सकाळी शुन्य ब्रेकफास्ट + चहा दुपारीच जेवण ही संस्कृती कार्यालयीन कामाच्या लाईफस्टाईलसाठी सयूक्तीक आहे का ?

बाकीच्या जगाचे मला माहित नाही पण बहुतांश भारतीय कार्यालयांमध्ये काम करणारे लोक सकाळी घरातून अपवादानेच ब्रेकफास्ट/सकाळची न्याहरी घेऊन निघत असावेत (माझा व्यक्तीगत कयास या कौलात लोक काय सांगताते पाहूच) मग दुपारी लंचटाईमलाच लंच घेताना दिसतात. या विना न्याहरी चहावर अर्धा दिवस जिवनशैली बद्दल माझे काही आक्षेप आहेत.

एक तर चहा हे भूक मारण्याचे काम करते, त्यातून जी काही साखर शरीरात जाते तिचे स्वरुप काँप्लेक्स शुगरचे नसते. मुख्य म्हणजे शरीराची अन्नाची गरज तांत्रिक पद्धतीने मारली जाते. मग लोक कार्यालयात कामावर तर हजर असतात पण ब्रेकफास्ट न करणार्‍यांची एफिशीअन्सी अफेक्ट होत नाही का ? कारण कामात लक्ष नसणारी फक्त शरीराने हजर असणारी मग चहाचा अजून एक-दोन राऊंड मारणारी मंडळी पाहिली आहेत. शरीराची झोप आणि भूक ही कर्तव्ये नीटशी पार पडली नसतील तर व्यक्तीत जरा अग्रेसीव्हनेसही येतो जो कार्यालयीन वातावरणास पोषक नसण्याची शक्यता असू शकते. खासकरून एच आर, रिसेप्शनीस्ट आणि सेल्स/मार्केटींग विभाग जिथे संवाद हा महत्वाचा असतो तेथील लोक कळत नकळत भूकेने अफेक्टेड असले तर त्यांच्या संवादाच्या सौहार्दावर मर्यादा येउ शकतात ज्या आस्थापनीय वातावरणात योग्य असतील असे नव्हे.

शिवाय तुम्ही ज्यावेळी सर्वाधिक काम करणार आहात त्या आधी खाल्लेल्या अन्नाचे निट पचन होऊ शकते. दुपारनंतर जेवणारी मंडळी आळसावतात कामही तसे कमी होते त्यातच भारतीय आहारात प्रमाणाबाहेर तेलतुप आणि साखरेचे सेवन होते की ज्यामुळे शरीरास स्थुलता येते. सकाळी न्याहरी न करणारी बरीच मंडळींचे दुपारचे जेवण उशीरा म्हणुन रात्रीचे जेवण उशीरा म्हणून मग सकाळी उशीरा उठणे आणि कार्यालयाच्या वेळा न पाळणे असे दुष्टचक्रतर नाहिना अशी शंका वाटते.


*(किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ? या चर्चेत मिपावर सहभागी होउ शकता किंवा या धाग्यातही चर्चा करण्यास हरकत नाही.)

तुमचे काय मत आहे

प्रतिक्रिया

सकाळी ६.४५ला भरपूर नाश्ता आणि चहा घेऊन (एक सकाळी उठताच आणि दुसर्यांदा नाश्ता झाल्यावर). दुपारचे जेवण वेळेवर करता येईल कि नाही याचा नेम नसतो बहुधा दुपारी १-३ च्या मध्ये केंव्हाही. पोट भरलेले असेल (टंकी फुल असेल तर गाडी धावते) तर कामात लक्ष लागते.

मी नवर्‍या ला दुपार च्या जेवणाचा आणि सकाळ चा नाश्ता असे दोन डबे देते. सकाळी लवकर घरा बाहेर पड्त असल्यामुळे खाणे शक्य होत नाही, पण थेट दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहणे योग्य नाही.

मी कार्यालयात जात नाही आणि चहाही पित नाही.

मी सकाळी उठल्याउठल्या खाते आणि कॉफी पिते. एवढं करूनही मला थोड्या वेळाने पेंग येते, विशेषतः उन्हाळ्यात. पण खाल्ल्यावर तासा-दीड-तासांत व्यायाम केल्यावर माझी झोप उडते; किमान मलातरी तसं वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चहाही पित नाही

शेम ऑन यु.
व्यायामही करुन आम्हा बोदल्यांना गिल्ट देतेस? डबल शेम ऑन यु Wink

शेम ऑन यु.

सहमत आहे. आणखी हवं असेल तर मी रोज किमान (दोनदा दोन शॉट एस्प्रेसो+दूध पिऊन) साडेआठ तास झोपते; आणखी झोप आली तर अधूनमधून पेंगा काढते.

किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?

स्वयंपाक हे प्रकरण न आवडण्याबद्दल निबंधच्या निबंध लिहिता येतील. पण सध्या भूक लागल्ये म्हणून खायला जाणं भाग आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनु मला कळलं टक्केवारी १०० पेक्षा जास्त का येतेय. कारण रेडिओ बटन नसून चेक्बॉक्सेस आहेत. म्हणजे एक्स्क्लिझिव्हली एक पर्याय निवडायचा नसून अनेक पर्याय निवडता येतायत.

Smile शुचि.

मी सर्व पर्यायांवर टीक करुन सबमिट केले.

खरे तर "ऑफिस ला येउन नाष्ता करते" हा पर्याय् लेखकानी दिला नाहीये.

क्या बात! मी ही सर्व पर्यायांवर टीक केले. मला ही तो हापिसात येऊन चरायचा पर्याय हवा होता.

अनु मला कळलं >>> पण हे अनुला का सांगताय? तिने कुठे विचारलं होतं?

ROFL तिने गेल्या वेळेला हा मुद्दा सर्वांच्या लक्षात आणुन दिला होता.
तुम्ही धुमकेतू सारखे उगवा आणि मग आम्ही स्पष्टीकरण देत बसतो Wink

कार्यालयाला जाण्यापुर्वी सकाळी चहा नाश्ता काहीच घेत नाही.

कार्यालयाला जाण्यापुर्वी सकाळी चहा नाश्ता दोन्ही घेतो

याला मत दिले आहे. पण ते अर्धसत्य आहे कारण मी सकाळी नाश्ता नव्हे तर जवळपास जेवण करूनच बाहेर पडतो (सकाळी ७ च्या आधीच).

हैला, याला विनोदी श्रेणी कोणी दिली?

खरंच सकाळी जेवण करूनच बाहेर पडतो. विश्वास बसत नसेल तर सकाळी साडेसहाला या घरी! डायरेक्ट तवा टू प्लेट गरमागरम पोळ्या खायला!!

खरंच सकाळी जेवण करूनच बाहेर पडतो. विश्वास बसत नसेल तर सकाळी साडेसहाला या घरी! डायरेक्ट तवा टू प्लेट गरमागरम पोळ्या खायला!!

भाग्यवान आहात, (मी येतोय उद्यापासून रोज सकाळी, कुठे राहता ? Smile)

बाकी श्रेण्या प्रकरण हाईट होते हं ! श्रेण्यांना श्रेण्या देण्याची आणि श्रेण्या बदलण्याचा अधिकार धागा लेखकाकडेच हवा.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

प्रत्येकाचे बॉडी क्लॉक व रुटिन या गोष्टी किती परस्पर सुसंगत आहेत यावर ते अवलंबून असते.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बहुतांश भारतीय कार्यालयांमध्ये काम करणारे लोक सकाळी घरातून अपवादानेच ब्रेकफास्ट/सकाळची न्याहरी घेऊन निघत असावेत (माझा व्यक्तीगत कयास या कौलात लोक काय सांगताते पाहूच)

काहीतरीच, आयटीमधे जी लोक सकाळी येणे अपेक्षीत असते ती साडेदहा वगैरे ला उगवतात मस्त घरुन खाउन पिउन. ज्यांना कंपनीच्या बस वर अवलंबुन रहावे लागते ते सकाळी येतात वेळेवर आणि लगेच कँटीन गाठतात.

तुमचे म्हणणे खरे आहे ते बिचार्‍या असंरक्षीत क्षेत्रातल्या मजुरांसाठी. "भारतीय कार्यालयांमध्ये" काम करणार्‍यांसाठी नाही

काहीतरीच, आयटीमधे जी लोक सकाळी येणे अपेक्षीत असते ती साडेदहा वगैरे ला उगवतात मस्त घरुन खाउन पिउन. ज्यांना कंपनीच्या बस वर अवलंबुन रहावे लागते ते सकाळी येतात वेळेवर आणि लगेच कँटीन गाठतात.

हम्म छान हे माहित नव्हते, पण मॅनेजर आणि मॅनेजर्स ही हेच करत असतील तर हा कंपनी मॅनेजमेंट समोर मोठा प्रश्न बनून उभा रहातो पण तोंड बंद ठेऊन सबऑर्डीनेटर्सचे हे वर्तन सहन करावे लागते. तुम्ही जे वर्णन करताय त्यात सकाळची एक कॉमन टिम मिटींगही धड होणार नाही.

ऐसिवर चर्चेचा स्पीड कमी असल्यामुळे तेवढे चर्चा धागे आणता येत नाहीत पण वेळ व्यवस्थापन आणि/अथवा किचन मॅनेजमेंट लेव्हलला आणि ऑफीस मधला वेळ ऑफीससाठी असतो हे समजण्याच्या लेव्हलला कुठे तरी समस्या असणार.

