कडू कडू कारले

एक होता _ _ _, गाव त्याचे पार्ले
आवडायचे त्याला, कडू कडू कारले

एकदा त्याने खाल्ले, गोड गोड कारले
आणि त्याचे डोके, फिर फिर फिरले

“आवडे मला कडू, आणि हे काय चारले”
असे म्हटले जिभेने, नि मानगूट त्याचे धरले

कॉफीचे पाकीट त्याने, आणले भलेथोरले
बाटलीभर कॉफी प्यायला, तरी नाही पुरले

कडूशार कोयनेल, होते घरी उरले
बादलीभर प्यायले, तरी नाही पुरले

अंगणात होते पाच, कडुनिंब पेरले
एक अख्खे झाड खाल्ले, तरी नाही पुरले

शेवटी त्याच्या डोक्यात, खरे काय ते शिरले
आणून कडू साखर, तिचे बकाणे भरले

पळून गेले जिभेवरचे, गोड उरले-सुरले
’हुश्श’ म्हणून त्याने, खाल्ले कडू कडू कारले

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा!
लय म्हंजे लयच भारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile गमतीदार!

बालकवितेत चोख लयीचे महत्त्व फार असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाडगावकर कवी
पापड-कविता करी
त्यापेक्षा ही
कारले कविता बरी

पापडाचे काय
तळा नाहीतर भाजा
नाहीतर त्यात
काही नाही मजा

कारल्याचे काय
कसेही शिजवा
मात्र त्यात भरपूर
साखर-गूळ हवा

आता टंकणे पुरे
"शिदोरी" संपली
शिवाय इथे कामाची
आहे रास पडली

(कधीमधी यमक्या) सुनील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

गोड कारलं खाऊन जिभेला आलेला गोडवटपणा घालवण्यासाठी कडू कडू साखर खायची ही आय्ड्या भारी आहे.
एकंदरीतच कवितेतलं कल्पनावैचित्र्य आणि अतिशयोक्तीपूर्ण वर्णन मस्त जमलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

हाहाहा! आवडली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको