खेळ सावल्यांचा

सिल्युएट प्रकारातील एक छायाचित्र येथे देत आहे. अभिप्राय जरूर कळवावेत. धन्यवाद.






सिल्युएट म्हणजे पार्श्वभुमीतील प्रकाशासमोर एखाद्या वस्तूची, व्यक्तीची फक्त रुपरेषा दिसेल अशी छाया निर्माण करणे. या फोटोत मी कॅमेरातील सिल्युएट तंत्राचा उपयोग करुन उजेडासमोरील छाया टिपल्या आहेत. पण त्याच बरोबर मागच्या आंधाराचाही उपयोग करून सिल्युएट दुहेरी बनवायच प्रयत्न केला आहे. (पोर्णिमेला पुन्हा प्रयत्न करायला हवा.) फोटोवर इतर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.

कॅमेर्‍यात सिल्युएट तंत्र नसेल तर एक्स्पोजर अ‍ॅडज्स्ट करुन असे फोटो काढता येतात. भरपूर प्रकाश पार्श्वभुमीला ठेवून त्यापूढील वस्तूचे छायाचित्र एक्स्पोजर कमी ठेवून (शटर स्पीड जास्त ठेवून) काढता येते. शटरस्पीड प्रकाशाच्या तीव्रतेनुसार ठेवावा.


field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्रात जादू आहे हे नक्की.
कशी करतात जरा आम्हाला पण सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

निळोबा, कॅमेर्‍यात जादू आहे हो तुमच्या! पण तू म्हणतो आहेस तसं पौर्णिमेला एकदा पुन्हा प्रयत्न करून पहा. छताचं सिल्हूट दिसतं का ते पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(चकचकीत) गाडीचे (अति) परावर्तानाने तिथे हा प्रयोग काहिसा फसला आहे. बाकी सर्व ठिकाणी 'केवळ' छाया आली आहे.
बाकी प्रयोग मस्त जमलाय. या चित्रात जादू आहे या निरिक्षणाशीही सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो भाग क्रॉप आउट करायचा मोह आवरावा लागला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझी नजर उजेडावरच राहात होती. उजेडातील भिंतीला फारच "स्ट्रक्चर" आहे. त्यामुळे झाड-गज-मोटार यांच्या सिल्हुएटांकडे माझे लक्ष केंद्रित होत नव्हते.

(माझ्यासाठी) चंद्रामुळे चित्र वाचले. पण चंद्र यापेक्षा खूप मोठा हवा. हा एक प्रसिद्ध दृष्टिभ्रम आहे. निसर्गात आपण क्षितिजापाशी चंद्र बघतो, तेव्हा मनावर त्याचे बिंब त्याच्या कोनीय अंतरापेक्षा पुष्कळच मोठे भासते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठ्या चंद्राच्या दृष्टीभ्रमाबद्दलः म्हणजे पोर्णिमेलाही यापेक्षा चांगला परिणाम होईल असे वाटत नाही असे म्हणायचे आहे का?

या सिल्युएट मध्ये अंधार्‍यापेक्षा प्रकाशाचा भाग लक्ष खेचून घेतोय, हे पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

"नैसर्गिक" म्हणजे प्रत्यक्ष बघताना आभास होतो तसा.

या चित्रात चंद्राच्या कोरीची "लांबी" हेच पूर्णिमेलासुद्धा चंद्राच्या बिंबाचा व्यास असणार आहे. म्हणजे दिसेल तो पांढरा ठिपकाच.

एक तर खूप दूर जाऊन खूप प्रचंड झूम लेन्सने हे चित्र काढावे लागेल - म्हणजे लांब अंतरावरून घराचे कोनीय मान लहान होईल, चंद्राचे कोनीय मान जवळजवळ तेच राहील - हे व्यवहार्य नाही. किंवा चंद्राचे वेगळे चित्र - घराच्या पेक्षा दृष्टिभ्रमाला साजेसे झूम केलेले - वेगळे घेऊन घराच्या चित्रात योग्य ठिकाणी चिकटवायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो छान.

असेच काहीसे म्हणतो, डबल एक्स्पोजर केल्यास चंद्र मोठा दिसून बाकीचे चित्र तेवढेच दिसेल पण त्या चित्रातले नाटय काय असेल माहित नाही.

डबल एक्स्पोजर - पहिल्या टेक मध्ये झूम करून फक्त चंद्राचा फोटो काढावा, दुसर्या टेक मध्ये बाकीचा सिल्हुत काढावा, सिल्हुत काढताना शटर स्पीड जास्त ठेवावा त्याने सिल्हुत अधिक उठावदार येईल असे वाटते , काही क्यामेराना हि सोय इन बिल्ट असते, काहीना पोस्ट पिक्चर प्रोसेसिंग करावे लागते.

माझे मर्यादित तांत्रिक ज्ञान (चू. भू. देणे घेणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच म्हणतो. सिल्हुएटच्या कुठल्यातरी एका विशिष्ट रेखीव आकृतीची नाही. काहीशी गर्दी व गिचमिड झाल्यासारखी वाटली.

अवांतर - तुझा चंद्राचा फोटो डकव की. आणि तो डोळ्यात प्रतिबिंबित होणारा चंद्र... त्या फोटोचं काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर - तुझा चंद्राचा फोटो डकव की.

चंद्रावर अजून प्रयोग करतो आहे, मागल्यावेळेपेक्षा चांगला फोटो मिळेल अशी अपेक्षा आहे.

आणि तो डोळ्यात प्रतिबिंबित होणारा चंद्र... त्या फोटोचं काय झालं?

हा हा हा, त्या चंद्राचा शोध मात्र अजून सुरु आहे.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

खूप गर्द काळोखात प्रकाश आणि त्याच्याखाली असलेल्या गोष्टी ठळक दिसताएत पण सिल्युएट ईफेक्ट साठी प्रकाश किंवा अंधाराची तीव्रता कमी पाहिजे होती असं वाटतं. बाकी फोटो काढण्याची कसब छान आहे.

--मयुरा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान!! नविन तंत्राबद्दल माहिती कळाली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नविन तंत्राबद्दल माहिती कळाली' असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0