समुद्रपक्षी

Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः

आहे मी एक समुद्रपक्षी,
माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण,
मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त
उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त!
कार्वर म्हणतो,
Start where you are,
with what you have
make Something of it
Never be satisfied!
मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात?
माझे दोन चिमुकले पंख,
पेलतील ना हे शिवधनुष्य!
आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी!
कारण,जोडीला माझी जिद्द आहे,
आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती,
माझी मनोदेवता,माझा आतला आवाज!
नाही मला मान्य,
"बाबा वाक्यं प्रमाणं!"
नकोच मला तुमची ती मळलेली पायवाट अन् रुळलेला रस्ता,
शोधीन माझा मार्ग मीच आणि करेन तयार रस्ता!
झाडा़झुडुपांची वाटेतली संकटं
देईन तोडून ,फेकून
पण.. मला उडायचं आहे,
उंच भरारी घ्यायची आहे!
माझे भाईबंद 'कावकाव' करत आहेत,
आणि माझे सखेसुह्रद करत आहेत काळजी,
वाटू दे त्यांना गंमत आणि उडवू दे खिल्ली,
थोडी काळजी सुध्दा पण आवश्यक आहे.
माहित आहे माझंच मला,
"माझा गुरु मीच आहे,"दुसरा साथ देणर नाही,
पण मिळालीच साथ मला,मी ती नाकारणार नाही.
साथ हवी जिद्दीची,
कारण, वाट ही न परतीची!
सोबती माझा मध्येच दमला,
किंवा थकला शरीराने,
जरुर करीन मी ही संगत आणि थोडं औषधपाणी
पण मनानेच दमल्यानंतर?
उपाय नाहीच काही त्याला,
शिवाय एकच,सारखे मनात एकच घोकणे
मागचे दोर कापले आहेत, आणि
झेप पुढेच घ्यायची आहे.
क्षितीजापर्यंत दूर कक्षा माझ्या विस्तारल्या आहेत
आणि, कुंपण तोडून जायचे आहे मला,
क्षितीजाच्याही पलिकडे!
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे,
पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे!
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

सलाम! काय कविता आहे!
अनुवाद अतिशय आवडला.. अनुवादाचा हट्ट सोडून उद्धृत इंग्रजीतच ठेवलं हे तर खूप आवडलं..
स्वातीतै पाकृ, भटकंती बरोबरच कवितांचे अनुवाद लै झ्याक करतेसे दिसतेय ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ, धन्यवाद.:) परंतु हा कवितेचा अनुवाद नाही. Richard Bach ची हे एक लहानशी कथा आहे.(अर्थात,आशयाच्या दृष्टीने खूपच मोठी..)खूप वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचले तेव्हापासूनच ते डोक्यात घोळत राहिले आणि मग कधीतरी असा स्वैर अनुवाद लिहिला गेला.
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख अनुवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मुक्त रुपांतर आहे हे. चांगले झाले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाची पुन्हा एकदा आठवण करुन देणारे ओघवते शब्द आहेत.
पण 'कुंपण तोडून जाण्यातली' जोनाथनची आंदोलनं थोडी अजून धारदारपणे व्यक्त व्हायला हवीत असं एक वाटून गेलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक आवडलं. आयायटीत असताना होस्टेलमध्ये काही पुस्तकांची साथ यायची आणि ती एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये फिरायची. आणि मग रात्रींच्या कॅक सेशनला त्यांच्यावर खडाजंगी चर्चा व्हायच्या. त्यातलं हे एक पुस्तक.

जोनाथन सीगलच्या पुस्तकाबाबत त्या माणसाला खरोखरच उडता येतं की ते रूपक होतं यावर वाद झाल्याचा आठवतो. म्हणजे मेट्रिक्समधल्याप्रमाणे जगाचे भौतिकी नियम हे खरे नियम नाहीत, तर ते मानण्यावर आहेत असं म्हणणारा एक गट होता. तर या पुस्तकात भौतिकी नियमांबद्दल नाही, तर सामाजिक नियमांबद्दल चर्चा आहे असं म्हणणारा दुसरा गट होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0