कथा

End Game

सर्व वाचकांचे आभार !

ललित लेखनाचा प्रकार: 

ती सध्या काय करते?

"तू वर्षभरासाठी दूर जातेयस आणि कुठे ते मला सांगत नाहीयेस?" निकोलाय अविश्वासाने म्हणाला. त्याच्या आवडत्या मश्रूम पिरोगींना त्याने हातही लावला नव्हता.

"मी नाही सांगू शकत रे, राजा! सरकारी गुपित आहे ते," व्हेराने त्याची मनधरणी करायचा पुन्हा प्रयत्न केला. पण निकोलाय फुरंगटून बसला होता.

अखेरीस व्हेरा म्हणाली, "तर मग ऐक."

===

निकोलायने वोदकाचा अजून एक घोट घेतला. ती जळजळीत ऊब घशाखाली जाताना त्याचे लक्ष समोरच्या आरशाकडे गेले. पन्नाशी उलटल्यावरही त्याच्या चेहर्‍यात फारसे बदल झाले नव्हते, पण डोळ्यांमधील निरागस भाव केव्हाच हरपले होते.

===

ललित लेखनाचा प्रकार: 

चंद्रप्रभाचे सिंह

छापील माध्यमात प्रकाशनासाठी कथा अप्रकाशित करत आहे.

वाचकांचे अनेक आभार.

ललित लेखनाचा प्रकार: 

मोहन गाढवे

मोहन गाढवे माझ्या गावा शेजारच्या गावात रहात होता. तो आणि मी एकाच शाळेत शिकायला होतो. आमच्या वर्गशिक्षकांनी पोरं मोहन्याला गाढव्या, गाढवीच्या असं म्हणत म्हणून त्याला 'मोगा' हे नाव दिले. सगळे त्याला मोगा म्हणू लागले. कुणी गाढवे आडनावावरुन चिडवलं तर लगेच हेडसरांकडे रडत जायचा. हेडसर वैतागून गेले, एक दिवस बोलले गाढव खूप कष्टाळू आणि इमानी प्राणी आहे. तूला कुणी गाढव म्हणाले तर अजिबात चिडू नकोस. गाढवासारखा अभ्यास कर मग बघ गाढव चिडवणारे गाढवे साहेब म्हणतील.

ललित लेखनाचा प्रकार: 

ऍक्टर्सच्या लहानपणचे व्हिडीओ (ऊर्फ फालतू क्लिकबेट) (ऊर्फ मर्यादित कल्पनाशक्ती)

डिसेंबरमधली स्टोरी. नाताळच्या आसपासची.

मह्या आणि मी नेटफ्लिक्सवर कोणतीतरी फिल्म बघत होतो. कोणाच्यातरी डोळ्यांसमोर अख्खं आयुष्य तरळतं असा सीन होता. अगदी बालपणापासून वगैरे.

"भेंजो हा लहान पोरगा वेगळा आहे. त्या अॅक्टरच्या लहानपणचा नाहीये तो व्हिडिओ!" मह्या एकदम बोलला. "त्या अॅक्टरला जन्मखूण आहे बघ डाव्या कोपरावर. पोराला नाहीये तशी खूण." फिल्म रिवाईंड करत मह्या डिटेल्स दाखवू लागला.

ललित लेखनाचा प्रकार: 

ड्राय डे

"उद्या डिनरला बिर्याणी खायची का रे?" मह्यानी मला विचारलं.

"नको रे भेंजो. लास्ट आठवडा आहे. ती नवीन सिप घेतली, तेव्हापासून एप्रिलमध्ये इन्क्रीमेंट मिळेपर्यंत जरा कट्टूकट होणारेय."

"अरे खर्च नाही यार. बाॅसिणीच्या नवीन घरी पार्टी ठेवलीय. एमडीपासून सगळ्यांना बोलवलंय तिनी. मला कार्ड देऊन बोलली, तू नक्की ये आणि हवं तर कोणाला बरोबर आण. पार्टीत काय पिणार हेपण विचारलं पण मला बरोबर नाही वाटलं मग ज्यूसच बोललो."

ललित लेखनाचा प्रकार: 

"समीर"

तू सकाळी office ला जाणार, संध्याकाळी late येणार आता हे रोजचच होणार. Free असताना किती बर असायच ना? वाट्टेल तेव्हा भेटता यायचं, हल्ली chatting कमी झालाय, बोलाणही कमी होणार, पर्यायच नाही म्हणून आपण ते समजाऊन घेणार. आत्ता काय आणि नंतर काय Busy तर व्हावाच लागणार होत.

तुझी वाट पाहायला आवडत रे मला, पण त्यानंतर तू समोर हवा असतोस, तुला घट्ट मिठी मारायची असते, तुझ्याकडून एखादा पापा हवा असतो, तुझा थकवा एका क्षणात जावा अशी माझी इच्छा असते. तुलाहि हेच हव असत ना?

ललित लेखनाचा प्रकार: 

Feral people in the urban jungle

गोवा फिल्म फेस्टिव्हलला बेस्ट डाॅक्युमेन्टरीचं प्राईझ खरं आम्हालाच मिळणार होतं; पण आम्ही डाॅक्युमेन्टरी बनवलीच नाही भेंजो. तर त्याची ही गोष्ट.

ललित लेखनाचा प्रकार: 

सोमा टक्रीकर -- एक कालवश मर्मस्पर्श

Touch

(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित)

ललित लेखनाचा प्रकार: 

खोळ

‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला.

उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा