मंत्रालयाला लागलेली आग : काही प्रतिक्रिया

प्रस्तुत बातमी नुसार :

"महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे मानचिन्ह असलेल्या "मंत्रालय' इमारतीला काल भीषण आग लागली. काल दुपारी पावणेतीन वाजता सुरू झालेले अग्नितांडव मंत्रालयाच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर पसरले. पाहता पाहता राज्याच्या या अत्यंत संवेदनक्षम इमारतीमधील सर्व चीजवस्तू जळून भस्मसात झाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री सुनील तटकरे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, वनमंत्री पतंगराव कदम, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या केबिन आणि कार्यालये अग्निकल्लोळात भक्ष्यस्थानी पडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी आणि त्यानंतर एअर कंडिशनर्सचे स्फोट होऊन आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे."
------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा एक निव्वळ अपघातच होता की या घटनेमागे घातपात होता , उच्चपदस्थांच्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे असलेल्या कागदपत्रांना नष्ट करण्याचा हा डाव होता काय, या मागे कुणी राजकीय शक्ती होत्या काय हे प्रश्न विविध वर्तुळांमधे विचारले जात आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशीही मागणी केली गेलेली आहे. या दुर्घटनेनंतर मंत्रालयाचा कारभार शुक्रवारपासून नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले असले तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव अशा सर्वोच्च पदांची कार्यालये भस्मसात होण्यापासून वाचविण्यात अपयश आल्यामुळे या आगीत मंत्रालयाची प्रतिष्ठाच खाक झाल्याची भावना व्यक्त केली जात होती.

बातमी आल्यानंतर विविध वर्तमानपत्रे , चर्चास्थळे, सोशल मिडिया आणि गप्पासत्रांमधे या संदर्भात चर्चा होणे अपरिहार्य होते. सोशल मिडिया/इमेल्स मधून आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया येथे देत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
चला , मंत्रालयाच्या डागडुजीसाठी १,००,००,००० करोड चं बजेट पास करूया Wink
- आजमाडी कन्स्ट्रक्शनस्
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Mantralay ko lagi aag me RSS ka haat hai
- dogVijay singh
------------------------------------------------------------------------------------------------------------------
काय पण लोक आहेत आपले ? तिकडे सरकार बोंबलून बोंबलून सांगतेय, अरे बाबांनो, ही आग "शॉर्टसर्किट"मुळे लागलीय, बाकी काही नाहीये, तर आमची ही येडी लोकं त्यावर विश्वासच ठेवीनात की राव... ज्यांना आपणच निवडून दिलं, त्यांच्यावर विश्वास नको का ठेवायला ? आता आपण एवढं मर मर मरतो या लोकांसाठी आणि या लोकांना त्याचं काहीच नाहीये, या लोकांचा विश्वासच नाहीये आपल्यावर, हे कळल्यावर राग येणारच ना ? सरकारचं तरी काय चुकलं मग ? रागाच्या भरात होऊन जातं मग असं काहीतरी... ते काही फार गंभीरपणे नसतं घ्यायचं... शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती ? आणि छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट तरी काय वाटून घ्यायचं ते ? बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती हैं... उग्गाच अपुन के डोके को शॉट नहीं लगा लेने का.... क्या ?
------------------------------------------------------------------------------------------------------------------
"आगीत तेल ओतायला हवे होते, बॊंब टाकायला हवा होता" इत्यादी गप्पा मारणारे हे कसे विसरताय की मंत्रालयातही तुमच्याआमच्यासारखीच अनेक सामान्य माणसे काम करत असतात, अनेक सामान्य माणसे आपलं काम व्हावं म्हणून कुणाकुणाला भेटायला गेलेली असतात... या सगळ्यांनी फुकट कुत्र्याच्या मौतीने मरावं अशी अपेक्षा व्यक्त करताना निर्ढावलेले भ्रष्ट राजकारणी वा अतिरेकी यांच्यापेक्षा आपण वेगळे कसे काय बरे ठरतो?
.......
.......

मान्य. लोकांना तसे काही अपेक्षित नसावे आणि मला वाटते, मुख्य मुद्दा वेगळाच आहे. ही प्रतिक्रिया ज्या उत्स्फूर्तपणे आणि एकमुखी आली आहे ते बघता सर्वसामान्यांच्या मनातला लोकप्रतिनिधींबद्दलचा विखार अधोरेखित होतोय एवढेच तात्पर्य.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ऐसी अक्षरे"च्या वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अधुन मधुन आग लागून जुन्या फाईली जळलेलं चांगलं असतं. तेव्हढं साफसफाई करायला सोपं होतं. फक्त वेळोवेळी बाहेरच्या सर्वरवर सगळी महत्त्वाची महिती सेव्ह केलेली असली म्हणजे झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकांना तसे काही अपेक्षित नसावे आणि मला वाटते, मुख्य मुद्दा वेगळाच आहे. ही प्रतिक्रिया ज्या उत्स्फूर्तपणे आणि एकमुखी आली आहे ते बघता सर्वसामान्यांच्या मनातला लोकप्रतिनिधींबद्दलचा विखार अधोरेखित होतोय एवढेच तात्पर्य.

याच्याशी सहमत आहे.

त्या निमित्ताने मंत्रालय आणि एकूणच कारभार थोडा अधिक आधुनिक होईल, कागदपत्रं कमी होतील अशी आशा आहे.

मंत्रालयावरचा झेंडा काही लोकांनी (अग्निशमन दल, पोलिस, कल्पना नाही.) जीव धोक्यात घालून वाचवला यावर लोकांच्या प्रतिक्रिया "तिरंगा महान आहे" इ, प्रकारचं दैवतीकरण विनोदी तरीही रिप्रेझेंटेटीव्ह वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मंत्रालयाचा फायरचा इन्शुरन्स नव्हता.(पेपरातली बातमी)
डिझास्टर मॅनेजमेंट प्लान फेल गेला.
नेहमीप्रमाणेच सावळागोंधळ झाला.
उलटसुलट अफवा पसरल्या.
उलटसुलट वक्तव्ये 'जबाबदार' लोकांकडून केली गेली.
मिडियाला चर्चा करायला आणि उर बडवायला कारण मिळाले.
काही संस्थळांवरील काँग्रेसनिष्ठ चाचांना त्यातही विरोधकांना चिमटे काढावेसे वाटले.

एकंदरीतच या शिस्तहीन देशात कुठल्याही मोठ्या हादशानंतर होते ते अगदी 'प्रेडिक्टेबल' रीतीने झाले.
यांत आता आश्चर्य वाटण्यासारखे काहीच उरले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मंत्रालयावरचा झेंडा काही लोकांनी (अग्निशमन दल, पोलिस, कल्पना नाही.) जीव धोक्यात घालून वाचवला यावर लोकांच्या प्रतिक्रिया "तिरंगा महान आहे" इ, प्रकारचं दैवतीकरण विनोदी तरीही रिप्रेझेंटेटीव्ह वाटलं.

- काही (मिडियाप्रमाणे ७) लोकांनी आपला जीव धोक्यात घालून भारतीय झेंडा आगीत जळण्यापासून वाचवला या त्यांच्या स्पृहणीय कृत्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्हायला हवेच. पण त्या बातमीचे पुनःपुन्हा प्रसारण करून आणि त्यात 'महान देशभक्ती' इ. शब्दांची चुरचुरीत फोडणी घालून जे 'जय हो' भांडवलीकरण चाललेले आहे ते खटकते आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे.
भारताच्या एका मोठ्या राज्यातल्या सर्वोच्च सत्तापिठावर फडकणारा राष्ट्रध्वज जळण्याची घटना घडू शकते याचा अर्थ काय होतो?- याचे भान कुणालाही आलेले दिसत नाही.

दुसरीकडे या आगीत पाच लोकांचे मरण ओढवले ('बळी गेले' असे म्हटले तर कुणावर तरी संशय व्यक्त होतो, म्हणून ते शब्द नकोत) हे मात्र निखळ सत्य आहे. त्यांनाही कुणी वाचवले असते तर मिडियाने त्याचेही प्रचंड भांडवल केले असते. थोडक्यात, बातम्या म्हणजे मेलोड्रामा झालेल्या आहेत.

***
बाकी, मंत्रालयाच्या आगीबद्दल (प्राप्तकालीन पद्धतीनुसार) म्हणाल तर जे झाले ते चांगलेच झाले, जे होईल ते चांगलेच होणार...
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळुनि किंवा पुरूनि टाका
सडत न एक्या ठायी ठाका l
सावध ऐका पुढल्या हाका l
खांद्यास चला खांदा भिडवुनि || Smile

भारतमाता की जय, वंदे - मातरम, क्षयज्ञ तुम आगे बढो - हम तुम्हारे साथ है, जय - हिंद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडी दुरुस्ती:
'मंत्रालयाचा फायरचा इन्शुरन्स नव्हता' असे नव्हे. मंत्रालयातल्या एकूण अव्यवस्थेकडे पाहून सात इन्शुरन्स कंपन्यांनी त्या इमारतीचा आगीविरुद्ध विमा उतरवण्यास नकार दिला होता. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मंत्रालय अगोदरच 'अग्नेय स्व:, इदं न मम' झालेले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेतात फार तण माजलं की ते शेत पेटवुन देतात.
एकतर त्याने माजलेल्या तणाचा निकाल लागतो. राख खत म्हणुन उपयोगी पडते आणि जमीन भाजुन निघते त्यामुळे पुढली पीकं जोमाने येतात.
काहीसा असाच उद्देश असावा. आता भ्रष्टाचाराच पुढलं पिक जोमानं घेता येईल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

'आग लागो त्या सरकारच्या कारभाराला' असे म्हणायचीही आता सोय राहिली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे एकंदरीत ती इमारत 'ऍक्सिडेंट वेटिंग टू हॅपन' या स्थितीला होती असं दिसतंय. कधी तरी व्हायचाच होता अपघात, आत्ता झाला. त्यामुळे जी घातपाताची शंका व्यक्त केली जाते ती मात्र माझ्या दृष्टीने निकालात निघाली. ढिसाळपणा अक्षम्य होता याबाबत वादच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0