अमिरी खमण

साहित्य-
१ वाटी हरबरा डाळ, १ वाटी मूग डाळ, २ टेबलस्पून तेल,
२ पेराएवढे आले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा, २ चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१/२ चमचा हळद,१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे,१/२ चमचा हिंग (मिसळणाच्या डब्यातील लहान चमचा),
एका मध्यम लिंबाचा रस, २ चहाचे चमचे साखर,मीठ चवीनुसार,५ते६ काजूबिया तुकडे करुन
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर,१/२ वाटी बारीक शेव +
थोडे खवलेले खोबरे, कोथिंबिर, बारीक शेव , डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी.
कृती-
दोन्ही डाळी वेगवेगळ्या ५ ते ६ तास भिजत घाला.
नंतर त्या उपसून रोळीवर काढून वेगवेगळ्या वाटा, वाटताना त्यात आले व मिरच्याही घाला.
डाळी वाटून झाल्यावर त्या एकत्र करा.
त्यात हळद,मीठ, दही/ताक घाला व ढवळा.
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
एका ताटलीला तेलाचा हात लावून घ्या.
डाळीच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व ढवळा.
हे मिश्रण ताटलीत ओता व ही ताटली त्या पातेल्यात ठेवून वरुन झाकण ठेवा.
ढोकळ्याप्रमाणे उकडा, साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर लागतील.
कोमट झाल्यावर ते कुस्करा.
एका कढईत तेल तापत ठेवा, त्यात मोहरी घाला ती तडतडली की हिंग व जिरे घाला, काजूचे तुकडे घाला.
नंतर मिश्रणाचा कुस्करा त्यात घाला व ढवळा.झाकण ठेवून २-३ वाफा काढा.
लिंबाच्या रसात साखर व मीठ घाला व हे वरील मिश्रणात घाला.
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर व १/२ वाटी शेव घाला आणि ढवळा.
सर्व करताना वरुन शेव, ओले खोबरे,कोथिंबिर घाला. डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

विशेषतः कोथिंबीर, खोबरं आणि डाळिंबाच्या दाण्यांमुळे हे मस्त दिसतं आहे. करून बघावंसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा मस्त दिसतंय.. मात्र तयारी करून ठेवावी लागेल डाळी भिजवणां वगैरे.
माझं आणि प्लान्ड फूडचं फारसं जमत नाही.. "चला आता काय बनवूया पटकन!" क्याटेगरीतले आम्ही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिसतंय मस्तच. नाव पाहून आमीर खानच्या नावाचं विडंबन वाटलं, पण आतला माल फारच झकास निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा अतिशय आवडता, पण आता विसरला गेलेला पदार्थ. माझी आई मस्त बनवायची. शाळेतून आल्यावर, मधल्यावेळी... चव अजून रेंगाळते आहे.
आणि डाळिंबाचे दाणे तर इतके छान लागतात ह्यात! दाताखाली टचकन फुटतात आणि गोड रस पसरतो, किंचितच पण हवाहवासा....
स्वाती दिनेश..... खूप खूप आभार!
आईलाही आता तो आठवतो आहे का ते विचारले पाहिजे, म्हणजे कसा करायचा ते....
मीही करुन बघेन म्हणतेय, माझ्या लेकीसाठी!
तिला आवडेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच गं स्वातीताई. हे तर अमेरिकन खमण आहे. आमच्या दादरला कबुतरखान्याजवळ मिळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं