विश्वनाथन आनंदचे अभिनंदन

बुद्धीबळाच्या विश्वविजेतेपदीच्या स्पर्धेत आव्हानकर्ता बोरिस गेलफांड (इस्रायल) याचा पराभव करून आनंदने आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले. भारतात जन्म झालेल्या बुद्धीबळासारख्या खेळात इतकी वर्षं भारत मागेच होता. गेल्या दशकात आनंदने ही त्रुटी भरून काढली आहे. तीसुद्धा सर्वोच्च स्थानी भारताचा झेंडा रोवून! या नेत्रदीपक कामगिरीबद्दल आनंदचे अभिनंदन.

या स्पर्धेत प्रथम दिवसाला एक डाव (काही विश्रांतीचे दिवस सोडून) याप्रमाणे १२ डाव खेळले गेले. पहिले सहा डाव बरोबरीत सुटल्यावर बोरिस गेलफांडने सातवा डाव जिंकून आघाडी घेतली. लगेच दुसऱ्या दिवशी आठवा डाव जिंकून आनंदने पुन्हा बरोबरी साधली. पुढच्या चार डावांत बरोबरीच झाल्यामुळे आज टायब्रेकर खेळला गेला. यात अर्ध्या तासाचे चार डाव खेळले गेले. आनंदने यातला दुसरा डाव जिंकून व इतर बरोबरीत सोडवून विजय प्राप्त केला.

आत्तापर्यंत खेळले गेलेले सर्व डाव इथे पहाता येतील: http://www.chessdom.com/anand-gelfand-live/

आनंदचे पुन्हा एकवार अभिनंदन.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आनंदचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या विषयावरचा एक उत्कृष्ट लेख :
http://rbk137.blogspot.com/2012/05/blog-post_30.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आनंदचे अभिनंदन.

राजचा हा ही लेख उत्तम आहे. तिथल्या प्रतिसादतली बुद्धीबळविषयक चर्चाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आनंदचे अभिनंदन. विश्वविजेतेपदाची स्पर्धा ही लांबलचक आणि कष्टप्रद असते. चार तासांचा अटीतटीचा डाव खेळून किती दमायला होतं ते मला स्वानुभवाने माहीत आहे. इथे तर महिनोन् महिने आधी तयारी, त्यात त्या तीन आठवड्यात प्रत्यक्ष स्पर्धेतल्या डावांपलिकडेही दररोज इतर डावांवर मेहनत, चालींचं विश्लेषण... या सगळ्यांचा ताण संपल्यावर खूपच हलकं वाटलं असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0