संस्कृती

रामनवमी

रामनवमीचा उत्सव आज सर्व देशभर साजरा केला जात आहे. ह्या उत्सवाच्या तिथीची निश्चिति कशी झाली हे जाणण्याची मला उत्सुकता वाटली कारण कोठल्याहि घटनेचा इतका स्वच्छ कालनिर्णय आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये क्वचितच सापडतो आणि जेथे तो असतो तेथे त्याच्या खरेपणाबाबत अनेक शंका असतात असा आपला अनुभव आहे.  ह्या उत्सुकतेपोटी जालावर उपलब्ध असलेल्या रामायणसंहितांचा मी शोध घेतला.  त्यात मला जे दिसले ते पुढे लिहीत आहे.

ह्या संदर्भात शोधलेल्या संहिता दोन गटात पडतात.  पहिल्या गटाची प्रातिनिधिक संहिता म्हणून शास्त्री श्रीनिवास कट्टी मुधोळकर आणि सत्कारी मुखोपाध्याय संपादित 'Ramayana of Valmiki' ह्या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.  दिल्लीमध्ये १८८३ मध्ये छापलेले हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.   ह्या पुस्तकात रामजन्मासंदर्भात खालील श्लोक दिसतात:

ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः |
ततः च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ || १-१८-८
नक्षत्रेऽदितिदैवत्ये स्वोच्चसंस्थेषु पञ्चसु |
ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पताविन्दुना सह || १-१८-९

http://www.valmikiramayan.net येथेहि हेच श्लोक दिसतात, यद्यपि तेथील संस्कृत अशुद्ध आहे

ह्या श्लोकांचे भाषान्तर मन्मथ नाथ दत्तकृत भाषान्तरानुसार
असे आहे:

"And then when the six seasons had rolled away after the completion of the sacrifice, in the twelfth month, on the nineth lunar day, under the Punarvasu asterism, when the Sun, the Moon, Saturn, Jupiter and Venus were at Arius, Capricorn, Libra, Cancer and Pisces, and when Jupiter had arisen with the Moon at Cancer, Kausalya gave birth to the lord of the universe..." (पृ.४९.)

’अध्यात्मरामायण’ नावाचा एक ग्रन्थ, मुनिलाल ह्यांनी भाषान्तरित केलेला, गीता प्रेस, गोरखपूर ह्यांनी छापला आहे.  मूळ रामायणाचा हा संक्षेप दिसतो.  त्यामधील पुढील श्लोक कमी शब्दात तेच तपशील देतो:

मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे।
पुनर्वस्वृक्षसहिते उच्चस्थे ग्रहपञ्चके॥
मेषं पूषणि संप्राप्ते... सर्ग ३, श्लोक १४,१५.

sacred-texts.com ह्या संस्थळामधील राल्फ टी.एच.ग्रिफिथकृत रामायणाचे भाषान्तर येथे आहे.   ह्या भाषान्तरामध्येहि वरील ग्रहस्थितीचे वर्णन दिले आहे.

Wikisource मधून घेतलेले आणि जनमानसावर मोठी पकड असलेले तुलसीदासाचे तुलसीरामायण असे म्हणते:

तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं। कौसल्यादि तहाँ चलि आई॥
अर्ध भाग कौसल्याहि दीन्हा। उभय भाग आधे कर कीन्हा॥
कैकेई कहँ नृप सो दयऊ। रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ॥
कौसल्या कैकेई हाथ धरि। दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि॥
एहि बिधि गर्भसहित सब नारी। भईं हृदयँ हरषित सुख भारी॥
जा दिन तें हरि गर्भहिं आए। सकल लोक सुख संपति छाए॥
मंदिर महँ सब राजहिं रानी। सोभा सील तेज की खानीं॥
सुख जुत कछुक काल चलि गयऊ। जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ॥
नौमी तिथि मधु मास पुनीता। सुकल पच्छ अभिजित हरिप्रीता॥
मध्यदिवस अति सीत न घामा। पावन काल लोक बिश्रामा॥
सीतल मंद सुरभि बह बाऊ। हरषित सुर संतन मन चाऊ॥
बन कुसुमित गिरिगन मनिआरा। स्त्रवहिं सकल सरिताऽमृतधारा॥
सो अवसर बिरंचि जब जाना। चले सकल सुर साजि बिमाना॥
गगन बिमल सकुल सुर जूथा। गावहिं गुन गंधर्ब बरूथा॥
बरषहिं सुमन सुअंजलि साजी। गहगहि गगन दुंदुभी बाजी॥
अस्तुति करहिं नाग मुनि देवा। बहुबिधि लावहिं निज निज सेवा॥

हा सर्व झाला एक गट.

दुसर्‍या गटात पडतात रामायणाच्या अशा आवृत्त्या ज्यांमध्ये रामजन्माच्या निश्चित वेळाविषयी अथवा तिथीविषयी कसलाच उल्लेख नाही.  ह्यामध्ये प्रामुख्याने पडते Baroda Oriental Institute ने निर्माण केलेली रामायणाची critical edition.  येथे उपलब्ध असलेल्या ह्या आवृत्तीमध्ये रामजन्माबाबत इतकेच म्हटले आहे:

कौसल्याजनयद्रामं दिव्यलक्षणसंयुतम्।
विष्णोरर्धं महाभागं पुत्रमिक्ष्वाकुनन्दनम्॥६॥
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा।
यथा वरेण देवानामदितिवज्रपाणिना॥७॥
भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रम:।
साक्षाद्विष्णोश्चतुर्भाग: सर्वै: समुदितो गुणै:॥९॥
अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत्सुतौ।
वीरौ सर्वास्त्रकुशलौ विष्णोरर्धसमन्वितौ॥१०॥

अर्थ: इक्ष्वाकुकुलनन्दन, भाग्यशाली, जणू विष्णूचा अर्धा भागच भासणार्‍या आणि दिव्य लक्षणांनी युत अशा पुत्राला कौसल्या जन्म देती झाली.  देवांमध्ये श्रेष्ठ अशा वज्रधारी इन्द्रामुळे जशी अदिती तशी कौसल्या अतितेजस्वी अशा पुत्रामुळे शोभून दिसली.  सर्व गुणांनी युक्त आणि विष्णूचा चतुर्भागच असा सत्यपराक्रम भरत कैकेयीपासून जन्मला.  सर्व अस्त्रांमध्ये कुशल आणि विष्णूच्या अर्ध्या अंशाने समन्वित अशा लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या दोघांना सुमित्रा जन्म देती झाली.

रामायणाची जी संस्कृत संहिता sacred-texts.com मध्ये येथे उपलब्ध आहे ती वर उल्लेखिलेल्या critical edition शी जुळते.

महाभारतातील खगोलविषयक उल्लेख कितपत सत्यस्थितिनिदर्शक मानावे ह्याबाबत शंकर बाळकृष्ण दीक्षितकृत ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या पुस्तकातील काही विधानांचा उपयोग होतो.  उदा. पृ. ११३ वर ते म्हणतात: "मेषादि संज्ञा भारतात कोठे आल्या नाहीत हे मागेच सांगितले आहे.  भारताच्या कोणत्याहि भागाच्या रचनाकाली त्या प्रचलित असत्या तर त्यांचा काही उल्लेख भारतात आल्यावाचून राहिला नसता, अशी सर्व भारत वाचणारांची खात्री झाल्यावाचून रहावयाची नाही.  तेव्हा भारतरचनाकाली मेषादि संज्ञा प्रचारात नव्हत्या.  तसेच क्रान्तिवृत्ताचे १२ विभाग करून ग्रहांची स्थिति सांगण्याची पद्धति भारतात नाही.  ग्रहांची व चन्द्राची स्थिति जेथे सांगितली आहे तेथे ती नक्षत्रांवर सांगितली आहे." रामायणात वर्णिलेला काल हा सर्वसंमतीने महाभारतातील वर्णिलेल्या कालाचा पूर्वीचा मानला जातो.  रामायण त्रेतायुगात घडले आणि भारतीय युद्धाच्या समाप्तीपासून कलियुग सुरू झाले अशी पारंपारिक श्रद्धा असते.  रामावतारहि कृष्णावताराच्या पूर्वीचा मानला जातो.  म्हणजेच महाभारतरचानाकालात जे ज्ञान नव्हते ते रामजन्माच्या वेळी निश्चितच नसणार.  तर मग रामाच्या जन्मासंबंधी ’अमुक ग्रह अमुक राशीत होता’ असले विधान, तसेच हा जन्म चैत्र महिन्यात झाला हे विधान निर्माणच कसे झाले?  रामजन्माच्या वेळी उपस्थित असलेला कोणीही नंतर बर्‍याच कालाअंती निर्माण होऊ घातलेल्या चैत्रादि संज्ञा, तसेच राशींचे उल्लेख कल्पून त्या कोठे नोंदवून ठेवू शकला नसता.  इतक्या प्राचीन काळात भारतीयांपाशी काही अन्य कालगणनेची आणि आकाशनिरीक्षणाची शिस्त होती असे कोठेच दिसलेले नाही

सारांश असा की आजच्या रामजन्माच्या कहाणीमागे सत्य काहीच दिसत नाही.  कानावर पडलेल्या परंपरा आणि तुलसीदासासारख्यांच्या लिखाणावर सश्रद्धांचा असलेला पूर्ण आणि अचिकित्सक विश्वास हेच तिचे आधार आहेत.

Taxonomy upgrade extras: 

बेख्डेल टेस्ट

हा बेख्डेल टेस्टचा दुवा. एखाद्या कलाकृतीतलं स्त्रियाचं चित्रण पुरेसं स्वतंत्र - व्यापक आहे का, हे तपासण्यासाठी ही चाचणी वापरतात. तिला असलेल्या आक्षेपांबद्दलची ही चर्चा आहे.

***

अशा प्रकारच्या चाचण्या टोकाचे निकष वापरतात, असं समर्थन वर केलं आहे. ते ठीकच. चाचण्या नक्की कशा प्रकारे तयार केल्या जातात, त्या तशा असाव्यात की नसाव्यात याबद्दल मला काही मत नाही. तो शास्त्रातल्या तज्ज्ञांचा विषय आहे.

Taxonomy upgrade extras: 

व्यक्ती, इझम आणि मैत्री

साहिर या धाग्यावर 'साहिर कम्युनिस्ट असूनही तो एका कॅपिटालिस्टला का आवडावा?' अशा प्रश्नावर काही मार्मिक चर्चा झाली. त्यातून एकंदरीतच विचारसरणी - मतांतरं - व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंध यावर टिप्पणी करणारा एक प्रतिसाद रमताराम यांनी दिला. तो मूळ विषयाशी अवांतर असला तरी विचारांना चालना देणारा, स्वतःचा जीव असलेला असल्यामुळे तो स्वतंत्र धागा म्हणून वेगळा काढत आहोत. ज्या प्रतिसादाला उत्तर म्हणून तो दिला होता तो प्रतिसाद इथे सापडेल. - ऐसी अक्षरे

Taxonomy upgrade extras: 

इंग्रजी शब्दांचे/संज्ञांचे संस्कृतीसापेक्ष अर्थ

चर्चाविषय तसा ओळखीच्या विषयाचा.

काही गोष्टींकरता असलेला इंग्रजी शब्द अमुक देशात हा असतो तर तमुक देशात तो असतो. उदाहरणार्थ, उंच इमारतीच्या पाळण्यांना भारतात लिफ्ट म्हणतात तर अमेरिकेत एलिव्हेटर. किंवा रस्त्यावरच्या गाड्यांच्या इंधनाला भारतात पेट्रोल म्हणायचं तर अमेरिकेत गॅसोलीन ऊर्फ गॅस. मोटरगाडीच्या मागील कप्प्याला भारतात डिकी म्हणतात तर अमेरिकेत ट्रंक असा शब्द आहे.

Taxonomy upgrade extras: 

पुणे फिल्म फेस्टिवल : नोंदी, समीक्षा, गमतीजमती...

९ जानेवारीपासून पुणे फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात झाली. अनेक ऐसीकर चित्रपट पहायला जात आहेत. अनेक जण अर्थातच जात नाहीयेत. सगळ्यांसाठीच सामुदायिकपणे फिल्म फेस्टिवलच्या गमतीजमती नोंदवण्यासाठी हा धागा.

यात मुख्यत्वे दोन प्रकारचे प्रतिसाद येतील. एक म्हणजे सिनेमाची परीक्षणं/समीक्षा. यासाठी 'मी अमुकतमुक तीन सिनेमे पाहिले त्यातला हा असा वाटला, तो तितका आवडला नाही' असा प्रतिसाद देण्याऐवजी, त्या सिनेमाच्या नावाचा प्रतिसाद काढावा आणि तिथे सिनेमाविषयी लिहावं. आधीच जर त्या सिनेमाविषयी लिहिलं असेल तर त्याखाली आपलं मत लिहावं. म्हणजे एका सिनेमाविषयीची चर्चा एकत्र दिसेल.

Taxonomy upgrade extras: 

सभ्यता आणि सम्यकता

आजच्या जमान्याची एक खासियत आहे. ही खासियत सांगण्यापूर्वी आजचा जमाना म्हणजे काय ते सांगणे गरजेचे आहे. हा जमाना एका विशिष्ट कालबिंदूवर जन्म घेत नाही. प्रत्येक घरात, कुटुंबात, गावात, जातीत, धर्मात, देशात, क्षेत्रात, धर्मात तो विचित्रपणे चालू होतो, बंद होतो, पून्हा चालू होतो. पण गेल्या ५० एक वर्षांपासून बर्‍यापैकी सतत चालू आहे आणि त्याचा जोर आणि व्याप्ती फारच वाढली आहे. असो. काय आहे ही खासियत? ती आहे माणसाला असलेल्या अकलेचा शोध. लोकांना अचानक असा आत्मसाक्षात्कार झाला आहे कि त्यांना प्रचंड अक्कल आहे.

Taxonomy upgrade extras: 

नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !

विकी डोनर सिनेमा

विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.

वीर्यदान आणि नियोग एक तुलना

Taxonomy upgrade extras: 

पांडव आणि राम ह्यांचे आदर्श.

'पांडव/राम हे वंद्य आहेत ही तर भारतीय संस्कृतीची आधारभूत भूमिका' असे आजच दुसर्‍या एका धाग्याच्या प्रतिसादात मी लिहिले. तेथपासून ही पुढील विचारधारा निर्माण होते.

पांडवांनी राज्याचा वाटा मिळविण्यासाठी कौरवांशी निकराचे युद्ध केले आणि अपरिमित जीवनहानीनंतर त्यांनी नुसता वाटाच नाही, पूर्ण राज्य ताब्यात घेतले ही महाभारताचे मुख्य कथानक. त्यांनी हे जे केले त्याबद्दल सर्व भारतीय त्यांची स्तुतिगीते गात आले आहेत. अशा स्तुतीला ते कितपत पात्र होते आणि, त्याच्याहि पुढे जाऊन, आपल्या वर्तणुकीमधून त्यांनी पुढच्या पिढयांना काय शिकवणूक दिली आणि त्या शिकवणुकीतून पुढच्या पिढयांना कितपत लाभ अथवा नुकसान झाले?

पांडवांच्या पूर्वीच्या अनेक पिढयांकडे नजर टाकता असे दिसते की भारतात बापाकडून मुलाकडे राज्य primogeniture (थोरला मुलगा हा सर्वोत्तम वारस) मार्गाने संक्रमित होत असे. कुरुकुलातहि भरतापासून हीच पद्धति चालू होती. (पांडवांच्या पूर्वीच्या कुरुकुलातील राजांची नावे महाभारतातील आदिपर्वाच्या अध्याय ९४ आणि ९५ येथे पहा - गांगुली भाषान्तर). कौरवपांडवांच्या काळच्या अधिक जवळ आल्यावर दिसतात शंतनूचे दोन मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद गंधर्वांशी लढतांना पडला आणि विचित्रवीर्य राजा झाला. त्याचे तीन मुलगे - धृतराष्ट्र, पंडु आणि विदुर. धृतराष्ट्र अंध असल्याकारणाने तो जरी राजा झाला तरी कारभार प्ंडु करीत असे. ऋषीच्या शापामुळे पंडूला स्वत:चे पुत्र होणार नाहीत असे दिसल्यावर पंडु विरक्त होऊन वनवासात गेला आणि त्याच्या सूचनेवेरून कुंतीने तीन आणि माद्रीने दोन देवांपासून पुत्रोपत्ति करून घेतली तेच पाच पांडव.

हे सर्व लक्षात घेतले की पांडवांचा राज्याचा वाटा मागण्याचा दावा पोकळ होता असे दिसते. ते औरस होते वा नव्हते हा विचार न करताहि पांडवांची अर्ध्या वाटयाची मागणी प्रस्थापित ’राजाच्या थोरल्या मुलाचा हक्क’ ह्या तत्त्वाच्या संपूर्ण विरोधात होता. ’पंडूने काही काळ राज्य केले’ हाही विचार येथे करता येत नाही कारण थोरला भाऊ असतांना पंडु केवळ त्याचा regent म्हणून राज्य करीत होता आणि त्यामुळे त्याच्यापासून पांडवांकडे कोणताच अधिकार संक्रमित होत नाही.

तरीही पांडवांनी इतके मोठे युद्ध केले. ’इतिहास विजेते लिहितात’ ह्या तत्त्वानुसार अर्थातच पांडव हे तत्त्वासाठी भांडणारे आणि कौरव त्यांना विरोध करणारे दुष्ट हा विचार प्रस्थापित झाला पण तो योग्य होता का?

हा प्रश्न केवळ पांडवांच्या झगडून वाटा मिळविण्याइतकाच मर्यादित नाही. त्यातून पुढे मालमत्ता ही संपूर्ण कुटुंबाची आणि प्रत्येक पिढीतील पुरुष सदस्याला त्यातील भाग तोडून मागण्याचा अधिकार आहे ह्या विचाराला चालना मिळाली आणि हा विचार नाना स्मृतींमध्ये ग्रंथबद्ध होऊन भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला.

भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा विचार विनाशकारक ठरला असे दिसते. एकतर जुन्या मालमत्तांचे लहानलहान तुकडे पडत गेल्याने व्यक्तींची आर्थिक क्षमता पिढीमागून पिढी घसरत गेली. मोठ्या मालमत्तांमधून होणारा भांडवलाचा संचय होऊ शकला नाही. दुसरीकडे काहीतरी भाकरतुकडा घरातच उपलब्ध व्हायची शाश्वती मिळाल्याने धडपड करून बाहेर पडण्याला आणि नवे प्रदेश, नवी क्षितिजे शोधण्याला काही अर्थ राहिला नाही. युरोपीय संस्कृतींमध्ये कुटुंबाच्या समाईक मालकीची आणि पिढी-दरपिढी वाटपाची पद्धत नव्हती. मिळकतदार घराण्यांमध्ये सर्व मिळकत बहुतांश थोरल्या मुलाला मिळत असे. अन्य मुलांना स्वत:च्या उपजीविकेचे मार्ग शोधायला लागत असत. काहीजण सैन्यात, काहीजण वकिली-वैद्यकी-चर्च अशा व्यवसायांचे शिक्षण घेऊन तर काहीजण अमेरिका-पूर्वेकडचे देश असे आपापले मार्ग चोखाळत. ह्यातून त्यांचा वैयक्तिक लाभ तर होईच पण त्यांच्या त्यांच्या देशांचा प्रभावहि दूरवर पसरे. ह्यातील काहीच आपल्याकडे घडले नाही आणि त्याला कारण महाभारताने आपल्यापुढे ठेवलेला ’वाटणी मागणे आणि त्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांच्या उरावर बसणे योग्यच’ हा धडा.

पांडवांप्रमाणे राम हा आपला एक आदर्श. पण त्याचे वागणे सर्वकाळ आदर्शवत् होते काय? सीतात्यागाच्या बाबतीत त्याचे वर्तन मला वैयक्तिक पातळीवर निंदनीय आणि राजा म्हणून कर्तव्यच्युति दर्शविणारे वाटते.

रावणाच्या पराभवानंतर आणि वधानंतर सीता रामाकडे परत आली आणि त्याने तिला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करून दाखवायला सांगितले. (फेमिनिस्टांचा पहिला आक्षेप येथेच आहे पण माझा मुद्दा तो नाही.) ती दिव्याला उतरली आणि हे रामाने स्वत: पाहिले. तरीहि काही वर्षांनंतर एका धोब्याने काही शंका व्यक्त केली आणि एव्हढयावरून त्याने सीतेचा त्याग केला. ’स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि। आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा॥’ असे त्याचे कारणहि दिले.

लोकाराधन राजाने करावे हे योग्यच आहे पण त्याला किती महत्त्व द्यावे? ’काहीहि करेन पण लोकाराधन करेन’ इतक्या टोकाला ते नेणे योग्य आहे काय? राजाची अन्यहि कर्तव्ये असतात. प्रजेच्या अधिकारांचे रक्षण हे एक राजाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या पावित्र्याची सत्यता आणि शीलावर डाग न लागणे हा सीतेचा अधिकार होता आणि रामाला तो ठाऊक होता. तरीहि रामाने येथे त्याची पायमल्ली करून लोकाराधनाला प्राधान्य दिले. त्याने हे योग्य केले काय? ’आपल्या सिंहासनाला धक्का पोहोचू नये’ म्हणून त्याने अबलेचा बळी दिला असे म्हणता येईल काय?

आपणांस काय वाटते?

Taxonomy upgrade extras: 

रसिकांतले काही अग्रणी

नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते.

Taxonomy upgrade extras: 

"रोल्स रॉयस

ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते
तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - संस्कृती