समाज

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

आपल्यातील बहुतेक एस्पेरांतो हे नाव प्रथमच ऐकत असतील. कदाचित ही भाषा ओळखणारे वा बोलणारे आपल्यापैकी कुणीही नसतील. परंतु एस्पेरांतो ही एक जागतिक भाषा आहे व त्याचा जन्म 130 वर्षापूर्वी झाला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १

मानसोपचाराबद्दल बरेच प्रमाणात गैरसमज आहेत असं सर्वसामान्य चित्र दिसतं. मानसोपचार कधी, का घ्यावेत, त्यातून अपेक्षा कसली ठेवावी अशा प्रकारचा संवाद मानसोपचार-समुपदेशक सुलभा सुब्रह्मणम यांच्याशी केला. हा लेख म्हणजे त्याचं संकलन आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट...

मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

गर्भधारणेचे बाजारीकरण

जननक्षमतेचा व्यापार

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - २

कधी ढगफुटी होते. नदीला पूर येतो. पाण्याचा महाप्रचंड लोंढा घोंघावतो. आणि आपल्या वाटेत येणाऱ्या हजारो लोकांना वाहवून नेतो. काही काळ प्रलय होतो, आणि नंतर पुन्हा पूर्ववत प्रवाह सुरू होतो. पाण्याचे लोंढे डोळ्याला दिसतात. त्यांचा आवेग जाणवतो. रौद्र रूपाची भीती वाटते. ढगफुटी - पाण्याचा प्रवाह - गेलेले जीव ही साखळी स्वच्छपणे मांडता येते. तीवर कोणी शंका घेऊ शकत नाही. कधी कधी मात्र विचारांची ढगफुटी होताना दिसते. आणि त्यांच्या प्रवाहात लाखो जीव वाहून जातात. अठराव्या शतकाच्या अंतकाळात जी विचारधारा उगवली तिने असेच अनेक बळी घेतले. आता तो प्रवाह पुन्हा पूर्ववत झालेला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या

गोड चेहर्‍याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे "मम्मीSSS .... " असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले ऐकताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती घाण उपसणे ही एक मोठी समस्या होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

.

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स...

अमेरिकेत अनेक ठिकाणी मी पाट्या बघितल्या आहेत. विशेषतः प्राणीसंग्रहालयात आणि नॅशनल पार्क्समध्ये. 'प्लीज डू नॉट फीड द ऍनिमल्स'. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अनेक अस्वलं असतात. तिथे 'प्लीज डू नॉट फीड द बेअर्स' अशा पाट्यादेखील दिसतात. हा संदेश का दिलेला असतो असा मला नेहमी प्रश्न पडत असे. प्राण्यांपासून माणसाला धोका असतो म्हणून की माणसापासून प्राण्यांना धोका असतो म्हणून? त्याचं थोडक्यात उत्तर असं की दोन्ही बरोबर आहे. माणसांनी प्राण्यांना खायला घातलं तर त्यांना माणसांकडून खायला मिळेलच अशी अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे जे लोक त्यांना खायला घालत नाहीत त्यांच्याबाबतीत ते आक्रमक होऊ शकतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज