चित्रपट

व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग ३ : भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर

भाग १
भाग २
-----------
तर हा या लेखमालिकेतील शेवटचा भाग/लेख असेल. मागील दोन्ही लेखांमध्ये आपण चित्रपटाचा एक दृश्य माध्यम म्हणून अपेक्षित असलेला वापर, व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर याविषयी बोललो. या लेखामध्ये आपण व्हिज्युअल काॅमेडीची उदाहरणे पाहू. यातही पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील वापर आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर, असे दोन भाग आहेत. त्याविषयी खाली सविस्तर येईलच. लेख चांगला वाटला ते कळवा. पूर्ण लेखमालिका कशी वाटली तेही कळवा.

व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग २ : व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर

भाग १
-----------
मागील लेखात आपण दृश्य माध्यमाविषयी थोडंफार बोललो. आता यावेळी आपल्या मूळ विषयावर म्हणजेच व्हिज्युअल काॅमेडीविषयी बोलू.

व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग १ : चित्रपट - एक दृश्य माध्यम

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहिणार आहे, असं मी म्हणत होतो, अखेर त्यावर लिहिलं आहे. या विषयावरील लेख लेखमालिकेतून प्रसिद्ध करणार आहे. त्यातीलच हा पहिला लेख. पुढील लेख साधारणतः पुढील रविवारी प्रसिद्ध होईल.
--------------------

You don’t want to explain to the audience, because that makes them observers. You want to reveal to them little by little and that makes them participants because then they experience the story in the same way the characters experience it. - Bill Wittliff

दोन संवेदनशील लघुपट दिग्दर्शक

(या लेखात उल्लेखलेल्या तीनही लघुपटांमधील कथा उघड केलेली नाही. अर्थात, यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पाॅयलर नाहीत. ''8'' या लघुपटाची लिंक शेवटी दिली आहे.)

लघुपट हे कमी कालावधीत जास्त परिपूर्ण, परिपक्व व परिणामकारक विषय मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. त्यातल्या त्यात आपल्याकडे लघुपट निर्मितीची एक क्रेझ आजकाल निर्माण झाली आहे. पण, त्यातील विषय, त्याची हाताळणी याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय का, हे पाहणे आता गरजेचे आहे. असो.
तर आपल्याकडेही कित्येक अप्रतिम दिग्दर्शक आहेत. ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करता येतील अशी - क्रांती कानडे, राम गावकर, इत्यादी मराठी नावंही आहेत. क्रांती कानडेची जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर आधारित 'चैत्र', किंवा रामचंद्र गावकर दिग्दर्शित 'सेल्फी' अशा कित्येक परिपूर्ण शाॅर्टफिल्म्स उदाहरण म्हणून सांगता येतील. असो.
तर लघुपट या विषयावर पुन्हा कधीतरी सविस्तर बोलूच, पण तूर्तास तरी आजच्या विषयाकडे वळू.

समीक्षेचा विषय निवडा: 

पहिला ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल- एक अभिप्राय

प्रेरणा- चिंतातुर जंतू यांचे आवाहन: http://www.aisiakshare.com/node/5574#comment-147687

नुकतंच नागपुरात भरवण्यात आलेल्या पहिल्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलला (27 ते 29 जानेवारी) उपस्थित राहण्याचा योग आला. या नेटक्या आणि सफल आयोजनाबद्दल आधी आयोजकांचे अभिनंदन. विशेष म्हणजे यात ऐसीकर चिंतातुर जंतू अथ पासून इतिपर्यंत धावपळ करत सामील होते. त्यांना 'याची देहि याची डोळा' बघण्याचा व भेटण्याचा योग आला. वेळेअभावी मैफिल बसवता आली नाही . असो. महोत्सवावरचा हा थोडक्यातला अभिप्राय.

समीक्षेचा विषय निवडा: 

दोन अधिक दोन - एक अस्वस्थ वर्तमान

"दोन अधिक दोन किती"? हा प्रश्न एखादी गोष्ट किती सोपी असावी त्याची न्यूनतम पातळी दाखवण्यासाठी वापरला जातो. जसा इंग्रजीत "इटस नॉट रॉकेट सायन्स" हा वाक्प्रचार वापरून 'रॉकेट सायन्स' ही समजण्याची कठिणतम पातळी असल्याचे दाखवतात तसे.
हा आठेक मिनिटांचा लघुचित्रपट (https://www.youtube.com/watch?v=EHAuGA7gqFU&feature=youtu.be) तुम्हांला विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो.
चित्रपट आजचा नाही. २०११ सालचा आहे. पर्शियन भाषेत केलेला आहे, पण सबटायटल्स आहेत (ती नसती तरी फार बिघडले नसते).

समीक्षेचा विषय निवडा: 

म्हारी छोरिया छोरोंसे कम है के ? ('दंगल' समीक्षा)

(मी जिथे मोठे स्पॉइलर्स आहेत तिथे तसे लिहिलेले आहे .बायोपिक असल्यामुळे त्यात रहस्य काही नाही . पण तरी चित्रपटातले काही तपशील उघड होऊ शकतात. ज्यांना पूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी चित्रपट बघितल्यावरच वाचावे.)

समीक्षेचा विषय निवडा: 

(ओम नमः) शिवाय

हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली.

समीक्षेचा विषय निवडा: 

Good Will Hunting

मी मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे, मला मानसिक आजार, त्यावरील उपचार, किंवा समाज त्या कडे असा पाहतो, त्याचे चित्रपटातून, नाटकातून कसे होते, यात मला रस असतो. ह्या पूर्वी देखील मी त्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे, जेव्हा Good Will Hunting हा चित्रपट प्रसारित केला जाणार आहे हे कळल्यानंतर तो मी पाहायला बसलो, आणि तो संपेपर्यंत उठलोच नाही. असे क्वचितच होते.

समीक्षेचा विषय निवडा: 

अडीच हजार गायी चोरणारा अल्वरेज केली

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

आठवणीतला हाॅलीवुड-सहा

चोरी ती चोरीच...

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट