कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अ‍ॅट बीच

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्‍यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्‍याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.

मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा 'उतारा' म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. Smile

प्रकार मलिबू कोकोनट रम आणि आल्मन्ड (बदाम) लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
मलिबू कोकोनट रम 1.5 औस (45 मिली)
अमारेतो लिक्युअर (Amaretto Liqueur) 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
संत्र्याचा रस
बर्फ
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.

आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, 'सनराइज'चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.

चला तर मग, अ डे अ‍ॅट बीच तयार आहे. Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कॉकटेल तर निदान बघायला तरी आवडलंच. पण एकदा तुझ्या घरी फोटो काढायला विशेष आलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह व्वा,

आपली 'पाय'धूळ ह्या गरीबाच्या घरात पडेल तो सुदिन Wink

- (गरीब, बिच्चारा, निवासी भारतीय) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0