राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
१३ डिसेंबर
जन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८)
मृत्यूदिवस : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा
१६४२ : न्यूझीलंडचा शोध.
१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.
२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- MindsRiot