गद्य

सत्य

एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.

ललित लेखनाचा प्रकार: 

राधा विलास

कितीही समजवा, कितीही हाकला, पण ती वृद्धा काही मुख्य द्वारामधुन जायचे नाव घेत नव्हती. विशाखाने तिला समजावले, ललीतेने धमकावले, सुचित्राने त्या वृद्धेला काही धन देऊ केले पण नाही. तिचा हट्ट एकच राधाराणीला भेटू द्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

गोम

ललित लेखनाचा प्रकार: 

विश्वामित्र आणि विषाणू

अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली. त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला

नारदा! इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे.

अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना मी वीणा दाखविली तरी त्यांच्या विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते. भारी हुशार आहे तू. कसे ओळखले तू मला?

ललित लेखनाचा प्रकार: 

बिती विभावरी जाग री - जयशंकर प्रसाद

एक सखी आपल्या प्राणप्रिय सखीला जागी करते आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

बाई

भर उन्हाळी दिवशी डोक्यावर फॅन लावुन, कनक पसारा घालून बसली होती. नानाविध जुने फोटो, पुस्तके, डायऱ्या, वह्या, कागदाचे कपटे आसपास विखुरलेले होते. मधेच गॅलरीमधुन येणाऱ्या, वाऱ्याच्या झुळकीने कागदाचे कपटे अस्ताव्यस्त उडत होते. ते सावरताना तिची तारांबळ उडत होती खरी पण चेहऱ्यावरती व्यग्र भाव ठेवुन काहीतरी वाचत होती ती. काही काही डायऱ्या, कागद वाचताना, तिच्या चेहऱ्यावरती पुसट स्मितरेषा उमटत होती. तर काही फोटो पहाताना, डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. कनक होतीच तशी हळवी, मूडी आणि पटकन बोल अंगाला लावुन घेणारी. खरे तर पावसकर बाई तिला नेहमी सांगत -"नाण्याच्या २ बाजू असतात कनक.

ललित लेखनाचा प्रकार: 

तो रविकर का ....

रंजीशही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ ..

ललित लेखनाचा प्रकार: 

टीनेज क्रश सॉन्ग्स

आज काही गोड आणि ग्लॅमरस गाण्यांबद्दल बोलू यात म्हणजे टिनेज क्रश विषयावरती बेतलेली अगदी शुगरस्वीट गाणी. म्हणजे भर उन्हाळी दुपारी, रवाळ कलिंगडाच्या थंडगार फोडीसारखी रिफ्रेशिंग, बासुंदीतील सायीच्या लपक्यासारखी जीभेवर विरघळणारी गाणी.

ललित लेखनाचा प्रकार: 

तीन इच्छा

मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

छोड दो ऑंचल... 

Blue Saree

"व्हाय डू फॅट इंडियन विमेन वेअर सारीज? देअर बेलीज लुक टेरिबल! अँड वी आर अड्वाइज्ड टु कव्हर अप?"
 "व्हाय डू सम  इंडियन मेन होल्ड हॅन्ड्स विथ ईच अदर? दे डोन्ट लुक लाईक दे आर ए कपल!" 

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य