इतर

सत्तरच्या दशकातील रॉक

१९२० च्या दशकात ब्लूज आणि स्विंग , १९५० च्या दशकात रॉक अँड रोल हे नवीन जॉन्र आले,स्थिरावले आणि लोकप्रिय झाले .
रॉक म्युझिकची सुरुवात जरी १९६० च्या दशकात झाली असली तरी १९७० च्या दशकात जास्त संख्येने अत्युत्तम रॉक गाणी झाली . इथे त्यांचा थोडा परिचय देत आहे . काय ऐकताय या धाग्यावर सुरुवात केली होती . मॅनेजमेंट च्या आदेशामुळे वेगळा धागा काढत आहे .
मालक जंतू यांच्या आदेश /हुकुमावरून ख फ वरून हि गाणी धाग्यावर आणत आहे .

स्पर्धा का इतर?: 

मूकपट आणि आजचं संगीत:

गेला आठवडा मस्तच बिझी गेला. रविवारी तारनोव्सक्ये गूरं (गूर-याचा अर्थ पोलिश मध्ये डोंगर. संस्कृत गिरी शी अगदीच साधर्म्य असलेला हा शब्द आहे ) या शहरात एक फेस्टिव्हल होता. जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करणारे काही ग्रुप पोलंड मध्ये आहेत. आमचा ग्रुप ही त्यातलाच एक. मी , मालविना पाशेक , प्योत्र मेलेख , बोरिस स्लोविकोवस्की असे आम्ही अर्थात "बेदेबेदे आणि पुरंदरे" ग्रुप चे सदस्य गेली काही वर्षे ( दुर्दैवाने फार नियमित नाही) जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करतो आहोत. तर या अशा एकमेव म्हणता येईल अशा फेस्टिव्हल च्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात आमची वर्णी लागली.

स्पर्धा का इतर?: 

मुले आणि आपण आणि संगीत/वाद्य साक्षरता वगैरे वगैरे

एक मार्च रोजी संध्याकाळी आमच्या साऊंड कार्ट ( मूळ पोलिश नाव देवनागरी मध्ये लिहिणं फारच मुश्किल आहे ) चा परफॉर्मन्स झाला. यामध्ये खरं तर एक ते सव्वा तासामध्ये आम्ही दोन कथा ( परीकथा म्हणता येतील अशा, आणि या दोन्ही इटालियन आहेत) सादर करतो. सादर करतो म्हणजे त्या कथा संगीतातून सांगण्याचा प्रयत्न करतो , त्याला कथेचं musical interpretation असंही म्हणता येईल. माझ्या मनात ही कल्पना फार आधीपासून होती. आणि यामध्ये पूर्ण अंधारात हा प्रयोग करावा असा माझा मूळ इरादा होता. पूर्ण अंधारात यासाठी की ऐकण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित व्हावं.

स्पर्धा का इतर?: 

रंग : उतरणारे , उतरलेले , उडणारे , उडालेले : एका जुन्या अज्ञात चित्राचं ध्यानवृत्त

चार पाच दगडी पायऱ्या उतरून रेस्तराँ मध्ये येतो. मंद जॅझ संगीत (आमच्या पोलंड मध्ये या जॅझ संगीताचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात सारखा सारखा कोमल रिषभ लागतो, धून भैरव थाटाकडे झुकते , ऐकणाराला या कोमल रिषभाच्या जागा आधीच लक्षात येऊ लागतात. दुसऱ्या प्रकारात मात्र हा कोमल रिषभ क्वचित कधीतरी येतो किंवा येतही नाही) , सुरेल प्रकाशरचना , काही भिंती कच्च्या विटांच्या , काही भिंती सुरेख शुभ्र रंगवलेल्या असा एकूण ओळखीचाच माहौल असला तरी हँगरला कोट अडकवताना आजूबाजूच्या चित्रांवर माझी नजर जातेच.

स्पर्धा का इतर?: 

कॅरीकेचर

मागे एकदा मित्रांसोबत देव असलाच तर तो आर्टिस्ट असेल का इंजिनीअर या विषयावर एक रिकामी चर्चा झाली होती. रिकामी अशासाठी की अशा चर्चांमधून काही एक ठोस निष्कर्ष निघणं अशक्यच असतं. पण त्या निमित्ताने याबाबतीत थोडंफार वाचन झालं. त्यात व्ही.एस. रामचंद्रन आणि विलियम हर्स्टीन नावाच्या दोघांनी लिहिलेला एक इंटरेस्टिंग रीसर्च पेपर वाचनात आला. त्याच्यात त्या दोघांनी कलेच्या ८ वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा केलेली आहे. खरं तर कलेपेक्षा, कलेचा माणसाच्या मनावर जो परिणाम होतो त्याचे ८ पैलू त्यात सांगितले आहेत असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.

स्पर्धा का इतर?: 

कीप क्वाएट - चानाद सेगेदी

कीप क्वायेट ही डॉक्युमेंटरी फिल्म आज नेटफ्लिक्सवर पाहिली.

स्पर्धा का इतर?: 

तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

स्पर्धा का इतर?: 

माईंची सूरसंगत ( लोकसत्ता ) आणि जगदीश पटवर्धन यांचा गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर ह्यांच्यावरील लेख

मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल. मोगूबाईंना आईने १९११ साली हरिदासबुवांकडून प्रथम गानसंस्कार केले. पण हरिदासबुवा म्हणाले मी एका गावात फार दिवस राहत नाही त्यामुळे त्या हताश झाल्या.

स्पर्धा का इतर?: 

खग्रास सुर्यग्रहण

नुकत्याच झालेल्या खग्रास सुर्यग्रहणाचे फोटो.

80 मिमि रिफ्रॅक्टर + कॅनन 450D.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर