बिल गेट्स की स्टीव्ह जॉब्ज?

'टिपिंग पॉईंट' आणि 'आऊटलायर्स'सारख्या गाजलेल्या पुस्तकांचा लेखक माल्कम ग्लॅडवेल याने टोरंटो पब्लिक लायब्ररीत नुकत्याच दिलेल्या एका भाषणात असे म्हटले आहे की इतिहास स्टीव्ह जॉब्जपेक्षा बिल गेट्सला लक्षात ठेवेल. बिल गेट्सच्या धर्मादायी कामाच्या संदर्भात हे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मॅक, आयपॅड, आयफोन वगैरेंद्वारे मूठभर धनिकांत आपली छाप पाडणार्‍या अ‍ॅपलच्या योगदानापेक्षा मलेरिया आणि पोलिओसारख्या रोगांच्या उच्चाटनासाठीचे बिल गेट्सचे प्रयत्न ग्लॅडवेल यांना अधिक ऐतिहासिक महत्त्वाचे वाटतात हे यावरून दिसते. म्हणजेच तुम्ही समाजाला काय दिले आहे याला अधिक महत्त्व देण्याकडे ग्लॅडवेल यांचा कल आहे. त्यांच्याच शब्दांत:

So Gates, sure, is the most ruthless capitalist. And then he decides, he wakes up one morning and he says, 'Enough.' And he steps down, he takes his money, takes it off the table ... and I think, I firmly believe that 50 years from now, he will be remembered for his charitable work. No one will even remember what Microsoft is.

"And of the great entrepreneurs of this era, people will have forgotten Steve Jobs. Who's Steve Jobs again?

"But Gates, there will be statues of Gates across the Third World, and people will remember him as the man who ... you know, there's a reasonable shot, because of his money, we will cure malaria."

ग्लॅडवेल यांना जॉब्जविषयी अनादर आहे असे नाही, कारण भाषणात त्यांनी जॉब्जविषयी अधिक काळ भाष्य केले. "he was an extraordinarily brilliant businessman and entrepreneur." आणि "He was brilliant at understanding the image he wanted to craft for the world." अशा शब्दांत त्यांनी जॉब्जचा गौरव केला. तरीही गेट्सने कमावलेल्या पैशातून जगाला दिलेले योगदान मोठे आहे असे ते म्हणतात.

अधिक सविस्तर बातमी वाचण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी:
http://www.pcmag.com/article2/0,2817,2405562,00.asp

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

जगाला दाता-बिल गेट्स जितका गरजेचा आहे तितकाच स्टीव्ह गरजेचा आहे का? असा जर प्रश्न असेल तर माझ्या मते जगाला स्टिव्ह जॉब्स सारख्या सृजनशील व तरीही सौंदर्यदृष्टीची जाण असणार्‍या व्यक्तीची अधिक गरज आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जगाला स्टिव्ह जॉब्स सारख्या सृजनशील व तरीही सौंदर्यदृष्टीची जाण असणार्‍या व्यक्तीची अधिक गरज आहे

१००% सहमत!

- (स्टिव्ह जॉब्सचा एकलव्य) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोघांना लक्षात ठेवणे अवघड आहे का? : ) प्रत्येक वेळेला एक रेघ खोडूनच दुसरी रेघ लांब केली पाहीजे का? काही लोकांना अशा लठ्ठालठ्ठ्या लावण्यात काय आनंद मिळतो नकळे. (ही ओळ लेखनकर्त्यास उद्देशून नाही)
ऋषिकेश यांचा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक तुलना आहे खरी!

संगणक-मोबाईल फोन या क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करू पहाणार्‍या दोन कंपन्यांच्या 'सर्वेसर्वां'ची तुलना होणं अस्थानी वाटत नाही. मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपलशी तुलना होण्यात गुगल का आलं नसावं तर गुगलच्या ब्रिन/पेज यांची नावं बहुदा ते दोघे अजून निवृत्त न झाल्यामुळे आली नसावीत.

फक्त भारताचा विचार करता मलाही स्टीव्ह जॉब्जपेक्षा बिल गेट्स (किंवा अ‍ॅपलपेक्षा मायक्रोसॉफ्ट) थोर वाटतात. भारताची अर्थव्यवस्था, निर्यात आयटीवर बर्‍यापैकी अवलंबून आहे आणि या आयटी कंपन्या हाय मेंटेंनन्स असणार्‍या सौंदर्यवती, अ‍ॅपलपेक्षा कामाच्या असणार्‍या मायक्रोसॉफ्टला अधिक महत्त्व देणार, देत असाव्यात. मूठभर धनिकांमधे गणला न जाणारा भारत आणि बहुसंख्य भारतीय "हाय मेंटेनन्स" अ‍ॅपलला अधिक भाव देणार नाहीत हे माझ्या (कंजूष) भारतीय मनाला लगेचच समजतं. तिसर्‍या जगातल्या इतर देशांमधेही हाय-मेंटेनन्स अ‍ॅपल लोकप्रिय होण्याचं काही कारण दिसत नाही.

पण ग्लॅडवेल यांचा मुद्दा इथे सर्वस्वी वेगळा आहे. अ‍ॅपल असो वा मायक्रोससॉफ्ट, दोन्ही कंपन्या नफ्यासाठी बनवल्या आहेत. त्यात कोण मोठं हा माझ्यासारख्या सामान्य माणसाने विचार करण्याचा प्रश्न नसावा; शेअर विकत न घेतल्यास निश्चितच नाही. १०० वर्षांनी कदाचित अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट यांच्या जोडीने गूगलचंही नाव नसेल तेव्हा लोक जॉब्जना आठवतील का बिल गेट्सना? आणि त्यासाठी सामाजिक कार्याचा विचार करता ही तुलना अस्थानी वाटते. एक व्यापारी मोठा का समाजसेवक अशी तुलना हास्यास्पद वाटते. या तुलनेत मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर पॉल अ‍ॅलन* यांना घेतल्यास ते अधिक हास्यास्पद आणि पेट्रनायझिंग होईल खरं!

(मिक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल दोन्ही कंपन्यांची उत्पादनं टाळणारी) अदिती

*पॉल अ‍ॅलन यांनी आपल्या मिळकतीतला मोठा हिस्सा अ‍ॅलन टेलिस्कोप अरेसाठी दिला आहे. SETI (Search for Extra-Terrestrial Intelligence) यासाठी ही दुर्बीण वापरली जाणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भूतकाळातली उदाहरणे बघायला हवीत.

२०व्या शतकात मोटारींच्या रचनेत आमूलाग्र बदल घडवून व्यापार साम्राज्ये स्थापणारे कोण-कोण, त्यांच्यापैकी आपल्याला कोण आठवते... ते बघितले पाहिजे. अथवा १९व्या शतकातील रेल्वेवाल्यांपैकी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलना दोन वेगळ्या व्यक्तींमध्येच कशाला हवी? एकाच व्यक्तीच्या (समुहाच्या) दोन विभिन्न कामांमधेदेखिल करता येईल.

उद्या लोकांना टाटा आठवतील ते कशासाठी? नॅनोसारखी जगातील स्वस्त कार बनवली म्हणून की कॅन्सर रुग्णालय उभारले म्हणून?

(लोक सहसा फक्त टाटा हे नाव आठवतील - रतन की जे आर डी असा भेद बहुदा केला जाणार नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडं अवांतरः 'इतिहास लक्षात ठेवेल'ही कल्पना रोचक आहे. 'इतिहास' म्हणजे इथं भविष्यातले लोक कुणाला मोठं मानतील असा प्रश्न आहे. त्याची तरतूद आपल्याला आज करता येते (निदान तसा प्रयत्न करता येतो) हे मजेदार आहे आणि त्याबाबतची आपली मतं नोंदवून आपण त्या इतिहासाला (म्हणजे भविष्यातल्या आजच्या दिवसांच्या प्रतिमांना/समजण्याला?) एक आकार देऊ शकतो हेही गंमतीदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0