ओसामा बिन लादेनवरची आमेरीकन कार्यवाही न्याय्य होती का ?

ओसामा बिन लादेनवरची आमेरीकन कार्यवाही न्याय्य होती का ? खालील पैकी पर्याय निवडा सहज जमल्यास खालील जे पर्याय निवडाल त्यांची आपापल्या परीने स्पष्टीकरणे मांडून चर्चेत सहभाग घेता आल्यास पहावे.

प्रतिक्रिया

'न्याय्य नव्हती'ला मत दिले आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमेरिकेबाबत न्याय्य अन्याय्य असे काही पर्याय अॅप्लिकेबल आहेत? हमारा हेलिकॉप्टर जब कहीं उतरता है तब न्यायभी साथ लेके उतरता है जानी..

न्याय असा काही अ‍ॅब्सोल्युट नसतो.

अमेरीकेच्या बाजुच्या लोकांसाठी न्याय्य होती, ओसामाच्या बाजुच्या लोकांसाठी अन्यायी वाटली असेल.

मस्त!

ज्जे बात

कोणती कार्यवाही ? तो स्नोडेन सांगतोय की अमेरीका त्याला बहामाला घेऊन गेली ती कार्यवाही ? अमेरीकेनी केली म्हणजे ती बरोबरच असणार. गविंना अनुमोदन. अमेरीकन डिक्शनरीत "अन्याय" नावाचा शब्दच नाहिये.

हे असले निरर्थक धागे म्हणजे 'भिंतीला तुंबडया' लावण्यासारखे आहे.

असल्या धाग्यांमध्ये अर्थपूर्ण - नुसती 'पिंक' नव्हे - असे काही लिहायचे असेल तर त्याच्या पार्श्वभूमीचे काही पातळीवरचे ज्ञान आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ह्या मध्ये पाकिस्तानला निश्चित माहिती काय होती, बिन लादेन आपल्याच देशात लपला आहे हे त्यांना माहीत होते काय, तो गैरसोयीचा ठरत असल्याने त्याचा काटा काढायला त्यांनी अमेरिकेला कोठल्यातरी उच्च पातळीवर संमति दिली होती काय असल्या डझनावारी गोष्टींत वर्तमानपत्रात येते त्या पलीकडे आपणा कोणासच काहीच माहिती नाही. तेव्हा सर्वज्ञतेचा बुरखा घेऊन आपण असले मतप्रदर्शन कशाला करायचे?

पाकिस्तान शासनाने हे प्रकरण घडल्यावर त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांचे एक चौकशी कमिशन बसवले होते. त्या कमिशनलाहि ह्या गोष्टीचा थांग लागलेला नाही.

हे कमिशन आपल्या अहवालाच्या प्रकरण २६, परिच्छेद ५९१ मध्ये पुढील विधान करते:

Chapter 26. Assessments of the Commission.

...

591. ...It was accordingly a criminal case of murder which was condemned by a number of international lawyers and human rights organizations. It was however welcomed in the initial communications of the the President and the Prime Minister of Pakistan.
(अधोलेखन माझे.)

तेच कमिशन अहवालाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये असे लिहिते:

Laden report

अमेरिकेच्या कृतीमागे आन्तरराष्ट्रीय कायदा आणि संकेत काय म्हणतात हेहि आपणास ठाऊक नाही. सर्व अल-कायदा कृत्ये ही शत्रुत्वाची कृत्ये असल्याची अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

अशा सर्व पार्श्वभूमीवरती भर्तृहरीने सांगितलेले 'अज्ञानावरचे पांघरूण म्हणजे मौन' आपण धारण करावे हेच योग्य.

