संकेतस्थळ

संस्थळाचे दर्शनी पान - भाग २

ऐसी अक्षरेवर वेगळे काय? हा प्रश्न अधूनमधून उपस्थित होतो. इतर संस्थळांप्रमाणेच हीही एक अभिव्यक्तीची जागा, इतकंच आहे का? संस्थळ सुरू केलं तेव्हापासून केवळ इतकंच राहू नये असा कायमच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवात झाली ती मुक्त वातावरणात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देऊन. कमीतकमी संपादन करून प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा, लेखांना तारका देऊन आत्तापर्यंत आलेलं चांगलं लेखन सांभाळून ठेवण्याची सोय केलेली आहे. त्याच मार्गाने पुढे पावलं टाकून गेले काही दिवस आम्ही ऐसी अक्षरेचा लोगो वेगवेगळ्या दिवशी बदलता ठेवला. आता सुरुवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....

Taxonomy upgrade extras: 

दिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१

ऐसी अक्षरे २०२१ दिवाळी अंकासाठी आवाहन.

Taxonomy upgrade extras: 

तक्रारींचा पाढा

Taxonomy upgrade extras: 

संस्थळ बंद असणं आणि गुलाबी पिंका दिसणं हे दोन त्रास सध्या सुधारलेले आहेत. २९ डिसेंबर २०१६ ते ४ जानेवारी २०१७ या सहा दिवसांमध्ये केलेलं लेखन परत मिळवता आलं नाही. या सगळ्याबद्दल दिलगिरी.

अजूनही संस्थळ पूर्णपणे दुरुस्त झालेलं नाही. काम सुरू आहे. पुन्हा संस्थळ बंद करण्याची गरज असल्यास आधी कळवून मगच संस्थळ बंद होईल. लेखन नष्ट होणार नाही याचीही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न होईल.

<धमकी सुरू>या अडचणींबद्दल सविस्तर लेख येऊ शकतो. <धमकी संपली.>

--

या धाग्याचं प्रयोजन म्हणजे आधी ज्या चालत होत्या त्या गोष्टी आता हव्या आहेत आणि बंद पडल्या आहेत त्यांची यादी करणे. सुरुवात म्हणून यादी -

मराठी संकेतस्थळं - इतिहास, प्रकृती, प्रवृत्ती वगैरे

Taxonomy upgrade extras: 

मिसळ पाव वर ऐसी ची बरीच मंडळी बरीच रेंगाळताना दिसतात .... मिसळ पाव काय मातृसंस्था आहे का स्फूर्तिस्थान ? ( हा कोणी कुठे जावे वगैरे असले दुहेरी निष्ठा टाईप भंकस प्रश्न नसून, फक्त कुतुहूल म्हणून विचारत आहे ) च्यायला काय extreme right ऑफ extreme right मंडळींनी भरलेला ग्रुप आहे . बिचारे कोण ताम्हणकर काहीतरी लिहितात आणि लोकं तुटून म्हणजे तू टू न पडताहेत ... एखादाच कोणी मुटे उलटी fight देतोय .. जबरदस्त करमणूक ... एक कुणी श्री गुरुजी नावाच्या id " हा विषय ऐसी वर बरा दिसेल " किंवा तत्सम डाव्या हाताची बॅक हँडेड कॉमेंट मारतंय ... गंभीर करमणूक आहे. असो

ASS - ऐसी स्वयंसेवक संघ

Taxonomy upgrade extras: 

बहुभाषिक द्वैमासिकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Taxonomy upgrade extras: 

'इंडियारी' या बहुभाषिक द्वैमासिकामध्ये (indiaree.com) आता मराठी विभाग सुरू होत आहे. त्यासाठी कथा, कविता, ललितलेख इ प्रकारचे लिखाण पाठवण्यासाठी हे आवाहन.
हे मासिक इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातील लिखाणाचे स्वामित्वहक्क लेखकाचे/लेखिकेचे असतील. लिखाणाबद्दल सध्या तरी काही मानधन मिळणार नाही.

इथे फोटो कसे चढवावेत?

नवीन सदस्यांना मदत असा ह्या धाग्याचा हेतू आहे.
फोटो चढवणं जरा कठीण वाटू शकतं. खाली दिलेली पद्धत वापरल्यास फोटो चढवणं सोपं वाटू शकेल.
इथे फोटो चिकटवण्यासाठी आधी तो फोटो जालावर असणं आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की तुमच्या लॅपटॉप किंवा
वैयक्तिक संगणकावरून थेट इथे फोटो टाकणं शक्य होणार नाही. जालावर म्हणजे पिकासा, फ्लिकर किंवा तत्सम
कुठल्याही साईटवर असलेला फोटो इथे चिकटवता येईल. इथे मी पिकासाचं उदाहरण घेतलं आहे.

पायरी १

पिकासा अकाउंट मध्ये लॉगिन करून अपलोड वर टिचकी मारा

२०१५च्या दिवाळी अंकासंबधात काही प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

पिवळा डांबिस ह्यांच्या 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण' ह्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमधून पुढील विचारांना चालना मिळाली.

'ऐसी'च्या २०१५ दिवाळी अंकातील आजपर्यंत प्रकाशित झालेले लेखन पाहिले आणि असे लक्षात आले की काही लेखक येथे केवळ दिवाळी अंकापुरतेच आलेले दिसतात. ह्या लेखकांचा 'ऐसी'मध्ये अन्य कसलाहि सहभाग - उदा. अन्य दिवाळी अंकाबाहेर लेखन, प्रतिसाद इत्यादि. एरवी येथे कधीच न दिसलेले हे लेखक अचानक धूमकेतूसारखे आज येथे कसे उगवले? हा दिवाळी अंक 'ऐसी'च्या सदस्यांच्या लेखनासाठी आहे ना?

ह्याची कमीत कमी दोन उत्तरे मला सुचतात. काहींनी (उदा. मन्या जोशी, पंकज भोसले, शाहू पाटोळे) ह्या लेखकांनी एकतर गेल्या एकदोन दिवसांपूर्वीच आपापले लेख संपादकांकडे पाठवले आणि संपादकांना ते गुणवत्तेने इतके उच्च वाटले की त्यांनी तत्काल दिवाळी अंकात त्यांचा समावेश करून 'ऐसी'च्या सदस्यांना उपकृत करायचे ठरविले. दुसरी शक्यता अशी की संपादकांना ह्या गुणवान लेखकांची उपस्थिति 'ऐसी'च्या दिवाळी अंकात असावी असे मनापासून वाटले आणि त्यांनी ह्या लेखकांच्या मागे लागून त्यांच्याकडून लिखाण मिळविले.

ह्या दोन्ही पर्यायांना माझा आक्षेप आहे. दिवाळी अंकासाठी साहित्याची मागणी करणारा लेख येऊन गेल्यास काही महिने होऊन गेले. त्यात एक कालमर्यादा घालून दिली होती. विशेष गुणवत्तेच्या लेखनाच्या बाबतीत संपादकांनी मोडायलाहि माझी हरकत नाही पण मग अशी अपेक्षा निर्माण होते की अशी सवलत दिलेले लेख त्या गुणवत्तेचे असावेत. हे लेख तसे आहेत का?

दुसरा पर्याय म्हणजे संपादकांनीच कोणाच्या मागे लागून त्यांचे लेखन मिळविले. येथेहि तोच आक्षेप. असे लेखक काही अद्वितीय प्रतिभेचे असले तर एकवेळ चालेल पण तसे येथे आहे का? दुसरे असे की 'अमुक लेखन वाचा' असे 'ऐसी'च्या सदस्यांना आपल्या अधिकारात अनाहूतपणे सांगण्याचा अधिकार संपादकांना कधी मिळाला?

'ऐसी'ला धरून असलेले कैक सदस्य येथे नित्याने मूळ लेखन आणि प्रतिसाद देऊन संस्थळ चालू राहण्यास सहभाग देतात. कोणीतरी बाहेरचा अचानक आणून 'त्याचे लिखाण तुम्ही आता वाचा' हे त्या सदस्यांवर लादणे योग्य वाटत नाही. पूर्वी जाहीर करून एका विवक्षित विषयावरचा लेखसंग्रह (Anthology) काढण्यातहि काही वावगे नाही पण तो इरादा पहिल्यापासून सदस्यांच्या पुढे ठेवला पाहिजे.

हे लिहिण्यापूर्वी अशा काही 'नव्या' लेखकांची मी गोळा केलेली माहिती खाली दर्शवीत आहे.

लेखक - मन्या जोशी
लेख - मन्या जोशीच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’ज्याम मजा’ संग्रह
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ दिवस १३ तास

लेखक - पंकज भोसले
लेख - प्लेबॉयचे साहित्यिक गोमटेपण
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २० तास ४५ मिनिटे

लेखक - शाहू पाटोळे
लेख - बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ हे पुस्तक
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २१ तास ४ मिनिटे

लेखक - मुकुंद कुळे
लेख - नवी गाणी नवा बाज
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - http://aadital.blogspot.com/
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ दिवस २१ तास

लेखक - मुग्धा कर्णिक
लेख - चाळ नावाची गचाळ वस्ती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ वर्ष ३ आठवडे
(येथे थोडे अधिक. ह्या लेखिकेचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे १ वर्षांपूर्वीच्या २०१४ च्या दिवाळी अंकातील ’चळवळ : व्यक्ती आणि समष्टी’ हा १४ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज १ वर्षे ३ आठवडेच झालेले आहेत.)

लेखक - सचिन कुंडलकर
लेख - वॉकमन
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता २००९
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्षे १ आठवडा
(येथे थोडे अधिक. ह्या लेखकाचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे २ वर्षांपूर्वीच्या २०१३ च्या दिवाळी अंकातील ’माझा परिसर, माझा कलाव्यवहार' हा २८ ऑक्टोबर २०१३ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज २ वर्षे १ आठवडाच झालेला आहे. २०१४च्या दिवाळी अंकात ह्या लेखकाने ड्रॉप घेतलेला दिसतो!)

लेखक - सलील वाघ
लेख - सलील वाघच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - 'सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५'
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्ष २७ आठवडे

संस्थळाबद्दल काही आकडेमोड.

Taxonomy upgrade extras: 

काही गृहितकं -
१. ऐसी हे एक फोरम आहे. तेव्हा इथे चर्चा होणं किंवा लेखावर प्रतिक्रिया देणं हे सगळ्यात जास्त अपेक्षित आहे. तेव्हा फोरम किती "जिवंत" आहे ते तपासायला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत-
अ) इथे येणारे नवीन लेख
ब) लेखांवर होणार्‍या चर्चा.
अर्थात, अ) पेक्षा ब) नेहेमीच जास्त असणार आहे, त्यामुळे ब) ची माहिती ह्यासाठी जास्त मोलाची असेल.
अ) नक्कीच महत्त्वाचं आहे, पण इथली बरीचशी अ‍ॅक्टिव्हिटी ही प्रतिक्रिया आणि प्रतिसाद-उप-उप-उप प्रतिसाद ह्या स्वरूपाची असल्याने अ) चा अभ्यास आपण थोडा नंतर करू.
.

अजोंना अनावृत्त पत्र

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः हे लेखन इथे हलवले आहे.

पाने

Subscribe to RSS - संकेतस्थळ