Skip to main content

अथाङ्ग

दे झोकून एक उडी
काळ्याशार खोल डोही
अंधाराच्या मोज विटा
पापणी काळी दर डोई

उजेडाचा नको संग
अंधार उसवेल काळा तंग
हात राहो नुसता रिक्त
पाऊलही काळे अभंग

काळोखाची लागो समई
निथळो सारी काळी शाई
व्याकुळतेचा काळा सूर
अंधाराची होवो आई

काळसुद्धा हवा काळा
उजेड लावी भलता लळा
माझे मन शोधू पाही
काळोखाच्या नाना कळा