कुजबुज

फार फार दिवसान्नी येई
सायसाखरी हाक कापरी
सुरकुतलेत्या मऊ आजीची..
खोल तळाशी कुजबुज होई
गोधडीच्या त्या गडद उबेशी

सायङ्काळी कधी अचानक
आठवणीञ्ची होते दाटी
भरून जाते शब्द निसटता
अश्रुन्नीही व्याकुळ दृष्टी

आजच का हे आठवायचे होते सारे?
दिसावयाचे आजच अन् चेहेरेही परके?
हनु लपविता गच्च उराशी गुडघ्यांवरती
अश्रुञ्चे भित्रेपण त्या अन्धारी सरते .....

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

निव्वळ गर्दीनेच गुदमरवणाऱ्या, प्रेमाने विमनस्क करणाऱ्या आठवणींची ही कविता. सायसाखरी हाक कापरी खूप आवडलं.

मात्र चेहेरेही परके वर अडखळलो. आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणी येत असताना हे परके चेहेरे कुठून येतात नीट समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजावून देण्याच्या दृष्टीने याला उत्तर देणे खरे तर कठीण आहे. इतकेच म्हणू शकतो की तुम्ही या कवितेपर्यन्त पोहोचताना ज्या जीवनचक्रातून गेलात, ते माझ्या जीवनचक्रापेक्षा वेगळे होते. त्यामुळे, मला जो अनुभव ही कविता होताना आला, तो तुम्हाला तशाच किंवा वेगळ्या प्रकारे भिडू शकला नाही. अगदी वैयक्तिकच बोलायचे झाले तर काही प्रसङ्गान्त आपले म्हणून असलेले चेहरे देखील अचानक परके होतात. तेंव्हा आजीच्या प्रेमळ हाकेची/स्पर्शाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता खूपच आवडली. काही आठवून गेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मस्तच! पटकन स्वतःला जोडता येईल अशी कविता.
पहिल्या काहि ओळींनी एकिकडे 'पैठणी' आथवत होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!