नागड्या राजाला नागडे म्हणण्याची आपली वृत्ती नेहमी कौतुकास्पद वाटते. यासंदर्भातील आठवण - जे लीडर्स्/मॅनेजर्स खाष्ट असतात त्यांचाच आयुष्यात सर्वात जास्त उपयोग होतो.
अर्थात मी देखील रिसिव्हिंग एन्ड ला राहीलेले आहे. नार्सिसिस्ट, स्वतःचे दु:ख कुरवाळणारा धागा नेहमी काढतात अशा काहीशा शब्दात आपण माझी बोळवण केली होती. ती लक्षात तर आहेच पण त्यावर योग्य तो अंमल केलेला आहे. Smile

रोचक, मागच्याही माझ्या एका धाग्यावर अरविंदजी आणि शुचि यांचे असेच एका पाठोपाठ साशंकतेचे प्रतिसाद आले होते. त्या वेळी उदय यांनी धाग्याचा संदर्भ विषद करण्यात मदत केली होती त्यानंतर आपण दोघांनी भूमिका बदलली होती का माहीत नाही. आपणा दोघांच्या मनमोकळ्या प्रतिसादांचे स्वागत केले पाहीजे पण आपण निश्कर्षावर येण्याची घाई करत नाही आहोत आणि समोरच्यांना एखाद्या विषयावर काहीच माहिती नाही याची निश्चित खात्री आपणास असते किंवा कसे ?

अमेरिकेच्या कृतीमागे आन्तरराष्ट्रीय कायदा आणि संकेत काय म्हणतात हेहि आपणास ठाऊक नाही. सर्व अल-कायदा कृत्ये ही शत्रुत्वाची कृत्ये असल्याची अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

अशा सर्व पार्श्वभूमीवरती भर्तृहरीने सांगितलेले 'अज्ञानावरचे पांघरूण म्हणजे मौन' आपण धारण करावे हेच योग्य.

मागच्या वेळी उदय यांना माहिती होतीच या धाग्यासाठी इतर कुणी माहिती देणारे येऊ शकतीलच ना ? मौन बाळगण्याचा आपल्यापुरता आपल्याला आधिकार आहेच. ज्यांना मते मांडायची आहेत त्यांना मते मांडण्याचा अधिकारही आहे. भाषण स्वातंत्र्याबद्दल आमेरीका भारताच्या पुढे आहे म्हणतात एनी वे मी आमेरीकेचा नागरीक नाही त्या भारताचा नागरीक आहे जिथे रविंद्रनाथ टागोर नावाचा एक कवि होऊन गेला होता.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

या धाग्यासाठी इतर कुणी माहिती देणारे येऊ शकतीलच ना ?

तोपर्यंत धीर न निघाल्याने तो प्रतिसाद दिलेला आहे. जर प्रतिक्रियांनी धागा ऊंचीवर नेऊन ठेवला तर उत्तमच. अन्यथा वेळ वाया असे वाटले म्हणून तो प्रतिसाद. यात एवढीच अपेक्षा होती की धागाकर्त्याने थोडी पार्श्वभूमी व आराखडा विशद करावा.

भाषण स्वातंत्र्याबद्दल आमेरीका भारताच्या पुढे आहे म्हणतात एनी वे मी आमेरीकेचा नागरीक नाही त्या भारताचा नागरीक आहे जिथे रविंद्रनाथ टागोर नावाचा एक कवि होऊन गेला होता.

या शब्दांचा अर्थ कळला नाही.

धागा ऊंचीवर नेऊन ठेवला तर उत्तमच.

माझ्या लेखनाच्या उंची बद्दल ती अ‍ॅव्हरेज असेल पण किमान अ‍ॅव्हरेज उंचीवर नेण्याचा विश्वास 'अन्यथा माहितगार आहेच ना' असे म्हणताना आहेच, या स्टेटमेंट मध्ये जरासा ओव्हर कॉन्फीडन्स असलातरीही माझे लिगल थेअरी आणि आंतरराष्ट्रीय सहसंबंधांबद्दलची आतापावेतो ग्रहण केलेली माहिती अगदीच फुसकी आहे अशा कारणाने हा धागा नक्कीच काढलेला नाही, ऐसिचा वाचक ओसामा आणि आमेरीका प्रकरण जाणण्याच्या पुढच्या स्तरावरचा सुश्रुत नक्कीच आहे. -आत्ता लिहिपर्यंत न्याय्यहोती अथवा नव्हती म्हणणारे मिळून १४ जणांचा कौल आला आहे सांगता येत नाही म्हणणारे दोघेच आहेत ते दोघेही सुश्रून नसतील याची शक्यता कमीच असावी-

माझी बाजू मांडूनही कौल घेता आला असता पण एकच बाजू दाखवून पब्लिक परसेप्शन बाधीत केल्या नंतरचे कौलाचे निकाल निष्पक्ष रहात नाहीत. पब्लिक परसेप्शन जे आणि जसे आहे ते जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीनी सर्वेक्षण घेणे हा विशीष्ट उद्देश आहे एनी वे मी थोड्याच वेळात वेगळ्या प्रतिसादाने लिहितोच आहे.

भाषण स्वातंत्र्याबद्दल आमेरीका भारताच्या पुढे आहे म्हणतात एनी वे मी आमेरीकेचा नागरीक नाही त्या भारताचा नागरीक आहे जिथे रविंद्रनाथ टागोर नावाचा एक कवि होऊन गेला होता.

अहो अशा विषयांची चर्चा करताना काही टोकाचे आमेरीकन (शुद्ध आमेरीकन एनाआराआय नव्हे) भिती सायबर बुलीईंग करण्याचा हकनाक प्रयत्न करताना आणि भारतीय त्या दडपणा खाली येताना अनुभवले आहे) पण अशावेळ माझ्या समोर जेव्हा केव्हा आली तेव्हा तेव्हा मी रविंद्रनाथ टागोरांची Where The Mind Is Without Fear हि कविता पुढ्यात टाकली आहे.

Where The Mind Is Without Fear

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कोल्हटकर आजोबा - इथे आणि तत्सम जालावरच्या फोरम्स मधे जे काही चालते ते जवळजवळ सर्वच "रिकामा ब्राह्मण (अ‍ॅट्रोसिटीचा आरोप नको म्हणुन ब्राह्मण ) , कुडाला तुंबड्या लावी: ह्या कॅटेगरीत येत नाही का?

हे पटले नाही. अनेक असे विषय आहेत जे वाचून मती बदलली आहेत. यादी आहे (निदान ३ क्षेत्रं आठवताहेत) तेव्हा क्वालिटेटिव्ह फरक हा असतोच.

क्वालिटेटिव्ह फरक हा असतोच.

असतो पण बहुतांशबेळा subtle असतो असा माझा व्यक्तीगत अनुभव आहे, सर्वसाधारणपणे आपापल्या फिक्स पोझीशन्स कुणी सहज बदलत नाही, मनाचा खुलेपणा तसा अपवादात्मक लोकांना अपवादात्मक प्रमाणातच शक्य होतो. समोरच्या व्यक्तीवर व्यक्तिगत टिका न करता मांडणी अभ्यासपूर्ण ससंदर्भ, खोडताना श्रोताभिमुख अभिवृत्ती असेल तेव्हा पूर्ण त्यांचा मुद्दा तर्कसुसंगतपणे खोडून निरुत्तर केल्या नंतर प्रांजळपणे मत बदलल्याचे सांगणारे कमीच भेटतात. अशा वेळी मत बदलल्याचे जाहीर न करता मत बदलत असावेत असा बिहेविअरल चेंज क्वचीत काही जणांच्या बाबतीत आढळून येऊ शकतो नाही असे नाही. पण संपूर्ण समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता ऐसि अक्षरेच काय मायबोली मिपा यांचा वाचकवर्ग अधिक असूनही असेल का तर मला तरी दाट शंका वाटते, म्हणजे समजा मराठी लोकांची संख्या १० कोटी आहे संपूर्ण समाजाच्या विचारधारेत परिवर्तन होण्यासाठी किमान दहा टक्के लोकांपर्यंत अगदी तुम्ही इन्फुएंसिंग गटांवर कॉन्संट्रेट करायचे म्हटले तरी ४ टक्के लोकांचे तरी मत बदलावे लागेल म्हणजे किमान ४० एक लांखांचे मतपरिवर्तन व्हावयास हवे. इथे एका मताचा पुरस्कार करताना चार लोकच किती फाटे फोडतात ४० लांख लोक किती फाटे फोडतील ? अलिकडे फ्रीबेसीकच्या समर्थनार्थ फेसबुकसारख्या दिग्गजाने सगळे आकाश पाताळ एक करुन पाहीले त्यांना यश येऊ शकले का ? नमोंनी श्रीलंकेत जी मात्रा वापरली तीच बिहारमध्ये इतर कुणी त्यांच्या वर वापरत होते एकुण दिल्ली आणि बिहार त्यांची त्यांची मते त्या प्रमाणात बदलण्यास तयार झाले नसावेत. मते परिवर्तीत होतात हे खरे असले तरी लोकमान्य म्हणतात तसे समाजमन हे एक गूढ रसायन आहे ते तुम्हाला पाहीजे तसेच बदलेल याची काहीच शाश्वती नसते. या अर्थाने अनु राव यांच्याही म्हणण्यात तथ्य असावे म्हणजे तथ्य आपण म्हणतात ते आणि अनु राव म्हणतात या दोघांच्या मध्ये कुठे तरी असावे ते नेमके कुठे ते सांगणे बरेच कठीण असावे

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्ही आधीचा बिहेव्हिअरल पॅटर्न दाखवुन दिलात याबद्दल कौतुकच वाटलं. आय विल बी माइंड्फुल हेन्स्फोर्थ.

होय न्याय्य होती ला मत दिले आहे..

न्याय्य नव्हती म्हणून मत दिलेले कोण खुळचाट आहेत इथे.
फेक्युलर औलाद.

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

न्याय्य होती

वरच्या सर्वश्री अरविंद कोल्हटकरजींंच्या या प्रतिसादातून ऐसिवरील वाचक आणि लेखकुवर्ग आमेरीकन कार्यवाही न्याय्य नव्हती म्हणणारे निघाले आणि त्याचे कुणी खंडन केले नाहीतर काय या चिंतेत असावेत का असे त्यांच्या प्रतिसादावरून वाटून गेले. ऐसिवरील चर्चा कोणत्याही दिशेने गेली तरी सुश्रुत लेखक-वाचकांच्या मर्यादीत वर्तुळातील एक चर्चा यापुढे ऐसिवरील या चर्चेच्या प्रभावाबद्दल साशंकतेच्या प्रश्नचिन्हाचा आकार अगडबंब असावा त्या बद्दल मी वर लिहिले आहेच. ऐसिच्या वाचकात टोकाचे इस्लामी विचार करू शकणारे कुणी असण्याची शक्यता नगण्य असेल, अगदीच अपघाताने कुणी आले तरीही टोकाचा विचारांचे खंडन करण्याची क्षमता ऐसिच्या सुजाण वाचक-लेखकात असावी, इतःपरही कुणी धर्मांधवेडा निघाला तर त्यांना कितीतरी पटींनी पुरुन उरावे एवढी (किंवा अमाप स्वरुपात) आमेरीकन महासत्ता सक्षम असावी असे वाटते. त्यामुळे कट्टर इस्लामिकांबद्दल इथे तुर्तास फारशी काळजी करण्याचे ऐसिकरांना कारण असावे असे प्रथमदर्शनी वाटत नाही त्यामुळे भाषण स्वातंत्र्ये आणि ऐसि धोरणांच्या कक्षेत मनमोकळी चर्चा होण्यास हरकत नसावी किंवा कसे.

आता इतर अनुमानांमध्ये कार्यवाही न्याय्य होती म्हणणार्‍यांचा एक इन्फरन्स भारतालाही परदेशस्थ अतिरेक्यांवर अशी कार्यवाही करण्यास मिळावयास हवी असाही एक दृष्टीकोण असू शकतो आणि त्या दृष्टीकोणाचे समर्थन करणारे त्यांच्या समर्थनार्थ मुद्देमांडण्यास स्वतः पुरेसे सक्षम असावेत त्यामुळे त्या बद्दलची चर्चा मी इतरांवर सोडतो.

