शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl
(ऋग्वेद १/१६४/४६)

[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].

आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात, त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही.

आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.

ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती.

हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पना पुढे आणली.

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥
(ईशान उपनिषद /६)

जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पना त्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.

भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.

काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली, नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.

पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

प्रतिक्रिया

मला लेख टाकतानाच वाटले होते, ऐसीवरचा कुणीहि पुरोगामी या लेखाला प्रतिसाद देणार नाही. सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचा विचार बहुतेक त्यांना रुचला नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाचले होते खंडोबा हा सूर्याचा अवतार आहे म्हणून. (पण मला नीट आठवत नाही. कदाचित माझे विचार मिक्सड अप झाले असावेत.)
जालावरती हा जेजुरीचा फोटो सापडला. खरच एवढी हळद असते तिथे?
https://lh3.googleusercontent.com/-tDe2NiuxsUA/TbBH6-0V0kI/AAAAAAAAEGw/nxV8ycBQIEE/s640-Ic42/Jejuri_gadkot.jpg
.
https://lh3.googleusercontent.com/-2RmMYLmM8Js/TbBH0P9l-KI/AAAAAAAAEGs/x-GJo5RdJ1s/s450-Ic42/Khandoba-1.jpg
.

हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी".

वा! किती खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, तू दिलेले दुसरे चित्र खासच आहे. त्यातला पुरुष तर घोड्यावरुन पडता पडता वार करतोय असे वाटते.
राक्षस मात्र चेहेर्‍यावरुन सज्जन दिसतायत आणि जानवे पण घातलय त्यांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबद्दल अनेक कथा-कहाण्या फेमस आहेत त्यांपैकी एक म्हणजे 'अजमत' या नावामागची कहाणी होय. औरंगजेब हे देऊळ उध्वस्त करण्यास आला होता तेव्हा अचानकपणे अनेक भुंगे येऊन मुघलांना चावू लागल्याने माघार घेणे भाग पडले, तस्मात त्याने या स्थानाला 'अजमत' हे नाव दिले असे सांगतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगला अटेंप्ट होता काका, पण हे साले पुरोगामी आजकाल उचकत नाहीत.
बेटर लक नेक्श्ट टाईम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. <<

ओहो, म्हणजे मॅट्रिमोनियल साईट्सवर जातिनिहाय वरवधू शोधणारे लोक आणि लव्ह जिहादांना विरोध करणार्‍या खाप पंचायती पुरोगामी असतात होय? आता मला अनेक गोष्टींचे अर्थ समजू लागले आहेत. डोळ्यात अंजन टाकणारा लेख लिहिल्याबद्दल धागालेखकाचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हां सापडलं -

खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा.

संदर्भ - https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4...
___________
शिवाय वरच्या चित्रात श्वान व अश्व दाखविले आहेत जे की अनुक्रमे भैरव व सूर्याचे वाहन आहेत.
_________
ती शस्त्रास्त्रांची पूजा केव्हा होते? खंडेनमवमीलाच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद दिल्यानंतर देवता व वाहने चिंतन करत होते = झोपेची आराधना + idle विचार Wink
काहीतरी साधर्म्य आढळले उदा -
भैरव - श्वान - भैरव ही देवता "शासन करणारी" आहे म्हणजे काशीमध्ये भैरवाचे दर्शन घेतल्याशिवाय शंकराचे होत नाही. भैरव हा द्वारपाल आहे. तसेच पापी लोकांना भैरव दंड देतो असे काहीसे. श्वान = कुत्रा हा तसा भीतीदायक आणि चोरांना दंड देणारा असतो.
.
घोडा सर्वात उमदं जनावर आहे , देखणे व सळसळते तेजस्वी - सूर्य ही देवता तशीच आहे. सर्वाधिक तेजस्वी, तरुण.
.
कावळा असतो शनिचे वाहन. दोघेही काळे असल्याने तसेच रुढार्थाने कुप्रसिद्ध असल्याने साम्य वाटते.
.
सिंह व देवीची सांगड तशीच हंस व सरस्वती याबदाल तर बोलायलाच नको.
.
मोर सर्वात सुंदर समजला जातो , डिट्टो कार्तिकस्वामी त्याच्या देखणेपणा/सौंदर्याकरता प्रसिद्ध देवता आहे.
.
आता गणपती आणि उंदीर यांचा संबंध लावण्याकरता मला बुद्धीझम चा आसरा घ्यावा लागला. बुद्धाने प्राण्यांची सभा बोलावली असता १२ प्राणी प्रथम पोचले म्हणून १२ राशींना त्यांची प्रतिके दिली. पैकी उंदराला माहीत होते की तो काही ही रेस जिंकणार नाही तव्हा तो मला वाटतं कोण्या प्राण्याच्या अंगावर बसून आरामात गेला व ऐनवेळी ऊडी मारुन बैलाच्या शपटीला लोंबकळत ऊडी मारुन, व सर्वांच्या आधी पोचला. Smile म्हणजे बुद्धीमान असणारच.
नो वंडर गणपतीचे वाहन आहे.
.
बैल हा देखणा व संथ प्राणी शंकराचे वाहन का / गरुड हा शार्प पक्षी विष्णुचे वाहन का - ते मात्र लक्षात येत नाहीये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैल हा देखणा व संथ प्राणी शंकराचे वाहन का

तुम्हाला कुठे संस्कृतिकोश मिळण्यासारखा असेल, तर त्यात बहुधा वृषभावर नोंद आहे, ती वाचायला तुम्हाला आवडेल. त्यात बैल शंकराचे वाहन का या प्रश्नाचे उत्तर असावं असं वाटतंय. शिव हाच वृषभ होता, मग तो वृषभवाहन झाला, असं काहीतरी आठवतंय.
* बाय द वे, बंगालात घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय घुबड आठवलेलं मला. पण सुचलं नाही.
अरे हां चंद्र जसा सुंदर अन रेखीव तसच त्याचं वाहनही रेखीव - हरीण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैल हा देखणा व संथ प्राणी शंकराचे वाहन का

तुम्हाला कुठे संस्कृतिकोश मिळण्यासारखा असेल, तर त्यात बहुधा वृषभावर नोंद आहे, ती वाचायला तुम्हाला आवडेल. त्यात बैल शंकराचे वाहन का या प्रश्नाचे उत्तर असावं असं वाटतंय. शिव हाच वृषभ होता, मग तो वृषभवाहन झाला, असं काहीतरी आठवतंय.
* बाय द वे, बंगालात घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फालतू जालीय लेख. कॉपी-पेस्ट करून मंद धार्मिक माणसांच्या व्हॉट्सॅप ग्रुपांत लोकप्रिय होण्याचं पोटेन्शियल.
पण या निमित्ताने अरुण कोलटकरांच्या कवितांची आठवण आली, म्हणून धन्यवाद. बाकी शंकराचं रूप वगैरे ठीक, पण पुरोगाम्यांना का जाड टाईपांत अडकवलं आहे ते कळेना.असो, खंडोबाच्या लेखात पुरोगाम्यांना झोडपणं हेही त्या महान भारतीय सर्वसमावेशक परंपरेला धरून असावं असा समज करून घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

नील लोमस, प्रतिसादाबाबत धन्यवाद. माझे लेखन वाचा. मी कधीच कुठलेही लेखन कॉपी पेस्ट करून लिहित नाही. यात फक्त ऋग्वेद आणि ईशान उपनिषदचा उल्लेख आहे आणि खंडोबा संबंधित जुजबी माहित. हे सोडल्यास लेखातल अक्षर नी अक्षर फक्त माझे विचार आहे आणि मला नाही वाटत असा विचार या पूर्वी कुणी केला असेल. अजून व्हॉट्सॅप वर लेख टाकला नाही आहे. मी व्हॉट्सॅपवर कमीत असतो. तरी हि आपण हा लेख व्हॉट्सॅपवर टाकला तर आनंदच होईल.

टीप: तुमच्या प्रतिसादातून व्हॉट्सॅप हा शब्द कॉपी पेष्ट केला, राग मानू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.

खंडोबाला महादेवाचा अवतार मानणे किंवा कुठल्याही स्थानिक/ लोकपरंपरेतून आलेल्या देवतेला शिव/ विष्णूसारख्या बड्या देवाचा अवतार मानणे याला रा चिं ढेर्‍यांनी उन्नयनप्रक्रिया म्हटले आहे. उन्नयनाची प्रक्रिया समाजाला एका सूत्रात बांधण्याच्या हेतूने होते, असं नाही. बहुतेक वेळा आपल्या देवतेचे महत्त्व वाढवण्यासाठी दोन्ही बाजूच्या (देवतांच्या) उपासकांकडून होऊ शकते. हे एक प्रकारे appropriation असते. स्थानिक देवतेचे स्वतंत्र महत्त्व लोपवून तिला उच्च समजल्या जाणार्‍या देवाच्या परिवारात सामील करून घेण्याची ही प्रक्रिया असते. शैव - वैष्णवांच्या संघर्षात आपापल्या पंथाचे/ दैवताचे वर्चस्व स्थापन करण्यासाठीही लहान देवतांना शिव/ विष्णूचा अवतार म्हणून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया घडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भालचंद्र नेमाडे ह्यांच्या 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' ह्या कादंबरीचे शीर्षक पाहताक्षणीच मला अतिशय समर्पक वाटले. येथे 'अडगळ' ह्या शब्दामागे 'समृद्ध' हे विशेषण आहे आणि त्यामूळे 'अडगळ' हा शब्द तुच्छतादर्शक राहात नाही. हिंदूधर्मातील परस्परविरोधी आणि एकमेकांस छेद देणार्‍या शेकडो कल्पना, मिथके, पुराणकथा, तत्वज्ञाने ह्या सर्वाचे एका शब्दाने वर्णन करण्यासाठी ह्याशिवाय दुसरा अन्वर्थक शब्द सुचत नाही.

ह्या अडगळीच्या कबाडाखान्यात शिरून इकडेतिकडे थोडीफार धुंडाळणी केली की शोधणार्‍याला आपल्याला काहीतरी अनमोल माणिक सापडले आहे असे वाटू लागते. त्याला त्याचा मोठा आनंद होतो हे खरे आहे. इकडेतिकडे सहज सापडणार्‍या संस्कृत वचनांनी त्याला सजवून अलंकृत भाषेत पुढे मांडताहि येते.

पण हा सर्व फापटपसारा कशासाठी असा प्रश्न काही चिकित्साखोर लोकांना पडतो. मीहि त्यातीलच एक आहे हे प्रामाणिकपणे मान्य करून मी आपली रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी कधी ना इतिहास आणि पुराणकथा वाचताना डोकेच कामातून जाते.वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळे दाखले. आणि खंडोबा हा राजा होऊन गेला असेल पण शंकराचा अवतार वगैरे काही नाही हं.कोणी म्हणतयं खंडोबा धनगर तर कोणी वाणी!कोणी म्हणतयं चार बायका होत्या तर कोणी म्हणतयं दोन!

एका असामान्य राजाला देवाचे रूप दिले गेले इतकेच बाकी काही नाही.

पुराण फक्त ऐकायचे, बघायचे स्वतः काही विचारच करायचा नाही?
म्हणजे शिक्षकांनी चुकीचे शिकवले तरी हं म्हणायचं कारण ते शिक्षक आहेत ना!

----ब्रह्मास्त्र Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी