इतनी मुष्किल नहीं किताबत (द्विभाषिक विडंबन)

प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी सूखी दावत ( द्विभाषिक ग़ज़ल )"


टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत

पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?"

शेर सांगता दुसर्‍यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत

दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत

मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी
सवाल मुझको है सिर्फ़ इतना, बनाम किसके करूँ मुहब्बत

अंधाराच्या किश्श्यांवरती आत्मवृत्त लिहिण्याला बसलो
माहताब शरमाकर बोली, "बेग़ैरत हो, मियाँ, निहायत"

अलिबाबाच्या गुहेत होत्या तिघी, संपदा, माणिक, नीलम
याद आ गयी मुझको भी किस वख़्त मगर कंबख़्त शराफत

लग्नावरती आज भरवसा कसा, कुणी अन्‌ किती करावा?
निकाह फर्ज़ी, फर्ज़ी काज़ी, गले पड गयी मेह्र की आफत

दोषपूर्ण गझलांच्या "खोड्या" काढत केले लेखन सारे
अर्ज़ मेरी है यही खुदासे, रहे सुखनवर सभी सलामत



वाचकांची बोंबाबोंब टाळण्यासाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.

किताबत - लेखन
रिवायत - परंपरा
गनीमत - पर्याप्त
शरारत - खोडसाळपणा, खोड्या
बेग़ैरत - निर्लज्ज
शराफ़त - सभ्यता
आफ़त - संकट
सुखनवर - कवी
सलामत - सुरक्षित

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा वा खोडसाळराव. तुमने तो भन्नाट कमाल कर दिया. मियॉं ह्या गझल का प्रत्येक वाघ तो हमे डिएनए सारखा महसूस झाला. पहेले लाइन मे मराठी मातेचा सवाल तो दुसरे मध्ये उर्दू अब्बाजानचा जवाब.

माहताब शरमाकर बोली, "बेग़ैरत हो, मियाँ, निहायत"

असाच बेगैरतपणा मुकम्मल हो ही चंडिकादेवीकडे मन्नत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम 'निजामी' गझल Wink
प्रयत्न आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्या बात! क्या बात!
एकदम मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0