याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं

नुकतंच हे वाक्य वाचनात आलं.

"याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली."
त्यावर सुनील यांनी म्हटलं की, विरामचिह्नांचा वापर केला नाही तर ते

याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

असे वाचले जाईल!

या लेखाचा उद्देश मौजमजेचा आहे.

१. याच वाक्यातले शब्द तेच ठेवून पण क्रम बदलून आणि विरामचिह्नं वापरून किती वेगवेगळे अर्थ अन्-अर्थ करता येतात? थोडेसे विभक्ती प्रत्यय बदलायलाही हरकत नाही.
२. पार्सिंग एररमुळे भलताच अर्थ निघतो अशी इतर उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत का?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मी सुरूवात करतो.

माझ्या, याच आडनावाच्या आईचं एका भारतीय डॉक्टरने बुडाचं हाड मोडलं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

माझ्या आडनावाच्या याच आईचं एका भारतीय डॉक्टरने बुडाचं हाड मोडलं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका भारतीय डॉक्टरने त्यावर माझ्या गेल्या आडनावाच्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली
एका भारतीय डॉक्टरने त्यावर माझ्या आडनावाच्या आईचं गेल्या बुडाचं हाड मोडलं होतं! त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली
एका डॉक्टरने त्यावर माझ्या भारतीय आडनावाच्या आईचं गेल्या बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली

वगैरे वगैरे.. बरेच वेरीएबल असल्याने खूप शक्यता आहेत वाचायला मजा येणारेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या वरून आठवण झाली.. Necessity is a mother of invention (गरज ही शोधाची जननी आहे) या वाक्यात Necessity, mother आणि invention याञ्च्या जागेची कशीही अदलाबदल केली तरी आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या प्रसङ्गास ते लागू पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आईचं बुडाचं हाड याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात माझ्या भारतीय आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
माझ्या भारतीय आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

हुश्श... बास्स. कंटाळलो आता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुमची प्रतिभा थोडी मोकाट सोडा राव. विभक्ती प्रत्ययांचं स्वातंत्र्य दिलं आहे ते घ्या, म्हणजे मस्त अनर्थ करता येतील.

माझ्या आईचं हाड शस्त्रक्रियेने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात याच बुडाच्या एका भारतीय डॉक्टरने आडनावाची केली.
माझ्या आडनावाच्या बुडाची शस्त्रक्रिया एका भारतीय डॉक्टरने केली. त्यावर याच आईचं हाड गेल्या आठवड्यात मोडलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काँग्रेसने भाजपाचा पराभव केला.
भाजपाने काँग्रेसचा पराभव केला.
पराभवाने भाजपाचा काँग्रेस केला.
पराभवाने काँग्रेसचा भाजप केला.
केल्याने भाजप-काँग्रेसचा पराभव (होईल).
केल्याने पराभवाचा काँग्रेस-भाजप (होईल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज आनंदी आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज आनंदी आनंद झाला या ऐवजी आज आनंदी आनंद झाली किंवा आनंद आनंदी झाला असे हवे होते.

संदर्भ :- आजचा लोकसत्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

> पार्सिंग एररमुळे भलताच अर्थ निघतो अशी इतर उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत का?

एस.टी. गेलेल्या प्रत्येकाला हे उदाहरण माहिती असतंच: शां त ता रा खा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

An English professor wrote the words, “Woman without her man is nothing” on the blackboard and directed his students to punctuate it correctly.

The men wrote: “Woman, without her man, is nothing.”

The women wrote: “Woman: Without her, man is nothing.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... nothingच्या ठिकाणी a beast घातलेली आणि विरामचिन्हांत किंचित बदल केलेली अशी ऐकली होती.

Woman, without her man, is a beast.

Woman! Without her, man is a beast.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घाईघाईने आणि भलतेच वाचले आणि तसे असते तरीही ही वाक्ये अशीच झाली असती का असे मनात आले.
मला वाटते Woman, without her man, is nothing. Woman! Without her, man is nothing. अशी मूळ वाक्ये आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ज्या सदस्यांची किर्ती दिगंतात मावत नाही त्यांनी असा फालतूपणा करावा याची मला स्वःताला एक ऐशी अक्षरेकार म्हणून शरम वाटली. आज मी ऐ अ कार याची खंत वाटत आहे
कळावे
आ न
टां

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

आपण पायात बूट घालतो की बुटात पाय? अंगात सदरा की सदर्‍यात अंग?

शब्द वेगळ्या पद्धतीने तोडण्याची मोरोपंती गंमत पाहा:

अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा|
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा||

अन्वयः महीवरा राया, (जसा) वारा अनलसमीहित साधी तसा (हे) धीरा, अनलस मीहि कामा यावा, रामही (यावा), वराका मा (दुसरे काय करणार? तीहि येईल.) (कंसातील शब्द अध्याहृत वाचायचे आहेत.)

मराठीत (!) अर्थ: हे पृथ्वीवरील श्रेष्ठ राजा, वारा जसा अनला(अग्नि)चे इच्छित साधतो (वार्‍यामुळे आग उफाळते), तसा हे धैर्यवान पुरुषा, मीहि अनलस (आळस न करता) तुझ्या कामाला (साहाय्याला ) येईन, तसाच बलरामहि येईल. त्यानंतर वराका (बिचारी) मा (लक्ष्मी - येथे कृष्णाची पत्नी रुक्मिणी) - तीहि येईल.

शब्दांची उलटापालट झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आमच्या शाळेच्या रस्त्यावर एक भिंतभर रंगविलेली जाहिरात होती. ती रोज येताजाता वाचून आम्ही खोखो हसत असू. जाहिरात होती पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्यांची.

इंग्रजीत spoonerism ची अनेक उदाहरणे आहेत, जसे I gave him a blushing crow (crushing blow).

झारची अमर्याद सत्ता रशियात चालत असे तेव्हाची एक गोष्ट. एका राजकीय कैद्याला खटला होऊन मृत्युदंडाची शिक्षा झाली. त्याने झारकडे दयेचा अर्ज केला. झारने अर्जावर हुकूम लिहिला простить нельзя казнить. (क्षमा करणे न मारणे). स्वल्पविराम टाकण्याचे झार विसरला. हुकूम बाहेर आला तेव्हा अधिकारी बुचकळ्यात पडले. अर्थ काय लावायचा - क्षमा न करणे, मारणे की क्षमा करणे, न मारणे? झारकडे पुनः जाऊन अर्थ विचारण्याचे धैर्य कोणीच केले नाही. त्यांच्या दृष्टीने सुरक्षित असा अर्थ त्यांनी लावला - क्षमा न करणे, मारणे आणि कैद्याच्या आयुष्याची दोरी तुटली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दांची उलटापालट झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आमच्या शाळेच्या रस्त्यावर एक भिंतभर रंगविलेली जाहिरात होती. ती रोज येताजाता वाचून आम्ही खोखो हसत असू. जाहिरात होती पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्यांची.

हीच जाहिरात आम्ही 'पर्गोलॅक्स - गुलाबाच्या जोडगोळ्या' अशी वाचत असू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरण मनोरंजक अाहे, पण मोरोपंतांना ही खोडच होती असं वाटतं. त्यामुळे शब्दांचे चमत्कार करण्याच्या अट्टाहासापायी अर्थाची तुटेपर्यंत अोढाताण करावी लागते असं त्यांच्या काव्यात फारवेळा झालेलं अाहे. त्यात ते शीघ्रकवी होते, म्हणजे कुठलाही शब्दप्रयोग ऐकला की तो मधेमधे तोडून त्याचं कसकसं वाटोळं करता येईल ह्याचा त्यांना ताबडतोब वास लागत असणार.

ते रोजच दुपारी बायकोला 'अातजाऊनचहाकर' असं म्हणत असल्यामुळे ती वैतागलेली होती, अाणि काहीवेळा मुद्दाम गार झालेला चहा अाणून देत असे, असा प्रवाद ऐकलेला अाहे.

(सॉरी. असा काही प्रवाद नाही. मी अात्ताच तो तयार केला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

स्पूनरिझमचे अजून एक उदाहरण -

If you hiss my mystery lecture, I will send you home by town drain.

(If you miss my history lecture, I will send you home by down train)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक उदाहरण देऊ ? कुमार सानू <=> सुमार कानू. (कानाला जो सुमार वाटतो तो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजीतले वाक्य "Time flies."
अर्थ १ : काळ उडून जातो.
अर्थ २ : माश्यांचा समय मोजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृतातला एक प्रश्न : 'कं बलवंतम् न बाधते शीतम् ?' (कोण असा बलबान आहे की ज्याला थण्डी वाजत नाही ? )
उत्तर : 'कंबलवंतम् न बाधते शीतम्' (तोच, ज्याने काम्बळे धारण केले आहे !)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील श्लोक

कं संजघान कृष्ण: का शीतलवाहिनी गङ्गा |
के दारपोषणरता: कं बलवन्तं न बाधते शीतम् ||

प्रसिद्ध आहे पण पुढील चुटका पहा:

एक राजा तसा असंस्कृत होता पण आपल्या ज्ञानाचा त्याला मोठा गर्व होता. त्याने अशी आज्ञा काढली होती की राजपरिवारात सर्व संभाषण केवळ संस्कृतमध्येच चालेल.

एकदा आपल्या राण्यांसह तो जलक्रीडा करीत असता त्याने एका राणीवर पाणी उडविले. ती त्याला म्हणाली, 'मोदकै: सिञ्च माम् !' राजाने लगेच सेवकाला मुदपाकखान्याकडे पिटाळले आणि मोदक आणवून राणीवर टाकले.

राणीला म्हणायचे होते 'मा उदकै: सिञ्च माम्' माझ्यावर पाणी उडवू नकोस !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्सेल वापरून क्रमचय(permutations) पद्धतिने 20,922,789,888,000 एवढी वाक्ये तयार करता येणे शक्य आहे.

वानगीदाखल -
मोडलं शस्त्रक्रिया त्यावर आडनावाच्या हाड गेल्या भारतीय होतं, याच बुडाचं आठवड्यात एका आईचं केली. माझ्या डॉक्टरने
आईचं मोडलं हाड होतं, भारतीय त्यावर माझ्या एका आठवड्यात गेल्या डॉक्टरने शस्त्रक्रिया बुडाचं आडनावाच्या केली. याच
आडनावाच्या होतं, मोडलं एका माझ्या भारतीय गेल्या त्यावर बुडाचं आठवड्यात आईचं हाड शस्त्रक्रिया याच केली. डॉक्टरने
एका शस्त्रक्रिया बुडाचं डॉक्टरने गेल्या मोडलं त्यावर याच भारतीय होतं, माझ्या आडनावाच्या केली. आईचं आठवड्यात हाड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण वरच्या वाक्यांमध्ये काही शब्द परत परत आलेले आहेत. काही गाळले गेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी! मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

काय राव काहीतरीच.

आमच्या (भारतीय) भाषा कसंही पार्सिंग केलं तरी सारखाच अर्थ दाखवतात म्हणून श्रेष्ठ आहेत म्हटलं !!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चिच्चा कुणीकडचे!

असो. कालच वाचनात आलेली गोष्ट. संदर्भ लोकमान्य ते महात्मा, खंड दोन. लेखक सदानंद मोरे. (प्रकरण १०४, पृष्ठ क्र: ६१९)

लिखाणातला संदर्भ असा, गोहत्या अगदी वेदकालापासून निषिद्ध आहे असं सिद्ध करायचं होतं. महाभारताच्या शेवटी, भीष्म शरपंजरी पडले असता बाणांची टोकं कशी टोचतात याचं वर्णन, "माघमासे गवा इव" असे आहे. गायीच्या बलिदानाचा माघ महिन्यातल्या धर्मकृत्याशी संबंध लागतो. मग त्याची मोडतोड करून "माघमा सेगवा इव" करून विंचवाच्या नांगीचा संदर्भ आणला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जयवंत दळवी आणि अनंत काणेकर एकदा कुठेसे जात होते. मधेच काणेकरांना एक लहानसे हॉटेल दिसले. 'चला दळवी, आज भंडार्‍याच्या हॉटेलात खाऊया' म्हणून काणेकर त्यांना तिथे घेऊन गेले.
मालक ऑर्डर घ्यायला आला. काणेकरांची ऑर्डर, ' दोन प्लेट हिन्दू '. मालक बुचकळ्यात पडला. दळव्यांना, काणेकर काहीतरी विनोद करत आहेत एवढे लक्षात आले, पण काय ते कळेना.
त्या हॉटेलवरच्या पाटीवर लिहिलेले होते, 'हिंदूचे मटणाचे हॉटेल'. ते वाचून काणेकर हिंदूचे मटण मागत होते. नंतर काणेकरांनी मालकाला चूक समजावून सांगितली आणि योग्य वाक्य कागदावर लिहून दिले. काही दिवसांनी तिथे नवी पाटी दिसू लागली, 'मटणाचे हिंदू हॉटेल'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा ओढून ताणून जोक वाटला. 'हिंदूचे मटणाचे दुकान' वाचल्यावर माझ्या मनात हिंदूचे 'मटणाचे दुकान' असेच आले. जर तिथे 'हिंदूचे मटण' मिळते असे दाखवून नाव द्यायचे असेल तर ते 'हिंदूच्या मटणाचे दुकान' होईल, 'हिंदूचे' नव्हे! इथे 'मटणाचे' हे हॉटेलचे विशेषण वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हिंदू मटण हॉटेल" असा विनोद असावा.

आणि नंतर "मटणाचे हिंदू हॉटेल" झाले असणार.

पण गंमत म्हणून ओढूनताणूनच असावा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जरा ओढून ताणून जोक वाटला. 'हिंदूचे मटणाचे दुकान' वाचल्यावर माझ्या मनात हिंदूचे 'मटणाचे दुकान' असेच आले. जर तिथे 'हिंदूचे मटण' मिळते असे दाखवून नाव द्यायचे असेल तर ते 'हिंदूच्या मटणाचे दुकान' होईल, 'हिंदूचे' नव्हे! इथे 'मटणाचे' हे हॉटेलचे विशेषण वाटते.<<

माझ्या मते जुन्या मराठीत 'चे' हा विभक्तिप्रत्यय 'च्या' या अर्थानंही वापरला जाई. उदा : 'तिचे कुंतली फूल चाफ्याचे' यातला पहिला 'चे' आज वापरला जात नाही. त्याऐवजी आज 'तिच्या कुंतली' म्हटलं जाईल, पण दुसरा 'चे' आजही वापरला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"खास खवैय्यांसाठी तांबडा-पांढरा रस्सा मिळण्याचे कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकाण...."

यात वरवर वाचता फरक जाणवत नाही. पण आम्ही ती मालकाला अनर्थ घडू शकणारी चूक दाखविली होती. 'खास खवैय्यांसाठी" याचा अर्थ इतरांना तिथे प्रवेश निषिद्ध असाही होऊ शकतो. विशेष म्हणजे कोल्हापुरी मालकाला ते पटले आणि मग बदल झाला "खवैय्यांसाठी खास तांबडा-पांढरा रस्सा मिळण्याचे कोल्हापुरातील एकमेव ठिकाण...."

२. मंगळवार पेठेत एस.टी.डी.बूथ बोर्ड होता :
"एक रुपयात लोकल कॉल जगात कुठेही बोला." मग नित्याची ग्राहकांची शाब्दिक मारामारी. एक रुपयात जगात कुठेही कसे बोलता येईल ? पंक्च्युएशनचे महत्व पटविले गेले. बोर्ड आता झाला. "एक रुपयत लोकल कॉल. तसेच जगात कुठेही कॉल करू शकता."

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चगेट्च्या भुयारी मार्गात असलेल्या एका दुकानासमोर एक पाटी वाचली होती. New jeans available. All colours guaranteed. मी आणि माझा मित्र ते वाचून कल्पना करू लागलो, की याचा अर्थ - एक जीन्स विकत घेतली की कालान्तराने सगळे तिला सगळे रङ्ग प्राप्त होतील, याची खात्री ! इथे विरामचिह्ने असूनही अनर्थ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपक्रमावरील काही सदस्यांना या संस्थळावर प्रवेश द्यावा. त्या सदस्यांना हा पार्सिंगचा प्रकार भलताच भावलेला दिसतो. पण उपक्रमावर मौजमजेला बंदी असल्यामुळे त्यांची कुचंबणा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मौजमजेला बंदी असल्यामुळे त्यांची कुचंबणा होते.

त्यांचा रामच * फुटका, त्याला कोण काय करणार! **


* राम = दैव = नशीब असा काही अर्थ होत असावा, असा आमचा आपला एक संशयसिद्धांत (पूर्वीच्या भाषेत 'अटकळ') आहे. (त्या रामाला हे 'दैवत्व' कधी प्राप्त झाले, यावर मात्र विद्वानांच्या मतांचे 'ऐकत्व' काही केल्या साधत नाही, असे काहीतरी आम्ही बुवा ऐकत आहोत. जाऊद्या. त्यांना साधकबाधक चर्चा करू द्या. आपण आपले ऐकत राहावे झाले.)

** राम आणि पांडू यांना एकत्र आणणारी अशाच अर्थाची काही नवी म्हण या निमित्ताने सुचली होती. ती येथे ठोकून देण्याचा मोह मोठ्या कष्टाने आवरला. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम आणि पांडू यांना एकत्र आणणारी अशाच अर्थाची काही नवी म्हण या निमित्ताने सुचली होती

द्या हो ठोकून! तसंही ठोकून दिल्याने फार तर काय होईल, तुम्हाला सुमार म्हणले जाईल इतकेच ना? Wink

-अतिसुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

... इशारा काफ़ी, असे काहीसे सुवचन आहे.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उपक्रम संकेतस्थळ आवडते.

नितिन थत्त्यांनी निर्देश केलेल्या चर्चेत मी "ऐसी अक्षरे"वरील चर्चेचे समर्थन केलेले आहे. आणि येथे उपक्रम संकेतस्थळावरील "राम, देवत्व" चर्चेचे समर्थन करत आहे.

मला या संकेतस्थळ-चिखलफेकीबाबत वाईट वाटते आहे. अर्थात चिखलफेकीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे. आणि चिखलफेक आवडत नाही हे म्हणण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिखलफेक करू नये : सहमत. (अशाच प्रकारचे मत मी पुर्वी उपक्रमावरही व्यक्त केले आहे.)

पण, विनोदाने केलेली टिका आणि खालच्यापातळीवरून (संस्थळा/सदस्यांच्या नामोल्लेखासकट) केलेली चिखलफेक यात मात्र सदस्यांनी फरक करावा. ज्याचेत्याचे निकष ज्यानेत्याने वापरावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile