कविता .......उरल्या उपरेपणाच्या. ..

कविता .......उरल्या उपरेपणाच्या. ..

खरं तर आमच्याकडे
लिहीण्यासाठी
दाखवण्या बघण्यासाठी
ठोस असे काहीच नाही

ना चुलाण्याचा धूर
ना घुंगराचे छुन्नक गाणे
ना देवळातील हरी विठ्ठल गजर
ना अति किंवा अनावृष्टीचे
दणके फटके
ना वर्णाचे न धर्माचे
ना भाषेचे न असण्या नसण्याचे
पीळ कोणतेच

इकडे नव्यांना तर आम्ही
कधीच आपलं मानलं नाही
वर इथे राहून
तिकडचे कढ काढण्यात
लेखण्या झिजून गेल्या
हाताचे घट्टे भेगाळून गेले
मागच्या पुढच्या बटा
विरळ होत रुपेरी होत गेल्या
आम्हालाही चुकवून

आता हिंदकळणे फक्त
एकूणच सीमारेषांवर अधांतरी
त्यांनी पूर्वीच मिटली कवाडे
यांच्या आमच्यात नादान दुरावा
आता सुकलेल्या फोलपटांमधून
कविता .......उरल्या उपरेपणाच्या.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या वरील प्रतिसादास श्रेणी मिळाली आहे. तरीही मी हा प्रतिसाद संपादित करू शकतो. तो केला तर ती श्रेणीच 'निरर्थक' ठरू शकते. ही जरा गडबड वाटते.
श्रेणी: माझा प्रतिसाद निरर्थक वाटला हे मौजेचे आहे. अर्थात, हा ज्याची त्याची जाण, समज वगैरेचा भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता आवडली.
असण्या नसण्याच पीळ आणि नादान दुरावा हे विशेष आवडलं.

मागे सोडलेल्या रस्त्याला, गावाला नाव न देता संदिग्ध ठेवल्यामुळे ही कविता अधिक व्यापक झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0