गद्य

रस्त्याचे ऋण ...

पूर्वी आमचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा फोटोत दाखवल्यासारखा असा दिसायचा. दोन्ही बाजूनी दाट झाडी अन त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानी सारया रस्त्याने स्वागताला उभ्या असत. झाडांच्या या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की आपण झाडांच्या कंच हिरव्यागार पानांच्या हिरवाईतल्या गुंफातून प्रवास करतो आहोत की काय असे वाटायचे. रस्त्याच्या दुतर्फा असणारया या झाडांच्या भाऊगर्दीत प्रामुख्याने लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडे जास्त करून असत. त्यातही कडूलिंबाची मेजोरिटी मोठी होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

गावाकडच्या आठवणी अन पावसाचा सांगावा .....

उन्हाळा जसजसा संपत यायचा तसे कधी कधी आभाळ दाटून येई अन वडिलांची ओढ त्या आभाळाकडे असे. थोडे जरी झाकाळून आले तरी ते गावाकडे शेतात असणाऱ्या गडयाला फोन करत. तिकडे काय हालहवाल आहे याची चौकशी करत. पण त्यातूनही त्यांना समाधान मिळत नसे. मग ते गावाकडे असणाऱ्या त्यांच्या लहान भावंडाना म्हणजे सदाशिव काका किंवा नेताजी बाबा नाहीतर क्वचित बापूकाकांकडेही ते विचारणा करत. शेतातला गडी नानू राठोड हा अक्कलकोट तालुक्यातल्या कडबगावचा होता, त्याचं मराठी अगदी तिखट शेंगाचटणी सारखं तरतरीत आणि लवंगी फटाक्यासारखं कुरकुरीत होतं. सोलापुरात थोडा जरी पाऊस झाला तरी वडील त्याला विचारत,"काय नानू पाऊस आहे का रे गावाकडे ?".

ललित लेखनाचा प्रकार: 

लाकूडतोड्याची लोखंडी कुल्हाडी - कथेचा सार

लाकुडतोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल. लाकुडतोड्याची कुल्हाडी पाण्यात पडली. लाकुडतोड्याने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. जलदेवता सोन्याची, चांदीची आणि लोखंडी कुल्हाडी घेऊन वर आले. लाकुडतोड्याने लोखंडी कुल्हाडी आपली म्हणून ओळखली. जल देवता प्रसन्न झाले, लोखंडी कुल्हाडी सोबत सोन्या आणि चांदीच्या कुल्हाडी हि त्याला दिल्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

शिट्टी

भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या विशेष दाद देत नसत.

उन्हाची तिरीप डोळ्यावर आली तसं भानू कुत्रं उलथापालथा झालं. आता पाण्यात पोहून जंगलात फेरफटका मारावा या विचाराने ते तळ्याकडं चाललं. काठावर त्याला शालन करडू दिसलं. पुढचं पाय वाकवून तळ्यातलं पाणी पीत होतं. हे शालन करडू म्हणजे रंगा बोकडची धाकली लेक. नुकतीच वयात आलेली उफाड्याची पोर.

ललित लेखनाचा प्रकार: 

उप संपादकाची व्यथा- असत्यं वद धनं चर

सन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले. तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले.

ललित लेखनाचा प्रकार: 

श्‍वेता नावाचं फिनिक्‍स

हल्ली कामासाठी बऱ्याचदा माझं ‘फँटम फिल्म्स’च्या अंधेरीमधल्या ऑफिसमध्ये जाणं होतं. ‘फँटम फिल्म्स’ म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल आणि मधु मंतेना या चौघांनी मिळून सुरू केलेलं, प्रॉडक्शन हाऊस. तर ‘फँटम’चा स्वतःचा असा एक स्क्रिप्ट डेव्हलपमेंट विभाग आहे, जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या लेखकांनी पाठवलेल्या चित्रपट संहिता वाचणे, नवीन कथानक डेव्हलप करणे अशी कामे चालतात. तिथे एक छोट्या चणीची सुंदर मुलगी नेहमी, तिच्या लॅपटॉपवर काही तरी वाचत असताना दिसायची. जेव्हा वाचत नसायची, तेव्हा ऑफिसमध्ये उत्साहीपणे भिरभिरत असायची. तिला कुठे तरी पाहिलं आहे, असं सतत वाटायचं.

ललित लेखनाचा प्रकार: 

यक्ष प्रश्न - भस्मासुराला वरदान देणारे

भस्मासुराची कहाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही थोडक्यात सांगतो. भस्मासुराने उग्र तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराने वरदान मागितले, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होईल. महादेवाने पुढचा काहीच विचार न करता तथास्तु म्हंटले. भस्मासुराने महादेवाने दिलेल्या वरदानाचा प्रयोग महादेवावारच करण्याचे ठरविले. महादेवाला स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. महादेवाने भगवान विष्णूंचा धावा केला. भगवंताने मोहिनी रूप धारण केले. स्वत:च्याच डोक्यावर हात ठेऊन भस्मासुर भस्म झाला. इति.

ललित लेखनाचा प्रकार: 

शांबरीक खरोलिका

मध्ये मी पाहिलेल्या दोन मी मूकपटाबद्दल थोडेसे येथे लिहिले होते. परवा विजय पाडळकर यांचे ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे पुस्तक वाचताना मी काही वर्षापूर्वी(बहुधा २००९ मध्ये) पुण्यातल्या मध्ये शांबरीक खरोलिका ह्या कार्यक्रमाला National Film Archives of India(NFAI) मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली. त्याबद्दल थोडेसे.

ललित लेखनाचा प्रकार: 

कैथरीन हेपबर्न-'वूमन ऑफ दि इयर'

12 मे कैथरीन हेपबर्नच्या स्मृति प्रीत्यर्थ

अविस्मरणीय हाॅलीवुड-तीन

सुबह का भूला शाम को घर लौट आए तो भूला नहीं कहलाता....

नायिकेला घरा ऐवजी समाजसेवेत ज्यास्त इंटरेस्ट आहे. घरी नवरा-मुलं यांना सोडून ती सोसायटी, किटी पार्टींमधे बिजी असते। एखाद्या प्रसंगानं तिचे डोळे उघडतात आणि ती जग सोडून पुन्हां आपल्या घरांत रमते...या विषयावर पुष्कळ चित्रपट आले, येत आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद ची आठवण....

‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं...
कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला. चित्रपट होते-‘बेवफा,’ ‘बारिश’ अाणि ‘नवबहार.’ पैकी बारिश मधे एक कव्वाली हाेती, त्यांत तलत देखील एक गायक होता-

‘एक नजर में दिल भरमाए, सूरत हो तो ऐसी हो...’

तसंच ‘नवबहार’ मधे देखील त्याची एकच गझल होती-

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य