धार्मिक संकेतस्थळे अश्लील संकेतस्थळांहून अधिक असुरक्षित

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार आंतरजालावरच्या धार्मिक संकेतस्थळांवर फेरफटका मारला तर तुमच्या संगणकात विषाणूसंसर्ग होण्याची शक्यता ही अश्लील संकेतस्थळांवरच्या फेरफटक्यापेक्षा अधिक असते. संकेतस्थळ चालवण्यामागची आर्थिक कारणं हा एक घटक यामागे असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकाधिक ग्राहक आपली सेवा वापरण्यासाठी पैसे देतील अशी आशा अश्लील संकेतस्थळांना असते. अशा ग्राहकांना आपल्या संकेतस्थळावर असुरक्षित वाटू नये याची काळजी त्यामुळे तिथे घेतली जात असावी. त्या मानानं निव्वळ विचारप्रणालींचा प्रसार करण्यासाठी आंतरजालावर आपलं संकेतस्थळ स्थापन करणारे लोक तितकी काळजी घेत नसावेत. त्यामुळे त्यांच्या संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षाछिद्रं आढळत असावीत असा अंदाज आहे. 'ऐसी अक्षरे'चे वाचक याची नोंद घेऊन आपल्या आंतरजालावरच्या वावराविषयी जागरूक राहतील आणि कदाचित आपल्या वावरात योग्य दिशेनं बदल करतील अशी आशा आहे.

त्याशिवाय आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे भारतातून सर्वाधिक स्पॅम निर्माण होतं. अमेरिका या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

अधिक माहितीसाठी पाहा : दुवा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

>>निव्वळ विचारप्रणालींचा प्रसार करण्यासाठी आंतरजालावर आपलं संकेतस्थळ स्थापन करणारे लोक तितकी काळजी घेत नसावेत. त्यामुळे त्यांच्या संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षाछिद्रं आढळत असावीत असा अंदाज आहे.
अच्छा! याबाबत 'ऐसी अक्षरे'चे म्हणणे काय आहे? सध्या इथं बरंच। काही वैचारीक सुरू आहे म्हणून विचारतोय. Wink
>>'ऐसी अक्षरे'चे वाचक याची नोंद घेऊन आपल्या आंतरजालावरच्या वावराविषयी जागरूक राहतील आणि कदाचित आपल्या वावरात योग्य दिशेनं बदल करतील अशी आशा आहे.
म्हणजे? 'तिकडॅ' जावं लोकांनी असं म्हणताय की काय? सुरक्षीत स्थळी हो... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक बातमी आहे.

थोडक्यात संगणक आणि डोकं दोन्ही पोखरतात तर काही प्रकारची स्थळं!

अच्छा! याबाबत 'ऐसी अक्षरे'चे म्हणणे काय आहे? सध्या इथं बरंच। काही वैचारीक सुरू आहे म्हणून विचारतोय. (डोळा मारत)

इथे सगळेच हौशे-नवशे-गवशे. संगणक पोखरला जाईलच याची खात्री नाही. पण डोकं पोखरल्याचा आव नक्की आणला जाईल. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>>>'ऐसी अक्षरे'चे वाचक याची नोंद घेऊन आपल्या आंतरजालावरच्या वावराविषयी जागरूक राहतील आणि कदाचित आपल्या वावरात योग्य दिशेनं बदल करतील अशी आशा आहे.

माझ्यामते वावरातला बदल या दिशेने असायला हवा की आपल्या संगणकावरची सुरक्षाव्यवस्था जमेल तितकी अद्ययावत् बनवावी. कुठलीही साईट ही सुरक्षाछिद्रांनी ग्रस्त असू शकते इतकाच सोप्पा याचा अर्थ होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार आंतरजालावरच्या धार्मिक संकेतस्थळांवर फेरफटका मारला तर तुमच्या संगणकात विषाणूसंसर्ग होण्याची शक्यता ही अश्लील संकेतस्थळांवरच्या फेरफटक्यापेक्षा अधिक असते

लोक सारखे तक्रार करत असतात व्हायरस इन्फेक्शनचे, पण माझा कंप्युटर आजवर कधी इन्फेक्ट का झाला नाही याचं उत्तर मला आता कळलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही सुरक्षा सापेक्ष आहे हे लक्षात असू द्या.

नशीब, या दोन्ही प्रकारात न मोडणारी संकेतस्थळं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकालच्या कुठल्याही नियतकालिकात कॅची हेडलाईन असल्यास लेखाचे कंटेट कमी दर्जाचे असण्याची शक्यता दाट असते.

"Peace means having a bigger stick than the other guy!" — Howard Stark
Christine Everheart - That's a great line coming from the guy selling the sticks.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धर्म हा सेक्ष पेक्षा ज्यास्त 'चढतो'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मग धार्मिकते कडून अश्लीलतेकडे वळू म्हणता? बरं आता म्हणताच आहात तर ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर लावा जोर, आता काय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

इश्श्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!