श्रद्धा

या मनुष्यांना हवे काय तरी आहे?

Taxonomy upgrade extras: 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. आणखीन अंधश्रद्धेचा कायदा राज्यातल्या सरकारने पास करून घेतला. वटहुकूम काढला आहे, असे वृत्त टिव्हीवर आले आहे. या सगळ्या प्रकरणा मध्ये मला एक गोष्ट समजत नाही, ती अशी की, ज्या प्रसंगी हा कायदा पास होत नव्हता, त्या प्रसंगी हे लोक ब्राह्मणांना दोष देत होते. सनातन प्रभातवर आरोप करत होते. म्हणजे, हा कायदा पास होत नाही आहे, त्याला ब्राह्मणच जबाबदार आहेत, असे यांना म्हणायचे होते. मग आता हा कायदा पास झाला तरी हे लोक पुन्हा वरून ब्राह्मणांनाच दोषी धरीत आहे, ते का असा माझा प्रश्न आहे.

गरज विवेकी धर्मजागराची

Taxonomy upgrade extras: 

अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्‍याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत. विवेकाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी केलेले हे आवाहन
गरज विवेकी धर्मजागराची [दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]
(नरेंद्र दाभोलकर)

नरेंद्र दाभोलकरांची हत्या: आदरांजली

प्रखर विवेकवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 'अंनिस'च्या माध्यमातून समाजात विविध बदल घडवण्यासाठी त्यांनी योजलेले उपाय उल्लेखनीय होते. त्यांचा असा अंत दु:खदायक आणि उद्वेगजनक आहे.

समाजात परिवर्तन करणार्‍या या विवेकी व्यक्तीस 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांतर्फे विनम्र आदरांजली!

सदर धाग्यावर संबंधित घटनेवरील आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात व आदरांजली वाहण्यात यावी.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - श्रद्धा