ऑलिंपिक २०१२ : बोपन्ना, पेस, भूपती आणि भारतीय टेनिस

आताच हाती आलेल्या बातमी नुसार, महेश भूपती पाठोपाठ रोहन बोपन्ना यानेही, लिअँडर पेस बरोबर लंडन ऑलिंपिक मध्ये खेळायला नकार दिला आहे.
http://timesofindia.indiatimes.com/sports/tournaments/london-olympics/Ro... .

पेस आणि भूपती यांच्यातल्या वैयक्तिक बेबनावाची नीट माहिती असूनही ऑलिंपिक समितीने त्यांची जोडी घोषित केली. गेला काही काळ बोपन्ना आणि भूपती अशी जोडी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे दिसत होती. पण एकंदर सरकारी पातळीवर लिअँडर पेसचा वशिला बळकट दिसतो. दोन्ही खेळाडूंना पेसबरोबर खेळायचे नाही; दोघांनीही एकत्रितपणे यश संपादन केलेले असूनही ऑलिंपिक करता लिअँडर पेस च्या नावावर सरकारी कमिटी अडून बसलेली आहे.

एकंदर, आंतरराष्ट्रीय टेनिसमधे पुरुषांच्या दुहेरी विभागात भारतीय संघाला असलेल्या आशेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही गोष्ट आता दिसू लागलेली आहे. वैयक्तिक बेबनाव आणि दुराभिमान यांच्या समीकरणात सरकारदरबारचा वशिला हा घटक मिळवून अखेर राष्ट्रहिताचं मातेरं होतं आहे हे स्पष्ट आहे.

पेस च्या जोडीला आता कुणीतरी तिय्यम खेळाडूला पाठवण्यात येईल आणि दुहेरी विभागातल्या अपयशाबद्दल ऑलिंपिक समिती आणि पेस हे बोंबा मारायला मोकळे होतील असंच चित्र दिसतं.

महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांची मिश्र दुहेरीमधली जोडीसुद्धा आता ऑलिंपिकच्या बाबत सरकारी हस्तक्षेप आणि पेसमहाराजांच्या वशिल्यामुळे फुटते काय, हे आता बघणे आले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्वप्रथम ऑलिंपिक २०१२ साठी वेगळा धागा-प्रकार सुरू केल्याबद्दल आभार!

बोपन्ना भुपती ही जोडी काहि वर्षे एकत्र खेळली तर आहेच, शिवाय त्यांचे सध्याचे मानंकन पेस-भुपतीपेक्षा वरचे आहे. असे असताना पेस-भुपती जोडीचा आग्रह ठेवणे इम्प्रॅक्टीकल किंबहूना हास्यास्पद वाटते. पेसचा वशिला किती आहे माहित नाही, मात्र ती जोडीच खेळवण्याचा हट्ट बघता, एकूणच भारतीय जनतेत त्यांचे फिट्ट असलेल्या नावामुळे घेतले गेल्याची शक्यता वाटते. उद्या पेस-भुपती हरले तर जन्तेला वाईट वाटेल पण बोपन्ना-भुपती हरले तर पेस-भुपती ही 'सिद्ध' (प्रुवन)जोडी असताना त्यांना का खेळवले असा बोभाटा करायला मिडीया कमी करणार नाही

बाकी, यावेळी टेनिसमधे ऑलिंपिक पदक मिळेल असे मला व्यक्तीशः वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संघ तयार करताना वैयक्तिक क्षमतेपेक्षा तो संघ म्हणून एकत्र काम करेल की नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. क्रिकेट किंवा फुटबॉल सारख्या मोठ्या संघांमध्ये एखाद दोघांचं भांडण चालून जातं. किंबहुना इतके लोक असतात की बिनभांडणांचे सापडणं कठीण असावं. पण टेनिससाठी दोघांचाच संघ असतो. तिथे परस्परांवरचा विश्वास हा प्रचंड मोठा भाग होतो. त्यामुळे ऑलिंपिक समितीने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार अजाणता झाला असावा यावर विश्वास बसणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रिडामंत्री अजय माकन यांनी दोन्ही कोर्टांमधून चेंडू मारला आहे. काल म्हणाले, AITA शक्य आहे तर दोन संघ का पाठवत नाही. आज म्हणे, त्यांचं त्यांनी काय ते ठरवावं.

http://timesofindia.indiatimes.com/sports/tournaments/london-olympics/Aj...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यासंबंधीचा लोकसत्तातील हा छोटेखानी लेखही वाचनीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.