इतर

गूज

तुझ्यावरी आई माझा जीव जडू दे
कोल्यांची बाय तू लाडाची हाय
तुलाच माझ्या मनीचं ठाय
डोंगरावर तुझा दरबार भरू दे
तुझ्यावर आई माझा जीव जडू दे
लेकरांवर तुझी पाखर हाय
चंदनपालखी तुझी दिमाखात जाय
माणिकमोत्यांची फुलं तुला वाहू दे
चाफेनं आई तुझी परडी भरु दे
खणानारळानं तुझी ओटी भरीन
तांबुलविडा आई तुला अर्पिन
चरणांची आई तुझ्या सेवा घडू दे
तुझ्यावर बाय माझा जीव जडू दे
___________________________________
रेणु राजाची सुकन्या ऋषी जमदग्नींची भार्या
परशुरामाची जननी आई एकविरा भवानी

ललित लेखनाचा प्रकार: 

मुंबई कोलाज: बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!

झालं असं की मी माझ्या फायनॅन्शियल ऍडव्हायझरला एक बारीक शंका विचारायला फोन केला.
(हे असं बोललं की आपण करोडोंत खेळत असल्याचा फील येतो... असो)

तर हा मनुक्ष अस्सल मुंबईकर.
एका बाबांचा निस्सीम भक्त.
बाबांना जाऊन काही वर्षं झालेली वगैरे.
त्याच बाबांचा अवतार 2.0 मुंबईत येणार असल्याने हा सध्या प्रचंड एक्सायटेड!

आणि त्याची चूक-बरोबर श्रद्धा ह्या पोस्टचा मुद्दा नाहीयेच...
मुद्दा वेगळाच हय!

ललित लेखनाचा प्रकार: 

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

पहिला भाग प्रकाशित केलेला आहे

ललित लेखनाचा प्रकार: 

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

तितली रानी तितली रानी
मुझको दे दो अपने पर
पर लगाके उड जाऊंगी
अपनी नानी के घर

मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं.
लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल.

माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.)

ललित लेखनाचा प्रकार: 

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर...

एस-९

याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला...

दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती...

स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

ललित लेखनाचा प्रकार: 

सिंधुआज्जींचे वीकेंड होम

शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यामुळे सिंधुआज्जी आणि स्लाॅथ्या नेहमी वीकेंडची वाट बघत असतात. "दूरदेशी गेला स्लाॅथ्या, आणि सिंधुआज्जी" टाईप दौरे नसतात तेव्हा मनीमाऊ, काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, सुहासिनी, तरस बल्बा, पाणचेतक, ......, पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा हे सगळेच आर्जवून आणि आवर्जून सिंधुआज्जींच्या वीकेंड होमला जातात.

टुमदार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका उत्तुंग गावात सिंधुआज्जींचं वीकेंड होम आहे. वाऱ्याची झुळुक आली की अंगणातले बाओबाब डोलू लागतात, आणि त्यांच्यावर राहणारे शाखामृग आणि शहामृग बोलू लागतात. पुरेशी पार्किंग स्पेस असल्यामुळे सिंधुआज्जीही तिथे गेल्या की खूष असतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

सकारात्मक Vs नकारात्मक

एखाद्याने आंतरजालावर लेख लिहिला की त्याच्या वरती जे प्रतिसाद येतात त्यात लेखक / लेखिकेच्या मताशी सहमत अथवा विरुद्ध असे दोन तट पडतात. जे विरुद्ध असतात त्यांची मतं वाचली किंवा प्रतिक्रिया पाहिली की अगदी जहाल ते मवाळ असे सर्व प्रकार दिसतात. काही जण असे लिहितात की वाचल्यावर " आली मोठी शहाणी / शहाणा" " काय समजतो/ समजते स्वतःला " " अक्कल नाही तर लिहिते/ लिहितो कशाला" असा सूर असावा प्रतिक्रिया देतांना असं वाटतं. समजूतदार वाचक असतात ते " बरं लिहिलंय पण हे असं नको होतं, " ठीक आहे पण असा बदल केला असता तर, " मी या वाक्याशी सहमत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे" वगैरे सौम्य भाषेत लिहितात.

ललित लेखनाचा प्रकार: 

त्रूफोची नजर पाहताना... ०१

*लिहिताना मी प्रकाराचा, शैलीचा फारसा विचार करत नाही. परंतु लेखनप्रकार निवडण्यास भाग पाडलं गेल्यामुळे माझ्या सर्व लिखाणाला 'ललित' म्हणायचं ठरवलं आहे.*
*लेखांना आकडे देण्याचं एकमात्र कारण म्हणजे त्रूफोच्या सिनेमासंबंधी मी याच शीर्षकाखाली लिहिणार आहे.*
*कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*

ललित लेखनाचा प्रकार: 

आणि आषाढी पावली...

या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...

*रवींद्र दत्तात्रय तेलंग*

काही प्रसंग आठवणीत घर करून जातात.

12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली.

ललित लेखनाचा प्रकार: 

गुर्जी

गुर्जींची आणि माझी अशीच ओळख झाली. फार दुर्गम नसला तरी आदिवासी भाग होता तो. गुर्जी सुध्दा आदिवासी समाजातील व्यक्ती होते. नोकरी निमित्त त्यांच्या गावाला नेहमीच जाणं होत असे. कायम सायकलवर दिसत. शर्ट पायजमा पेहेराव आणि हातात सायकल. समोर आले की तोंड भरून हसणार. बोलणं इतकं मधाळ आणि मायेने भरलेले की गुर्जी फार जवळचे वाटत.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर