Skip to main content

18+

कमान ओलांडून अठरावी
अधीर आलो अनंग-देशी
इथल्या अणु-रेणूवर अविरत
प्रथम-रसाची(#) झाक जराशी

पर्वत इथले अवघड, दुस्तर
घळीत त्यांच्या नजर न ठरते
चेटूक त्यांचे नजरबंदीचे
स्वप्नातही ना पाठ सोडते

गुहा निसरड्या, फसव्या इथल्या
दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन
गारूड गूढाचे पण त्यांच्या
पंचप्राणा छळते निशिदिन

अनंगदेशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात आपुला जगन्नाथ - जो
मुठीत दे अनुभव तुष्टीचा :)

=================

(#): नवरसांतील प्रथम रस = शृंगाररस

मारवा Tue, 17/12/2024 - 13:32

स्वावलंबनाचे महत्व विषद करणारी
स्तनाग्रे वसते....स्तनमध्ये तू.... स्तनमुले.. या विख्यात प्राचीन काव्याची
आठवण करून देणारी उदात्त अवार्चीन कविता !
तुमच्या रूपाने जणू नवीन हस्तर कवीचा जन्म झालाय