डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण

महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण.
आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.
भारतीय शास्त्रीय संगीत हा एक विशाल महासागर आहे. सामान्य माणूस मात्र हया संगीतापासून थोडा अलिप्त आहे. हे संगीत समजायला थोडे अवघड आहे असा एक गैर समज आहे आणि तो वाढवण्यात खुद्द गायाकांनीच हातभार लावला आहे. राजस्थानी , पंजाबी येथील बोलीभाषेतीत चिजांचा अर्थ खुद्द गावायालाच माहित नसतो तर तो त्या गीतामाधला भाव श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचवणार ? डॉ. रानडयानी हया कामी अथक परिश्रम घेतले. अनेक चीजा संग्रहित केल्या त्याचा अर्थ सांगितला. हया संदर्भात त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली ( संगीताचे सौंदर्य शास्त्र , लोकसंगीत शास्त्र ). अनेक गायक, रसिकांना ह्याचा फायदा झाला.
मुंबई –पुण्यामाधला संगीता वरचे चिंतत , चर्चा हया गेल्या अनेक डॉ. रानड्यांच्या शिवाय पूर्ण झाल्याच नाहीत. ते अतिशय चांगले वक्ते होते. त्यांच्या लिखाणा प्रमाणेच त्यांची भाषणेही विद्वत्ता आणि विनोद यांनी यथेच्च भरलेली असत.
voice culture चे महत्व त्यांनी अनेक कलावंताना पटवले. त्यांच्या कार्य शाळेचा लाभ गायक , नट , वृत्तनिवेदकानी घेतला. अनेकांना आपल्या आवाजावर किती आमूलाग्र संस्करण होवू शकते ह्याची कल्पनाही नव्हती ती आली !
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे ते पहिले प्रमुख होते. त्यांच्या मधल्या रसिकतेला संशोधक , वक्ता , लेखक , शिक्षक , प्रशासक अशा अनेक पैलूंचा स्पर्श होता. त्यामुळेच ते भारताबाहेरच्या अनेक विध्यापिठाशी जोडले गेले होते.
डॉ.रानडे हे त्यांच्या शिष्या बरोबर अनेक संगीत साधकांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या ज्ञानाचे भांडार सगळ्यांना सदैव उघडे होते.
देवी अहिल्या होळकर हया चित्रपटाला त्यांनी संगीत दिले.अहिल्याबाईंचे कर्तुत्व सांगणारी कथा , शबाना व सदाशिव अमरापुरकारांचा समर्थ अभिनय ही हया चित्रापाठाची वैशिष्ट्ये आहेतच व त्याला सुयोग्य असे डॉ. रानड्यांचे संगीत आहे. कलापिनी-ताईंच्या आवजातीत नर्मदा अष्टक व प्रल्हाद शिंदे ह्यांचा आवाजामधले लोकसंगीत ह्यांचा त्यांनी सुरेख वापर केला आहे.
त्यांच्या निधानंतर अनेक नाही, सर्वच वृत्त पत्रांनी मृत्यु लेख , आठवणी छापल्या होत्या. अनेक दिग्गजांनी त्यांना शब्द-स्वरांची श्रद्धांजली वाहिली. आज एक वर्षांनतर माझ्या भावना एवढयाच आहेत की “ त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत सोपे करून सांगणारे “गाईड” हरवले आहे.
त्यांच्या भाषणाचा एक दुवा देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=dR-I78vd2bM

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मनोज,
voice culture चे महत्व ओळ्खून ते पटवून देण्याचा, अग्रपूजेचा मान रानडेसरांचा आहे.
मुंबई विद्यापीठातील संगीत विभागाविषयीही असेच म्हणता येईल. सर्व प्रकारच्या गायकी-घराणी असलेल्या गुरूंनी तिथे शिकवले ते रानडेसरांमुळेच!
पं.फिरोज दस्तूर (किराणा), पं. गोविंदराव अग्नी (आग्रा), पं जाल बालापोरिया (ग्वाल्हेर), लिमयेबाई (प्रामुख्याने जयपूर-अत्रॉली) अशा अनेक मान्यवरांच्या शिकवणीचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला. शिवाय तेथील सुसज्ज रेकॉर्डिंगरूम, वाचनालय ह्या सुविधाही सुरूवातीपासून तिथे आहेत ह्याचे श्रेयही रानडेसरांचेच!
दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमांतून संगीत मैफिली, कलाकारांच्या मुलाखती, त्यांच्या सहभागाने श्रवणीय झाल्या.
त्यांना विनम्र अभिवादन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोज यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत.
डॉ. रानडे यांच्याबद्दल जवळजवळ काहीच माहिती नव्हती. त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्याबद्दल आभार!
डॉ. रानडे यांना आदरांजली!

यानिमित्ताने वॉईस क्ल्चर पासून ते काही चिजांचा अर्थ वगैरे विषयांवर श्री. मनोज व इतर ऐसीच्या सदस्यांकडूनही अधिक विस्ताराने वाचायलाही आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डॉ. रानडे मराठी वृत्तपत्रांमधे लिखाण करत असत ते वाचत असे. पण व्हॉईस कल्चरबद्दल फार माहिती नाही. त्याबद्दल अधिक लिहाल का?

डॉ. रानडे यांना आदरांजली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशोक रानडे या नावाने दोघे लिहायचे. त्यापैकी एक प्रस्तुत लेखात उल्लेख झालेले. त्यांचा उल्लेख डॉ. अशोक रानडे असा व्हायचाच असे नाही. दुसरे अशोक रानडे पत्रकार. दोघांचाही लेखनाचा विषय संगीत हाच. दुसरे रानडे बहुतेक वेळेस त्यांचे नाव लेखासोबत पूर्ण असावे यासाठी आग्रही असायचे, त्यामागे हा नामगोंधळ नको ही भूमिका असायची. प्रस्तुत लेखातील डॉ. रानडे मुंबईस्थित, तर दुसरे पुण्याचे.
माझे चुकत नसेल तर या दोघांची नावे - अशोक दा. रानडे आणि अशोक श्री. रानडे. फक्त कोण कुठले हे आत्ता नेमके आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माझे चुकत नसेल तर या दोघांची नावे - अशोक दा. रानडे आणि अशोक श्री. रानडे. फक्त कोण कुठले हे आत्ता नेमके आठवत नाही.<<

अशोक दा. रानडे हे 'द' अशोक रानडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात एक चूक झाली आहे . मला बी. आर देवधरच म्हणायचे होते. चुकून , दि.ब. देवधर लिहिले आहे.

सर्वांचे परत एकदा आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम लेख. दुवाही छान आहे. विनम्र अभिवादन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते