विज्ञान/तंत्रज्ञान

ऑनलाईन जाहिराती : कशा टाळाव्यात, टाळाव्यात का?

संकेतस्थळांवरील ऑनलाईन जाहिरातींचा भडिमार थांबवण्यासाठी मी अॅडब्लॉक व तत्सम इतर अॅडऑन्स वापरतो. गेल्या काही दिवसात अनेक संकेतस्थळांनी पान दाखवण्यापूर्वी अॅडब्लॉकर बंद करा अशा सूचना दाखवायला सुरुवात केली आहे. विशेषतः एनडीटीवी आणि लोकसत्ता ही माझ्याकडून नियमित पाहिली जाणाऱ्या संकेतस्थळांवर आता मी जात नाही. लोकसत्ताच्या ईपेपरमध्ये जाहिराती असल्यातरी ऑनलाईन आवृत्तीसारख्या त्या अंगावर येत नाहीत आणि बहुतेक बातम्या तिथे असतात. बाकीचे ऑनलाईन वाचन फीडली वगैरेमध्येच होत असल्याने सुदैवाने जाहिराती नाहीत.

अभियांत्रिकी पदविकेनंतर असणाऱ्या कोर्सेसची माहिती हवी आहे

माझा भाऊ सध्या अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन मेकॕनिकल इंजीनिअरींग करत आहे.
पुढच्या वर्षी त्याला मेकॕनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे. तरी मार्गदर्शन हवे आहे.

पोकेमॉन गो : 20 वर्षांची तपश्चर्या

आज पोकेमॉन गो (Pokemon Go) या मोबाइल फोनवरच्या गेमने जगात धमाल उडवून दिली आहे. 7 जुलै 2016 साली, म्हणजे अगदी अलीकडेच रिलिज झालेल्या या गेमने जगातील सगळी रेकॉर्डस तोडली आहेत. केवळ एका रात्रीत हा गेम प्रचंड लोकप्रीय झाला व जगभर याच्यावर लोकांच्या उड्या पडू लागल्या. केवळ पहिल्या आठवड्यातच 10 लाखांच्या वर लोकांनी हा गेम डाऊनलोड करून त्याने ट्विटर, फेसबूक, स्नॅपचार्ट, इन्टाग्रॅम व वॉटसअपचे रेकॉर्ड तोडले व 600 कोटी डॉलर्सची कमाई केली. हा गेम चालत खेळायचा गेम आहे. या गेमने लोकांना एवढे वेड लावले आहे की एरवी अजीबात न चालणारी माणसे या गेमच्या निमीत्ताने मैलोंमैल चालायला लागली.

गणिती / तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला ताबडतोब ग्रीन कार्ड !

अमेरिकेत कोणतीही गणिती किंवा तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला हिलरीकाकू ताबडतोब ग्रीन कार्ड देऊ म्हणतात ! फक्त नोकरीची ऑफर असण्याची अट आहे . (हे आधी मिट रॉम्नी ने 2012 सालीच मांडले होते!) यातून अशा पदव्याचा काळा बाजार सुरू होईल , तसेच वयस्क अमेरिकन लोकांना काढून त्याजागी स्वस्त अशियन पोरांना स्वस्तात आणले जाईल अशी टीका होत आहे (पण हे सध्याही चालू आहेच !) . सध्या अमेरिकन मास्टर्स वाल्यांना वीस हजार वेगळे "H-1B"व्हिसा आहेतच . अमेरिकेच्या दृष्टीने काहीही असले तरी भारताने याचे स्वागत आणि समर्थन करायला हवे .

पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती

२० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानातून हवेत सल्फ्यूरिक असिडचे फवारे मारायचे; पाण्याच्या वाफेबरोबर त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फेटचे मायक्रो कण तयार होतील , जे सूर्याचा प्रकाश परावर्तित करतील . यामुळे सूर्याची सुमारे एक टक्का उष्णता पृथ्वीवर पोचण्यापासून थांबविता येईल. सुरुवातीला २५,००० मेट्रिक टन सल्फ्यूरिक असिड आणि ११ विमाने लागतील (नंतर हे वाढवीत न्यावे लागेल ) आणि एकूण खर्च (सुरुवातीला, दर वर्षी ) सुमारे ७० कोटी डॉलर्स येईल . अधिक वाचन :

बॉस मराठी इनपुट प्रॉब्लम

ऐपल मक़बूक प्रो वर गूगल मराठी इनपुट कसा वापरायचा। इन बिल्ट इनपुट सिस्टेम हिंदी आहें त्यामूले टाइप करता येत नाही। सिस्टेम प्रेफ़्रेन्स वर जौण
ट्राय केला। पूर्णविराम येत नाहिए उभि रेश एटेय अशी ।।।।

प्लीज़ हेल्प
फ़ोरम वर पण सर्च केला सोलशन नाही मिलाल

विंडोज़ मध्ये जसा फ़्री फ़्लो वापरता येत होता तसा पाहिजे

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

मी आणि माझा मित्र स्नेहल शेकटकर, नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे,

स्क्रिवेनरविषयी अनुभव/माहिती हवी आहे

स्क्रिवेनर सॉफ्टवेअर उबुन्टूवर कोणी वापरले आहे का? असल्यास अनुभव कसा आहे, प्रणालीच्या मर्यादा, येणार्‍या सर्वसाधारण/तांत्रिक अडचणी, व मराठीत (देवनागरी युनिकोड) लिहिण्यास येणार्‍या विशिष्ट अडचणींविषयी माहिती हवी आहे. संगणकक्षेत्राबाहेरील, गीक नसलेल्या, सामान्य उबुन्टू उपभोक्त्यास वापरता येण्याजोगे आहे का?

आगाऊ आभार.

मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software

बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..

आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान