ही बातमी वाचली का?

ही बातमी वाचली का, या प्रकारचे धाग्यांसाठी ही टर्म वापरावी.

साहित्य संमेलने: प्रस्थापित वि. विद्रोही: एक टिपण

अ.भा. मराठी साहित्य संमेलन जवळ येवू लागलं की माध्यमांतून नेहमीच्या त्याच त्या चर्चा रंगतात. ते यंदाच्या संमेलनाबाबतही खरं आहे. याच संदर्भात राजीव काळे यांचा प्रस्थापित व विद्रोही या दोन्ही साहित्य संमेलनांबाबतच्या प्रासंगिकतेबद्दल विवेचन करणारा 'निदानाच्या पुढे काय ?' हा लेख दै.लोकसत्तात आला आहे.

यासंदर्भात आणखी काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

आत्ताच ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केले!

आत्ताच ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केले आहे. त्यानंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी आपल्या निवडणूक मोहिमेतल्या भूमिकांपासून जराही मागे न हटण्याचे वचन दिले आहे . कोणत्याही रिपब्लिकन प्रेसिडेंटपेक्षा त्यांचे भाषण पूर्ण वेगळे होते. त्याला "इंपिरियल प्रेसिडेन्सी " -रिपब्लिकनांचा आवडता विषय- याचा गंधही नव्हता. इस्लामी दहशतवाद पूर्ण निपटून काढणे, अमेरिकेतले इन्फ्रा-स्ट्रक्चर सुधारणे ( १ ट्रिलियन डॉलर्स !), अमेरिकन नोकऱ्या परत आणणे या सर्वाला पाठिंबा नाकारण्याचे कारण नाही .

बेबी ऍस्पिरिन: हृदयविकार आणि कर्करोग शक्यतेत लक्षणीय घट!

दिवसाला एक ते दोन "बेबी ऍस्पिरिन " गोळ्या (८१-१६२ मिग्रॅ , किंवा आसपास ) गोळ्या घेतल्यास हृदयविकार (ref 2, 3) आणि कर्करोग (ref. 4-7) होण्याच्या शक्यतेत लक्षणीय घट होऊ शकते. जितकी अधिक वर्षे हे चालू ठेवाल तितका याप्रकारचा फायदा वाढत जातो . फक्त ज्यांना पोटातील रक्तस्रावामुळे ऍस्पिरिन घेणे शक्यच नाही त्यांनी हे करू नये. तरी त्यासाठी 'बफर्ड ऍस्पिरिन" प्रकारच्या गोळ्या मिळू शकतातच .
("लान्सेट" आणि "अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन" ही उत्कृष्ट मेडिकल जर्नल्स आहेत. पेपरचा "PMID" नंबर , व तो नसल्यास संबंध नाव गूगल केल्यास पेपरचा संक्षिप्त गोषवारा , आणि अनेकदा संबंध पेपरही वाचायला मिळू शकतो.)

निर्भया प्रकरणातील आरोपी अजून जिवंत आहेत!

http://beta1.esakal.com/desh/nirbhaya-case-accused-moved-separate-cell-2...
निर्भया प्रकरणातील आरोपी अजून जिवंत आहेत हे ऐकून धक्का बसला ! फार पूर्वीच त्यांना फाशी दिली जायला हवी होती! कसाबला फाशी व्हावी यासाठी देशात जी आरडाओरड चालू होती, त्याच्या एक शतांशही ओरडा या तितक्याच गर्हणीय गुन्ह्याबद्दल ऐकू येत नाही हे कसे? काही कायदेशीर प्रक्रिया अजून बाकी आहेत का?

"कम्युनिस्ट" प्रमुखान्चा ट्रम्प यांना जागतिकीकरण- मुक्त व्यापार या विषयांवर उपदेश!

चीन च्या "कम्युनिस्ट" पक्षाचे प्रमुख शी जिन-पिंग ह्यांनी श्री ट्रम्प यांना जागतिकीकरण आणि मुक्त व्यापार या विषयांवर डाव्होस येथे उपदेश केला . विरोधाभास पाहून हसू आवरत नाहीये! (पण चिनी कम्युनिस्ट पक्ष भांडवलशाही उत्पादन अत्यंत कुशलतेने हाताळतो हे केंव्हाच सिद्ध झाले आहे! चीन हा भांडवलशाहीचा नवा बालेकिल्ला असेल असेही शी यांनी सूचित केले!)
http://www.nbcnews.com/news/world/china-s-xi-lectures-trump-globalizatio...

ही बातमी समजली का? - १३५

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/parrikar-could-be-the-next...

पर्रीकरांची घरवापसी ?

गोव्याताल्या निवडणूकांमधे प्रेशर निर्मण झाल्यामुळे पर्रीकरांना गोव्यात पुन्हा मुख्यंमंत्री बनण्याचा "मौका" मिळणार असे दिसतय.
.
.

हजारो मुसलमान ख्रिश्चन बनत आहेत .

http://www.christianpost.com/news/scores-of-muslims-turning-to-christ-in...
ख्रिस्चानिटीतून कदाचित ख्रिस्त-भक्तांना मानसिक शांती मिळत असेलही (पण ती तर मुहम्मदही देऊ शकतो!), पण ख्रिस्चानिटीला "शांततेचा धर्म" म्हणणे योग्य ठरेल का? ख्रिश्चनांनी त्यांच्या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे बहुधा मुसलमानांपेक्षा जरा जास्तीच माणसे मारली असतील असे वाटते.

अटर्नी जनरल साठी प्रस्तुत श्री जेफ सेशन्स: टॉर्चर, मुस्लिम एंट्री बंदी ला विरोध!

ट्रम्पने अटर्नी जनरल साठी प्रस्तुत केलेले श्री जेफ सेशन्स यांची त्या पदासाठी सिनेट कमिटी पुढे सुनावणी सुरु आहे. त्यांनी टॉर्चर, मुस्लिम एंट्री बंदी या दोन्हीलाही विरोध दर्शविला आहे - यात ते ट्रम्पच्या निवडणूक-जाहीरनाम्याचा विरोधात गेले आहेत. के के के लाही त्यांनी विरोध दर्शविला आहे . एकूणच ट्रम्पच्या बऱ्याचशा मूर्ख आणि अतिरेकी भूमिका रिपब्लिकन पक्ष दुरुस्त करेल असे वाटते आहे. पण तथाकथित "मुक्त-व्यापार" वादी रिपब्लिकन काँग्रेस ट्रम्पच्या मुक्त-व्यापार-विरोधी तत्वज्ञानाशी कसा काय लढणार आहे हे बघणे मनोरंजक ठरेल.

ही बातमी समजली का? - १३४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

पाने

Subscribe to RSS - ही बातमी वाचली का?