चीज मश्रुम्स्


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. Smile

साहित्य : अळंबी (मश्रुम्स्) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्‍यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.

कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.

तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.

चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सादरीकरण नेहमीप्रमाणे ऊत्तम

मश्रुम आवडत नसल्याने पास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्तच दिसत आहेत रे चीजमशरुम्स गणपा,
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकलं माकलं तर पोटात घ्याल

तुमच्या हातचं पोटात घ्यायचा योग कधी येईल हाच विचार चालू असतो. Smile

फोटो काढताना पदार्थांची मांडणीही उत्तम व्हावी हा प्रयत्न केलेला दिसून येतो. पहिल्या फोटोत नाव प्लेटच्या कडेवर लिहिणंही भारीच. इतक्या बारकाव्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यातून स्वयंपाक, पाककृती आणि तिचं सादरीकरण यावरचं प्रेम दिसून येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
सादरीकरण खासच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झक्कास मांडणी आहे.
पण, इतके मोठे मशश्रुम्स भारतात मिळतात का कुठे? काल एका मॉलात तरी नाही दिसले Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतात कुठे मिळतात हे माहित नाही.
पण माझ्या मामाने मध्यंतरी अळंबी उत्पादनाचा प्रयोग केला होता. तेव्हा त्याने बर्‍यापैकी मोठ्या अळंब्यांच पीक घेतलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

सर्व वाचक आणि प्रतिसाद देण्यार्‍यांचे मन:पुर्वक आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

सुरेख पाककृती आणि सादरीकरण. नुसत्या रुपावरुनच मुलगी गुणाची असणार अशी खात्री पटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

झकास दिसत आहेत रे मश्रूम्स. मश्रूम्सच्या देठाचं काय करायचं मग? (फुकट कसं जाऊ द्यायचं?)

ऋषिकेश, मला वाटतं इथे तू नेहेमी मिळणारे पांढरट रंगाचे मश्रूम्स वापरले तरी चालेल. घटोत्कची आकाराचे पोर्टोबेलो वगैरे वापरायची आवश्यकता नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मश्रूम्सच्या देठाचं काय करायचं मग? (फुकट कसं जाऊ द्यायचं?)

असे कसे फुकट जातील?
सुपमध्ये किंवा मश्रुम स्टरफ्रायमध्ये वापरता येतील की. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

ट्राय करून बघेन. ते इतके छोटे असतात की त्यात हे सारण भरता येईल का अशी शंका वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा रे हा... लै लै भारी दिसतय... मटकन खावसं वाटतय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''