कथा

कार्नेगी देवाची कहाणी

ऐका देवा महाराजा कार्नेगीजी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and f*** the people.

ललित लेखनाचा प्रकार: 

फर्मी साहेबाची ऐसी तैसी

removed for print media

ललित लेखनाचा प्रकार: 

डॉक्टर ननवरे -- एक मॅॅड सायंंटिस्ट

जो माणूस झोपलेला असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या कुशीत झोपलेले असते. जो माणूस आळस झटकून उभा राहतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान उभे रहाते. जो माणूस चालत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या बरोबर चालत रहाते. जो माणूस पळत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या पाठोपाठ पळत असते.
-------- इति प्रसिद्ध जपानी तत्वज्ञ मी (१५२४-१५९७)

ललित लेखनाचा प्रकार: 

बाधा

बाधा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .
राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .

ललित लेखनाचा प्रकार: 

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

चाळकऱ्यांनी एकजुटीनं 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

(नदीम-) श्रवणभक्ती

[हल्लीच मी लिहिलेल्या 'बटाट्याच्या चाळीतला लॉकडाउन' या कथेला 'काहीतरी बऱ्यापैकी वरिजिनल लिहा' असा एक प्रेमळ सल्ला मिळाला होता. त्यामुळे ('वरिजिनल' हा शब्द लेखकाचा ओरिजिनल असल्यामुळे नीट कळला नाही, पण-) माझं हे ओरिजिनल आणि रिजनल असं दोन्ही प्रकारचं लिखाण लिहायचा मोह अनावर झाला. अर्थात हे सगळं गंमत-जंमत या हेतूनंच लिहितो आहे याची कृपया नोंद घ्यावी. 'बऱ्यापैकी' हा शब्द कळला. हे त्यात सामील होतं की नाही हे वाचकांवर सोपवतो....]

आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

बटाट्याच्या चाळीतला 'लॉकडाऊन'

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!

चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.

ललित लेखनाचा प्रकार: 

तैवान झिंदाबाद

तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट.

मी ऑफिसमध्ये चटर्जीदाबरोबर काम करत बसलो होतो. म्हणजे तो एडिटिंग करत होता आणि मी "क्या बात है सर" वगैरे म्हणत त्याला प्रोत्साहन देत होतो. तेवढ्यात मह्याचा फोन आला. "कामात आहे रे, नंतर बोलूया," एवढं बोलून मी फोन ठेवला. "महेश का फोन था क्या? साला उतना जुगाडू आदमी मैंने जिंदगी में नही देखा!" चटर्जीदा म्हणाला. त्याच्या एका खडूस क्लायंटकडून अडकलेल्या पैशांची रिकव्हरी मह्याने करवून दिली होती तेव्हापासून मह्याबद्दल त्याला कौतुकयुक्त आदर आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

वरदान

सर्व वाचकांचे आभार

ललित लेखनाचा प्रकार: 

थेरप्युटिक नेचर वॉक

आम्ही कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. रविवारची सकाळ होती. मी पोहे खात न्यूझीलंडची कोणतीतरी वनडे मॅच बघत होतो एवढ्यात मह्या घरी आला.

"गॅव्हिन लार्सन सोड भेंजो, हे बघ काय," असं म्हणत तो बाजूला बसला आणि क्लासच्या बॅगेतनं बरीच चकाचक पॅम्प्लेट्स काढून त्यानी टीपॉयवर ठेवली. "माझ्या क्लासमधला समीर सुट्टीत इंग्लंडला गेला होता. तिकडे हॉटेलात रिसेप्शनला टुरिस्ट पॅम्प्लेट ठेवली होती ती सगळी उचलून आणली साल्यानी. मी म्हटलं मला दे. झेरॉक्स काढून उद्या परत द्यायच्या बोलीवर दिली."

"आता तू काय लोणचं घालणार त्यांचं?" मी पोह्यांचा बकाणा भरत बोललो.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा