सोळावं वर्ष...........

शून्यापासून सुरू होऊन अनंतापर्यंत पोचणार्‍या अंकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उदाहरणार्थ --
शून्य - निराकार चैतन्यस्वरूप; एक - आत्मा, जगदात्मा; दोन - ग्रहणे; तीन - त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम; साडेतीन - मुहूर्त; चार - आश्रम; पाच - तत्त्वे; सहा - रिपु; सात - सप्तपदी; आठ - गंध; नऊ - ग्रह; अकरा - रुद्र; बारा -राशी; तेरा - (अक्षरी) मंत्र; चौदा - विद्या; पंधरा - ??????????
सोळा - ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तू कितने बरस की? मैं सोलह बरस कीऽऽऽऽ’

असा हा सोळावा अंक आणि सोळावं वर्ष! बालपण आणि तारुण्य ह्यांच्या सीमारेषेवरील एक महत्त्वाचं वर्ष. माणसाच्या आयुष्यात अद्भुतता घेऊन येणारं!

मिलिंद बोकीलांच्या ‘शाळा’मधील मुकुंद जोशीला सोळावं वर्ष अवचितपणे भेटतं. तो म्हणतो,
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्या कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत. फळा नाही, शिक्षक नाहीत. पण त्यातलं शिकणं सुंदर आहे."

अरविंद गोखले ह्यांच्या ‘आभा सावंत’ च्या मनात सोळावं वर्ष कसं येतं? पुरूषाची चाहूल घेऊन, बोक्याच्या रुपानं, मांजर-पावलांनी कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता तिच्या मनात ते प्रवेश करतं.

आणि...... अमृता प्रीतम...
आपल्या ‘सोलहवां साल’ विषयी ‘रसीदी टिकट’ मध्ये लिहितात ---
‘सोलहवां साल आया - एक अजनबी की तरह। पास आकर भी एक दुरी पर खडा रहा। मैं कभी चुपचाप उसकी ओर देख लेती, वह कभी मुस्कुराकर मेरी ओर देख लेता।’
‘वह कभी किसी रात मेरे सिरहाने की खुली खिडकी में से होकर चुपचाप मेरे सपनों में आ जाता, या कभी दिन के समय, मेरे पिता को सोये हुए देखता तो वह घर की दीवार फांदकर आ जाता, और मेरे कमरे के कोने में लगे हुए छोटे-से शीशॆ में आकर बैठ जाता।’
‘कहते हैं, ऋषियों की समाधी भंग करने के लिए जो अप्सराएं आती थी, उसमें राजा इंद्र की साजिश होती थी। मेरा सोलहवां बरस भी अवश्य ही ईश्वर की साजिश रहा होगा, क्योंकी इसने बचपन की मेरी समाधी तोड दी थी। मैं कविताएं लिखने लगी थी और हर कविता मुझे वर्जित इच्छा की तरह लगती थी। किसी ऋषी की समाधी टूट जाए, तो भटकने का शाप उसके पीछे पड जाता है - ‘सोचों’ का शाप पीछे पड गया....’
‘वास्तव में यह वर्ष आयु की सडक पर लगा हुआ खतरे का चिन्ह होता है (कि बीते वर्षों की सपाट सडक खत्म हो गयी है, आगे ऊंची-नीची भयानक मोडोंवाली सडक शुरू होनी है, और अब माता-पिता के कहने से लेकर स्कूल की पुस्तकें कंठस्थ करने, उपदेश को सुनने-मानने और सामजिक व्यवस्था को आदर-सहित स्वीकार करने के भोले-भाले विश्वास के सामने हर समय एक प्रश्न-वाक्य आ खडा होगा...) इस वर्ष जाना-पहचाना सब कुछ शरीर की वस्त्रों की तरह तंग हो जाता है, होठ जिन्दगी की प्यास से खुश्क हो जाते हैं, आकाश के तारे, जिन्हे सप्त-ऋषियों के आकार में देखकर दूर से प्रणाम करना होता था, पास जाकर छू लेने को जी करता है... इर्द-गिर्द और दूर-पास की हवा में इतनी मनाहियां और इतने इन्कार होते हैं और इतना विरोध की सासों में आग सुलग उठती है...’
‘जिस हद तक ये सब औरों के साथ होता है, मेरे साथ उससे तिगुना हुआ (एक, आस-पास की मध्यम श्रेणी का फीका और रस्मी रहन-सहन; दूसरे मां के न होने के कारण हर समय मनाहियोंका सिलसिला और तीसरे पिता की धार्मिक अगुआ होने की हैसियत में मुझपर भी अत्यंत संयमी होकर रहने की पाबन्दी) इसलिये सोलहवे वर्ष से मेरा परिचय उस असफल प्रेम की तरह था, जिसकी कसक सदा के लिये कहीं पडी रही जाती है और इसीलिये वह सोलहवां वर्ष भी अब मेरी जिन्दगी के हर वर्ष में कहीं-न-कहीं शामील है...’
‘मेरा खयाल है जब तक आंखो में कोई हसीन तसव्वुर कायम रहता है, और उस तसव्वुर की राह में जो कुछ भी गलत है, उसके लिए रोष कायम रहता है, तब तक मनुष्य का सोलहवां वर्ष भी कायम रहता है (खुदा की जात की तरह हर सूरत में)।’
‘हसीन तसव्वुर एक मेहबूब की मुहं का हो, या धरती के मुंह का, इससे फर्क नहीं पडता। यह मन के सोलहवे वर्ष के साथ मन के तसव्वुर का रिश्ता है और मेरा यह रिश्ता अभी तक कायम है।’

निरनिराळ्या पुस्तकांच्या विश्वात जेव्हा आपण रममाण होतो तेव्हा आपल्या मनातील स्त्री-पुरूष, मुलगा-मुलगी असा भेद नाहीसा होतो. भाषेचं बंधन रहात नाही. लिखाण सहाव्या दशकातील आहे की एकविसाव्या शतकातील आहे ह्याच्याशी काही देणं-घेणं उरत नाही. मनाला भिडतात त्या त्यातील सहज-संवेदना!
नकळत आपणही विचारात पडतो-
‘आपलं आपल्या सोळाव्या वर्षाशी नातं इतक्या उत्कटतेनं कधी जडलं का? आजच्या आपल्या जगण्यात ते सोळावं वर्ष कुठे आहे?’

चित्रा....

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय पण अधिक बांधीव आणि विस्ताराने रंगवायला हवं होतं असं वाटलं.. रंगायला सुरवात होतेय तोच संपलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपलं आपल्या सोळाव्या वर्षाशी नातं इतक्या उत्कटतेनं कधी जडलं का?

नाही.
उत्कटतेने जडाव्या अशा अनेक गोष्टी सापडत गेल्या पण १६ व वर्षं त्यात नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"१६वं वरीस धोक्याचं" असल्या चित्रपटाचं नाव ऐकून मला लहानपणी ती एखादी रहस्यमय कथा वाटली होती..
की सोळाव्या वर्षी काही तरी भयानक होणार आहे वगैरे.
सतरा पे खत्रा हे समजलं तेव्हा मग लायनीत आलो आपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरा सोलहवां बरस भी अवश्य ही ईश्वर की साजिश रहा होगा, क्योंकी इसने बचपन की मेरी समाधी तोड दी थी। मैं कविताएं लिखने लगी थी और हर कविता मुझे वर्जित इच्छा की तरह लगती थी। किसी ऋषी की समाधी टूट जाए, तो भटकने का शाप उसके पीछे पड जाता है - ‘सोचों’ का शाप पीछे पड गया....’

मुलीला / मुलाला सोळाव्या वर्षी इतका सुंदर शाप लागला तर पालकांची झोप उडायचे कारण नाही! सुंदर परिच्छेद आहे, अमृता प्रीतमचे गद्यही किती काव्यात्म आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाने १४-१६ च्या आसपास असताना 'सोळाव्या वरीसा' बद्दल इतके कै वाचनात आले की भीतीच वाटू लागली. म्हंजे कसं, की सोळावं वरीस म्हणजे अमुक, तमुक, कांदा, लसूण...त्यामुळे आपण वागतो ते खरंच न्याचरल आहे की जे वाचतो त्याचा प्रभाव आहे असा प्रष्ण तेव्हाही पडल्याचे आठवते. यद्यपि नंतर कन्फ्यूजन क्लीअर झाले- बोळा निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0