चित्रपट

मिडल मॅन

आज यानी विकांत म्हणजे शनिवारी म्हणजेच फनिवारी मित्रांबरोबर बसलो नेहमी सारखं (गब्बरभौ ने येळेत बिर्यानीच आवतन नै दिल सार्वजनिक). ह्यावेळी मात्र क्वचितवालं हॉटेल होत. कधीकधी करतो (म्हणजे जास्तवेळेस कॅश देतो) तसं ह्यावेळीही कार्ड स्वॅप केलं. अन् हाय दैया, डेबिट मॅसेज आला, त्यातलं शेवटचं वाक्य "at xyz bar and restaurant" हे वाचून तोंड कुच्चळ करुन त्या मॅसेजकडं बघण्यापलिकडे पर्याय नव्हता. एकदमच मिडल मॅन नावाचा चित्रपट झरझर मनात येउन गेला.
चित्रपट तसा पॉर्न व्यावसायाशी संबंधित आहे आणि ज्याप्रकारे चित्रपटाची प्रस्तावना होते ते आपोआप पटायला लागतं (पटायला पेक्षा रीलेट व्हायला लागतं).

समीक्षेचा विषय निवडा: 

"पॅरीस कॅन वेट" हल्काफुल्का पण देखणा चित्रपट

बऱ्याच दिवसांनी एखादा निवांत आणि सुंदर चित्रपट पहायला मिळाला आणि लिखाणासाठी हात सरसावला.
"पॅरीस कॅन वेट" हि खरं तर दूरदेशी घडणाऱ्या परिकथेसारखी कथा.
भारतात राहणाऱ्या आणि चित्रपटात दाखवलेल्या जीवनशैलीपेक्षा खूप वेगळं, साधंसुधं जीवन जगणाऱ्या माझ्यासारख्याला हि कथा हा चित्रपट आवडावा यामागचं कारण काय असावं बरं?

या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा खरा हेतू या चित्रपटाचं परीक्षण करण्यामागं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

The purge

मन शुद्ध करण्यासाठी कायद्याचा कोणताही वचक किंवा कोणतीही मदत उपलब्ध नसताना एक रात्र म्हणजे तब्बल बारा तास येथेच्छ धुमाकुळ म्हणजे The Purge. ज्या व्यक्तीं/समुहाबद्दल राग/चीड आहे, त्यांचे सर्रास मुडदे पाडणे म्हणजे The Purge.
जवळपास एकाच घरामध्ये घडणारे हे कथानक एका कुटूंबावर चित्रीत केलेले आहे. या कुटूंबातील कर्ता पुरुष Purge मधल्या सांभाव्य हल्ल्यांपासून बचावासाठी उपयुक्त अशा संरक्षण यंत्रणा विकत असतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

Guilty By Suspicion

आपल्यापैकी बरेच जण इतिहासात रमतो, तसा मी देखील रमतो. एखाद्या देशाचा, क्षेत्राचा इतिहास आपल्याला ढोबळ मानाने माहिती असतो. बऱ्याचदा पुस्तके, चित्रपट, पर्यटन यातून या इतिहासाचे अनेक कंगोरे, पदर आपल्यासमोर उलगडले जातात. कधी जाणूनबुजून हे असे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा केलेला प्रयत्न असेल किंवा सहजच आपसूक ते समोर आलेले असेल, ही खरं तर अलीबाबाची गुहाच असते. परवा असेच झाले. Guilty By Suspicion नावाचा, १९९१ मधील, तसा जुना, चित्रपट पहिला. प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत प्रसिद्ध नट Robert Di Niro हा होता, हो, तोच तो The Godfather II फेम.

समीक्षेचा विषय निवडा: 

डंकर्क- युद्धभूमीवर !

सिनेमा म्हणजे फक्त गोष्ट नाही . सिनेमाला तांत्रिक अंगेही असतात . आपल्याकडे प्रेक्षकांना सिनेमाची गोष्ट हीच महत्वाची वाटते. त्यात काही चुकीचे नाही . कारण सिनेमा बघायला जाताना माणूस एक नवीन गोष्ट काय आहे हेच बघायला जातो . पण या तांत्रिक गोष्टींचा आस्वाद घेता आला तर अनेक गोष्टी हाती लागू शकतात. ख्रिस्तोफर नोलनचा 'डंकर्क ' हे त्याचं उत्तम उदाहरण .

समीक्षेचा विषय निवडा: 

विनिता भट

मागे रफीवरील लेख लिहित असताना त्याची बरीच गाणी ऐकली आणि काही निवडक गाणी पाहिली. तेव्हा अनायासे मोहम्मद रफीने गायलेलं आणि जाॅनी वाॅकरवर चित्रित झालेलं एक गाणं पाहण्यात आलं. त्यातील जाॅनी वाॅकरच्या कामाला तोड नाही. पण आता इथं त्याबद्दल नाही बोलत कारण, जाॅनी वाॅकरचं काम हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.

समीक्षेचा विषय निवडा: 

प्राय‌म‌र: त‌र‌ल, तांत्रिक थ‌रार

आजूबाजूचे चित्र‌प‌ट पाह‌त अस‌ताना, ख‌र‌ंच बुद्धिम‌त्तेला चाल‌ना देतील असे चित्र‌प‌ट पाह‌ण्याची उर्मी दाटून येणं स्वाभाविक आहे. हॉर‌र, मिस्ट‌री ह्यांनी तो कंडू श‌म‌त नाही. मेंदू अजून माग‌त अस‌तो. इंट‌र‌स्टेलार, आय‌डेंटिटी, डॉनी डार्को सार‌खे चित्र‌प‌ट ज‌रा क‌र‌म‌णूक क‌र‌तात प‌ण त्यांचा, त्याच त्या अंधाऱ्या बोळात‌ल्या क‌हाण्या, आणि संथ चाल‌लेल्या गोष्टींचाही कालांत‌राने कंटाळा येतो. हिंदीत‌ल्या जॉनी ग‌द्दार, आ देखें ज‌रा व‌गैरेंचा इथे उल्लेख‌ही न केलेला ब‌रा.

समीक्षेचा विषय निवडा: 

शोधिता लावण्य थोरवें

समीक्षेचा विषय निवडा: 

गेट आउट : एकदा तरी पहावाच असा थरार

तसा हाॅरर फिल्म्स् हा माझा प्रांत नव्हे. पण हे चित्रपट मला सतत त्यांच्याकडे आकर्षित करत राहतात. त्यामुळे साहजिकच मी 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' वा 'द काॅन्जुरिंग'सारखे मेनस्ट्रीम चित्रपट पाहिलेले नाहीत. पण याउलट मला सायकाॅलाॅजिकल हाॅरर मला आवडतात. मग त्यात 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' किंवा 'द शाइनिंग'सारख्या चित्रपटांचा समावेश होतो. अलीकडे असाच 'गेट आउट' हा चित्रपट पाहण्यात आला. पण पाहण्यापूर्वी या चित्रपटाचे रिव्ह्यू मी साहजिकच वाचलेले नव्हते. शिवाय याचा जाॅनरही मला माहित नव्हता. त्यामुळे सवयीप्रमाणे मध्यरात्री चित्रपट पाहण्यास सुरू केला. चित्रपट अर्ध्यावर कधी पोहचला तेही कळाले नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

झाडे लावणारी बाई

नुकताच जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा झाला. नेमिची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या पर्यावरणजागृती साठी केला जाणारा हा खटाटोप, जागर परत एकदा संपन्न झाला. झाडे, वृक्ष, जंगले यांचे महत्व आपल्या संस्कृतीत आधीपासूनच आहे, जसे की देवराया, ज्या मुळे वृक्षांचे जतन, संवर्धन होते. तो जीवनाचा एक भागच आहे. पण गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणामुळे बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगलांचा ऱ्हास झाला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. पश्चिम घाट बचावो सारखी आंदोलने देखील झाली आहेत. पुण्यात नुकत्याच मेट्रो वाहतुकीचा प्रकल्प सुरु झाला, आणि त्यामुळे झालेली वृक्ष तोड ताजी आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट