मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक

मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.

इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.

मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात. स्मरणशक्ती अफाट आहे.

अध्याय नं १६ श्लोक नं १९ असे उल्लेख धडाधड येतात.

त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन काही तरुण, काही तरुणी इस्लामच्या शरणमधे येतात.
आता डॉ. झाकीर नाइक यांनी आपल्या भाषणात मांडलेले काही मुद्दे पहा.

एका मुलीने झाकीरना विचारले, ' तुम्ही म्हणता एवढा इस्लाम चांगला आहे मग लोकांना स्वीकारायला इतका वेळ का लागतोय'

यावर डॉ. झाकीर म्हणतात' प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. इस्लाम स्वीकारणे तेवढे सोपे नाही.
इस्लाममधे दारु हराम आहे. लफडेबाजीला परवानगी नाही.
त्यामुळे इस्लाम स्वीकारायचा तर आधी दारू सोडावी लागते, लफडेबाजीचा त्याग करावा करावा लागतो.
यामुळे लोकान्ना इस्लाम स्वीकारायला वेळ लागतो."

पण मनात प्रश्न येतो, "आमचा धर्म दारू प्या, लफडी करा' असे सांगतो की काय ? " डॉक्टर तुम्हाला अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे आहे का !

कधी एखाद्या भाषणात झाकीर कोणकोणती वाद्ये इस्लाममधे निषिद्ध आहेत ते सांगतात

यामधे बासरी निषिद्ध आहे.

एखादा श्रद्धाळू उभा राहतो, विचारतो "भगवान श्रीकृष्णांच्या हातात बासरीच होती"
यावर झाकीर विचारतात "ते बासरी कशासाठी वापरीत?"
श्रद्धाळू म्हणतो "गोपी स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी"
झाकीर खूष होऊन जातात. म्हणतात पहा "यासाठीच इस्लाममधे बासरी निषिद्ध आहे, बासरीमुळे मन उद्दीपित होते, शांत होत नाही"
--
त्यांच्या भाषणात अनेक मुस्लिम राष्ट्रांचा उल्लेख होतो.
पाकिस्तान आणि पाकिस्तानपेक्षाही सौदी अरेबियाचे कौतुक फार.
एकदा कुणी विचारले, "सौदी अरेबियामधे इतर धर्मांना परवानगी का नाही ?"

तर ते उदाहरण देतात, " गणित शिकवणारा एक शिक्षक म्हणतो २+२ = ५
दुसरा म्हणतो २+२ = ६ आणि तिसरा म्हणतो २+२ = ४, मग आपण २+२ = ४ म्हणणार्‍या
शिक्षकालाच शिकवायला ठेवणार ना ? बाकीची उत्तरे चूक आहेत आपल्याला माहीत असते.
मग बाकीच्या गोष्टी चूक आहेत माहीत असताना त्या आपण कशा स्वीकारणार ?"

अतिशय धक्कादायक -
डॉ. झाकीर ओसामाचं उघड समर्थन करतात.
ते म्हणतात, "He is terrorising the terrorist then it is ok"
अमेरीका हीच खरी टेररीस्ट आहे अशी एक धारणा आहे. त्यामुळे अमेरीकेविरुद्ध काहीही केलं तरी ते क्षम्य आहे.

त्यांची भाषाही ठीक नाही
त्यांना एका महिलेने विचारले, "एका पुरुषाने ४ स्त्रियांशी लग्न करणे योग्य आहे का ?
हा स्त्रियांवर अन्याय नाही का ?"

यावर झाकीर म्हणतात, "It is better to become private property than public property"
यावर ते स्त्रियांबद्दल बरेच काही बोलतात पण त्या गोष्टी इथे लिहिणे प्रशस्त वाटत नाही.

एका स्त्रीला सोडून तिचा नवरा परदेशात गेला. तिथे त्याने दुसर्‍या महिलेशी लग्न केले
आणि आपल्या पहिल्या बायको नि मुलांना वार्‍यावर सोडले.
या स्त्रीने डॉ झाकीर नाइक यांना प्रश्न विचारला,'असे न सांगता नवरा दुसरं लग्न करत असेल तर याबाबत इस्लाम काय म्हणतो'

झाकीर म्हणतात, नवर्‍याने पहिल्या बायकोला इन्फॉर्म करणे गरजेचे आहे पण परवानगी घेणे बंधनकारक नाही

शंकर, गणपती या देवां बद्दलही वेडेवाकडे विचार ते प्रकट करतात. विचित्र उद्गार काढतात.
जमलेल्या लोकांनाही ते तसेच विचार प्रसृत करण्याचा सल्ला देतात.

असे विचार प्रकट करून श्रद्धावंतांच्या भावना दुखावल्या तरी हरकत नाही, परवा करू नका असेही सांगतात.

पुढे
'या देशाला वंदन करायला आम्हाला आमचा मजहब परवानगी देत नाही' असे दिव्य ज्ञानही ते समोर बसलेल्या अनुयायांना देतात.

यावर काय बोलणार

तुका म्हणे उगी रहावे
जे जे होइल ते ते पहावे.

---

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ऐसी अक्षरेवर स्वागत!

तुका म्हणे उगी रहावे
जे जे होइल ते ते पहावे.

तुर्तास इतकेच म्हणतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0