नुकतीच पुण्यात रिक्षांची झालेली भाडेवाढ आपणास योग्य (न्याय) वाटते का?

प्रतिक्रिया

तिकडची कौलं बंद झाली, इकडे सुरु,
कौलारू खुष.
(दिवाळी झाली, आता अभ्यासाला लाग)

------------------------
घणघणतो घंटानाद

या पर्सनल प्रतिसादाचा निषेध नोंदवतो. ते प्रकरण होऊन आता दोन वर्षे लोटली आहेत. आपण जुन्या गोष्टी या नव्या संस्थळावर न उकरलेल्याच बर्‍या, नाही का?

निषेध फाट्यावर मारतो.
आपणही तीच ती जुनी सुमार कौलं इथं फाडू नयेत, नव्या बाटलीत जुनीच दारू.
जरा वेगळे काहीतरी लिहा. (आधी अभ्यास करा)

------------------------
घणघणतो घंटानाद

मी जकार्ता मधे रहातो /:)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जकारतामध्ये रिक्स/कॅब्स आहेत का? असल्यास त्यांचे भाडे भारतीय रिक्स्च्या तुलनेत किती आहे?

अजून किती भाडेवाढ हवीय
सेवेच्या नावाने तर बोँब असते

संगणकस्नेही आता त्यांनी संप करु की नये यावर एक कौल काढा कसे

.

अजून किती भाडेवाढ हवीय

माझ्या मध्ये 'रिक' ('रिक्षा' करता हुच्चभ्रु तरुणाई वापरत असलेले टोपण नाव)चे वाढलेले भाडे योग्य आहे. रिकचे चालक्-मालक हे अतिशय सामान्य, निम्नस्तरीय आयुष्य जगत असतात. त्यांनाही मुलेबाळे आहेतच की.

सेवेच्या नावाने तर बोँब असते

असे सरसकट म्हणता येत नाही.

संगणकस्नेही आता त्यांनी संप करु की नये यावर एक कौल काढा कसे

आपली सूचना विचाराधीन आहे. Wink

काय स्नेह्या, रिक्षा घेणार आहेस का?

अतिशय हि&हि प्रतिक्रिया, यकुशेठ आपल्याकडुन ही अपेक्षा नव्हती. Sad

ही&ही प्रतिक्रियेबाबतच्या तुझ्या अधिकारावर अतिक्रमण केल्याबद्दल मला खरोखर शरम वाटली Wink

नामगुम जायेगा, आयडी ये बदल जायेगा, मेरी प्रतिक्रिया ही पहचान है.. गर याद रहे..

चुकुन दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ.

अच्छा सामान्य निम्नस्तरीय आयुष्य आहे म्हंजे उर्मटपणा वागण्याचा अधिकार मिळाला का

मुलाबाळ्याच्या नावाखाली भाडेवाढ हवी पण त्या बदल्यात सेवा पुरवायला नको
सरसकट नसतीलही पण त्याच प्रमाण केवळ 1 टक्का असेल बाकीच्याच काय

विचार करताय पुढच्या कौलाच्या
आधीच शुभेच्छा देते कसेँ

.

अच्छा सामान्य निम्नस्तरीय आयुष्य आहे म्हंजे उर्मटपणा वागण्याचा अधिकार मिळाला का

असे आम्ही म्ह्णालेलो नाही. जिथे ज्यांची चूक असेल तिथे कायदा आपले काम करेलच.

मुलाबाळ्याच्या नावाखाली भाडेवाढ हवी पण त्या बदल्यात सेवा पुरवायला नको

एकतर आधीच मिळालेली भाडेवाढ फार त्रोटक आहे, त्यातही रिकचालक रात्रीचा दिवस करुन, रक्ताचे पाणी करुन आपल्यासारख्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवत असतात, त्यांच्यावर अशी थेट टीका करण्या आधी आप्ण वस्तुस्थिती समजुन घ्यावी ही नम्र विनंती.

सरसकट नसतीलही पण त्याच प्रमाण केवळ 1 टक्का असेल बाकीच्याच काय

या टक्केवारीला आधार काय? Wink

विचार करताय पुढच्या कौलाच्या
आधीच शुभेच्छा देते कसेँ

हॅ हॅ हॅ.. धन्यवाद, धन्य्वाद. ऐसीकौले कशीही फोडेन!

आमच्या उस्मानाबादला नाही झाली.

आमच्या उस्मानाबादला नाही झाली.

तिथे रिक्स मीटरने चालत नसाव्यात.

कायद्याचे बोलू नका त्याने सगळे प्रश्न सुटले असते तर अजून काय हव होतं
कायदा किती प्रभावि आहे ते माहितीय

रक्ताचे पाणी रिकचालक करतात
खिक कोणत्या युगात वावरत आहात रक्ताचे पाणी ते करतात की त्याच्या ईच्छित स्थळी पोचवण्यासाठी विनवण्या करुन आमच्या रक्ताचे पाणी होतय

आणि हो हे अनुभवाचे बोल आहेत बर का त्यासाठी कुठल्या विदाची गरज नाही
ती झापड काढा अगोदर डोळ्यावरची

.

आपला सात्विक संताप आम्ही समजु शकतो.

धन्यवाद
बाकी तुम्हाला ज्युनिअर शरद राव बनण्याची भारी हौस दिसतेय

.

आदरणीय शरद राव हे गरीब कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे विख्यात कामगार नेते आहेत, त्यांचा उल्लेख आदरानेच व्हवा ही विनंती. असो. आपल्यासारख्या मुंबई आणि पुण्यातील नोकरदार उच्चभ्रु इंडिया शायनिंगचे नारे देण्यार्‍यांना काय कळणार म्हणा गरिबांची समस्या?

होना शरद रावासारख्या उठसुठ जनतेला वेठीला धरण्याऱ्‍या नेत्याच्या उल्लेख आदरा(?)नेच व्हावा ही तुमची अपेक्षा योग्यच आहे
आणि आम्ही उच्चभ्रु असलो तर असु द्या तुम्ही सामान्य आहात ना मग झाल तर

.

तुमच्या संवादात शिरण्याबद्दल माफ करा...

पूर्वी मी देखील http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/12/blog-post_6774.html हा असा लेख लिहून पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षावाल्यांबद्दल माझा संताप व्यक्त केला होता.

पण आता काळानुरूप बरेच संदर्भ बदलले आहेत. पुण्यापुरते बोलायचे झाले तर पुण्यात रिक्षाकरिता सीएनजी ची सक्ती केलेली आहे आणि सीएनजीचा पुरेसा पुरवठा केला जात नाही. सीएनजी भरण्याकरिता दिवसातले चार ते सहा तास रांगेत थांबावे लागते. वेळेची किंमत गृहीत धरता हा रिक्षाचालकांना होणारा मोठाच आर्थिक फटका आहे.

शिवाय मीटरने भाडे आकारून नियमाप्रमाणे व्यवसाय केल्यास मिळणारे उत्पन्न तुटपूंजे वाटावे इतकी प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. चौकोनी कुटूंब चालविण्याकरिता मासिक पंचवीस हजार उत्पन्न मिळायला हवे ही रिक्षाचालकांची मागणी आहे. रिक्षाच्या सध्याच्या भाड्यातून हे शक्य वाटत नाही.

दुसरीकडे या सर्व गोष्टींबाबत तक्रार करीत व्यवसाय करण्यापेक्षा अनेक चांगल्या व्यक्तींनी हा व्यवसाय सोडूनच दिला आहे. त्यामूळे इतर अनेक बोगस लोक विनापरवाना भंगारात पाच हजारात रुपयांत रिक्षा विकत घेऊन तीच विना परवाना चालवायचा उद्योग करीत आहेत. अर्थातच अशा लोकांचे वर्तन प्रवाशांना हितावह नाही. या लोकांमुळे खरे रिक्षाचालक बदनाम होत आहेत. अशा बोगस रिक्षाचालकांना शोधून त्यांना कायमचे या व्यवसायातून हद्दपार करणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. पुन्हा अशा लोकांची संख्या मूळ नियमित रिक्षावाल्यांपेक्षाही जास्त आहे. यांना बंद करून टाकले तर एक मोठा प्रवासी वर्ग वाहतूकीपासून वंचित राहील अशी डळमळीत पुण्यातली सार्वजनिक बससेवा आहे.

असो. इथे स्नेहींनी भाडेवाढ योग्य वाटते का हे विचारले आहे? त्याविषयी इतकेच म्हणता येईल की सद्य परिस्थितीत तरी नाही. हो पण जर योग्य प्रमाणात सीएनजी पुरवठा उपलब्ध झाला आणि बोगस रिक्षांना हद्दपार केले तर इतकी भाडेवाढ प्रवासी व रिक्षाचालक दोघांनाही फायद्याचीच ठरेल.

मी दिलेले स्पष्टीकरण केवळ पुण्यापुरतेच मर्यादित आहे. इतर शहरांतील रिक्षाचालक / प्रवासी यांच्या समस्यांविषयी काहीच ठाऊक नसल्याने भाष्य करता येत नाही.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

>>>>> दुसरीकडे या सर्व गोष्टींबाबत तक्रार करीत व्यवसाय करण्यापेक्षा अनेक चांगल्या व्यक्तींनी हा व्यवसाय सोडूनच दिला आहे. त्यामूळे इतर अनेक बोगस लोक विनापरवाना भंगारात पाच हजारात रुपयांत रिक्षा विकत घेऊन तीच विना परवाना चालवायचा उद्योग करीत आहेत. अर्थातच अशा लोकांचे वर्तन प्रवाशांना हितावह नाही. या लोकांमुळे खरे रिक्षाचालक बदनाम होत आहेत. अशा बोगस रिक्षाचालकांना शोधून त्यांना कायमचे या व्यवसायातून हद्दपार करणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. पुन्हा अशा लोकांची संख्या मूळ नियमित रिक्षावाल्यांपेक्षाही जास्त आहे. यांना बंद करून टाकले तर एक मोठा प्रवासी वर्ग वाहतूकीपासून वंचित राहील अशी डळमळीत पुण्यातली सार्वजनिक बससेवा आहे. <<<<

तुमचा हा मुद्दा अत्यन्त महत्वाचा आहे. अन ग्यानबाची मेख इथेच रोवलेली आहे.
नाही सरकार, पक्षी आरटीओमार्फत वगैरे यांचेविरुद्ध कारवाइ करत, ना रिक्षा युनियन लिडर्स पैकी कोणीही त्याविरुद्ध आवाज उठवत. किम्बहुना, अशा गैरव्यावसायीकांचे सन्ख्यात्मक ताकदीवरच युनियन व नेतेपण टीकुन असल्याने कसलीच अपेक्षा करववत नाही. जोवर हे जिकीरीचे काम होत नाही, तोवर हे असेच चालू रहाणार. (व्यवहारात उतरलेले "खोटे चलन" थोडक्या काळात "खर्‍या चलनाला" बाद करते नामशेष करते असा एक अर्थशास्त्रीय संकेत आहे, त्याप्रमाणेच रीक्षाव्यावसायीकान्चे बाबत देखिल घडताना दिसून येते आहे.)

धन्यवाद limbutimbu

त्यातही गंमत अशी की हे बोगस चालक कधीच खिशात परवाना बाळगत नाहीत (असला तरीही). रिक्षा भंगारातून घेतलेली असल्याने त्यांच्या नावावर नसतेच. पकडले की हे काखा वर करून मोकळे होतात. म्हणतात करा वाहन जप्त. आमच्याकडे काही परवाना वगैरे नाहीये. पाच हजाराच्या भंगार वाहनावर यांनी आधीच पन्नास हजार कमविलेले असतात. वाहन आणि प्रवासी यांना रस्त्यावर तसेच सोडून ते निघुन जातात, पुन्हा अशीच एखादी भंगार रिक्षा शोधतात आणि हे दुष्टचक्र चालुच राहते.

यावर एकच उपाय. अशा सर्व रिक्षा जप्त करून मोठ्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली नष्ट करणे. जे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. तसेच अशी रिक्षा चालविताना जो दिसेल त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून अटक करणे आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर किमान पाच वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावणे.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

अश्या प्रकारच्या विना परवाना रिक्षांमधुन अवैध / गुन्हेगारी कृत्ये देखील केली जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. यावर करवाई होणे जरूरी आहे.

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद, गुगळेजी.. आपण मांडलेले सीएनजीचा पुरवठा, तुटपुंजे उत्पन्न आदी मुद्दे अत्यंत सार्थ आहेत. जे स्वतः एखादे वाहन चलवतात (खाजगी/सार्वजनिक) त्यांनाच वाह्नाच्या देखभालीचा मुद्दा जास्त तीव्रतेने लक्षात येऊ शकतो. आजच्या घडीला जिथे साधे टायर पंक्चर काढायचे झाले तर १००-१५९ खर्च करावा लागतो तिथे योग्य ते वाढीव भाडे मिळावे अशी अपेक्षा रिक चालकांनी केली तर त्यात गैर ते काय? २००४ मध्ये जी खाण्यापिण्याची वस्तु १०० रु. ला मिळत होती तिची किंमत आज २०११ मध्ये किमान १३० रु. झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या खिशातुन गेलेले १ ते २ रु लक्षात येतात, मग त्याच ठिकाणी ते रिक्षावाल्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यु ने विचार करू पाहत नाहीत. हा पराकोटीचा स्वार्थी, आत्मकेंद्रितपणा झाला.

------------------------
घणघणतो घंटानाद

छान छान. गंभीर चर्चा चालली आहे अश्या ठिकाणी आपण हे दर्जेदार, उच्च अभिरुची संप्पन गाणे डकवुन चर्चेला फार मोठा हातभार लावला आहे धन्यवाद.

आभारी आहोत.
दुसर्‍या एका संकेतस्थळावरील चर्चेत पुण्यातील रिक्षावाल्यांबद्दल खिसा कापल्याची भाषा करता आणि येथे येऊन रिक्षावाल्यांची भलामण करता. आपण स्वतः मुंबईत राहून कधीतरी महिन्या दोन महिन्यातील एखाद्या प्रवासावरून पुण्यातील रिक्षावाल्यांवर केलेल्या टिप्पण्यांची गंमत वाटली. शिवाय तुमच्या चान चान गंभीर चर्चेविषयी कौतुकही.

----
रिक्षासुर.

------------------------
घणघणतो घंटानाद

सदर प्रतिसाद गमतीने टाकलेला आहे.

माझा प्रतिसाद मात्र गांभीर्याने टाकलेला आहे.

------------------------
घणघणतो घंटानाद

क्या बात है, याला म्हणतात कोटी.

समहाऊ, मी होय ला मत दिलय. पण ते देताना पुढील विचार मनात होते.
१) बाकी सगळ्यान्चे उत्पन्न येनकेनप्रकारेण वाढत असता रीक्षावाल्यान्नीच असे काय पाप केले आहे?
२) समजा भाडेवाढ जास्त असेल, तर निदान पुण्यात तरी त्याचा परिणाम जाणवुन घेतला जात नाही. जरी सार्वजनिक बसवाहतुकीचे तिनतेरा वाजविलेले असतील तरी मग जो तो उठतो अन टूव्हिलरने जाऊ लागतो.
३) मुद्दा क्रम. दोन ला अनुसरुन, रीक्षाची भाडेवाढ म्हणून टूव्हिलरची खरेदी, म्हणून ऑटोमोबाईल इण्डस्ट्री तगणे त्यातुन म्यानुफ्याक्चरिन्ग व रिपेअर्स मधे रोजगार निर्माण होणे, म्हणून इन्धन खर्च होऊन सरकारला कर रुपाने प्रचण्ड उत्पन्न मिळत जाणे, लोक स्वावलम्बी बनणे, वाहने आहेत रस्त्यावर म्हणून तरी किमान खड्डे बुजविणे वगैरे कामात कार्पोरेटर्स्/कॉन्ट्रॅक्टर्स यान्चे उखळ पान्ढरे होणे इत्यादी अनेक गोष्टी घडतात. हा देखिल भाडेवाढीचा फायदाच नाही का?
४) जास्त टूव्हिलर रस्त्यावर म्हणजे पीयुसी वगैरेद्वारे पुन्हा सरकारला उत्पन्न मिळते.
५) रस्तावाहतुकीचे नियमन करताना वरची चिरीमिरीचे उत्पन्नही वाहने जास्त असल्याने त्याच पटीत वाढीव मिळते. (मी तर असे ऐकुन आहे की अमक्यातमक्या चौकात पोस्टीन्ग मिळावे म्हणूनही दर ठरलेले आहेत. Blum 3 )
हा सगळा रीक्षाभाडेवाढीचाच उपयोग नाही का?

समाजातील सर्वच घटकांच्या समस्या विचारात घेणे हे कल्याणकारी सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे.
रिक्षावाल्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर परदु:ख शीतल अशी सामान्य नागरिकांची मनोभुमिका सर्वसाधारपणे असते.

ठाण्यात रहात असल्याने पुण्यातल्या रिक्षाभाड्याविषयी मत व्यक्त करणे योग्य नाही. म्हणून पास.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चालु शकेल. ठाणे असो वा पुणे रिक्षा चालकांच्या / प्रवासी वर्गाच्या समस्या सार्वत्रिक आहेत.

मीसुद्धा काही न बोलण्याचे ठरवले आहे कारण ठाण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला ठार केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.. भाडे नाकारणे आणि जास्त भाडे वगैरे वादातून. अगदी मी रिक्षा पकडतो त्यांपैकी नाक्यांवर..

आहे पुण्यात असा कोणी रिक्षावाला?

तस्मात वेगळ्या अर्थाने थत्तेंशी सहमत.. गप्प राहणे उत्तम Smile

भाडेअवाढ झाल्यामुळे आतातरी रिक्षाचालक प्रवासी म्हणतील तिक्डे जायला तयार होणार का तो माज तसाच चालू रहाणार यावर उत्तर अवलंबून आहे

हे भाढेअवाढ म्हणजे काय असते हो?
अवाढ म्हणजे वाढत नसलेले. जसे अमूर्त, अपेय, अवांछित.
अर्थात भाढेअवाढ म्हणजे भाडे न वाढणे.

------------------------
घणघणतो घंटानाद

अन्य संस्थळांपेक्षा या संस्थळाचा इकडे टंकनवेग जास्त अस्ल्यामुळे चुका होत असल्याची शक्यता नाकरता येत नाही.

टंकनदोष, पण आता तुमच्या प्रतिसादामुळे मूळ प्रतिसाद संपादित करता येत नाही;

खरंय! पैसे जास्त दयायला काही वाटत नाही; मात्र सेवा तशी दर्जेदार मिळायला हवी.

सेवा तशी दर्जेदार मिळायला हवी.

दर्जेदार हा शब्द वगळूनः

"सेवा मिळायला हवी"

इतकं झालं तरी देव पावला..

त्याने नुसतं हो म्हणावं .. हो म्हणणं जाऊदे.. नुसतं थांबून आपल्याला कुठे जायचंय ते ऐकून घ्यावं म्हणून आपण भीक मागण्याच्या लेव्हलला जातोय असा भास होण्याचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांना समजेल..

मीच पूर्वी चेकनाक्यावर उभे राहून लिहिलेले श्रीरिक्षापतिस्तोत्रम् इथे देण्याचा मोह आवरत नाहीये. हे रोज सकाळी १०८ वेळा म्हटल्यास उत्तम रिक्षालाभ होतो.
..

तुहि सर्वत्राता | तुहि प्रजापती |
तुहि रिक्षापती | त्रि-नाक्यांचा ||

प्रभाते तुज भजावे | मरोळासी चलावे |
त्वये नाकारावे | अतितुच्छतेने ||

तुला सर्व ठावे | पवईत खोळंबा |
वाहतूक मुरंबा | रोजचाच ||

कचेरीत जाण्या | भक्तांची रांग |
तूचि आता सांग | कोठे जावे ||

भक्तांशी झगडा | करावेस राडे |
हवे तुज भाडे | कुर्ला चेम्बुराचे ||

बगळा स्वरूपी | पोलीस मामा |
येईल कामा | कधी काळी ||

सकलांसी मामा | रांगेत जुंपे |
तुझा ग्यास संपे | योग्य वेळी ||

यातुनी आम्हा बोध | धरावा बसपंथ |
काढावा नेक्ष्ट मंथ | ब्येस्टचा पास ||

खतरनाक कविता, गवि! ROFL ROFL

जरा युनिव्हर्सल करा हो स्तोत्र, पुण्यातही या मंत्रोच्चारांची गरज आहे

गवि राँक्स
क्या बात है

मरोळच नाव नका काढू हो
चर्चगेट परवडल पण तो प्रवास नको

गवि सुट्ट्या पैशावरची भांडण विसरलात का
आणि ते बीकेसीचं शेअर रिक्षा

.

गवि सुट्ट्या पैशावरची भांडण विसरलात का

हॅ हॅ..

अहो सुट्ट्या पैशावरची भांडणं व्हावीत यासाठी मी तरसतोय.. कारण ही भांडणं आपल्याला रिक्षावाल्याने स्वीकारुन इष्टस्थळी पोचल्यावर होतात..

इथे मुळात रिक्षावाल्याने रिक्षात घेण्याचीच फाफ आहे.

हाहाहा

गवि बीकेसीत सुट्टे पैसे असतील तरच रिक्षावाले रिक्षात घेतात

.

अच्छा, हे नव्हते ठावूक.

बीकेसीत नोकरी करत असताना कुर्ला स्टेशनपर्यंत बसला लटकून जाणे किंवा रिक्षांना भीक मागणे हे पर्याय अत्यंत पीडादायक वाटल्याने मी सरळ ती बेस्टची कॅडबरी ठाणे बस पकडून थेट परत यायचो..

बीकेसीच्या काळात आधी कार नेण्याचा प्रयत्न झाला पण रस्त्यातच एका प्रवासाला अडीच तास लागायला लागले..आणि नऊ वाजून गेले की ऑफिसचे पार्किंग फुल्ल. मग एमेमारडीए मधे दिवसाचे पन्नाससाठ रुपये टेकवून पार्क करा.. ते परवडेना म्हणून बेस्टचा पंथ धरला..

हे सर्व त्या जळ्ळ्या रिक्षावाल्यांमुळे.

गवि पेटलेत आज
रिक्षावाल्याची काही खैर नाही

.

गवि स्तोत्रातील
"भक्तांशी झगडा | करावेस राडे |
हवे तुज भाडे | कुर्ला चेम्बुराचे ||"

१. ही रचना फार भावली. कोल्हापुरातील रिक्षावाल्यांच्याबाबत इतरत्र चांगले बोलले जाते त्याला कारण म्हणजे इथे मीटरप्रमाणेच भाडे घेतले जाते आणि आरटीओ दरपत्रकाची मागणी केल्यास रिक्षावाला ते तात्काळ हातात देतो त्यावरून पॅसेन्जर झालेल्या भाड्याची सत्यता पडताळून पाहू शकतो. पण कधीमधी 'भक्तांला झगडा' ही करावा लागतो इथे. उदाहरणार्थ : एकदा रात्रीचे केवळ ८.०० वाजले होते आणि माझ्या थोरल्या बहिणीला घरी 'किडनी स्टोन' च्या वेदना सुरू झाल्या म्हणून मी तिला घेऊन दवाखान्यात जावे यासाठी शेजारील नाक्यावर उभ्या असलेल्या रिक्षाकडे गेलो. रांगेत पहिल्या नंबरला जी होती तिच्या ड्रायव्हरला 'शेजारील अपार्टमेन्टकडे घ्या' अशी सूचना केली, कारण बहीण आणि तिची मुलगी तोपर्यंत तीन मजले उतरून खाली रस्त्यावर येऊन थांबले होते. माझ्या सुचनेवर रिक्षावाल्याने विचारले, "कुठे जायचे आहे?" हा प्रश्न लाईनमध्ये आपली गाडी लावणार्‍याने विचारायचा नसतोच. त्याच्या बोलण्याला मी तिथेच थांबविले आणि म्हटले, "त्याचा काय संबंध ? आम्ही गावात कुठेही जाऊ. तुम्ही इथे थांब्यावर गाडी लावली आहे ना ?" यावर माझ्या भाषेतील अधिकारपणाने का होईना तो थोडासा वरमला आणि म्हणाला, 'तसे नाही हो, माझी आता रिक्षा बंद करायची वेळ झाली आहे. तेव्हा म्हटलं माझ्या घरच्या रस्त्यावर, म्हणजे गंगावेश इथे जाणारा पॅसेन्जर भेटतो काय ते पाहत होतो." आम्हाला राजारामपुरी म्हणजे त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेने जायचे असल्याने व बहिणीची अवस्था पाहून जादाचा वाद घालण्यात अर्थही नसल्याने मी त्या रिक्षातून उतरून मागे दोन नंबरच्या रिक्षाकडे गेलो. त्याला प्रथम दवाखान्याचेच कारण सांगितले म्हणून का असेना पण तो लगेच तयार झाला व माझे काम झाले. पण तिथून निघून जाण्यापूर्वी मी जाणीवपूर्वक नकार देणार्‍या रिक्षाचा नंबर टिपून घेतला आणि दुसर्‍या दिवशी रितसर आर.टी.ओ. कडे झालेल्या घटनेचा तक्रारवजा वृत्तांत पाठविला. त्याची एक प्रत टाऊन हॉलजवळ असलेल्या रिक्षा संघटनेच्या कार्यालयातही दिली. सरकारी खाक्यानुसार त्यावर पुढे काय कारवाई झाली हे समजले नाही, पण रिक्षा संघटना कार्यालयातून तीन-चार दिवसानंतर फोन मात्र जरूर आला. सचिवाने झाल्याप्रकारे खेद व्यक्त केला आणि संबंधित रिक्षा ड्रायव्हरला संघटनेच्या कार्यालयात बोलावून योग्य ती समज दिली आहे अशीही पुस्ती जोडली. मला इतपत पुरेसे होते.

२. पुण्यातील रिक्षावाल्यांसमवेत भाड्याच्याबाबतीत कधी वाद झाल्याचे स्मरत नाही. मुलग्याचे घर नव्या सांगवीत [पिंपळे गुरव] म्हणजे स्वारगेटपासून खूपच दूर. जर लगेज जास्त नसेल तर मी पीएमटीनेच जातो, पण काहीवेळा कुटुंबसमवेत असेल तर रिक्षा करावीच लागते. अशावेळी स्वारगेट बाहेर असलेल्या रिक्षाग्रुपकडे जाऊन अगोदर भाडे फिक्स करून आणि ते दोन्ही पक्षी मान्य असेल तरच रिक्षात बसतो. सर्वसाधारणपणे स्वारगेट ते नवी सांगवी (वेळ पाहून) रु.२७०/- ते रु.२८०/- मागतात असा अनुभव आहे. पण थोड्याशा चर्चेनंतर २५०/- ला येतात आणि अगदी अपार्टमेन्टच्या दारात (मुख्य रस्त्यापासून अगदी आत असूनही) आणून सोडतात. इतक्या विविध वेळेला येऊनही अद्यापि "मी सांगवीकडे येणार नाही" असे कुणीही म्हटलेले नाही. हा अनुभव चांगला वाटला मला.

धाग्याच्या कौलाबाबत मत : भाडेवाढ होत असली तरी प्राप्त परिस्थितीत ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीच. (मला वाटते आजच आणखीन् पेट्रोल दरवाढ झाली.)

अशोक पाटील

विस्तृत चर्चेबद्दल / आपापले अनुभव इथे शेअर केल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार मानतो.
धन्यवाद.