कुछ मीठा हो जाय..

गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. सध्या अधूनमधून खाण्यावर कंट्रोल ठेवण्याचं भूत मानगुटीवर बसत असल्यामुळे गोडाशी संबंध संपल्यात जमा आहे. हो.. मोडायचाच निग्रह तर मासेमटणासाठी मोडावा, गोडासाठी नको..

पण आज पोराचा बालहट्ट झाला..

मुळात झालं असं होतं की मी माझ्या शाळकरी वयात रुचिराकृपेने एक चॉकलेटची पाककृती करायचो. ती एकदम जमून गेली होती. माझे बाबा मी बनवलेल्या चॉकलेटचं ताट रिकामं करुन टाकायचे. मग माझी कॉलर ताठ.

बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं. त्याला न कळत्या वयात ते तितकंच आवडलं जितकं माझ्या बाबांना आवडायचं. तसाही एरवी बर्‍याचदा तो माझा बाप असल्यासारखा वागत असतोच. म्हणून मलाही बाबांना परत एकदा चॉकलेट करुन दिल्याचं समाधान मिळतं. म्हणून मग हे पुन्हा बर्‍याचदा बनवलं जायला लागलं.

हे चॉकलेट फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्कसारखं गुळगुळीत मऊ नाही. ही तर चॉकलेटची वडी. पण तिचं वैशिष्ट्य असं की ती खूप खुटखुटीत आणि खमंग असते. तुम्ही करुन पहा, तुम्हालाही कदाचित एकदम आवडेल.

पहिल्यांदा खाली दाखवलेलं सामान गोळा करा:

-एक वाटी साखर, खूप गोड आवडत असेल तर दीड वाटी.
-एक वाटी मिल्क पावडर. नेसले एव्हरीडे अत्यंत रेकमेंडेड. शक्यतो दुसरी नकोच.
-एक वाटी लोणी. घरच्या शुभ्र लोण्याने अनेकदा ही कृती केली पण नंतर शोध लागला की अमूल बटरने खूप जास्त अफलातून स्वाद येतो. त्यामुळे एक पॅक अमूल बटर.
-ड्रिंकिंग चॉकलेट पावडर किमान सहा चमचे. कितपत डार्क हवंय त्यावर सात किंवा नऊ चमचेही घेऊ शकता. प्युअर कोको वापरलात तर तो कडू असतो. तो चारच चमचे घ्या.
-आवडत असले तर तीनचार काजू आणि बेदाणे. नसले तरी चालेल.

साखर एका विस्तीर्ण कढईत घ्या. आवेशाने ढवळ ढवळ ढवळायला पुष्कळ वाव हवा. छोटी कढई नको.

त्यात साखर जेमतेम भिजण्याइतकं पाणी अतिशय बेताने घाला. साखरेला लगेच पाणी सुटत असल्याने एकदम भसकन पाणी घालू नये हे वेगळं सांगायला नको. पाणी जास्त झालं तर तितका जास्त वेळ आटवत बसून हाताला रग लागेल.

दूधभुकटी आणि ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको पावडर एकत्र करुन घ्या. एव्हरेडीखेरीज अन्य दूधभुकटी असेल तर सरळ चाळणीतून पाडून घ्या म्हणजे एकदम सुंदर मिश्रण होईल. चाळणीची स्टेप फक्त स्मूथनेससाठी आहे. टाळली तरी चालेल.

साखरेच्या कढईखाली ग्यास पेटवा. मध्यम आचेवर पाकाला उकळी येऊ द्या. मधेमधे घोटत रहा आणि करपून कॅरेमलाईज होऊ देऊ नका.

सगळी साखर विरघळली आणि उकळता पाक जरा घट्ट वाटायला लागला की त्यात मिल्क पावडर आणि ड्रिंकिंग चॉकलेट पावडरचं मिश्रण घाला आणि तातडीने ढवळायला सुरुवात करा.

आता गुठळ्या होऊ न देणं, मिश्रण बाजूला न चिकटू देणं, करपू न देणं हे सगळं अत्यावश्यक असल्याने फोटू काढायला दुसर्‍या कोणालातरी बोलवा. पोराबाळांना काय बनतंय ते उंच उचलून दाखवायचं असेल तर आत्ताच पटकन दाखवून घ्या. कारण आता सटासट ढवळण्याचा अखंड कार्यक्रम चालू होतोय.

त्या पाघळलेल्या रटरटत्या मिश्रणात बटर घाला आणि त्याला विरघळताना बघत बघत एक "सिनफुल फीलिंग" घ्या.

मिश्रण दहाएक मिनिटं ढवळत ढवळत मध्यम आचेवर ठेवलं की हळूहळू घट्ट व्हायला लागेल

आता ढवळताना अधिकाधिक जोर लागायला लागेल. अशा वेळी ढवळण्याचा वेग अतीतीव्र करा. यावर स्मूथनेस अवलंबून आहे.

एका ताटाला थोड्याश्या लोण्याचा हात लावून तयार ठेवा. हे आधीच करुन ठेवलं तरी चालेल. ढवळण्यातून फुरसत मिळायला अवघड.

काजू किंवा इतर नट्स आवडत असतील तर या स्टेजला ते मिश्रणात तुकडे करुन घाला. बेदाणे आत्ता घालू नका. ते फुगून येतील.

मिश्रण ढवळता ढवळता आता ते घट्ट झाल्याचं लक्षात येईल. नेमकं केव्हा खाली उतरवायचं हा अनुभवाने शोधण्याचा पॉईंट आहे. पण अंदाज येण्यासाठी फोटो देतो आहे. फार घट्ट होऊ देऊ नका. नपेक्षा हत्यार म्हणून किंवा गोळाफेकीसाठी वापर करावा लागेल. फार आधी उतरवलं तर फाईव्हस्टारसारखं मऊशार आणि दाताला चिकटणारं होईल.

बटरचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण झटझट ओतून घ्या.

ते सेट होण्यासाठी ताटाला हलवा. या स्टेजला त्यात बेदाणे रुतवा.

अर्ध्या-एक तासाने सुरी किंवा उलथन्याने वड्या कापा.

अशा रितीने खुटखुटीत आणि खास आपल्या हातचा टच असलेल्या चॉकलेट वड्या तयार. पोरं जाम म्हणजे जाम खूश होतात. कढईतली उरलेली खरपूडही चाटून काढतात मांजरासारखी.

ही घ्या:

आणखी हवीत?

बनवा.. आणि कशी लागतात सांगा.. खूप सोपी आहे ही चीज.

"कुछ मीठा हो जाय"चे खूप प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येवोत ही शुभेच्छा.. (लगेच टेन्शन कशाला घेताय? इतरही बर्‍याच प्रकारच्या "गुड न्यूज" असतात की हो..

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

नुकतेच जेवण झालेले असूनही तोंडाला अर्धा लिटर पाणी सुटले...
'जिन चीजोंसे जिंदगी जिंदगी लगती है, डॉक्टर लोग उन्हींको मना कर देते हैं' अशोककुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तुमच्या वड्यांपेक्षाही (तूर्तास बनवून बघितल्या नसल्याने) तुमचे लिखाण खुटखुटीत, सहज आणि आत्यन्तिक जिव्हाळ्याने केलेले असे झाले आहे.
केवळ वाचूनच, तुम्ही त्या बनविताना, मला बाजूला उभे राहून बघण्याचे समाधान मिळाले. धन्यवाद !
वड्या करून बघितल्या की जरूर कळवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक शङ्का : दुधाच्या भुकटीऐवजी निव्वळ दूध किंवा मिल्कमेड वापरून वड्या (तश्याच नाही झाल्या तरी जवळपास तश्या) होतात काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावडर ऐवजी दूध किंवा मिल्कमेड घेतलं तर दोन गोष्टी होतात:कोको आणि क्रीम याचं संतुलन साधण्यासाठी दुधाची क्वांटिटी भरपूर घ्यावी लागते.
ते भरपूर आटवावं लागतं, विशेषत: नुसतं दूध असेल तर.
मिल्कमेडने गोळीबंदपणा येत नाही. लिबलिबीत होतं.
मिल्कमेड वापरुन केलं आहे. अशा वेळी साखर कमी घालावी लागते..

Thanks a lot..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! नक्की करणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच म्हणतो. फारच छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे प्रकरण इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं. अर्थात वाचताना सोपं वाटलं तरी केव्हा चुलीवरून उतरवायचं हे कळण्यासाठी काही वेळा चॉकलेटचं फदफदं किंवा चॉकलेट कॅनन बॉल्स करून बघावे लागतीलच. पण लागून लागून किती वाईट लागणार आहे? तेव्हा नक्की करून पहाणार आहे.

मापं वाटी आणि चमच्यांच्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कप-टेबलस्पून किंवा मिलिलीटर मध्ये रूपांतर जड जातं आहे. एक वाटीसाठी तुम्ही १०० ग्रॅम बटर वापरत आहात तेव्हा वाटी म्हणजे साधारण ११६ मिलिलीटर असा अंदाज करता येतो. चमच्याच्या चित्रावरून टीस्पून - अंदाजे ५ मिलीलिटर प्रत्येकी असा अंदाज येतो. तुम्ही जेव्हा सहा चमचे चॉकलेट मिल्क पावडर म्हटलं आहे, ती सहा चमचे म्हणजे अंदाजे एका वाटीच्या किती प्रमाणात हे सांगाल का? साधारण १/३ते १/४ का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१/२

Thanks..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवातीला साहित्यात नेसले एव्हरीडे असं बरोबर लिहीलंय पण पुढे
<< एव्हरेडीखेरीज अन्य दूधभुकटी असेल तर सरळ चाळणीतून पाडून घ्या म्हणजे एकदम सुंदर मिश्रण होईल. >> याइथे त्याची एव्हरेडी बॅटरी झालीये.

असो.

<< बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं. त्याला न कळत्या वयात ते तितकंच आवडलं जितकं माझ्या बाबांना आवडायचं. तसाही एरवी बर्‍याचदा तो माझा बाप असल्यासारखा वागत असतोच. म्हणून मलाही बाबांना परत एकदा चॉकलेट करुन दिल्याचं समाधान मिळतं. >> गोडाधोडावर लिहीलेल्या लेखात हा काहीसा गहिवरून टाकणारा उल्लेख... मला एकदम विजय तेंडूलकरांनी त्यांच्या वडिलांवर लिहीलेल्या लेखाचीच आठवण झाली. त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांची त्यांचा परममित्र कमलाकर सारंगसोबत तूलना केलीय आणि तुम्ही इथे तुमच्या वडिलांची तुमच्या मुलासोबत. खरंय.. आपल्यापासून कायमच्या दुरावलेल्या आपल्या जीवलगांना आपण आसपासच्या लोकांमध्ये शोधत राहतो आणि ते तसे सापडले म्हणजे गेलेल्या व्यक्तीमुळे झालेलं दु:ख काहीसं हलकं व्हायला मदत होते.

बाकी तुम्ही अगदी शाळकरी वयातच ही सिद्धी प्राप्त केलीत त्याबद्दल तुमचं अभिनंदन. माझी तर इतक्या वर्षात मॅगी नूडल्सच्या पुढे या क्षेत्रात प्रगती झालेली नाहीये. चॉकलेट सारखा अवघड प्रकार तर सबंध आयुष्यात जमणार नाही. तुम्ही बनविलेलं चॉकलेट उत्तमच आहे. पण वेगन (दूध व दूधाचे उत्पादन आहारातून वर्ज्य केलेले) लोकांकरीता एखादा चॉकलेट प्रकार सुचवू शकाल काय? इतरांकरिताही तो चांगलाच ठरेल; कारण माझ्या माहितीप्रमाणे दूध व शर्करा रहीत (किंवा शक्य तितक्या कमी प्रमाणात साखर असलेले) डार्क चॉकलेट हे शरीराला खूपच हितकारी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मी ही पाकृ करून बघितली आणि फसली. त्यात अर्थातच तुमचा दोष नाही. लेखात लिहिल्याप्रमाणे मी बेताचं पाणी म्हणजे फारच कमी पाणी घातलं बहुतेक. त्यामुळे मिल्कपावडर - कोको मिश्रण टाकल्यावर जे घट्ट गोळे झाले, त्यातून पुन्हा ते सावरलं नाही. लोणी घातल्यानंतर त्याचं तूप वेगळं आणि चॉकलेट वेगळं असंच राहिलं, खूप वेळ ढवळलं तरीही. या खूप वेळ ढवळण्यामुळे अर्थातच एकजीव न झालेलं, गुठळ्या झालेलं चॉकोलेटी मिश्रण जेव्हा गार करायला ओतलं तेव्हा ते गार होता होताच कडक व्हायला लागलं. मग मी शक्य तितकं पातळ करून शक्य तितकं कापलं.

गार झाल्यावर खुटखुटीत ऐवजी कुडकुडीत झालं. किंचित जळलं देखील असावं. बायकोच्या शब्दांत 'पाक चिक्कीवर गेला'. पण कुडुम कुडुम खायला मजा आली. पोराला 'हे बघ, टणक चॉकोलेट' असं उत्साहाने सांगितल्यावर त्यानेही खाल्लं. बिचारा साडेचार वर्षांचा आहे त्यामुळे अजून त्याची असल्या बाबतीत उदार दृष्टी आहे. वरच्या निम्मी रेसिपी केली होती. संपलीसुद्धा.

फिरून यत्न करून बघेन आणि मग सांगेन.

बादवे, पाणी नक्की किती घालायचं हे सांगाल का? म्हणजे साधारण अर्धी वाटी, पाऊण वाटी की एक वाटी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करुन पाहिलीत त्याचा आनंद आणि बिघडली त्याचं वाईट वाटलं.

साखर बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. थोडं जास्त झालं तरी हरकत नाही. पाच मिनिटं जास्त आटवावं लागेल इतकंच.

गोळे बनणं आणि टणक होणं यामागे मला वाटत असलेल्या शक्यता गृहीत धरुन काही सुचवण्या करतो. एखादा / एखादी एक्सपर्ट व्यक्ती अधिक सांगेलच.

१. वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला थोडं जास्त पाणी.
२.तुम्ही घेतलेली मिल्क पावडर स्किम्ड किंवा कमी फॅटवाली असली तर ती फुल क्रीम किंवा तत्सम घ्यावी. मी इथल्याप्रमाणे एव्हरीडे सजेस्ट केली ती यासाठी की ती एकजीव होते आणि क्रीमी असते.
३.मिल्क पावडर आणि कोको / ड्रिंकिंग चॉकलेट चाळणीतून काढावं म्हणजे स्मूथ मिश्रण होईल. ते उकळत्या पाकात ओतताना सतत आणि खूप जोरात ढवळावं. गुठळ्या फक्त सुरुवातीलाच होऊ शकतात ती स्टेज टाळली म्हणजे झालं. भसकन एकदम ओतल्यावर गोळा होत असेल तर भुरभुरत हळूहळू पसरून घालून पहा.
४. लोण्याचं प्रमाण वाढवून पाहा.
५. मिश्रण ढवळताना मधेमधे थेंब ताटात घेऊन अर्धं मिनिट थांबून तो दाबून पहायचा. कडकपणाचा अंदाज येईल. (कढईतला घट्टपणा आणि ओतल्यावरचा घट्टपणा याचं प्रमाण एस्टॅब्लिश होईल). झार्‍याने मिश्रण ढवळायला जड जायला लागलं की लवकरच ताटात ओता.

लोण्याचा ब्रँडही तपासून पहा. यातला एकही घटक लो-फॅट, डाएट फूड अशांपैकी चालणार नाही.

पुन्हा केलंत धाडस की फोटो जरुर द्या.

धन्यवाद्स..

- गवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करून पाहिली अन पहिल्या फटक्यातच मस्त जमली. वड्यांची चव आगळी वेगळी अन छान आहे.
मात्र अमूल बटरमुळे अंमळ खारट लागल्या. लोणी किंवा तूप घालून करता येईल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो???

अमूल बटर ऐवजी घरगुती पांढर्‍या लोण्यात करायचं. आधी मीही तेच करायचो. नंतर एकदा अमूल बटर वापरलं आणि उलट ती थोडीशी डॅश ऑफ सॉल्ट जास्त आवडली.. पण तुम्ही व्हाईट बटर वापरा. मुंबईत असाल तर पारसी डेअरीचं चांगलं. अन्यथा घरचं बेस्टच..

तुपाचं माहीत नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा पहा फोटो. माफ करा. माझ्याकडे कॅमेरा नसल्याने मोबाईलवर काढला आहे.
लोणी घालून करून पाहीन.
" width="480" height="480" />

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो.. माझेही फोटो मोबाईलवरच काढलेले आहेत. आताशा मोबाईलच स्टँडर्ड कॅमेरा बनला आहे सर्वांचा.. Smile

पण तुम्ही काढलेला फोटो इथे अपलोडवला गेला नाहीये बहुधा. काहीच दिसत नाहीये..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


आता दिसतो का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह.. रंग मस्त आलाय.. कन्सिस्टन्सीही एकदम बरोबर दिसतेय.. म्हणजे अगदी योग्य क्षणी आचेवरुन उतरवलं आहे..

करुन पाहिलंत म्हणून आनंद झाला.. Smile धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच छान आणि सुटसुटीत रेसिपी ! प्रथम प्रयत्नातच जमली!!
प्रत्येक step ला कृती सोबत images पण पाहत होते, त्यामुळेच बहुधा अचूक जमली असावी …
धन्यवाद . एक वेगळी च खमंग गोड चव आहे. वड्या तयार झाल्यावर अर्ध्या तासांत , अर्ध्याहून अधिक वड्या फस्त झाल्या …. ह्यातच काय ते आले!

अतिशय सविस्तरपणे आणि कमीत कमी चुका होतील अशा रीतीने लिहिलेल्या पाककृती साठी परत एकदा धन्यवाद !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

आहा. हे वाचून खूप ग्वाड वाटले मनाला. आवर्जून इथे अपडेट केल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पाककृती वाचून 'संतुर' ची आठवण झाली.मागे एकदा वसंतराव देशपांडे म्हणाले होते, संतुरच्या तारांवरुन उंदीर जरी पळाला तरी गोडच आवाज येईल. तस्मात, पाककृती थोडी बिघडली तरी चव गोडच लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0