बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ६

याआधी: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
(व्यवस्थापक : धाग्यांचे क्रमांक दुरुस्त केले आहेत आणि धागा 'बागकाम'मध्ये हलवला आहे.)

धागा क्रमांक ६ वर १०० प्रतिसाद झाल्याने,
(ते कुठले पूर्ण व्हायला? धागा कुंथत होता म्हणून मीच त्याला रेचक दिलं!!!! Smile )
आता धागा क्रमांक ७ काढतोय!
तर दोस्तहो, नवीन बातमी म्हणजे,

मोगरा फुलेला, माझा मोगरा फुलेला...

DSC_0664

फुले वेचिता बहरू, कळियांसी आला!!!

DSC_0675

बागकाम करतांना असे काही थोडेच क्षण असतात की ज्यावेळी केलेली सगळी मेहनत सार्थकी लागली असं वाटतं!!!
Smile
अशा ह्या क्षणांसाठी ढोरमेहनत करत रहायचं!!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वाहवा वाहवा मोग्रा हा! सुंदर कितीतरी खचित अहा!
आम्ही वेचु तुम्ही माळा
तुम्ही वेचा आम्ही गुंफु
चल मग कामे टाकुनीया, चला वेचुया मोग्रा हा!
वहावा वहावा मोग्रा हा! सुंदर कितीतरी खचित अहा!

Smile

छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थॅन्क्यू ऋषि!!
ती फुलांची ताटली आज रात्री मी माझ्या उशाशी आणून ठेवलेली आहे.
आज मी खूप आनंदी आहे!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर! गाणं दिवसभर या फोटोंसकट डोक्यात राहिल आता.
मला गेली दहा दिवस आमच्या गच्चीबागेकडे लक्षच द्यायला झालं नाही. काय होतंय तिथे कोण जाणे. तिथल्या सगळ्या वेली कोणीतरी कापून टाकून नवीन फरशी घातलीय, आणि फक्त भेंडीच्या पिशव्या राहिल्यात असं काल रात्री स्वप्न पाहिलं. आज गेलंच पाहिजे, इथे मस्त पाऊस लागलाय, पण नक्कीच कुंड्यांमधे पाणी साठून काही नवीन रोपं कुजली असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मस्त पाऊस लागलाय, पण नक्कीच कुंड्यांमधे पाणी साठून काही नवीन रोपं कुजली असणार.

शुभ बोल गं रोचने तर म्हणे....
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा, फुलं पहाताच नाकात मोगर्‍याचा सुवास दरवळला.
मलाही असाच आनंद झालेला जेव्हा माझ्या पहिल्या मोगर्‍याला पहिलं फुल आलं होतं Smile
हा आमचा खिडकीतला मोगरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय मस्त फुललाय मोगरा! हा वेली-मोगरा दिसतो आहे.

माझ्याकडची परिस्थितीचा आढावा:

दोन्ही प्रकारच्या टोमॅटोला भरपूर फळं येत आहेत.
भोपळ्या मिरच्याही आल्या आहेत बर्‍यापैकी. त्या झाडावरून कधी काढाव्यात याचा विचार करते आहे. सर्वात मोठी मिरची ही भारतात ज्या आकाराच्या मिरच्या असतात तेवढी आहे साधारण.
काऊहॉर्न मिरचीची तब्येत थोडी बिधडलेली दिसते आहे.
फरसबीची वेल जोमाने वाढते आहे, पण अजून फुलं नाहीत.
ब्लूबेरीचे झाड उत्तम अहे, पण फळं त्यामाने कमी लागली आहेत. जरा अभ्यास करायला हवा.
बाकी बेझिल, गवती चहा, लेमन बाम, अळू, मोगरा ठीक.
विकत आणलेली कांद्याची पात भाजीकरता चिरल्यानंतर मुळं पांढरी होती, म्हणून सहज जमिनीत लावली (खरं म्हणजे नुसती ठेवली), तर त्याला नवीन पात फुटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय काय स्वप्न पडताहेत.मोगरा मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोगरा मस्तए.
अलिकडेच एका मैत्रिणीने भेट म्हणून मोगऱ्याचं छोटं रोप पाठवलं. मुळात चार पानं होती, त्यातलं एक खराब होताना दिसतंय. पण अजून नवीन फुटवेही दिसत आहेत. म्हणजे अगदी या उन्हाळ्यात नाही तरी पुढच्या उन्हाळ्यात फुलं मिळावीत.

माझ्याकडच्या दोन भोपळ्या मिरच्यांना काय रोग लागलाय हे फोटो बघून सांगता येईल का? सगळ्या नोड्सच्या इथे हे असे फोड आले आहेत आणि त्या भागा‌तली पानं चुरगळल्यासारखी.

हा त्याचा दुसरा फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही बहुतेक फंगस असावी....
फंगसवर ऑरगॅनिक औषध मला ठाऊक नाही. पण नर्सरीत कॉपर बेस्ड रासायनिक फंजिसाइड मिळेल.
पण जे काही करशील ते लवकर कर. नाहीतर ही अख्खं झाडच नाही तर आजूबाजूची झाडंही इन्फेक्ट करेल.
एक काम कर. ते इन्फेक्ट झालेलं पान खुडून एका झिपलॉकच्या प्लास्टिक बॅगमधे लॉक करून जवळच्या लोकल नर्सरीत नेऊन त्याना विचार हे काय आहे आणि यावर उपाय काय ते.
ते मार्गदर्शन करतील...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनतरी आजूबाजूची झाडं शिल्लक आहेत. ही कुंडी हलवून दुसरीकडे ठेवून दिल्ये. आजच अशा काही फांद्या छाटल्या आहेत, त्यातली एखादी नर्सरीत नेते.

उरलेल्या कंपोस्ट करू का टाकूनच देऊ? नर्सरीतही काही उत्तर मिळतंय का पाहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोड आलेला सगळा भाग आणि थोडा जास्त कापला होता. त्यावर एक फंजिसाईड मारलं होतं. कापलेल्या भागातली जखम भरल्यासारखी दिसत्ये -
भरलेली जखम

साधारण दहा दिवसांपूर्वी कळ्यांची चिन्हं दिसायला लागली होती. आजच एक फूल आणि सहा कळ्या दिसल्या. मिरच्या किती धरतायत आणि त्या कशा निघतायत ते बघूया.
मिरचीचं फूल

---

मैत्रीणीने जो मोगरा पाठवला होता तेव्हा त्याला चार पानं होती. त्यातली दोन गळली, एकातलं अर्धं तपकीरी झालंय. पण नवा फुटवा आला, त्याला नवीन पानं आली आणि दोन कळ्याही दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुलात मुंगी दिसतेय. म्हणजे मिर्ची धरणारच.

रच्याकने. तो 'चुरडामुरडा' नामक रोग आहे. माणसांना व्हायरल वार्ट्स होतात तसा आहे. मला व्हायरल असल्याची माहिती दिली गेली होती, गूगलात फंगस लिहिलेली दिसली.

उपचार म्हणून दारू सजेस्ट केलेली आहे त्यासाठी.

ता.क.
हे :

मिरची चुरडामुरडा रोग -
फुलकिडे हे किटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमिटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते, पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

उपाय -
या किडीच्या बंदोबस्तासाठी रोपलावणीपासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने ८ मि.मी. डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.किंवा रोप लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आई ग्ग!!! नका टाकू असली चित्रं Sad
___
इथे मिळत नाही अन त्रास होतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मिळत नाही अन

होम डेपोमध्ये काय मिळत नाही? Smile
तुझी लावायची इच्छा असेल तर मिळणार, लक्ष ठेवून रहा.
इथे आपल्या मोगर्‍याला अरेबियन जास्मिन म्हणतात.
आणि मोगरा इथल्या थंड हवेतही इन्डोअर ठेवला तर चांगला जगतो.
मी बॉस्टनच्या थंडीतही चांगला वाढवला होता.
प्रयोग करून बघ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधीच्या वेलीवर लाल किड्यांनी हल्ला चढवलाय. ही झाली क्यूट पिल्लं; आई वडील अर्धा इंचपर्यंत मोठी आहेत.

इथला देशी, पावसाळ्यात सर्वत्र उगवणारा कोलमी शाक (शाक = पालेभाजी):

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी म्हंटल्याप्रमाणे रुची आणि रोचना यांच्या सल्ल्यानुसार मी बटाटा लावायचं ठरवलं होतं.
पण एक घोडचूक केली. फॅमिलीला स्टोन्फायर ग्रिल मध्ये जेवायला घेऊन गेलो! Smile
तिथले लाकडाच्या आगीवर भाजलेले रिब्ज, स्टेक आणि विशेषत: पिझ्झा खाल्यावर आमच्या चिरंजीवांनी मनात घेतलं की,
"डॅड, आपल्याला पण असा वुडफायर ब्रिक ओव्हन हवा!!"
एरवी मी मागणीकडे दुर्लक्ष केलं असतं पण लेकाच्या आईनेही तेच मागणं जरा वेगळ्या शब्दांत मांडलं,
"चांगली आयडिया आहे. मग आपल्याला सल्ली आणि बोटी कबाब, गोटचं रान वगैरे घरीच भाजून करता येईल!"
(इतक्या वर्षांनंतर आता माझे वीक पॉईंटस तिला चांगले ठाऊक आहेत!!) Smile
तात्पर्य काय मंडळी की आता सर्व लक्ष एक वुडफायर ब्रिक ओव्हन बांधण्यात गुंतणार आहे. दॅट इज माय नेक्स्ट प्रॉजेक्ट!!
त्यातून मला तो नेहमीचा टृएडिशनल डोम टाईप विद्रूप आकाराचा ओव्हन आवडत नसल्याने काहीतरी नवीनच आयडिया वापरून एक कामचलावू ब्रिक ओव्हन बांधायचा आहे.
तेंव्हा आता उरलेला समर ते रिसर्च करून गवंडीकाम करण्यात जाणार.
सो बटाटा यावर्षी कॅन्सल! विंटरमध्ये बघू....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागेअभावी आम्हाला असा ओव्हन बनवता येत नाहीय पण एकेकाळी त्यावर बराच रिसर्च केला होता. थोडा मोकळा वेळ मिळाला की इकडे लिंका चिकटवेन. साधा ओव्हन एका शनिवार-रविवारच्या सुट्टीत बनविणे शक्य आहे. माझ्याकडे असलेल्या एका मौल्यवान (माझ्यासाठी) पुस्तकातही त्याबद्दल बरीच माहिती आहे.

टृएडिशनल डोम टाईप विद्रूप आकाराचा ओव्हन

हा इतका सुंदर,रस्टिक आणि स्वस्तात मस्त घरच्या घरी बनणारा तुम्हाला विद्रुप वाटत असेल तर मात्र अवघड आहे.
haa

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा इतका सुंदर,रस्टिक आणि स्वस्तात मस्त घरच्या घरी बनणारा तुम्हाला विद्रुप वाटत असेल तर मात्र अवघड आहे.

रस्टिक आणि स्वस्तात मस्त, घरच्या घरी वगैरे बरोबर आहे, पण त्याचा आकार विद्रूपच वाटतो मला!! सॉरी, पर्सनल डिसलाईक!! Smile
पुन्हा त्यातही असा ओव्हन फक्त पिझ्झ्या/नानसाठी वापरता येतो. कबाब, रान त्यात होणे कठीण!!!!
बघूयात, सुचेल काही डिझाईन....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिक ओव्हन - झक्कास!
(विटा घरच्या की बाजारच्या? ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विटा घरच्या की बाजारच्या?

भट्टीवर जाऊन स्पेशल फायरप्रूफ विटा घेऊन येणार! Smile
जेंव्हा ओव्हन तयार होईल तेंव्हा त्यात केलेले पदार्थ खायला घालण्याआधी तुझ्या एका हातात घरची आणि दुसर्‍या हातात बाजारची वीट देऊन तुला यार्डभर फिरवणार!!! Smile
त्याआधी तुला 'प्लान' दाखवून तिथपासून सुरुवात करणार!!!!!
शेवटी आडनांवाला जागलं पाहिजे ना!!!!
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याआधी तुला 'प्लान' दाखवून तिथपासून सुरुवात करणार!!!!!

हाहाहा, (वश्या नसला) तरी जोशी म्हणाले होते खरं याबद्दल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो लावणारे बरेच लोक या धाग्यांवर येतात म्हणून इथे अपडेट -

फोटो लावताना विड्थ, हाईट यांच्यापैकी एकच किंवा दोन्ही खोके रिकामे ठेवले तर रिकामा टॅग येऊन काही ब्राऊजर्सवर फोटो दिसत नव्हते. आता अशा रिकाम्या ठेवलेल्या खोक्यांचा HTML code छापला जाणार नाही आणि सगळ्या ब्राऊजर्सवर फोटो व्यवस्थित दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोगट मिरची : आपण घरची बाग शोभेसाठी फुलझाडं आणि खाण्यासाठी रासायनिक किटकनाशकं न वापरलेली भाजा मिळाव्यात म्हणून करतो .तो वाइरल रोग आहे आणि बियांतूच असतो .रोप काढून टाका.कंपोस्टही नकोच.
अवनचे प्रोजेक्ट झाल्यावर त्यात बटाटे भाजणार नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवनचे प्रोजेक्ट झाल्यावर त्यात बटाटे भाजणार नाही का?

भल्ले बावा तुमी! अवो अजून कशाचा कशाला पत्त्या न्हायी आनि तुमी बटाटे भाजून र्‍हायले!!!! Smile
एकदा बनू तर द्या. मग त्यात बटाटेच काय, लसूण, भरताची वांगी, सिमला मिरच्या, टामाटो, मक्याची कणसं, सगळं भाजूयात की!!!
अजून काय सुचत असेल तर ते पण कळवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो वाइरल रोग आहे आणि बियांतूच असतो .

व्हायरल इन्फेक्शन असतं तर ते काही पानांनाच/ थोड्या भागाला न दिसता रोपभर दिसलं असतं ना?

रोप काढून टाका.

तुम्ही डॉक्टर नाही ना हो? नाय म्हणजे अर्धशिशी घेऊन आलेल्या रोग्याला, 'याला ब्रेन ट्यूमर आहे, लाईफ सपोर्ट काढून टाका!!' असं सांगितलंत तर रोग्याची पंचाईत!!! Smile ह. घ्या...

मला ते फंगस वाटण्याचं कारण की काही वर्षांपुर्वी माझ्या पीचच्या झाडाला असाच प्रकार झाला होता. त्यावेळेस मी कॉपर बेस्ड फंजिसाईड मारल्यावर तो बरा झाला आणि पुन्हा उद्भवला नाही. (ते चांगलं वाढलेलं फळतं झाड असल्याने त्यावर ऑर्गॅनिक प्रयोग करत बसायची माझी तयारी नव्हती!!)

अर्थात आपण दोघेही इथे एका फोटोवरून रोगाचं निदान करत बसलोय!
त्यादृष्टीने आपण दोघेही तसे 'अरण्यपंडितच'!!! अब सबकुच अदितीमैयाके हातमें!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही फंगस कदाचित गेल्या वर्षीच्या अडाणीपणातूनही आलेली असेल. ही कुंडी गेल्या वर्षी बहुतेक कंपोस्टाच्या शेजारी ठेवली होती. त्यामुळे कुंडीतल्या चेरी टोमॅटोला फंगस लागली होती. कंपोस्ट हलवल्यावर टोमॅटो सुधारला होता. या वर्षी कुंडीतली अर्धी माती काढून झालेलं कंपोस्ट घातलं. कदाचित त्याचा परिणाम असेल.

मिरची वेगळी काढल्ये. फोड आलेले भाग छाटल्येत. झाडांच्या मुळाकडचे २/३ भाग व्यवस्थित दिसत आहेत. अजून तीन महिने तापमान उष्ण असेल. बघूया काय होतंय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजून तीन महिने तापमान उष्ण असेल. बघूया काय होतंय ते.

तुमच्याकडे अलीकडे झालेल्या प्रचंड पावसामुळे वाढलेला दमटपणा आणि उष्ण तापमान याचा बुरशीवर काय परिणाम होईल?
ती मरेल का अजून जोमाने वाढेल?
जगल्या, बोटें मोज!!!!!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आख्खा जुलै कोरडा जाणारसं दिसतंय. दमटपणा संपला कधीचाच. रोज तापमान ९७ फॅ.च्या पुढेच जातंय.

फंजिसाईड्सबद्दल गूगलून वाचलं. ९० फॅच्या पुढे तापमान असेल तर वापरू नका म्हटलंय काहींनी. तरीही एक वापरलं. कुंडी सावलीत हलवल्ये. दिवसातून दोनदा पाणी घालायला सुरुवात केल्ये, तेवढंच तापमान सहन करणं झाडाला सोपं होईल.

रोगाबद्दल गूगलून फार काही सापडलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिवळा डांबिसने धाग्याला परत गति दिली त्याबद्द्ल थँक्स. मोगरा मस्त !
सगळ्यांच्या बागांमधली प्रगती वाचून उत्साह वाढतोय. माझ्याकडे पांढरे कापसा सारखे किडे चिकटलेले दिसतात पानांवर काहीवेळा; ते दिसले की मी काढून टाकते काडीने. ढब्बू मिरचीला बरीच फुले आली आहेत पण अजून मिरची लागली नाहीये. त्याच कुंडीतला भोपळ्याचा वेल वाढतोय- काही कळ्या दिसतायत आलेल्या. वांग्याला मोजून दोन फुलं आली. पहिलं वाळून गळलं. दुसरं गेले चार दिवस रोज फुलतं आणि संध्याकाळी मिटतं.
टोमॅटोला एक बारका हिरवा टोमॅटो दिसतोय. तीन छोटे लाल मुळे अर्ध्या इंचापेक्षा मोठे झाले आहेत. बाकी मेडशिंगी, लिची यांची रोपे ६ इंची कुडीत वाढत आहेत. शिरीषाचं बारकं रोप अचानक तुटून गेलं...बहुदा कबूतरांच्या धक्क्यानी त्याचं स्टेम तुटलं असावं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फळं येणाय्रा मोठ्या झाडावर कॅापरबेस्ट वगैरे ठीक आहे. मिरच्यांना वाइरल रोग होण्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यावर फवारे मारण्याचा खटाटोप करून त्या मिरच्या खाण्यापेक्षा ----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरच्यांना वाइरल रोग होण्याचे प्रमाण अधिक असते

हे मला माहिती नव्हतं.
असं असेल तर मग आमच्या सगळ्या मिरच्यांची तोडणी होईपर्यंत अदितीला कॅलिफोर्नियात प्रवेशबंदी!!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२-३ पालकाचा वापर करून झाल्यावर त्याला टाटाबाय बायबाय केलं आहे. त्याऐवजी आता टोमॅटोच्या ऑर्गॅनिक बिया पेरल्या आहेत.
जरा किटकमित्रांना आकर्षित करण्यासाठी सहज उगवणारी (नी फोफावणारी) पण आटोक्यात ठेवणे कठीण नसणार्‍या गुलबक्षीच्या बिया शेजारच्याच कुंडीत लावल्या आहेत. दोन्ही बियांना कोंब आले आहेत. लवकरच टोमॅटो वाढून किमान एकतरी फळ धरावे अशी अपेक्षा आहे. पालेभाज्या नी फुले इथवर प्रगती होते. मिरच्यांना पुढे पिक्चरसारखं फुलांची एकमेकांत घासघीस करून फळं काही लागली नव्हती :(.. बहुदा हायब्रीड असतील असे वाटून यावेळी टोमॅटोच्या ऑर्गॅनिक बिया लावल्यात, आशा आहे आता किमान एकतरी टोमॅटो मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ढोले पाटील रोडवर मेनलँड चायना इ. होटेल्स आहेत त्याच इमारतीत द्रविडा'ज़ बिस्त्रो नामक एक होटेलही आहे. तिथे गेलो असता वाचण्यात आले की टेरेसवर ते दोनेक हजारपर्यंत ऑरग्यानिक टोम्याटो इ. लावतात म्हणून. शिवाय कसे ते येऊन बघा असे आवाहनही त्यांनी केलेय. जमेल तेव्हा जाऊन बघा, कदाचित मदत होईलही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह ओके. हे माहित नव्हते.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा अनुभव फार नाही. पण टोमॅटो हे फारच सोशिक आणि काटक झाड असणार. मी बऱ्याच चुका करूनही या वर्षी मला १०-१५ घरचे टोमॅटो मिळाले. मी केलेल्या घोडचुका -

१. अचानक पाऊस भरपूर झाला तेव्हा कुंडीत पूर येऊ दिला.
२. कंपोस्टचा उघडा डबा टोमॅटोजवळच ठेवला होता.

जालावर शोधलं तर टोमॅटोची छाटणी करा वगैरे म्हटलेलं दिसलं. मी ते ही केलेलं नाही तरी बऱ्यापैकी फुलं-फळं धरली. या वर्षी लावलेले टोमॅटो अजूनही व्यवस्थित आहेत, तापमान पुन्हा ३२ से च्या खाली आलं की फळं मिळतील अशी आशा आहे.

टोमॅटो धरल्यानंतर पिकायला बराच वेळ लागतो. तेवढा धीर धर म्हणजे झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यापेक्षा, दाण्याचे कूट घालून कच्च्या टोमॅटो ची भाजी करुन टाकायची. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधे आणि चेरी टोमॅटो बरेच आले. आणलेली झाडं ऑर्गॅनिक नव्हती, पण मी कीटकनाशकाचा वा इतर कुठल्याही खताचा वापर न करता झाड वाढवले. प्राण्यांनी पळवलेलेही टोमॅटो आजूबाजूला पडलेले दिसले. मी फळाची वाढ पूर्ण झाली, की हिरवेच टोमॅटो तोडून पिकायला घरात आणून ठेवते. पिकायला वेळ लागतोच, पण निदान झाडाची वाढ्/नवीन फुलांचं येणं लांबत नाही.

भोपळ्या मिरच्याची बर्‍याच आल्या. लाल मिरचीच्या झाडाच्या मिरच्या मात्र हिरव्याच रहात आहेत. दुकानदाराने चुकीचं लेबल लावलं असावं.

फरसबीलाही गेल्या काही आठवड्यांपासून फुलं/शेंगा यायला लागल्या आहेत.

आमच्याकडे आता बागकामाचा मोसम संपत आला आहे. थंडीत येणारी काही झाडं लावता येटीलही, पण उस्तवार करयला येळ मिळणार नाही म्हणून तो प्रयोग करण्याचा विचार सध्या नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरच्यांची, बाग फुले,
अजूनि अंगणात....
DSC_0678

आणि
DSC_0677

पूर्वी या मिरच्यांच्या वाफ्यात दोन आधल्या वर्षांतल्या बियांतून उगवलेली चुकार टोमॅटोची झाडं दाखवली होती...
IMG_0163

ती झाडं आता मोठी होऊन त्यांना टोमॅटोही धरले आहेत...
DSC_0679

आणि
DSC_0680

वांग्यांच्या रोपांना वांगी आली आहेत...
DSC_0656

आणि
DSC_0655

आणि
DSC_0654

आजच वांगी तोडून घरात आणली. उद्या वांगीभाताचा बेत आहे!!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह, मिरच्यांना पाहून दिल खुश हुआ!

तुम्हा सर्वांचा बागकाम सीझन संपत आला, आमचा आता सुरू होणार. सध्या बिया मिळवणं, कायकाय, व किती लावायचं याचा बेत आखणं, जुन्या कुंड्यांतल्या मातीला बोन-मील, खत वगैरे घालून ठेवणं चालू आहे. दोन आठवड्यांमधे टोमॅटोच्या बिया पेरून ठेवणार. वांग्यांची छोटी छोटी रोपं तयार आहेत, पुढच्या वीकेंडला ती मोठ्या कुंड्यांमधे लावणार आहे.

यंदा भेंडी व बॉर्बोटी/चवळीच्या शेंगा खूप खाल्ल्या, पण भयानक पाऊस आणि दमटपणामुळे कोहळा, दोडका वगैरे वेलींना खूप फंगसचा त्रास झाला आहे. फवारे मारून मारून वैतागले. ऑगस्ट इज द क्रूएलेस्ट मंथ - कधी एकदा उकाडा कमी होईल असं झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी पुदिना लावत नाही का? आमच्या गॅलरीत एक पुदिना छान फोफावला आहे. जांभळे तुरे अन त्यावर येणार्‍या मध-माशा - पहायला मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोशिवाय आम्ही प्रतिक्रिया देत नाय!
च्यायला, आम्ही मात्र फोटो काढून, ते फ्लिकरचं दिव्य करून, इथे फोटो टाकायचे.
आणि तुम्ही मात्र फक्त एक ओळीची चावी मारून जाणार!
ते काही चालणार नाही!
शुचे , काय त्या तुझ्या जांभळ्या तुर्‍यांचा फोटो इथे टाक, मग पुढली चर्चा करू!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile तो सासूबाईंनी वाढवलाय ..... मी कसं लाटू श्रेय Wink
___
पिडां फ्लिकरचं दिव्य कशाला .... फेसबुकावर अपलोडवा अन हाकानाका लिंंक शेअर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो सासूबाईंनी वाढवलाय ..... मी कसं लाटू श्रेय

तुझा नवरा सुद्धा सासूबाईंनीच वाढवलाय, त्याला लाटलास ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा सिलेक्टिव्ह लाटणं म्हणतात याला.
उद्या टाकते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.
मग मी देखील आमच्या पुदिन्याचा फोटो टाकीन....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के डन Smile
__________

हा पुदिना व हा झेंडू. आईंनीच काढलाय फोटो.

https://scontent-ord1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpt1/t31.0-8/s960x960/11896184_1615449932062353_1843644699415810210_o.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे पुदिना. ते तुरे मस्त दिसताहेत.
आमच्याकडे तुरे येण्याइतका पुदिना कधी वाढतच नाही. दर रविवारी पानं मटणाच्या मसाल्यासाठी जातात!! Smile
हा माझ्या पुदिन्याचा सध्याचा फोटो.
DSC_0650a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडां फ्लिकरचं दिव्य कशाला .... फेसबुकावर अपलोडवा अन हाकानाका लिंंक शेअर करा.

ऐसीवर हे करता येतं?
मिपावर करता येतं हे माहिती होतं! (हे उगाच जरा राजेश आणि अदितीला चिडवण्यासाठी!!) Smile
असेल तर कसं करायचं ते सांगा हो कुणी या अडान्याला!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडां फेसबुकवर फोटो पब्लिक पर्मिशन्स ने टाकायचा. मग राइट क्लिक आणि कॉपी यु आर एल. सोप्पय. ती यु आर एल इथे टाकायची (इन्सर्ट्/एडिट इमेज भागात).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुझ को मिरची लगी तो मै क्या करू? मिरची लागण्याचं अवांतर कारण - आता फोड आलेल्या मिरच्यांना फुलं धरतायत तर फार उन्हाळा आहे म्हणून बहुतेक फळं धरत नाहीयेत. टोमॅटोसारखं या मिरच्यांचंही असतं हे माहित नव्हतं. ९५ फॅच्या वर फळं धरत नाहीत म्हणे.

असो. तोवर तुमच्या मिरच्यांसाठी हे गाणं -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फेसबुकापेक्षाही postimg( postimage) dot org फारच सोप्पे आणि सुपरफास्ट.अकाउंट असले की( कितीही) अॅल्बम बनवून फोटो अपलोड झाला की लिंका लगेच खाली येतात.resize वगैरे आहेच.फ्लिकरची photostream नाही पटली.कायमचे फोटो साठवायला मात्र उत्तम साइट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फोटो कोणत्या फुला/फळाचा ते ओळखा पाहू? Smile
DSC_0653

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याला अमच्याकडे तरी कृष्णकमळ म्हणतात, पुस्तकी नाव 'पॅसीफ्लोरा'. मला ह्याचा वास फार आवडतो. सोनचाफ्यानंतर सुगंधाच्या बाबतीत हेच फुल माझे आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा वास सुंदर, पण अंमळ गोड असतो. तसाच नागचाफा आणि गावठी गुलाब. भारी गोड.
सोनचाफा पहिला हे खरंच. पण मागोमाग बकुळ, मग प्राजक्त, मग सोनटक्का, मग जाई-जुई आणि मग तो शाणपणा मोगरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बकुळ चा वास ठाऊक नाही. पण हो, प्राजक्त, सोनटक्का, जाई-जुई झकासच. मोगर्‍याचा वास घेतला की मला लग्न-कार्य, सोहळे, गर्दी, भडक रंग, कोलाहल हे सगळं आठवतं आणि मग तो वास नकोसा होतो.

मला बुचाची फुलं ही जाम आवडतात - मस्त मंद वास असतो त्याला. नॉस्टॅलजीक होतं. साध्या चाफ्याच्या फुलांचाही असा अचानक वास आला की छान वाटतो. ऑफीस च्या पार्कींग मधे शिरताना प्रवेशदाराशी एक चाफ्याचं झाड आहे, सदैव फुललेलं असतं. गाडी आत घेउन जाताना विरुद्ध दिशेने वारा येतो आणि चाफ्याला शिवून हलकासा नाकात जातो तेव्हा फार प्रसन्न वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकुळीचा वास ठाऊक नाही? हाय रे दैवा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Sad
माझा एक मित्र सोनचाफ्याबद्दल असंच म्हणालेला, त्याला अगदी गेल्या महिन्यापर्यंत सोनचाफ्याचा वास (आणि मुळात ते फुल) ठाऊकच नव्हता. तेव्हा मला असेच झालेले जसे तुला अता वाटले, त्यामुळे समजू शकतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याची फळे लिंबा सारखी असतात, सरबत पण करता येते.

१०० कौरव, ५ पांडव आणि मधे कृष्ण ( ह्या फोटोत ३ दिसतायत ) असे काहीतरी लहानपणी ऐकल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही ती फळे याची नसतात हे पॅशनफ्लॉवर आणि तुम्ही म्हणताय ते पॅशनफ्रुट असलं तरी त्याचे वेल वेगळे असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॅशनफ्रुट खाल्लय - आंबट गोड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते फूल पॅशन फ्रूट (पॅसिफ्लोरा) चं आहे.
त्याला वास काही फारसा नाही पण त्याला ईडलिंबाच्या आकाराची हिरवी फळं लागतात जी पिकल्यावर लाल- आमसुली रंगाची होतात.
आत गर आणि बियांना एक विलक्षण सुवास (फ्रेग्रन्स) असतो.
सरबतं, आईस्क्रीम, फालुद्यामध्ये अतिशय मस्त लागतात.
पिना-कोलाडा मध्येही त्यांचा वापर अगदी समर्पक होतो. (माझी आवड!)
अचूक ओळखणार्‍यांचं अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>मोगर्याचा वास घेतला की मला लग्न-कार्य, सोहळे, गर्दी, भडक रंग, कोलाहल हे सगळं आठवतं आणि मग तो वास नकोसा होतो.
मला बुचाची फुलं ही जाम आवडतात - मस्त मंद वास असतो त्याला. नॉस्टॅलजीक होतं. साध्या चाफ्याच्या फुलांचाही असा अचानक वास आला की छान वाटतो.>>>अगदी पटलं.
एका टाल्कम पाउडरचे नाव ड्रीम फ्लाउअर याला साध्या पांढय्रा चाफ्याचाच वास असतो।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुलाब फोफावतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा काय सुंदर गुलाबी रंग आहे. त्या गुलाबामागे जी चिनीमातीची कुंडी आहे ते ही सुरेख आहे, मला आवडतात अश्या कुंड्या आणि त्या घरात तर फार शोभून दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेठ, गुलाब मस्त आहेत.
ते काय पोत्यामध्ये वाढवलेयत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद खाली हलवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे गुलाबाचे रोप किती निरोगी दिसतेय, एकही पिवळे पडलेले पान नाही. हिरवेगार झाड, तजेलदार फुले, मस्तं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाडांच्या बाबतीत जेवढी पांढरी लवदार मुळे अधिक तेवढे झाड निरोगी.ती येण्याचे प्रमाण या पिशवीत साधते.कापडाच्या विणीतून सतत पाणी पाझरते,गारवा निर्माण होतो, मुळे तापत नाहीत,हवा भरपूर मिळते.तसे दुसय्रा कुंड्यांत होत नाही.जाडजाड मुळे येतात परंतू त्यावर पांढरी पाणी पिणारी कमी असतात.शिवाय कुंड्याचा तळाकडचा आकार निमुळता होत जातो जिथे तो खरं म्हणजे वाढायला हवा.ऊन लागले की मातीच्या ,प्लास्टीकच्या कुंड्या फारच तापतात.

[भरतपुरजवळच्या एका मातीच्या किल्ल्याचे नाव लोहगड आहे.किती रास्त नाव आहे!दगडाच्या भिंतींवर बाहेरून चिखल थापला आहे.शत्रुचे बरेच तोफगोळे या चिखलाचे ढलपे पाडण्यातच वाया जातात,भिंतीवर आपटतच नाहीत. हा चिखलही कालच्या खंदकातून काढलेला आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेला महिनाभर बागकामाचा अनुभव, स्वप्ने-निराशा-वैफल्य-वास्तवाचा स्विकार-आशेची धुगधुगी आणि निसर्गाच्या सहनशीलतेने स्तिमित होणे असल्या चढउतारांवरून गेला. यावर्षी उत्तर अमेरिकेत आलेल्या मोठ्या दुष्काळाचा तडाखा कॅनडाच्या अनेक प्रांतांना चांगलाच बसला आहे पण निदान आमच्या भागात पाणीटंचाई फार नसल्याने बागकामावर फार परिणाम होईलसे वाटले नव्हते. शिवाय दुष्काळाचा आमच्यासाठी चांगला भाग म्हणजे जून-जुलैचे तापमान सरासरीपेक्षा बरेच जास्त असल्याने टोमॅटो-वांग्यांसारखी झाडे, फरसबी, ढबूमिरची वगैरेचे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे झाडे रसरशीत दिसत होती, फरसबीला तर दिवसाकाठी दोन माणसांची भाजी होईल इतक्या शेंगा येत होत्या. मटार, ढबूमिरची वगैरेही येऊ लागले होते. यावर्षी प्रथमच टोमॅटोच्या झाडांचे बुंधे अगदी पाऊण इंच-इंचभर व्यासाचे झाले होते आणि त्यांना बरेच घोसही आले होते. बटाट्यांचे तर रानच झाले होते.

असं असताना अचानक दोन दिवसांत होत्याचे नव्हते झाले, सलग दोन दिवस अर्धा-अर्धा तास प्रचंड गारपीट झाली, तापमान काही वेळापुरते वीस अंशांनी खाली आले. आम्ही शक्य तेवढ्या कुंड्या वगैरे घरात नेण्याचा प्रयत्न केला, दुसर्या दिवशीच्या गारपीटीआधी बागेतही ताडपत्री वगैरे लावून झाडे जपण्याचा प्रयत्न केला पण एकूण स्थिती गंभीर होती. कम्युनिटी पॅचच्या वाफ्यात लावलेल्या गोष्टींतले बटाटे वगळता इतर काही फारसे वाचेल अशी शक्यता दिसत नव्हती. खूप नुकसान झाले, टोमॅटो-वांगी वगैरे जी फळे लागली होती तीदेखील टिकतील असे वाटत नव्हते, चार्ड-बीट वगैरे पानांची वाफ्यातच कोशिंबीर झाली होती, झाडे जवळजवळ झोपली होती. बागेकडे पाहून आम्ही हौशी बागकाम करणार्यांनी आसवे गाळली आणि शेती करणे हे किती कष्टाचे आणि तरी प्रचंड बिनभरवशाचे काम आहे याची जाणीव होऊन शेतकर्यांच्या व्यथांचा आम्हाला पहिल्यांदाच खरा चटका बसला. हे केवळ हौशी बागकामप्रेमींचे दु:ख असेल तर ज्यांचे यावर उत्पन्न अवलंबून आहे त्यांच्या दु:खांची तर कल्पनाही करवत नाही.

त्यानंतरचा आठवडा काही करूच नये असे वाटत गेला पण नंतर पडलेल्या लख्ख सूर्यप्रकाशाने काही झाडे तरारली आणि सावरली ते पाहून परत बागेकडे जाऊन खुरपे हातात धरले. आपल्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करून झाडांना वाढायला आणि फळायला मदत करावी म्हणून खत-पाणी केले, काही नव्या (कमी वेळात म्हणजे पाच-सहा आठवड्यांत तयार होतील अशा) पाक्चॉय, चार्ड वगैरेच्या बिया पेरल्या. जी झाडे अगदीच होपलेस होती ती काढून टाकली, बटाट्यांना अधिक माती घातली. बाग पुन्हा ठीकठाक झाली पण गारपीट झाली नसती तर त्यातून जेवढे पीक आले असते त्याच्यात अर्ध्याने तरी घट झाली. गंमत अशी की बीट-चार्ड वगैरे झाडे पुन्हा जोमाने वाढायला लागली, एकूणच जी झाडे थंड प्रदेशात येतात ती झाडे पटकन सुधारली. वांग्याना जी काही सहा-सात वांगी आली होती ती राहिली आणि वाढलीही पण अधिक फळ धरण्याची शक्यता नव्हती. टोमॅटो मात्र ताडपत्री वगैरेने निभावले पण त्यांची वाढ खूपच मंदावली. आता दिवसाला सात-आठ चेरी टोमॅटो निघताहेत आणि इतर मोठ्या टोमॅटोलाही बरीच फळे आली आहेत पण ती पिकण्यापर्यंत हवेचा काही भरवसा देता येत नाही. ठीक आहे, हरकत नाही, कच्च्या टोमॅटोची चटणी करून बाटल्यांत भरून ठेऊ झालं!

त्यातच मागच्य आठवड्यांत पुन्हा एका दिवसापुरते तापमान एकदम घसरले (रात्री ३ अंश किमान!) आणि थोडा बर्फाचा पाऊस (स्लीट वगैरे) झाले त्यामुळे आम्ही अजून एक उसासा सोडला पण दुसर्याच दिवशी पुन्हा तापमान पूर्ववत झाल्याने थोडा दिलासा मिळाला.

एक महत्वाचे निरिक्षण असे की पूर्णतः सेंद्रीय पध्दतीने बाग करूनही जोपर्यंत हवामान ठीक असेल तोपर्यंत बागेची वाढ अगदी मस्त होत होती. मातीचा कस, कॉम्पोस्ट, वर्मीकॉम्पोस्ट आणि लागेल तसे पाणी देखील अगदी मुबलक पीक द्यायला पुरेसे होते, मुख्य गरज होती ती सूर्यप्रकाशाची. "झाडांना लागतो तो सूर्यप्रकाश" हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ सत्य समोर आले. जिथे बागेला अधिक सूर्यप्रकाश मिळत होता तिथल्या झाडांची वाढ सर्वात उत्तम होत होती. अजून एक निरिक्षण असे की स्क्वेअर फूट गार्डनिंगमधे काही झाडे (बटाटे!) लावू नयेत, ती इअतर झाडांचा सूर्यप्रकाश आडवतात आणि पोषणही पण गारपीटीसारख्या वेळी अशा गिचमिडीने वाढलेली झाडे एकमेकांचे रक्षण करतात. यावर्षी बटाट्यांनी काही झाडे मारली तर काही वाचविली Smile

गाजरे, बीटस, बटाटे उकरायला अजून थोडा अवधी आहे पण त्यांचे पीक ठीकठाक येईल अशी अपेक्षा (की आशा?) आहे. तीन-चार वांगी खाऊन झाली, मजा आली. थोडी गाजरे, पालेभाज्या, चेरी टोमॅटो, फरसबी वगैरेही खाऊन झाले. आपल्या बागेतल्या गोष्टी खाण्याचा आनंद काही औरच असतो! बरेच हर्ब्स लावले होते ते जमेल तसे वाळवून ठेऊन अथवा त्याचे हर्ब-बटर बनवून फ्रीज करणे चालले आहे. लसूण तयार दिसतोय पण अजून उकरला नाही, लसणाच्या लोणच्यांची काही खास पाककृती असेल तर अवश्य सुचवा. फोटो नंतर सवडीने याच प्रतिसादाला जोडेन त्यामुळे उपप्रतिसाद तोपर्यंत कृपया देऊ नका.
Eggplant

Basket-1

142

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच घराच्या वाफ्यातला लसूण उकरला, त्याची ही वेणी. अजून चांगले येऊ शकले असते पण काही चुका केल्या त्या पुढच्या वेळेस सुधारता येतील. लसणाला स्पर्धा आवडत नाही, त्याच्या बाजूला इतर काही लावायचे नाही. शिवाय सकस माती आणि भरपूर सूर्यप्रकाश असेल तर गड्डे जास्त मोठे, टपोरे येतात.
137

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी बरंच आलं की गं!! लसणाची वेणी मस्तच. आणी छोटूलं लाल गाजर ही.

हिरव्या वांग्यांची प्रजात कोणती आहे? माझ्याकडे एक "बनमाला" म्हणून तसलीच देशी प्रजात होती, पण या उन्हाळ्यात वाळली. गेल्या सप्टेंबरला लावलेली "लुटकी" वांगी अजून जोरात आहेत मात्र. काही रिपेरकामासाठी बाल्कनीत दुसरीकडे हलवावी लागली, आणि ऊन कमी मिळाल्यामुळे तिथे पावसाळ्यात मावा आणि अ‍ॅफिड्स (याला मराठीत काय म्हणतात?) लागले. गेल्या महिन्यात सलग नीमतेलाचा फवारा, आणि कंपोस्ट-टी चा डोस पाजून पाजून पुन्हा तरतरीत केले. आत पुन्हा फळ धरतंय. इथल्या हवेत वांगी तीन-तीन वर्षं टीकू शकतात म्हणे!

lutki begun

या उन्हाळ्यात भेंडी, बॉरबोटी आणि एखाद्दुसरी पालेभाजी सोडून फारसे यश आले नाही, तरी किडलेल्या रोपांवर यशस्वी औषधोपचार करून त्यांना जगवता आलं याचं मात्र प्रचंड समाधान आहे. आणि मोठेमोठे स्टिंकबग आणि पंपकिन बीटल मारून मारून दमल्यावर, अ‍ॅफिड्स वर फक्त जोरदार पाण्याच्या फवार्‍याने चांगला परिणाम झाला, पण आता माझ्या मदतीला अनेक प्रकारच्या लेडीबग्ज गच्चीवर आल्या आहेत. या किड्यांचे कौतुक करावे तितके कमी! तुरुतुरु फांद्यांवरून पळताना दिसले की खूप प्रसन्न वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरवी वांगी बिजली या जातीची आहेत आणि जांभळी रिमझिम जातीची, अर्थात त्याला काहीतरी स्थानिक नावे असणारच. त्याखेरीज गोटी वांगीपण लावली होती पण त्याला अजून काही फळ आले नाही. हिरव्या वांग्यांचं भरीत केलं होतं, ते इतकं चविष्ट झालं होतं की बस्स!
लुटकी वांगी मस्त दिसताय, तीन-तीन वर्षं झाडं जगतात हे माहिती नव्हतं. नीमतेलाचा वापर मी फार केला नाही; करंट्सच्या झाडावर खूप आळ्या आल्या होत्या त्यावर मारून पाहिलं पण फार उपयोग झाला नाही. यावर्षी आमच्याकडे लेडीबग्ज जरा कमी दिसल्या, हवामातल्या मोठ्या तफावतीने असाव्यात. अरगूला (एक प्रकारचे सॅलड) वर जेंव्हा ऑफिडसचा मारा झाला तेंव्हा लेडिबग्ज नव्हत्या आणि नंतर त्यांचा जोर संपल्यावर आल्या. पण तरीही बागेवर किड्यांचा फार मोठा परिणाम झाला नाही.
आता आमच्याकडे गार व्हायला लागलं आहे पण वांग्यांची झाडे चांगली दिसताहेत तर त्यांना कुंड्यामधे घालून घराच्या आत आणले तर जगतील का ते पहायला हवं. येवढी मेहनत केल्यावर निदान अजून थोडी वांगी आली तर बरं वाटेल. ढबूमिरचीचंही तेच, झाडे बरी दिसताहेत पण आता फ्रॉस्ट आलं की झालं.
आणि हो, नवर्याने गंमत म्हणून लावलेलं द्राक्षाचं रोप वाळून गेलं होतं त्याला अचानक पुन्हा पालवी फुटलीय :-)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तीन तीन वर्षं जगतात हे ठाउक नव्हते. तिसर्‍या वर्षी म्हातारपण येऊन थकून जातं असं ऐकलंय. पण आता एक वर्षं होत आलं, बघू हे कुठवर जगतं ते.
मी पंपकिन स्टिंकबग्ज चिरडून चिरडून दमले. कोहळ्याच्या वेलीला पार पोखरून टाकलं होतं. दिसायला भलतेच गोड, पण खूपच त्रास.
आमच्याकडे अजून पाऊस जोरात आहे, पण पहाट आणि संध्याकाळचं तापमान थोडं कमी झालंय. दिवसा अजून ३० से. च्या वर आहेच. टोमॅटो कधी पेरावेत विचार करतेय. आजच अरुगुला, रोजमेरी, चियोज्या बीटरूट आणि फ्लावरच्या बिया मागवल्या. माझ्या एकेकाळी आवडत्या सॅलडला पुन्हा चाखायची खूप इच्छा आहे - रोस्टेड बीट्स, अरुगुला, पाइन नट्स अँड गोट चीज. अर्थात त्याला सोबतीला चांगली पिनो नुआर हवी, पण ते असो. सोनेरी बीट्स च्या कुठे चांगल्या बिया मिळतात का पहायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पालेभाजी कुठली आहे ती टोपलीतली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या चार्डची पीठ पेरून भाजी अतिशय मस्त होते नाहीतर सॅलड म्हणूनही छान लागतं. रेनबो चार्ड अशा मिक्स चार्डच्या बिया पेरल्या तर त्यांची देठेही खूप सुंदर रंगांची असतात. वरच्या फोटोत दिसत नाही पण या फोटोत बघ. देठेपण चविष्ट असतात, पोकळ्याच्या देठांसारखी.

या
(फोटो जालावरून साभार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीठ पेरुन करुन बघेन. चांगली आयडीया आहे. मी आमटीत घालते. ठीकठाक लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोकळा! फार आवडती भाजी. आणि माठ आणि चवळई. पालेभाज्यांचा एक स्वतन्त्र धागा काढायला हवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>>केवळ हौशी बागकामप्रेमींचे दु:ख असेल तर ज्यांचे यावर उत्पन्न अवलंबून आहे त्यांच्या दु:खांची तर कल्पनाही करवत नाही.>>

•खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"झाडांना लागतो तो सूर्यप्रकाश" हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ सत्य समोर आले.

अगदी सहमत.
"दाहक परि संजीवक, करूणारूण किरणप्रभा!"
आमच्याकडे तो सूर्यप्रकाश अगदी उघडा (आणि बीचजवळ असल्याने कधीकधी नागडा!) असल्याने वाळवंटी जमीन, पाण्याचा तुटवडा वगैरे गोष्टी असूनही बहुतेक सगळी पिकं बचावली.....
बाकी खार नामक झुपकेदार शेपूटरूपी उंदरांचा ह्या जगातून कायमचा नायनाट करता आला तर बरं होईल!!!! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आमची काही सफरचंद....
DSC_0467

आणि
DSC_0468

आणि झूम इन...
DSC_0469

या झाडाला यापेक्षा अजून जवळजवळ चारपट फळं लागली होती.
भडव्या खारीनी ती हिरवी असतानांच नासधूस केली!!!
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा काय गोमटी फळं आहेत. खूपच सुंदर. आमच्या भागात सफरचंदाची काही झाडं रस्त्याच्या कडेला, कॉम्प्लेक्सेस मध्ये दिसतात. पण अजुनी हिरवी, आंबट ढाण, अ‍ॅपल-पाय वाली (ग्रॅनी ग्रीन) सफरचंदच दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकांना भेट म्हणून अ. द. मराठेंचं पुस्तक पाठवण्याजागी एखादी शॉटगन पाठवली असती तर बरं झालं असतं.

ही आमच्या ओळखीची एक शॉटगन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुची, डोन्ट वरी! बटाटे बीट्स वगैरे मंडळी येतील मस्त! Smile

वेजीटेब्ल्स आर ब्युटिफुल पीपल Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रुची, गारपीटामुळे झालेल्या नुक्सानाबद्दल वाचून वाइट वाटले!
"उषाज पिकल डायजेस्ट" मधे काही लसणाच्या लोणच्यांच्या कृत्या आहेत, नंतर डकवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोगरा, गुलाब, सफरचंद, मिरच्या, वांगी ... मस्तच

हा धागा फळं, फुले आणि भाज्यांनी बहरला आहे.

माझ्या (बाल्कनी) बागेची अवस्था मात्र सध्या बरी नाहीये Sad
मधे काही दिवस (जेमतेम २५-३० दिवस) मी तिच्यापासून दूर होते , तर बिचारी सुकुन, वाळून गेली.
आता परत नीटनेटकी केली आहे. आणि नविन पेरणी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अचरटजी, काय सुंदर गुलाब आहेत! शेजारची नक्षीकामाची कुंडी पण सुरेख आहे.
उन्हाने मरगळलेल्या अपराजिता / शंखपुष्प वेलीला आता छान फुलं येतायत. निळी फुलं पण आहेत, पण चांगला फोटो नाही काढता आला.

aparajita

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या पॅालिएस्टर पडद्याच्या पिशव्या शिवल्या आहेत.आतमध्ये मातीबरोबरच फर्निचर कामातले उरलेले लाकडाचे तुकडेही घातले आहेत.त्या चिनीमातीच्या कुंड्या बायकोने लग्नाअगोदर घेलल्या होत्या.त्याला तळाला भोक असते ते सिमेंटने बुजवले.आता झाडाची पिशवी फक्त आत ठेवायची आणि बदलायची .पाणी वाहून बाहेर येत नाही.नेहमी कुंडीत एक तजेलदार झाड दिसते.

( पॅालिएस्टर अधिक कॅाटन कापड वापरूनका ,टिकत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबल पोस्ट काढली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गारपिटी नंतरच्या भाज्या वगैरे फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर्षी डाळिंबांना फुलं खूप आली होती पण प्रत्यक्ष फळं मात्र एक-दोनच लागली. कदाचित दुष्काळामुळे असेल.....
DSC_0659

DSC_0668

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डाळिंबाच्या फुलांचा रंग मला खूप आवडतो. इथे दोन प्रकारचे डाळिंब मिळतात (कुठून येतात नक्की माहित नाही), पण एकाचे दाणे फिकट असतात त्याला बेदाना म्हणतात, आणि अगदी गडद गुलाबी-लालसर दाणे असतात त्याला डालिंब म्हणतात. कुंडीत होईल असे आमचे शेजारी म्हणतायत, मला लावून पहायचा आहे.
आज पहाटे गच्चीवर तगर: (याला मराठीत वेगळं नाव सुद्धा आहे का? इंग्रजीत काय म्हणतात?)
tagar flowers

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिला सुवासही असतो ना मंद? डबल तगर असं मजेशीर नाव ऐकलं आहे मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आम्हीही हिला डबल तगर म्हणतो. हिला मंद सुवास असतो. झाडही खूप स्टर्डी असतं.
सिंगल तगर एकेरी पाच/सहा पाकळ्यांची असते. तिला विशेष वास असा नसतो...
माझ्या लहानपणी गावी दोन्ही प्रकारची तगर पाहिली होती.
छान आठवण करून दिलीस.
(आता हे रोप शोधणें आलें!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डाळिंबाच्या फुलांचा रंग मला खूप आवडतो. इथे दोन प्रकारचे डाळिंब मिळतात (कुठून येतात नक्की माहित नाही), पण एकाचे दाणे फिकट असतात त्याला बेदाना म्हणतात, आणि अगदी गडद गुलाबी-लालसर दाणे असतात त्याला डालिंब म्हणतात.

ही जात गुलाबी-लाल दाण्यांची आहे. ह्या झाडांची एक गंमत आहे. आमच्या हिच्या एका इराणी मैत्रिणीने खात असलेलं डाळिंब स्वादिष्ट लागलं म्हणून त्याच्या काही बिया बाजूला काढून त्यापासून रोपं तयार केली. त्यातली पाच एकत्र उगवलेली रोपं आम्हाला दिली. त्यात ३ नर आणि दोन माद्या आहेत. फुलं आता मजबूत देतात पण फळं द्यायला नुकतीच सुरवात होते आहे. साधारण साडेतीन वषांची आहेत....

कुंडीत होईल असे आमचे शेजारी म्हणतायत, मला लावून पहायचा आहे.

ड्वार्फ जात लावली तर कुंडीत होईलही. ही ड्वार्फ जात दिसत नाहिये. आताच झाडं ७/८ फूट उंचीची झाली आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इराण आणि डाळिंबं यावरून ही अक्रोडडाळिंबी चिकन रेशिपी आठवली - http://www.epicurious.com/recipes/food/views/pomegranate-khoresh-231918.

किंचित गोडसर, पण अतिचविष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बियांपासून रोपे बनवून तीन वर्षांत फळे म्हणजे किती छान! म्हणजे आमच्या घरात वाढत असलेल्या लिंबाच्या रोपांना भवितव्य आहे म्हणायच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्शाल्ला, जरूर!
पण मायर हवी असतील तर कलमं करावी लागतील ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चल नवा धागा काढ
आता झाले ना शंभर,
चल नवा धागा काढ...

असं काय करतेस,
आळशीपणा करतेस.
थोडासा तू पुढाकार घे की!

डाळिंबंही पाहिली,
ती गुलाबंही पाहिली
अन् रूचीची (रड)कथाही वाचली! Wink

अदिती, नवा धागा काढ
आता झाले ना शंभर
चल नवा धागा काढ!!!!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0