या धाग्याचा उद्देश इतर काही अचर्चित इन्फरन्सेस कडे लक्ष वेधणे आहे ते म्हणजे

१) बा इंग्रज-आणि अमेरीकनांनो अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी धर्माधिष्ठीत राष्ट्रांच्या समर्थनाने तुमच्या कडून जागतीक राजकारणात जे काही तेल ओतले गेले त्यात काळाच्या ओघात त्या धर्माधिष्टीत राष्ट्रांची आणि आजूबाजूच्या राष्ट्रातील जनता होरपळून निघालीच त्या शिवाय तुमच्या देशांच्या टॅक्सपेयरचा पैसाही हकनाक डावावर लागला.
२) बा इंग्रज-आणि अमेरीकनांनो त्या नंतर यातील धर्माधिष्टीत राष्ट्रांना आणि धर्माधिष्ठीत संघटनांना तुम्ही जो शस्त्रास्त्रपुरवठा केलात त्यात तुमच्या काही उद्योगपतींचा जो काही तात्पुरता आर्थीक फायदा झाला असेल तो तुमच्याच टॅक्सपेयरच्या पैशातून झालेला असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या टॅक्सपेयरचा जेवढा पैसा धर्माधिष्टीत राष्ट्रांना मदत करुन वाया घालवलात तेवढा पुरे असावा अजून वाया घालवणे टाळलेले बरे हे तुमच्या टॅक्सपेयरच्या दृष्टीने बरे किंवा कसे याचा जरुर विचार करावात.

३) बा इंग्रज-आणि अमेरीकनांनो पाकीस्तान नावाचा वेगळा देश तयारच झाला नसता संपूर्ण अखंडभारत एक असतात तर ओसामा सारख्या अतिरेक्याला साउथ एशियात शरण मिळण्याची शक्यता कमी राहीली असती त्यामुळे पाकीस्तानला सामरिक मदत करण्याची भूमिका जेवढ्या लवकर सोडाल तेवढे अधिक हित तुमच्याच देशाचे होणार आहे हे लक्षात घ्या.

४) पाकीस्तानी लोकांना म्हणेन की गैरसमज किंवा जे काय असेल त्यातून फाळणी मिळवणे आणि नंतर अफगाणीस्तान आपल्या खिशातटाकून आपण मोठे होण्याच्या विचारांनी तुमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा नाशच केला आहे. भारतीय स्वातंत्र्य सैनिक वेगळे होऊ नका एकत्र राहीले तर पारतंत्र्य आणणार्‍यांना तोंड देणे सोपे जाते हे कोकलून सांगत होते, इथे तुमची जनता आणि सरकार अतिरेकी आणि सौदी-आमेरीका-चीन या सत्ता-महासतां च्या दबावांना बळी पडते आहे. यात नुक्सान आहे. त्यापेक्षा प्रायश्चित्त घ्या झाले गेले विसरुन स्वतःच्या भूमिका भारतीय मायभूमी सांगेल त्या प्रमाणे बदलून सुधारा म्हणजे पुर्ण एकसंघ भारतात तुमच्या जिवनास अधिक चांगला अर्थ प्राप्त होइल.

हि चर्चा संपन्न होत आल्यावर अजून एक महत्वपूर्ण अनुमान मांडायचे आहे पण आपला कौल निष्पक्षपणे दिला जावा म्हणून तुर्तास ते अनुमान मांडत नाही. कौल आणि चर्चेत सहभागी होत असलेल्यांना मनःपुर्वक धन्यवाद.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

जगात एकच न्याय असतो 'जिसकी लाठी उसकी भैंस. बाकी लाठीला न्याय संगत हि लाठीच्या जोरावर ठरविता येते.

ज्याप्रमाणे ' मोसाद ' या इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेने, अतीशय धाडसी मोहीम आखून्,ती पुर्णत्वास नेली. नरराक्षस इदी अमिन ह्या युगांडाच्या हुकुमशहाच्या, बालेकिल्ल्यात जाऊन, विमानतळावरून ,पळवून नेलेले विमान, सर्व प्रवाशांसह, सुखरूप परत आणले, त्याच प्रमाणे, ओसामा बिन लादेनचा दहा वर्षापासून शोध घेत घेत, थेट पाकिस्तानच्या लष्कराच्या जवळच्या ठिकाणावर पोहोचून, त्याला खतम करून, त्याचे प्रेत समुद्रात टाकून,विल्हेवाट लावली, यात अमेरिकन लोकांचे धाडस, युक्ती व साहस हेच दिसून येते. शत्रू हा शत्रूच असतो.त्यावर दयामाया दाखविणारे, जगात टिकूच शकणार नाहीत. शत्रूला जेथे दिसेल तेथे व शक्य असेल त्या मार्गाने संपविणे हीच खरी नीती ! त्यात योग्य-अयोग्य चा प्रश्नच उदभवत नाही.
दहशतवादी, जेंव्हा बॉम्ब स्फोट घडवून आणतात अगर बंदूकीच्या फैरी स्वैरपणे झाडतात, त्यावेळी ते कसलाही विचार करीत नाहीत, मग ते जिवंत हाती आल्यावर, त्यांना नैसर्गिक न्याय मिळायला हवा, असे मानवी आयोगाचे सभासद कां ओरडतात ? कारण दहशतवाद्यांच्या हल्ल्याला, त्यांचा कुणी नातेवाईक बळी पडलेला नसतो म्हणून ! ! त्यामुळेच अमेरिकेची क्रुती न्याय्यच म्हणावी लागते.

यात अमेरिकन लोकांचे धाडस,
युक्ती व साहस हेच दिसून येते.... क्या बात है.

actions not reactions..!...!

ज्याप्रमाणे ' मोसाद ' या इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेने, अतीशय धाडसी मोहीम आखून्,ती पुर्णत्वास नेली. नरराक्षस इदी अमिन ह्या युगांडाच्या हुकुमशहाच्या, बालेकिल्ल्यात जाऊन, विमानतळावरून ,पळवून नेलेले विमान, सर्व प्रवाशांसह, सुखरूप परत आणले

एंटेबी मधे योनाथन नेतानयाहू (इस्रायली पंप्र. बिनयामिन नेतानयाहूंचे बंधू) यांना प्राण गमवावे लागले होते. पण ती सगळी कथाच अतिरोचक आहे.

धाडसी मिशन खरीच, पण...

नरराक्षस इदी अमिन ह्या युगांडाच्या हुकुमशहाच्या, बालेकिल्ल्यात जाऊन, विमानतळावरून ,पळवून नेलेले विमान, सर्व प्रवाशांसह, सुखरूप परत आणले

आर यू सो शुअर अबौट द डीटेल्स?

मी येथे जे काही वाचले, त्याप्रमाणे ओलिसांपैकी दोघेजण 'फ्रेंडली फायर'मध्ये (बोले तो, इस्राएली कमांडोंच्या गोळीबारास बळी पडून, आणि त्यापैकी किमान एक तरी जण ओळखीच्या गडबडीमुळे, बोले तो इस्राएली कमांडोंस तो ओलिसांपैकी एकजण वाटण्याऐवजी अपहरणकर्त्यांपैकी एकजण वाटल्यामुळे) मृत्युमुखी पडले, व्हेअरअ‍ॅज़ एकजण अपहरणकर्त्यांच्या गोळीबारास बळी पडला म्हणून.

असो.

सुरवातीला माझ्या वाचनात " 90 minutes at Enteby " हे पुस्तक वाचण्यात आले. त्यानंतर तुनळी वर मूव्ही पण पाहिली.
ज्यांना जमले त्यांनी पुस्तक वाचावे अगर मूव्ही पहावी. खरोखर धाडशी पणाची कमालच केली मोसाद च्या गुप्तहेरानी ! ! तीच गोष्ट , अमेरिकेच्या त्या '२४ ' बहादूर धाडशी जवानांची !