पुन्हा राग मानायचा!

गेल्या बुधवारची गोष्ट. आम्ही एका हॉटेलात बसलो होतो. आम्ही म्हणजे प्रथमपुरुषी आदरार्थ एकवचनी या स्टाइलमध्ये नव्हे! संस्थानं कधीच खालसा झाली. त्यामुळे ‘परधानजी, आम्ही राज्याचा फेरफटका मारणार आहोत’ या टाइपचा डायलॉग आता रद्दबातल झालाय. नाही म्हणायला हल्लीच्या मराठी मालिकांमध्ये भरजरी वस्त्र परिधान केलेलं किमान एक स्त्रीपात्र आत्याबाई किंवा माँसाहेब या भूमिकेत शिरून ‘आम्ही हे कृत्य खपवून घेणार नाही’ असा मोबाईल फोनवरून कोणाला तरी दम भरत असलेलं दिसतं. पण हॉटेलात आम्ही म्हणजे मी सहकुटुंब बसलो होतो. टेबलाच्या एका बाजूला मी. समोरच्या बाजूला एका आसनात कुटुंब. दुस-या आसनात आमचं कन्यारत्न.

हल्लीच्या फॅशनप्रमाणे कन्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली. त्यामुळे संभाषण द्वैभाषिक स्वरूपात होऊ घातलेलं. धर्मपत्नी कटाक्षानं मराठीतूनच बोलून सुकन्येचा इंग्रजी मनसुबा क्षणाक्षणाला हाणून पाडत होती. मी नेहमीप्रमाणे त्या दोन शत्रूराष्ट्रांमध्ये तह करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे, ‘टु बिगिन विथ, आपण नवरत्न इडली, पंजाबी समोसे आणि फ्रूट ज्यूस ट्राय करू या का?’ असं मायबोलीत विलायती पाणी मिसळून दोघींना सांभाळून घेत होतो.

‘नो वे डॅडी! आय वाँट क्लब सँडविच, मश्रूम पिझ्झा अँड पेप्सी’, कन्यारत्नानं पहिला सुरुंग लावला.

पत्नीनं सुरुंग तात्काळ विझवून टाकला, ‘अजिबात नाही. हे महाराष्ट्रीय खाद्यालय आहे. कोथिंबीर वडी, झुणका-भाकर आणि पियूष मागवा हो.’

‘ओ शीट! यू ऑल्वेज ऑर्डर हॉरिबल स्टफ, मॉम!’

‘मला मॉम म्हणायचं नाही चारचौघात. लाज वाटते मला. आणि ह्यांनाही बाबा म्हण.’

‘मला चालेल की डॅडी म्हटलेलं. नो प्रॉब्लेम.’

‘अहो, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे की नाही तुम्हाला? मातृभाषेला अव्हेरायचं म्हणजे खुद्द स्वत:च्या मातेला विसरण्यासारखं आहे! म्हणूनच मी सारखा आग्रह धरत होते की, हिला मराठी माध्यमाच्या शाळेत घाला. पण तुमची आधुनिकतेची थेरंच आड आली ना? भोगा आता.’

‘मी कुठे काय भोगतोय? दोघींनी मिळून तासाभरात ऑर्डर फायनल केलीत तरी मी खुश होईन. शाळेचं म्हणशील तर मराठी माध्यमाच्या शाळाही आता इंग्लिश मिडियममधूनच शिकवतात.’

‘एक जागतिक भाषा म्हणून इंग्रजी शिकायला माझी हरकत कधीच नव्हती. पण मराठी आणि संस्कृत या भाषा आपल्या मुलांना यायलाच हव्यात. संस्कृत म्हणजे आपली मूळ भाषा. ती समजत नसेल तर आपण भारतीय म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे?’

‘ओ शीट! सॅनक्रित इज अ डेड लँग्वेज. पण मॉम, सॉरी, आई मला मराठी क्रिप्ट रीड करता येतं.’

‘देवनागरी लिपी म्हणतात ग सोने तिला. मराठी क्रिप्ट नाही.’ आईनं लेकीची तांत्रिक चूक दुरुस्त केली.

‘तेच ते. सी.. आय कॅन. समोरचा बोर्ड मी वाचून दाखवते. वाचू?’

‘वाच ना. परवानगी कसली विचारतेस?’

लेकीनं एकेक शब्द धीम्या गतीनं वाचला, ‘पुन: राग मानायचा. आय रिपीट, पुन: राग मानायचा.’

‘काय?’ मी आणि सौ. एकाच वेळी तारस्वरात किंचाळलो. परिणामी समोरून येणा-या वेटरच्या हातातला ट्रे हिंदकळला. ट्रेमधलं गरमागरम झणझणीत सांबार डाव्या टेबलावरच्या स्लीव्हलेस टॉपवर थोडंसं आणि बाकीचं उघडय़ा दंडावर सांडलं. मेदूवडय़ाची प्लेट तिच्या समोर बसलेल्या मित्राच्या उताण्या हेल्मेटमध्ये पडली. तिच्या बोंबलण्याकडे दुर्लक्ष करून त्यानं प्रथम फुकटात मिळालेले दोन्ही मेदूवडे तोंडात कोंबले आणि मग तिच्या दंडाला पकडून तो तिला वॉश बेसिनकडे घेऊन गेला.

गोंधळ निवळताच आमच्या कन्यारत्नानं जाहीर केलं, ‘यस. आय अ‍ॅम राइट!’

‘अशी पाटी आहे या हॉटेलात?’

‘ऑफ कोर्स! ती काय. पुन: राग मानायचा.’
चक्रम पाटय़ांसाठी पुणे शहर अखिल विश्वात नाव राखून आहे. ही साथ आमच्या शहरातही पसरली की काय? की या हॉटेलचे खुद्द मालकरावच मूळचे पुण्याचे?

‘बट डॅडी, आय मीन बाबा, टू बिगिन विथ, पहिल्यांदाच राग का मानायचा?’

‘इतकं खराब आहे का हो हे खाद्यगृह? म्हणजे गिऱ्हाईक रागावणार हे गृहीतच धरलेलं दिसतंय. आपण निघूया का इथून?’ सौ.नं काढता पाय घेण्याचा इरादा जाहीर करत पर्स उचलली.

‘छे ग. हा तर आमचा नेहमीचा अड्डा आहे. इडली तर अशी झक्क वाफाळलेली असते की फुंकून फुंकून खावी लागते. तसाच इथला पंजाबी सामोसा. आतलं पुरण तर इतकं झणझणीत असतं की सरदारजींच्या कानफटात..’

‘पुरण नाही सारण. पुरणपोळीत घालतात ते पुरण. बटाटेवडा, कचोरी, सामोसे यात घालतात त्याला सारण म्हणतात.’

‘तेच ते. सतत भाषेच्या चुका काढत बसू नकोस गं. नावाला महत्त्व नाही. चव महत्त्वाची. तेव्हा तू काळजी करूच नकोस. आपली मनीबॅक गॅरंटी आहे. डोळे झाकून काय हवं ते मागव.’

‘पण मग अशी पाटी लावलीच का मुळात? तुम्ही माझं जरा ऐकता का? गल्ल्यावर बसलेल्या गृहस्थांना विचारून या. म्हणावं गिऱ्हाईक धास्तावतं अशी पाटी वाचून. तर नक्की प्रयोजन काय या पाटीचं?’

‘कुठे आहे ती पाटी?’ मी जमेल तितकी मान वळवत विचारलं.

लेकीनं पाटीकडे बोट दाखवलं. बायकोनं पाटी वाचण्याचा प्रयत्न केला. पण तिला ‘दूरदृष्टी’ कमी असल्यामुळे आणि चष्मा दुस-या पर्समध्ये राहिल्यामुळे ते जमलं नाही.

मग मी उठलो. उभा राहिलो. पाटी मनातल्या मनात वाचली. मग मोठय़ानं वाचली, ‘पुनरागमनायच’

बायकोनं ते ऐकलं आणि लेकीच्या पाठीत धपाटा घालण्यासाठी हात वर करून म्हटलं, ‘गधडे! काहीतरीच काय वाचतेस? पाटीवर छान लिहिलंय. पुनरागमनायच. म्हणजे परत आगमन करा.’

‘परत आग? म्हणजे? परत काय करा?’ लेकीनं अतीव भाबडेपणानं प्रश्न विचारला.

धपाटा मारण्याकरता वर केलेल्या उजव्या हाताशेजारी डावा हात धरून नमस्कार करत पत्नी म्हणाली, ‘बाई ग, याचा अर्थ परत या. कळलं? पुन्हा या.’मी हुश्श करून स्थानापन्न झाल्यावर आम्हा दोघांसमोर तेच हात ओवाळत समोरून अहेर आला, ‘बघितलंत? किती धिंडवडे काढतेय कन्यका आपल्या मातृभाषेचे. वा रे वा! आता तरी कौतुकं पुरे करा आणि मराठी वर्तमानपत्रं वाचायला लावा हिला दर दिवशी. आणि काय अडलं तर मला विचार ग पोरी.’

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पण 'पुनरागमनायच' हे मराठी कुठे आहे? हे तर सन्स्क्रित आहे.
बाकी (काही) मराठी वृत्तपत्रांमधलं मराठी कन्यकेच्या मराठीपेक्षा फार वेगळं नसतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे मात्र खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद वर्दे

लेखकाचं प्रस्तुत साईट वर स्वागत आहे.

खुसखुशीत लिखाण. माझ्या लहानपणी मी "कांचसामानाचे दुकान" च्या ऐवजी "कांचनमालाचे दुकान" असं वाचल्याचं स्पष्ट आठवतंय Smile

असंच अजून लिखाण येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद वर्दे

हा हा हा! खुसखुशीत लेखन!
बाकी, मुलीला मराठी वर्तमानपत्रं वाचायला लाऊन कशाला मराठी बिघडवताय तिचं? त्यापेक्षा न आलेलं बरं Wink Blum 3

असो. ऐसी अक्षरेवर स्वागत! येऊ देत अजून असेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद वर्दे

भाषा 'मिसळ' संस्कृतीचा अपरिहार्य परिणाम मजेदार पद्धतीने सांगितला आहे तुम्ही.
मराठी वर्तमानपत्र वाचून मराठी सुधरेल? अशी अपेक्षा करणारे लोक आहेत अजून हे वाचून गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती, ऋषिकेश आणि आतिवास, धन्यवाद. आपले निरीक्षण शम्भर ट्क्के पटले. सध्याच्या मराठी वर्तमानपत्रातील आणि वाहिन्यामधील भाषा सन्करित आहे. पण ती नक्की कोणाची ते मात्र उमजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद वर्दे

वा ! अगदी सोज्ज्वळ विनोदी लेख. बाकी नवीन पिढीचे मराठी ऐकून राग वगैरेसुद्धा मानायची सोय नाही हं ! मराठी वाचन-लेखन आपल्या पिढीबरोबरच संपणार की काय अशी भिती वाटते. शुद्ध लेखन तर केव्हाच इतिहासजमा झाले आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम मस्त आणि फ्रेश वाटले लिखाण, मझा आला!
मुले आणि भाषा ह्यावरून एकदम हे आठवले Smile

- (पुनरागमनाय आवडलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली. बूकमार्क करून ठेवलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

'ऐसीअक्षरे' वर यायला सांगा तिला.. ठेवणीतलं मराठी शिकेल लवकरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

लिखाण एकदम खुसखुशीत झालय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या बोंबलण्याकडे दुर्लक्ष करून त्यानं प्रथम फुकटात मिळालेले दोन्ही मेदूवडे तोंडात कोंबले

हाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख गमतीदार आहे!

अवांतरः"पुनरागमनायच" असं का म्हणतात? संस्कृतमध्ये च हा प्रत्यय "आणि" या अर्थाने वापरतात ना? पण इथे तर एकच कृती आहे त्यामुळे "पुनरागमनाय" इतकंच लिहायला पाहिजे ना?
कदाचित हे कुठल्यातरी पोथीतल्या श्लोकावरुन आलेलं असेल. यावरुन आठवलं. अकरावीत आमच्या वर्गाचं हस्तलिखित वार्षिक काढायचं होतं. उज्ज्वल भविष्य असा नेहमीचा विषय होता. नाव ठरवायला भरलेल्या मीटिंगमध्ये मी "ज्योतिर्गमय" हे नाव सुचवलं तर बाकीच्यांनी ते रिजेक्ट केलं कारण "तमसो मा ज्योतिर्गमय" हे खूप मोठं होईल म्हणून. मी एक-दोनदा म्हणून पाहिलं की "तमसो मा" लिहायची गरज नाही; पण व्यर्थ. शेवटी "झेप" हे अतिशय कल्पक नाव ठरवले गेले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

पण तिला ‘दूरदृष्टी’ कमी असल्यामुळे

पुरण-सारण चूक तर कहर आहे. अगदी बरोबर फटकावलन त्या पत्नीने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0