निबंध

निबद्ध : माही मालकीन

निबद्ध : माही मालकीन

ललित लेखनाचा प्रकार: 

उदासगाणी

चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

ललित लेखनाचा प्रकार: 

म्हातारी मांजर

आमच्या गावाला शेजारील घरात एक मांजर पाळलेली होती.( नाव वैगेरे काही ठेवत नाही) तिची प्रकट होण्याची कथा अशी.

ललित लेखनाचा प्रकार: 

निबंध : माझा प्रियकर

मला निबंध लिहता येत नाहीय. गद्यपण जास्त लिहता येत नाहीय. मी कविता करते आणीक कविता वाचते. मला कविता खुप खुप आवडतात अणीक मला बक्षीस मिळणार आहे. आमच्या गल्लीत दरवर्षी गणेशोत्सवात आणि निरनिराळ्या जयंत्यांच्यावेळी त्या त्या जातीधर्मातल्या कविता करणार्‍यांना बक्षिसे देतात. माझा प्रियकर पण कविता करतो आणिक त्याचा संग्रह पण आहेय. ऐंशी रुपायला आहे आणि दुसरा दोनशे रुपायाला आहे. दोन्ही एकत्र घेतले तर तीस रुपये सुट मिळुन दोनशे पन्नास रुपयाला मिळते. एकुण एक हजार प्रति छापल्या आणीक अडीचशे गेल्या असे माझा प्रियकर सांगतो. ह्या सर्व अडीचशे लोकांना तो ओळखतो असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल.

ललित लेखनाचा प्रकार: 

निबंध : माझा नवरा

मी एका पाच हजार मित्र असणार्‍या फेसबुकवरच्या प्रसिद्ध लेखकाची बायको आहेय. त्याला पाच हजार फ्रेंड असले तरी लाईक्स मात्र सहाशे सातशेच्या वरती जात नाहीत. तरीही तो काहीही लिहो पाचशे जण त्याचे म्हणणे मान्य करतात म्हणजे माझ्या नवर्‍यामध्ये नक्कीच नेता होण्याचे काहीतरी गुण असतील. पुर्वीच्या काळी नेत्यांचे लाखो समर्थक असायचे, आताशा हे पाच हजार पेक्षा नेहमीच कमी असतात त्यामुळे त्यांना #मायक्रोनेता असे म्हणता येईल. एखादा माणुस किती मोठा तर ज्याला जेवढेच लाईक आणि तेवढेच फ्रेंड्स आहेत त्याला खरा नेता म्हणता येईल.

ललित लेखनाचा प्रकार: 

धार्मिक वांग्मय आणि मार्क्सिस्ट मॅनिफेस्टोची पानं.

मार्क्सवाद आणि भक्तिवांग्मय(१) यांच्या परस्परसंबंधांतील ताण्याबाण्यांचा उलगडा करणारा नाही, पण निदान तो गुंता चिवडणारा लेख कधीतरी श्री. बनसोडे लिहितील याची मला खात्रीच होती. तसा तो त्यांनी लिहिलाच. त्यात भक्तिवांग्मयाच्या पुस्तकांतली मधली काही पानं कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची का असतात? हा कळीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. (कम्युनिस्ट वुमनीफेस्टो का नसतो हा तितकाच ज्वलंत प्रश्न मात्र चातुर्याने टाळलेला आहे.) तर बाइंडरच्या चुकांबद्दल त्यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे. बाइंडर पुस्तकं घट्ट बसण्यासाठी एकेकाळी चुका मारायचे.

ललित लेखनाचा प्रकार: 

निबंध : माझे आवडते डावे ऋषीमुनी - चार्वाक

मी डावा आहेय आणीक सोडावॉटरच्या फॅक्टरीच्या परिसरात जन्माला आल्याने कम्युनिस्ट झालेलो आहेय. आमच्या लहानपणी मला अंकलिपी घेउन देतांना त्यासोबत अंकलिपीच्याच आकाराचे मार्क्सबाबाचे एक पुस्तक घेउन दिले होते. अंकलिपीतुन अ आ इ शिकल्यानंतर लगेचच मी मार्क्सबाबाचे पुस्तक वाचुन संपवावे असे माझ्या बाबांना वाटत असावे. मी अंकलिपीतीला अभ्यास संपवण्याआधीच मार्क्सबाबाचे ते लहानसे पुस्तक वाचुन संपवले. आणीक मला ते व्यवस्थीत समजले. आपल्याकडे लहान मुलांना आगोदर अंकलिपी देण्याआगोदर मार्क्सबाबाचे चरीत्र वाचायला द्यायला पाहिजे असे वाटते.

ललित लेखनाचा प्रकार: 

स्पॅम फोन कॉल्स

प्रगत देशात राहण्याचे तोटे, अशी एक लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते. पण तसं केल्यास उजव्या लोकांचा रोष उद्भवेल (अं ... तो तसाही ओढवून घेतेच मी, विसरलेच!) अशी एक भीती आधी वाटली. मग डाव्या लोकांच्या रोषाचीही भीती वाटली. "एवढा राग आहे प्रगत देशांवर तर मग राहतेस कशाला तिथे!" म्हणून या निबंधाचं नाव 'स्पॅम फोन कॉल्स' असं ठेवलं. हे असे इंग्लिश शब्द वापरले म्हणून ठाकरे लोकांचा रोष उद्भवणार नाही; बघा, देवनागरीत लिहिलंय. वर पॉप कल्चर अनुसरण्यामुळे जादाचे कूल पॉइंट्स मिळतील. आणि एक भलती भीती म्हणजे समजा भारतातही आता असले फोनवर फोन येत असतील तर भारतही प्रगत देश झालेला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पुरोगाम्यांचा विजय

पुरोगामी विचारसरणी आणि प्रतिगामी (किंवा कॉंझर्व्हेटिव्ह) विचारसरणी यात नक्की फरक काय? माझ्या मते मुख्य फरक हा आहे की प्रतिगामी म्हणतात 'ही व्यवस्था आजपर्यंत चालू आहे म्हणून चालू राहाणार, राहिली पाहिजे. त्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यांवर घाला आला तरी बेहत्तर.' याउलट पुरोगामी विचारतात 'ही व्यवस्था चालू ठेवण्याचे नक्की फायदे काय? जर तोटेच जास्त असतील तर ही व्यवस्था सोडायला हवी. जर या व्यवस्थेतून थोड्यांचा फायदा आणि अनेकांचा तोटा होत असेल तर ती टाकून अधिकांचा फायदा होईल असे बदल त्या व्यवस्थेत करायला हवेत'.

ललित लेखनाचा प्रकार: 

निबंध : माझ्या आवडत्या स्त्रीया.

मला भारतीय टिव्ही पहायला आवडत नाही. टिव्ही सिरीयलमधल्या अभिनेत्री आकर्षक वाटत नाहीत. त्यांचे सिरीयलच्या पुनुरुज्जीवनवादी पोषाखांऐवजी परिवर्तनवादी पोषाखांमध्ये इतरत्र फोटो येत असतात ते आवडतात पण त्या अभिनेत्री मुळ सिरीयलीत कशा दिसतात हे माहित नसल्याने खुप जास्त आवडत नाहीत. मला भारतीय सिनेमाही तितकासा आवडत नाहीय आणि अनुराग कश्यपच्या सिनेमातल्या हिरोईन्स आवडण्यासारख्या असल्या तरी त्यांनी जीव एक करुन केलेल्या भुमिकांमुळे त्यांची प्रतिमा अशी काही बनते की त्यांचे आकर्षण वाटत नाही (अभिनयासाठी खुप आदर मात्र वाटतो).

ललित लेखनाचा प्रकार: 
Subscribe to RSS - निबंध