कथा

एका फेसबुक्याचा मृत्यू -एक काल्पनिक कथा

एका फेसबुक्याचा मृत्यू -एक काल्पनिक कथा

-------------------------------------------------

तसा रूढ अर्थाने तो लेखक नव्हता

वाचन अनुभव प्रवासा मुळे त्याचे व्यक्तिमत्व बहुगामी बनलं होते

तो फेसबुकावर आला अन त्यानं एक कथा पोस्ट केली

लोकांना ती आवडली

कॉमेंट्स व लाईक्स चा वर्षाव झाला

कॉमेंट्स व लाईक्स च्या वर्षावाने त्याचा आत्म विश्वास वाढला

व तो नियमाने लेखन करू लागला

अनेक समुह होते त्यात पण त्याने सदस्यता घेतली व लिहू लागला

तिथे पण त्याचे लेखन आवडू लागले

त्याचा आत्मविश्वास पक्का झाला

ललित लेखनाचा प्रकार: 

चिन्मय चित्रे

चिन्मय चित्रे हा एक स्वछदि मुक्त जीवन जगणारा तरुण होता
आई जानकी चित्रे सरकारी कार्यालयात ऑफिसर होती व नुकतीच सेवानिवृत्त झाली होती
चिन्मय फेसबुक वॅट्स अप चे मित्रमंडळ या मध्ये रमला होता
पार्ट्या सहली खाणे पिणे मजेत आयुष्य जगत होता
आयुष्य मजेत जगायचं हे त्याचे जीवन विषयक तत्वज्ञान होता
कामिनी साने ची प्रोफाइल त्याने फेसबुकावर पाहिली अन तो बेहोष झाला
तिने अप लोड केलेले फोटो तो तास न तास बघत बसत असे
कामिनी सौंदर्य वती होती
कधी जीन व स्लिव्हलेस टॉप कधी गर्भ रेशमी साडी -तर कधी ड्रेस - असे फोटो ती अप लोड करत असे

ललित लेखनाचा प्रकार: 

त्रिकथा ३: बलम पिचकारी

ज मला कसंतरीच होतंय.

बऱ्याच वर्षांनी आज कोणतरी खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा पाहिजे होतं असं राहून राहून वाटतंय.

म्हणजे खरंतर लहानपणापासून बरीच वर्षं मी एकटाच राहिलोय.

आई मला जन्म देतानाच गेलेली, आणि बाबूजी मी पाच वर्षांचा असतानाच गेले... आत्महत्या केली त्यांनी.

नंतर सगळं शिक्षण पाचगणीला बोर्डिंग मध्ये... अमेरिकेत ग्रॅज्युएशन.. रिसर्च...

एव्हढी सगळी वर्षं एकटाच तर होतो मी.

आणि एकटेपणाची खतरनाक सवय होते हो...

आख्खच्या आख्ख डेअरी-मिल्क एकट्यानी खायची,

घरी नागडं फिरायची,

ललित लेखनाचा प्रकार: 

ठाणा प्रिमियर लीग

मह्या आणि मी छोट्या शिशुपासूनचे दोस्त, पण काल मी पळून गेलो नसतो तर त्याने मला जाम बदडला असता.

थोडी लांब स्टोरी आहे भेंजो. पाच नंबर बिल्डिंगमधली निकिता मह्याला आवडते. म्हणजे दुरून उसासे टाकण्याइतपत. (साला तिचं नाव बोलता यावं म्हणून इतिहासाच्या पुस्तकातला ख्रुश्चेव्हचा पॅरा घोकत बसायचा - निकिता ख्रुश्चेव्हनी स्टॅलिनचा पंथ संपवला का कायतरी.) तर तिला इम्प्रेस कसं करायचं? मह्या तसा चारचौघांसारखा. शिक्षण, नोकरी सगळं ठीकठाक पण शाईन मारण्यासारखं काही नाही. हां, पठ्ठ्या क्रिकेट मस्त खेळतो भेंजो. कव्हर ड्राईव्ह अगदी उजव्या हातानी खेळणाऱ्या लारासारखा. आणि ऑफस्पिनपण बरी टाकतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

मधुरा

मधुरा ही आमच्या गल्लीतल्या बाळू भटाची मुलगी. बाळू बामणाला बापू आणि मधुरा ही दोन मुले.‌ मधुरा बापूपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. बाळू भट गावात व आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सत्यनारायणाची पूजा, श्राध्दं, पंचांग सांगणं, भुमीपुजनाचे मुहूर्त काढून देणं, लग्न लावणं अशा कामांसाठी डिमांड असलेलं व्यक्तिमत्व होतं. भाग सधन शेतकरी, व्यापारी लोकांचा असल्यानं लोकंही भरपूर दानदक्षिणा द्यायचे. पैसे आणि शिधा वेगळा. कधी कापड, भांडी सुध्दा मिळायची.

ललित लेखनाचा प्रकार: 

मुक्तविहारी

https://movingimages.files.wordpress.com/2010/08/are-they-really-free.jpg
.

ललित लेखनाचा प्रकार: 

दर्पण

दर्पण
..........
गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली.
नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची..
त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता.
त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता..
बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता.. बाजुला बांधलेला पार खचायला आला होता...
त्या वर बसुन त्या वृक्षाखाली त्याची साधना चालु असे.
स्वामीचे व्यक्तिमत्व पण गुढ पण आवडावे असेच होते....
गोरापान देह..चेहे~यावर मार्दव व डोळ्यात अपार करुणा ..
मात्र हसणे निश्किल असे होते...

ललित लेखनाचा प्रकार: 

लग्न..एक लोक कथा..

लग्न..एक लोक कथा..
एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले....
व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते..
घरात म्हातारी आज्जी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार? त्यांतून परमुलुख..त्या मुळे आज्जी ला तुला प्रवास झेपणार नाही..वय झाले असे सांगून घरी ठेवण्याचे ठरते..
घरात एक किशोर वयीन नात असते तिचे आज्जी वर खूपं प्रेम असते..
तिच्या सारे लक्षात येते..ती आज्जी ला पोत्यात लपवते .व व-हाडा संगे बरोबर घेते...
व-हाड वेशी पर्यंत येते...मुलीकडचे लोक्स स्वागता साठी /सिमांत पूजांना साठी हजर असतात.....

ललित लेखनाचा प्रकार: 

यमदूत

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले

त्याने मागे वळून पाहिले

पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता

आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला

मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे

हे ऐकताच त्याला घाम फुटला

मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत

ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही

पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील

समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ?

तर तुला एक जीवदान मिळेल

समजा मी पळून गेलो तर ?

तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे

ललित लेखनाचा प्रकार: 

त्रिकथा २: आ दा पा दा

मी माधव डोळस उर्फ माध्या डोळस.

एक टाइम माझी पण थोडीशी हवा होती अंडरवर्ल्ड मध्ये.

शिवाय माझं नावही म्हणे २०-३० वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी नामचीन गुंडाशी मिळतं जुळतं होतं.

मला खरं तर आधी भारी वाटायचं हे सगळं.

डेअरिंग याहूम आपल्यात पहिल्यापासून.

केशूचा तर उजवा हात होतो मी... आणि डावा हात मदन्या.

पण केशूभाई म्हणायचाच, 'खरा जिगर माध्यातच आहे'

मदन्यात डेअरींगपेक्षा क्रौर्य जास्त होतं...

कुठे झुरळाला चटकेच दे, कुत्र्यांचे पायच बांध, आंधळ्या भिकाऱ्याला टपलीच मार असं काय काय करायला भारी आवडायचं त्याला.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा