समाज

कोरोना लस (भाग ३) - वाहक व प्रोटीन आधारित लशी

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण विषाणू वाहक आणि प्रोटीन आधारित लशींचा परिचय करून घेऊ.

कोरोना लस (भाग २) - जनुकीय लस

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण जनुकीय लशींविषयी माहिती घेऊ.

ट्रम्प मतदारांची कैफियत

ट्रम्प समर्थकांचे प्रश्न हे रोजीरोटीचे प्रश्न आहेत. डेमोक्रॅटिक समर्थकांना त्यांच्याबद्दल सहवेदना (empathy) निर्माण होत नाही ही खरी शोकांतिका आहे. तुमच्या नामशेष होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांबद्दल ट्रम्प समर्थकांना तरी बंधुत्वाची, आपलेपणाची भावना कशी निर्माण होऊ शकेल? यांच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न झाला आहे.

जंतूंचा नायनाट का त्यांच्याशी अटळ सह-अस्तित्व?

आपल्या जन्मापासून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू, जिवाणू यांची आपल्याला लागण होत असते आणि आपले शरीर त्यांचा मुकाबला करत असते. पण अनेकदा हे आपल्या नकळत होते. बहुतांश वेळा जंतुलागणीमुळे आपल्याला त्रास किंवा आजार होत नाही. आपल्या नकळतच शरीर त्यांचा बंदोबस्त करते, आपले संरक्षण करते. मग जंतूंचा नायनाट करण्याची कितपत गरज आहे?

कौन बनेगा करोडपती

जगजित हा एक 20-22 वर्षाचा तरूण. त्याला अगदी बालपणापासून गाण्याची आवड. त्याचा आवाजही बऱ्यापैकी होता. त्यातही गजल प्रकार त्याचा अत्यंत आवडीचा. मोठमोठ्या गजल गायकांचे गजल तो हुबेहूब गायचा. मित्र तर त्याला जगजितसिंग म्हणूनच हाक मारायचे. शाळा-कॉलेजच्या वा घरगुती कार्यक्रमात त्याची हजेरी असायची. घरातले, इतर नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी त्याच्या गाण्याचे कौतुक करायचे. टीव्हीवरील कार्यक्रमात एक-दोनदा तो भागही घेतला होता. आई-वडीलसुद्धा त्याच्या गाण्याला उत्तेजन द्यायचे. शाळा-कॉलेज संपल्यानंतर त्याला आपणही मोठा गायक होण्याची स्वप्नं पडू लागली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

माझ्या ई-पासाची कथा - मिलिंद जोशी

कठोर लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी ई-पास लागायचे. त्या काळात हे ई-पास प्रकरण एखाद्या काळ्या ढब्ब्या ढगासारखं सतत वर तरंगत असायचं. आमच्यासारख्यांना तर कायकाय त्या ई-पासासाठी यातायात करावी लागायची! हां पण हुशार लोकांसाठी मात्र...

महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?

साद प्रतिष्ठान : करोना टाळेबंदीत अन्नवाटप

टाळेबंदीच्या काळात काही लोक अत्यंत निरपेक्ष आणि निरलस वृत्तीने स्थलांतरित कामगारांच्या सोबत काम करत होते. ‘साद प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे’ यांच्या कामाची ओळख करून घेण्यासाठी 'ऐसी अक्षरे'ने त्यांची मुलाखत घेतली.

मोबाईलवर MBA

एखाद महिन्यापूर्वी फोनवर बोलताना धनंजयने “वापरलेला लॅपटॉप मिळेल का”, असं विचारलं.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

करोना साक्षात्कार : करू देत चार चार लोकांना तेच ते काम!

२२ मार्चला लॉकडाऊन झाला आणि (इतर दुकानांबरोबर) दारूची दुकानं बंद झाली. तत्पूर्वी महिन्यातून सरासरी पाच ते सहा वेळा ‘बसणे’ होत असे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांत दोनदा आणि पुढच्या तीन महिन्यांत तीनदा ‘झूम बैठका’ झाल्या. तेव्हा घरीच पडून असलेली प्यायलो. दारू दुकानं बंद झाल्यामुळे माझं काही अडलं नाही.

पाने

Subscribe to RSS - समाज