कथा

थ्री डिग्रीज ऑफ सेपरेशन

शाळा सुटली आणि आम्ही घरी न जाता सरळ शरयूआज्जींकडे गेलो. एकतर त्यांच्याकडे पौष्टिक लाडू असतात, आणि दुसरं म्हणजे त्या मस्त गोष्टी सांगतात.

"विजू, मोना, अरे आईला सांगून आलायेत का? नसेलच. थांबा, मीच सांगते तिला," म्हणत शरयूआज्जी आरामखुर्चीतून उठल्या आणि हळूहळू चालत इंटरकाॅमकडे गेल्या. "तुझी बाळं इथे आहेत गं," एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला.

"आज्जी, आज्जी, आमच्या शाळेत ना आज एक इतिहासतज्ञ आले होते," मोना एक्साईट होऊन सांगू लागली. "१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल ते सांगत होते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दलसुद्धा!"

ललित लेखनाचा प्रकार: 

एथिकल टुरिझम

इटालियन भाषेच्या क्लासला सुट्टी लागली, तेव्हा मह्या आणि मी वीकेंडला साईड बिझिनेस करायचं ठरवलं. बिझिनेस काय तर टूरिझम. भेंजो प्रत्येकालाच कुठेतरी जाऊन फोटो काढून इन्स्टावर टाकायला आवडतं.

डहाणूजवळच्या एका गावात मह्याच्या ओळखी होत्या. तिकडे जाऊन आम्ही सेटिंग लावून आलो. प्लॅन असा की शनिवारी सकाळी बसनी निघायचं, गावात जाऊन चिकन हाणायचं, दुपारी झोप काढायची, संध्याकाळी जरा शेतात भटकायचं, मग दारूशारू करून जेवून झोपायचं. सकाळी उठून नीरा प्यायची, नाश्ता करून परत शेतात फिरायचं, मग जेवून बसनी परत यायचं. फुल्ल चिल मारायचा प्लॅन भेंजो.

ललित लेखनाचा प्रकार: 

उगाच सुचलेली कथा

सीएसएमटीला गरीब रथ एक्स्प्रेस ची नुकतीच एन्ट्री झाली. घर सोडताना संसारी माणूस कुलूप लावलं की नाही याची खात्री करतो... अगदी तसच बड्या गोल्डफ्लेकची दोन पाकीट खिशात आहेत की नाही याची त्याने खात्री केली. प्रवास साधारण 4 तासाचा होता. एवढ्यासाठी तिकीट काढण्याची धावपळ करण्यात त्याला रस नव्हता त्यामुळे आवडत्या अंकाच्या डब्यात बसायचं त्याने ठरवलं...

ललित लेखनाचा प्रकार: 

जंगल आणि तो (कथा)

पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. पण अजून एकदा ती उबळ उफाळून आल्यावर त्याने दबक्या आवाजात त्या खोकल्याला वाट करून दिली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमल्यावर, एखादी अघोरी शक्ति पाहून एखादे घुबड चित्कारले आहे,असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते, तशी घरघर त्या छातीच्या पिंजर्‍यातून सारखी बाहेर यायची. अधून मधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरव्ही तो मनसोक्तपणे खोकलला असता. पण या वेळची परिस्थिती वेगळी होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

!!

शुकशुक!!
किती?
पाश्शे.
२००?
चला.
कुठाय?
इथच १० पावलावं.
वाकुन या सायेब. हां हंगाश्शी!
चल उतर कपडे - माझेही , तुझेही. मला वेळ नाय.
.
.
(खसफस )
.
.
( खोलीत खूडबूड)
.
(घाबरुन) ए कोणाय पलंगाखाली? बाहेर नीघ.
ओ ओ सायेब कोन नाय तिथं. उरका तुमचं. कुठुन येतात!!! नाय तर चल नीघ भायेर. नको तुजं पैसे, चल नीघ.
.
.
ओ ओ ओ सांगीतलं नं कोन नाय!!! चल निघ इथुन मुडद्या, हलकटा.
.
.
तुझा का?
.

ललित लेखनाचा प्रकार: 

बलिदान

टेबलाखाली बसलेल्या त्या मंगळ्याने मधल्या हाताची सातही बोटे जांभळ्या अल्गीच्या खारट द्रावात बुडवली, आणि त्याच्या पोटपंखातून आपसूक दाद निघाली, "वाह!"

"तू आमची भाषा शिकलास तर!" बाजूच्या खुर्चीवर बसलेली धरा हसत म्हणाली.

मंगळ्याने संयुक्त डोळे मिचकावले आणि तो म्हणाला, "ढवळ्याशेजारी बांधला..." "मंगळ्या!" त्याचे वाक्य धराने पुरे केले आणि दोघेही हसू लागले.

खऱ्या मिशनला काही काळातच सुरूवात होणार होती. त्याआधीच्या काहीशा तणावपूर्ण क्षणांमध्ये दोघांनी सख्ख्या शेजाऱ्यांची सोबत शोधणे स्वाभाविकच होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

खट्टे अंगूर १ : काळे मॅडमचे मिस्टर

Grapes

ललित लेखनाचा प्रकार: 

लघुकथा - प्रेमाची लांबी

प्रेमाची लांबी
---------------------------

नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच
वाटेल.

तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती .

एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर !
ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !”
तो हसत म्हणाला, “अस्सं ? मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं !”

ललित लेखनाचा प्रकार: 

इटालियन कनेक्शन

मह्याचा डीपी बेस्ट आहे. पिसाचा मनोरा कलतोय आणि मह्या त्याला जमीनदोस्त करायला अजून ढकलतोय असा. पण डीपी काढायला मह्या इटालीला गेला ती स्टोरी अजून जास्त बेस्ट आहे.

तर मह्याचं अॅप्रेझल झालं तेव्हा त्याच्या बाॅसिणीनं सांगितलं की काहीतरी नवीन गोष्ट शिकतोयस असं दाखवलं तर पुढच्या वर्षी प्रमोशन होऊ शकेल. त्यांची कंपनी औषधं एक्स्पोर्ट करते. सिनियर ऑफिसर झाल्यावर पोलंडमधे पॅरंट कंपनीच्या काॅन्फरन्सला जायला मिळतं दर वर्षी. तर बाॅसिण प्रमोशनचं बोलली आणि मह्या ऑलरेडी हवेत गेला.

ललित लेखनाचा प्रकार: 

ती लेस्बिअन आहे?

मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते.
मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा