प्रस्तुत धाग्यावर पुरेशी चर्चा झालेली आहे. प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आणि योग्य ती पावलं उचललेली आहेत. हे सर्व लक्षांत घेऊन प्रस्तुत चर्चा वाचनमात्र करण्यात आलेली आहे.
- "ऐसी अक्षरे" प्रशासन
"आपण यांचं मीठ खाल्लय" हा माझा आगरी समाजाचा इतिहास सांगणारा लेख दै. नवशक्तीत प्रकाशीत झाला होता. हा व अन्य विणकर, शिंपी, डहर उर्फ ढोर या जातींचाही इतिहास सांगनारे लेख मी नुकतेच ऐसी अक्षरे ( aisiakshare.com ) या एका सुबुद्ध व्यक्तींनी चालवलेल्या विचारी म्हणवणा-या संस्थळावर प्रकाशित केले होते. लेख जेंव्हा प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यावर वाचकांची टीका-टिप्पण्णी अपरिहार्य अशीच असते. किंबहुना तीच अपेक्षीत असते. त्यातुन विषय पुढे जायला मदत होत असते. परंतु या संस्थळावर जो जातीयवादाचा भयंकर पगडा आहे तो पाहता अशी संस्थळे ही समाजविघातक आहेत हे लक्षात येईल.
माझ्यावर व्यक्तिगत टिका मी समजु शकतो. जातीय झुंडशाहीची ती एक अपरिहार्य अवस्था असते. कंपु करून संस्थळावरील आपलाच हक्क अबाधीत ठेवायचा असे लोक प्रयत्न करनारच. कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या (स्व-कंपुतील नसलेल्या) लेखकाच्या प्रतिपादनाकडे लक्ष न देता त्याची शैली कशी आहे व कशी असायला हवी याचेच चर्वितचर्वण करण्यात अशांना रस असतो. हेतु साधा असतो तो हा कि इतरांना नाउमेद करणे. माझा मुद्दा समजावुन घेण्यासाठी मी आधी त्यांच्या समग्र प्रतिक्रिया येथे प्रकाशित करत आहे. कृपया त्या शांतपणे वाचाव्यात.
Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
Sun, 22/07/2012 - 19:27 | लेख.... (Score: 4 रोचक )
मन
पुण्य: 2
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे. असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
· प्रतिसाद
--मनोबा
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 20:20 | सहमत/असहमत (Score: 4 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
>>>>>>>>>>>>>>>
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे.
प्रचंड सहमत.
>>>>>>>>>>>>>>>>>
असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
१. ऐसी अक्षरेच्या धोरणांनुसार कुणालाही आपली राजकीय/सामाजिक संदर्भाततली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्याशी सहमत/असहमत होणे, त्याला विरोध करणे , कडकडीत निषेध नोंदवणे याचीही मोकळीक आहे.
२. "ब्राह्मणांच्या हत्याकांडा"ची कॉन्स्पिरसी थिअरी विनोदी वाटली. त्याच्याशी असहमती नोंदवतो.
देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो.
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Sun, 22/07/2012 - 16:00 | धागालेखकाच्या हास्यास्पद (Score: 1 )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
धागालेखकाच्या हास्यास्पद प्रतिसादांना काहीही उत्तर देणे नाही!
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 09:24 | मिठाचा 'शोध' कोणी लावला? (Score: 5 मार्मिक )
अरविंद कोल्हटकर
पुण्य: 2
ह्या लेखातील अतिव्याप्त विधानांबद्दल फार काही लिहीत नाही. बहुजनसमाजाला योग्य ते श्रेय दिले जात नाही अशा रुखरुखीतून हे लेखन निर्माण होत आहे. वाचणारे वाचतात आणि टाळ्या वाजवतात. बहुप्रसव लेखकाच्या नावावर आणखी एक 'वैचारिक' पुस्तक जमा होते. 'Preaching to the converted' अशा प्रकारचे हे लिखाण वाटते.
'आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला' ह्या एका विधानावर थोडे सविस्तर लिहितो. मीठ कोणी 'शोधले', चाक कोणी 'शोधले', विस्तव कोणी 'शोधला', आडोसा निर्माण केला किंवा प्राण्यांची कातडी पांघरली तर ऊन्ह-वारा-पाऊस-थंडीपासून बचाव होतो हे कोणी 'शोधले' अशा प्रश्नांना उत्तरे असतात असे मला वाटत नाही. 'शोधले' कोणीच काहीच नाही, जे निसर्गाने उपलब्ध होते ते 'ओळखले' इतकेच म्हणता येईल. तेहि अमुक एका काळी किंवा अमुक एका जागीच घडले असेहि म्हणता येत नाही. हे होतेच आणि अनेक जागी आणि अनेक वेळा हे स्वतन्तपणे लक्षात आले इतकेच म्हणता येईल. हे हजारो वर्षांपूर्वीच घडले असावे, त्याचा इतिहास फक्त सात हजार वर्षांचाच आहे असे मानायचीहि गरज नाही. हिंदुस्तानाच्या पश्चिम किनार्यावर घडले असेल तसेच बंगालच्या पूर्व किनार्यावरहि स्वतन्त्रपणे सापडले असेल, मध्यपूर्वेतील उष्ण समुद्रकिनार्यांवरहि सापडले असेल. सोनवणींच्या स्कीममध्ये आगरी - का कोळी? - जमातीला ह्याचा copyright द्यायचा असला तर ते त्यांचे स्वातन्त्र्य आहे पण सर्वांनी ती स्तुतिस्तवने गाण्यात मागे सूर लावावा इतके काही आगरी - का कोळी - समाजाचे विशेष योगदान मीठक्षेत्रात मला दिसत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 00:09 | ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची (Score: 2 मार्मिक )
ऐसीअक्षरे
पुण्य: 1
ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची अधिकृत भूमिका सर्व पानांच्या तळाशी ऐसीअक्षरेची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे दिसते. त्यातल्या मार्गदर्श तत्त्वांत उल्लेखल्याप्रमाणे "जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल." सर्व विचारसरणींच्या, सर्व प्रकारच्या सदस्यांचे ऐसी अक्षरेवर स्वागतच आहे.
सदस्यांनी लेखन करताना व्यक्तिगत आरोप आणि अशिष्ट भाषा टाळावी ही विनंती.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 01:41 | मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
श्री. सोनवणी : मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही>>>>> माझे नाव व टोपणनाव एकच आहे. व मुख्य म्हंजे मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण इतर जातींपेक्षा महान आहेत हे मान्य करताना मला कसलाही अपराधीपणा वाटत नाही. टोपणनावांबद्दल तुमचा राग हा टोपणनाव घेणार्याची जात ओळखता येत नाही म्हणून आहे. व तुमचा दावा की -- मी सर्व जातींचा मी सन्मान करतो -- हा तर सोंगीपणाचा कळस आहे. तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. ब्राह्मण हे कोणत्याही क्षमतेविना "वरचे" झाले व बाकीचे सर्व क्षमता असूनही "खालचे" राहिले असे सिद्ध करण्याचा उद्योग करणे याचा अर्थ विद्वत्ता नव्हे व इतिहास संशोधन त्याहून नव्हे.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 13:52 | सर्वांचे आभार. मी ही (Score: 2 रोचक )
Sun, 22/07/2012 - 11:25 | जनरलायझेशन (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
ठाणे व रायगड्(उत्तर) परिसरातच आगरी समाज हा (उत्तर भारतातील) जाटांप्रमाणे (जट जट जट .... दो दुने अठ) आडमुठा, हेकट, अशिक्षित, दांडगाई करण्यास उत्सुक म्हणून कुप्रसिद्ध आहे. जसे शिख लढवय्ये आहेत तसे जाट ही. पण आगर्यांची दादागिरी ही स्थानिकांवरच चालते. पण एखाद्या समाजाचे गुण मान्य करताना जनरलायझेशन चा दोष लागत नाही पण त्याच समाजास दोष देताना मात्र 'जनरलायझेशन होते' म्हणून गळे काढताना हे सोनवणींसारखे पुरोगामी लोक पुढे असतात. आगरी समाजाचा विकास झालेला नाही. हा समाज मागासच आहे. पण आपल्या मागासपणाचे खापर मात्र बामणांवर फोडायला हे अतिमागास आगरी/कोळी एकदम एका पायावर तय्यार असतात. माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 12:06 | विक्रमजी, आगरी/कोळी आज (Score: 3 रोचक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
विक्रमजी, आगरी/कोळी आज प्रबोधनाच्या वाटेवर आहेत. गेल्या चार महिन्यात या समाजाने १८ सामाजिक चचासत्रे घेतली. एका सत्राला मीही उपस्थित होतो. ब्राह्मणांना दोष देनारे एकही भाषण कोणी केले नाही. शिवाय तुम्ही त्या समाजाला सरसकट निम्नस्तरीय म्हनता हे तुम्हाला जरा अतीच वाटत नाही काय? प्रबोधनाच्या वाटेवर जे निघाले आहेत त्यांना अडवू पाहणारे तुमचे विधान नाही काय? मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 13:11 | हे योग्यच आहे. (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?>>>>>>>>
हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.
आणि तुम्ही ब्राह्मणांचा उल्लेख लेखामधे केला नाही पण खाली केला आहे. (आ.रा. ना उत्तर देताना.). मुख्य मुद्दा म्हंजे तुम्हास फरक पडला किंवा नाही याने ब्राह्मणांना अजिबात फरक पडत नाही. तुम्ही सर्वजातसमभाव बाळगता. पण ब्राह्मण तो भाव न बाळगताही पुढारलेले व श्रेष्ठ आहेत. व याचे पुरावे ढीग भर आहेत. सगळ्या जातीच्या लोकांना उच्च आंतरजातिय व विशेषतः ब्राह्मण जोडीदार हवा असतो यातच सगळे आले. तेव्हा तुमचा उद्योग ब्राह्मणांपेक्षा इतरांचे योगदान उच्च आहे हे दाखवण्याचा असला तरी त्याने फरक अत्यंत नॉमिनल पडणार आहे.
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 15:16 | जनसामान्य (Score: 5 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
कुणासाठीही लिहा. विद्वानांसाठी लिहा, जनसामान्यांसाठी लिहा. पण अवास्तव विधानांच्या आधारे कुणाला अस्मिता मिळवून देऊ असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे.
इतिहास व संस्कृती घडवण्यात जनसामान्यांचे योगदान राजेमहाराजांपेक्षा खूप अधिक आहे हे दाखवण्यासाठी असत्याचा आधार घेण्याची काहीच गरज नाही. उपलब्ध आणि अधिकृत इतिहासात याचे बरेच दाखले मिळतात. शिवाजीचं आख्खं चरित्र जनसामान्यांची ताकत अधोरेखीत करणारं आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा तशीच कहाणी सांगतो. मध्ययुगातील भक्ती-सूफी परंपरा या जनसामान्यांच्या महान सांस्कृतिक योगदानाचा भला मोठा पुरावा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर दामोदर कोसंबींनी आणि त्यांच्या समविचारी इतिहासकारांनी जो प्रकाश टाकला आहे त्यातून जनसामान्यांचे इतिहासातील स्थान आणि महत्व याचे लख्ख दर्शन घडते.
हे जे लिहिलेले आहे, ते साधारण सामान्य ज्ञान असलेला कोणीही "सामान्य माणूस" (माझ्यासारखा. मी विद्वान नाही. इतिहासकारही नाही. आणि सांगायला हरकत नाही, "ब्राह्मण" ही नाही.) मान्य करणार नाही. जनसामान्य जनसामान्य करत सत्याशी तडजोड ठीक नव्हे. जनसामान्यांचा अपमान करु नका.
या लेखात आक्षेपार्ह वाटते ते हे, की कोळी-आगरी समाजाच्या सध्याच्या व्यवसायासंदर्भात जे जे काही इतिहासात घडले आहे, त्याचे त्याचे सर्व श्रेय एक्स्लिझिव्हली याच समाजाला दिलेले आहे. जसे काही मानवी संस्कृतीच्या आरंभापासून कोळी-आगरी आणि इतर अशी विभागणी होती, आणि नॉन कोळी-नॉन आगरी मंडळींचा मीठ, नौकानयन, व्यापार, विणकाम याच्याशी संबंधच नव्हता. इतिहास सर्वांचाच आहे. हे असे अस्मिता जागे करण्याच्या नादात आपण जातींचे ध्रुवीकरण करीत आहात हे ध्यानात घ्यावे.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 14:05 | कोणतीही मते खोडुन काढतांना (Score: 0 निरर्थक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कोणतीही मते खोडुन काढतांना अरविंद कोल्हटकर देतात तसे पुरावे द्यावे लागतात. याच लेखमालिकेतील बाकीचे लेखही वाचले असते तर काही व्यवसाय हे एक्सक्ल्युजिव आहेत तर काही नाहीत हे लक्षात आले असते. पण सरधोपट विधाने करणा-यांना हे कोण शिकवणार?
दुसरे, तुम्ही ब्राह्मण आहात कि ढोर समाजाचे, मला काही फरक पडत नाही कारण मी सर्व जातींचा सन्मान करतो. शेवटी जाती कशाही निर्माण झालेल्या असोत...त्या होत्या आणि आहेत आणि राहणार आहेत. जातींचे ध्रुवीकरण नव्हे तर प्रत्येक जातीसमुहाचे संस्कृती घडवण्यातील योगदान मला अभिप्रेत आहे कि ज्यामुळे जाती एकमेकांकडे अधिक सन्मानाने पाहतील.
राहिले मी जनसामान्यांचा अवमान करतोय कि नाही...त्याचे उत्तर जनसामान्यांवरच सोडलेले बरे. त्याचे उत्तर मी तुमच्यासारख्या असामान्यांकडुन मागितलेले नाही. किंवा जनसामान्यही तुमच्याकडे तक्रार घेवुन आलेले नाहीत. मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही. वाकड्यात घुसण्यातच ज्यांना विकृत मौज वाटते त्यांच्यासाठी माझ्याकडे काही मनोरुग्णालयांची/मानसोपचार तज्ञांची यादी आहे..गरज भासलयास ती मी पुरवू शकेल.
तुम्ही म्हनता तुम्ही "सामान्य" आहात. नव्हे तुमच्याएवढ्या सामान्य प्रतीचा माणुस मी क्वचितच पाहिला असेल. त्यामुळेच तर तुम्ही "असामान्य" ठरता.
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
धन्यवाद.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 16:11 | माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्यान(Score: -1 खोडसाळ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.>>>>>>>>
सोनवणी, तुम्हास ही म्हण ठाऊक आहे का - अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 20:51 | संजय सोनवणी, श्री आळशांचा (Score: 5 मार्मिक )
अर्धवट
पुण्य: 2
संजय सोनवणी,
श्री आळशांचा राजा हे बहुतेक सर्वच संकेतस्थळांवर संयत व सामंजस्याची भूमिका मांडताना दिसतात, त्यांच्या वरील प्रतिसादातही मला काहिच आक्षेपार्ह आढळले नाही. आपला आक्रस्ताळेपणाचा प्रतिसाद व असभ्य भाषा यांचे या सदस्यांच्याबाबत या प्रतिसादात तरी वापरण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
संस्थळावर लेखन करायचे असेल तर त्यावर जे काही प्रतिसाद येणार ते वाचण्याची, समजुन घेण्याची, व त्याचा सभ्यपणाने प्रतिवाद करण्याची तयारी असणे हे आवश्यक ठरतेच.
तुमच्या लेखनाचा उदोउदो करणार्या लोकांसाठीच तुमचे लेखन असेल तर तसा फोरम निवडायला हवा.
केवळ कोणी विरोधी मत मांडले म्हणून असा आकांडतांडव कराल, तर काही दिवसांनी केवळ एकांगी विचार करणार्यांची फौज भोवताली जमा होउन, आपली मते तपासून बघण्याची क्षमताच नव्हे शक्यताही नाहीशी होईल.
असो...
श्री आळश्यांचा राजा यांच्या संदर्भात वापरलेल्या अनुचित आणि असभ्य भाषेचा तीव्र निषेध.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 16:22 | खिक्... (Score: 5 मार्मिक )
श्रावण मोडक
पुण्य: 2
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
खिक्... गरज? खुल्या संकेतस्थळांवर ती कधीच नसते. तसे तुम्हाला कोणी भासवून दिले असेल तर तो त्याचा मूर्खपणा आहे इतकेच.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 14:33 | मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी (Score: 4 मार्मिक )
बिपिन कार्यकर्ते
पुण्य: 1
मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी लिहित नाहीहे. अस्मितेच्या शोधात असलेल्या जनसामान्यांसाठी लिहित आहे.
असं असेल तर मग, मला वाटतं की स्वीपिंग स्टेटमेंट्स अथवा गुणी लेखनाबद्दल वर जे काही म्हणले गेले आहे ते अधिकच महत्वाचे ठरते.
काय म्हणता?
· प्रतिसाद
बिपिन कार्यकर्ते
Sat, 21/07/2012 - 14:06 | कार्यकर्ते...गुणी लेखनाचा (Score: 1 )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कार्यकर्ते...गुणी लेखनाचा क्लास काढा कि राव...पहिला विद्यार्थी मी होतो. पक्कं.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· संपादन
· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 08:53 | मीठाच्या व्यापारासंदर्भात (Score: 1 )
३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्य: 2
मीठाच्या व्यापारासंदर्भात 'बखर अंत़काळाची' (का 'अंताजीची बखर') मधे रोचक माहिती आहे. तपशील फारसा आठवत नाही, पण कादंबरीतल्या मुख्य पात्राचे वडील कोकणातून मीठ विकत घेऊन त्यात माती मिसळून मीठ बरंच महाग विकत असत. त्या काळात मातकट, काळपट मीठ फार महाग असे.
ठाणे शहराच्या आसपास रहाणार्या आगरी लोकांची भाषा ऐकत रहावी अशी गोड वाटते, अगदी शिव्यापण. या बायका प्रेमाने बोलताना, कौतुक करतानाही अस्सल शिव्या देतात त्याचे संस्कार अगदी लहान वयापासून झाल्यामुळेही असेल.
(लेखाबद्दल अधिक लिहीत नाही. आ.रा आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियेत अधिक भर घालण्याएवढं काही सुचलं नाही.)
· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 06:13 | बैठक (Score: 5 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
हा लेख वाचला. या लेखमालिकेतील इतर लेख वाचण्याचा प्रयत्न केला.
लेखनामागचा हेतू जरी प्रशंसनीय असला तरी लिखाणामधे एकंदर शिस्तीचा अभाव जाणवला. अनेक विधाने अशी एकामागोमाग एक येत जातात ज्यांची संगती लावणे अशक्य बनते. एका विशिष्ट समाजाचे एका विशिष्ट संस्कृतीमधे काय आणि कसे योगदान होते हे समजून घेण्याकरता आणि समजावून सांगण्याकरता लिखाणाची बैठक, विषयाची शिस्तशीर मांडणी , संदर्भांची यादी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या त्या संदर्भांची योजना हे मूलभूत नियम पाळले गेले असं दिसलं नाही.
कदाचित लिखाणामागची भूमिका आणि त्याचं स्वरूप हे एखादा ससंदर्भ निबंध लिहिणे असे नसून, विषयाची रंजक तोंडओळख करून देणे असा असू शकतो. हे करतानाही विषयाची रंजक मांडणी , शैलीबद्धता हे गुण अभावानेच जाणवले. मुख्य म्हणजे रंजन करणे याचा अर्थ तर्कागत संगतीला रामराम ठोकणे नव्हेच.
असो. लेखकाने या आधीच्या लिखाणात आपल्या वाचनाची चुणूक दाखवलेली आहे. या सखोल वाचनाचं, संदर्भ शोधण्याचं रूपांतर यथायोग्य रीतीने गुणी लिखाणात व्हावे या सदिच्छेपोटी प्रस्तुत अभिप्राय दिला आहे. कलोअहेवि,
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Mon, 16/07/2012 - 05:35 | हा हा (Score: 3 रोचक )
सन्जोप राव
पुण्य: 2
फार मनोरंजक लेख. 'राघूनानांची कन्येस पत्रे' आठवली
· प्रतिसाद
बक रहा हूं जुनूं में क्या क्या कुछ
कुछ न समझे खुदा करे कोई
Sun, 15/07/2012 - 23:41 | स्वीपिंग स्टेटमेंट्स (Score: 4 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना त्यातील गौरवस्थाने अधोरेखीत करणे इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणून एवढी स्वीपिंग स्टेट्मेंट्स करणे योग्य नाही. ज्या पद्धतीने हा लेख लिहिला आहे, त्याच पद्धतीने अजून एक (अशीच सांगोवांगीची) भर घालतो - सध्याच्या ओरीसामध्ये पूर्वीची काही राज्ये येत - ओड्र, कोशल, उत्कळ, कलिंग ही महत्त्वाची. त्यातील उत्कळ आणि कलिंग ही नावे "कोल" या सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासींवरुन पडलेली आहेत.
तर असे आहे, की जिथे जिथे कोल, कोलीय सापडते तिथे तिथे आपण कोळी आगरी मंडळींना जोडू शकतो. मला वाटते कोळशाचा शोधही कोलीय मानववंशानेच लावला असावा.
· प्रतिसाद
मी माझ्या सर्वच प्रतिक्रिया येथे घेतलेल्या नाहीत. मुळ दुव्यावर त्या आहेतच. येथे चर्चेसाठी अन्यांच्या सर्वच प्रतिक्रिया जशा आहेत तशा घेतल्या आहेत.
काय दिसते यातुन?
१. बहुजनांबद्दलचा पराकोटीचा उपहास. बहुजन करतात ती स्वीपींग स्टेटमेंटस आणि या संस्थळावरील महाभाग करतात ती असते विद्वत्तेची झेप!
२. यांना इतरांकडुन पुरावे/संदर्भ/ तळटीपा वगैरे हव्या असतात. हेही देतात...काय तर नेटवरील (बव्हंशी विकीपीडिया) चे संदर्भ. त्यात त्यांना आपली विद्वत्ता दिसते.
३. प्रत्येक लेखात काय असावे आणि काय नसावे या अपेक्षा झाल्या. अपेक्षा म्हणजे समीक्षण नव्हे. जे आहे त्याचे विवेचन करत मग त्रुटींबद्दल लिहिले तर त्याला समीक्षा म्हनतात.
४. एका महाभागाने कारण नसतांना, तसा विषयही नसतांना "मी ब्राह्मनही नाही" हे सांगायचा उद्य्योग का केला असेल हे मी समजु शकतो. "मी ब्राह्मण आहे पण ब्राह्मण्यवादी नाही" असे वावदुकपणे काही लोक बोलतात त्यातलाच हा प्रकार.
असो. वाचक सुज्ञ आहेत. हे लोक, काही उघड तर काही छुपे" जातीयवादी कसे आहेत याकडे वळतो.
विक्रम देशपांडे म्हणतात: "माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत."
पुढे ते म्हणतात: "हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.
"तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. "
विक्रम देशपांडे पुढे म्हणतात: "शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू."
आपण मुळातील त्यांची व अन्यांची विधाने वाचलेली आहेतच दोन जणांनी निषेधाचे कसे ढोग केले आहे हेही तपासुन पाहु.
"देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो."
हा झाला मुक्त सुनीत यांचा निषेध...(?)
तर आधी देशपांडेंच्या प्रतिसादाला गलीच्छ-हिडीस वगैरे म्हणुन "मन" म्हणतात- "कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात."
लक्षात आला का यांचाच गेम प्ल्यन? हमोंच्या भाषेत लिहिलेले यांना चालणार आहे. त्यांचा निषेध हा सशर्त आहे. मन म्हणतात ही आयडीच बोगस आहे. आयडी खरी असो कि खोटी, ते हस्तक असोत कि अन्य कोणी, निषेध करायलाच हवा होता. या दोघांनीच नव्हे तर या दुव्यावर ज्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी व अन्य वाचकांनीही. पण तसे झालेले दिसत नाही याचाच अर्थ या जातीयवादी विधानांन यांचा पाठिंबा आहे.
आणि असा निषेध झालेला नाही, वा या संस्थळाच्या व्यवस्थापनाने, जसे माझ्या संतप्त प्रतिसादाला लगोलग नियम/अटी दाखवते...तेच देशपांडेंबाबत दाखवलेले नाही याचाच अर्थ व्यवस्थापनच मुळत जातीय रोगाने ग्रस्त आहे
सर्वात महत्वाच्या बाबी येथे लक्षात घ्यायला हव्यात त्या ह्या:-
१. विक्रम देशपांडे नामक माणसाने (त्याचे खरे-खोटे नांव/जात काहीही असो) आगरी समाजाचा (आणि तदनुषंगिक सर्वच ओबीसी/बीसी/भटक्या विमुक्तांचा) घोर अवमान केलेला आहे.
२. आगरी लोकांनी मीठाचा शोध वा पुरातन कालापासुन व्यवसाय केलेला नसुन ते श्रेय आगरी लोकांचे नाही असा एकुणातील आविर्भाव आहे. थोडक्यात यांच्या मते मीठ काय आणि कातडे कमवायचा काय, शोध यांच्याच पुर्वजांनी लावला...
३. आगरी लोक हे मातृसत्ताक पद्धतीचे असुन वेदांपेक्षा पुरातन आहेत हे सत्य नाकारत ते श्रेय स्वत:कडेच ठेवायचे आहे. किंबहुना आगरी लोक वैदिकांपेक्षा पुरातन ठरतात हे सत्य त्यांना पुरेपुर अमान्य आहे.
४. त्यांनी अन्य जातीयांच्या इतिहासाबाबत मी लिहिलेल्या अन्य एकाही लेखाला एकही, कसल्याही दर्जाचा, प्रतिसाद दिलेला नाही. आगरी लोकांच्या बाबतीत मात्र त्यांना "निम्नस्तरीय", अतिमागासादि विशेषणे बहाल करत "ब्राह्मण हेच श्रेष्ठ आहेत" व बहुदा जगातील सारे काही त्यांनीच शोधले आहे असा या संस्थळावरील लोकांचा अप्रत्यक्ष अभिप्राय दिसतो. किंबहुना हा उपक्रम मी हातातच कशाला घेतला येथुनच यांचे आक्षेप आहेत. मी करतोय ते काम माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्याने व प्रामाणिकपणे करायला यांना कोणी अडवले नव्हते. ते केले नाही म्हणुन यथाशक्ती मला करावे लागत आहे.
अन्य लेखांवर कसलाही अभिप्राय नाही कारण तेथे मी वैदिक ऋचांचे वा तत्कालीन सम्स्कृतीचे उल्लेख केलेले आहेत. आग-यांचा लेखात नाही. यामुळे यांचा कसा पोटशुळ उठला असेल हे मी समजु शकतो...पण सत्य हे शेवटी सत्य असते.
५. अरविंद कोल्हटकर म्हनतात कि आगरी स्माजाचे मीठ उद्योगात मला त्यांचे फारसे योगदान दिसत नाही. त्यांच्यासाठी मी सांगतो कि आधी सिद्दी व नंतर ब्रिटिशांनी मीठागरे कशी ताब्यात घेत आग-यंची वाट लावली ते व नंतर तटरक्षक दलांनी समुद्राकाठचे बांध फोडुन मीठागरेच नष्ट केलीत, त्यामुळे हा धंदा कसा कोसळला हेही तपासायला हवे. एवढेच नाही तर बांध फोडल्याने किनारच्या जमीनी नापीकही बनवल्या. त्याबाबत आपला समाज कधी तोंड उघडत नाही. त्यांच्या या शोषनाबाबत आपण गप्प बसतो आणि त्यांच्यातील अडानीपणा...दारिद्र्य आणि त्यामुळे आलेला उद्दामपना यालाच लक्ष करतो आणि निम्नच आणि अतीमागासवर्गात ढकलत त्यांचा उपहास करतो...हा कोणता न्याय झाला? स्पष्टच विचारायचे तर ही कोनती विकृत ब्राह्मणी सम्स्कृती दाखवत ब्राह्मण समाजाचाही अवमान करत आहात?
६. सर्वच ब्राह्मणेतर समाजांना तुच्छ समजण्याची ही ऐसी अक्षरेची झुंडशाहीची प्रवृत्ती समाजविघातक आहे. समाजात दरी निर्माण करनारी आहे. वर्णव्यवस्थावादाचे भुत या संस्थळाचे मालक ते अनुयायी ब्राह्मणवादीच आहेत. हे सिद्ध करायला माझ्याकडे या संस्थलाबाबत इतरही अनेक पुरावे आहेत, पण ते मी सध्या न्यायालयासाठी राखुन ठेवतो.
ज्यावेळीस सर्व समाज निरलसपणे एकत्र यावा, जाती-जातींतील संघर्ष संपावा यासाठी काही प्रयत्न करत असतात तेंव्हा जाणीवपुर्वक असे लोक त्यात अडथळा निर्माण करतात आणि भरल्या खंडीत मुतत्तात. स्वत:ला काही जमत नसेल तर आपापल्या शैल्या/विचार यातच क्लोज ग्रुपमद्धेच गुंगावे, संस्थळे ही पब्लिक फोरम बनवु नयेत.
थोडक्यात:
मी ऐसी अक्षरे, देशपांडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करने, जातीयवादाचे समर्थन करणे, प्रोत्साहन देणे, जातीनिदर्शक हीणकस विधाने करणे आदि गुन्हेगारी कलमांखाली माझ्या वकीलाच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करत आहे याची नोंद घ्यावी. मग दोषी ख-या नांवाचे असोत कि खोट्या, भारतात रहात असोत कि विदेशात, त्यांना जेरबंद केले जाईल.
तसेच या "ऐशी अक्षरे" संस्थळावर कायमस्वरुपी बंदी आणण्यासाठीची मागणी केली जात आहे.
समाजात ऐक्य हवेय. हे असले उद्योग करना-यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. सुसंस्कृतततेच्या नांवाखाली असंस्कृत वागणारे लोक समाजाला एकुणात परवडणारे नाहीत.