या धाग्यासाठी अवांतर आहे पण "ऑफीस मधला वेळ ऑफीससाठी" याची कमिटमेंट एम्प्लॉयीजमध्ये कशी आणावी ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अहो ११ शिवाय पहिला कॉल ठेवता येत नाही. एखादा जरी माणुस नसेल तर सगळ्यांचा वेळ वाया जातो,

कीती लोकांच्या मागे लागणार?

.

ते सकाळी येतात वेळेवर आणि लगेच कँटीन गाठतात.

खरं गं अनु. अगदी खरय. मला हेच्च म्हणायचं होतं की मी घरुन खाऊन न निघता, हापिसात दप्तर (;)) टाकून लगेच किम्स स्नॅक शॅक गाठते, ऑफिसची कॉफी ढोसते. पण काय की खर्चाबद्दल मनात गिल्टी भावना आहेत. त्यात कोणी बोलेना की आम्ही बाहेरच नाश्ता करतो म्हणून. मग तोंड उघडलंच नाही.

आमच्या कार्यालयातील बरेच जण सकाळी पोटभर भातबित खाऊन मग निवांत कार्यालयात येतात. आणि कार्यालयात दिवसभर चहा पितात. ही 'संस्कृती' कार्यालयीन कामासाठी नक्कीच मारक आहे Tongue

मी सकाळी कार्यालयात जाताना जेवण करतो. (साधारण ९ इंच व्यासाच्या ४-५ चपात्या, भाजी, थोडेसे भात-वरण). साधारण २५० मिली पाणी. नंतर १ कप चहा,
नंतर सायंकाळी ४-५ वाजता हलका नाश्ता किंवा एखादे फळ आणि असेल तर चहा किंवा ज्युस (ज्युस आणि फळ एकत्र नाही).
पंधरा दिवसांतून एकदा उपवास. महिन्यातुन एक दिवस फक्त द्रव पदार्थ. (ज्युस, दुध आणि पाणी).

रात्री ८.३०-९.०० वाजता सकाळचाच कार्यक्रम परत एकदा. अर्थात रोजच बैठे काम नसते किंवा रोजच अंगमेहनत ही सारख्या प्रमाणात होत नाही.

कार्यालयाला जाण्यापुर्वी सकाळी चहा नाश्ता दोन्ही घेतो

याला मत दिले आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुझ्या प्रतिसादात "विनोदी" काय आहे ऋ.

म्हणजे काही हीडन मिनींग आहे का? जे मला कळत नाहीये.

मला काय विचारतेस.. ते त्या श्रेणीदात्याला विचार ने!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रेणीदात्याला म्हणायचय काय राव विनोद करताय आम्ही तुम्हाला सक्काळी सक्काळी हातभट्टीची चढवुन आलेलो पहातो की Wink ROFL
- ह घे वे सां न ल

सकाळी फक्त नाश्ता करतो. चहा पीत नाही.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सकाळी दोन वेळा नाष्टा करतो. एकदा घरी व एकदा ऑफिसात. नंतर ऑफिसात दोन कप कॉफी पितो. Wink
पण माहितगार दुसऱ्याच्या खाण्यात फार लक्ष देऊ नये, नाहीतर पुढचा जन्म वेटरचा मिळेल.

Biggrin

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण माहितगार दुसऱ्याच्या खाण्यात फार लक्ष देऊ नये, नाहीतर पुढचा जन्म वेटरचा मिळेल.

ROFL वेळेवर खाण्यास मिळण्याएवजी वेट करावे लागणे आणि आपण वेळेवर कार्यालयात थांबून इतरांचे खाणे-पिणे होई पर्यंत वेट करणे हे पाहीले तर याच जन्मी वेटर होऊन झाले आहे. हा धागालेख सर्वेक्षण इत्यादी हा तर आमच्या या जन्मीच्याच वेटरगिरीचाच अनुभव Smile Smile

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

आमच्या प्लानिंग मधील पुढची एक चर्चा तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सना पर्यायी आहार ? हि असणार आहे. Smile

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सकाळी ऑफिसला जायच्या आधी एक चहा होतोच, नाश्ता करायला वेळच नसतो. पण ऑफिसला ८:३० ला पोहोचल्यावर साधारण १० च्या सुमारास ब्रेकफास्ट बार किंवा ओट्स किंवा ब्रेड,बटर, ब्रेड ज्यॅम असं खाणं झालं की १२ पर्यंत झोप न येता मिटिंग/मिटिंगा मध्ये बसता येतं.

--
मयुरा

दुसऱ्याच्या खाण्यात फार लक्ष देऊ नये, नाहीतर पुढचा जन्म वेटरचा मिळेल.

आपले सरकार पुढल्या जन्मी वेटर होणारे का?
कारण कुणी काय खावे यात लक्ष देण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे असे ऐकून आहे Wink

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणि सरकार बनण्याआधी हेच लोक 'त्यांनी पहा किती मलिदा खाल्ला' म्हणून ओरडा सुरू होता म्हणे!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.