भारतीय शेरलाँक होम्स (?)

अदितिने केलेल्या
होम्सानुवादाचा प्रभाव कायम असतानाच मुद्दामहून राँबर्ट डाँन ज्युनिअर ,ज्यूड लाँ अभिनित शेरलाँक होम्स २००९ पाहिला.

नाही चित्रपटाच परीक्षण लिहित नाहीये.

त्यात राँबर्ट डाँनीने शेरलाँक अतिशय छान रंगवलाय.
प्रौढ गंमतीदार खडूस होम्स बघताना आपण एकदम गुंग होतो.
त्याला ज्यूड लाँने वाँटसनच्या भूमिकेत छान साथ दिलीय.

तर एवढ नमनाला घडाभर तेल घातल्यावर आता मुख्य मुद्दयाकडे वळूया.
राँबर्टला शेरलाँकच्या भूमिकेत पाहिल्यावर मनात विचार आला की कोणता भारतीय अभिनेता शेरलाँक होम्स समर्थपणे साकारु शकेल?
मी माझे पर्याय देतेय.
ईतरानी वाटल्यास आणखी भर घालावी.
होम्सचाच विचार केल्याने वाँटसनच्या भूमिकेचा विचार राहिलेला आहे.
तर त्यासाठी पर्याय सुचवावेत.

प्रतिक्रिया

रजीत कपूर (व्योमकेश बक्षी फेम)
पंकज कपूर (करमचंद फेम)
रमेश भाटकर (कमांडर फेम)
भानु उदय (स्पेशल स्क्वाड फेम)
श्रीवल्लभ व्यास (माया मेमसाब फेम)

अमिताभ बच्चन (अशी भूमिका (पक्षी डिटेक्टिवची) त्याने कधी केल्याचे आठवत नाही परंतू तो ती समर्थपणे करू शकेल असा विश्वास वाटतो. तसेही शेरलॉक होम्सचे वर्णन वाचल्यास तो उंच व सडपातळ असून तसेच फारसा देखणा नसल्याचे कळते)

शाहरूख खान (इंग्रजांचा सूड उगवायचा असल्यास याहून उत्तम पर्याय शोधूनही सापडणार नाही)

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

रमेश भाटकर? अहो, त्यांचा मुलगा आता तिशीत आहे आणि तो प्राथमिक शाळेत असताना रमेश भाटकर मध्यमवयीन डिटेक्टीव्हचं काम करायचे! वर दिलेल्या यादीतले सर्वच कलाकार तसे म्हातारेच आहेत म्हणा! (भानु उदय आणि श्रीवल्लभ व्यास मला माहित नाहीत.)

सूड उगवण्याबद्दल सहमती. शिवाय दिग्दर्शक म्हणून 'हम ने जीना सीख लिया' या नावाखाली 'शाळा' कादंबरीची वाट लावणार्‍या उकेंना घेतलं म्हणजे होम्समधे देशी मसाले अगदी पुरेपूर उतरतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुगळे
पंकज कपूर जास्त प्रौढ वाटतोय
अर्थात हे माझ मत आहे

रमेश भाटकरबाबत विचार नव्हता केला

भानु उदय थोडा जास्त इँम्पसिल्व वाटतो

शाहरुख आणि सूड
ROFL ROFL ROFL ROFL
सहमत आहे
सर आर्थर डोक आपटून घेतील
प्रो मोर्टायटीच्या अगोदरच होम्सला मूठमाती देतील

.

अदितिचा लेख वाचणे अजून बाकी आहे. त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. लिंकही देता येईल काय?

अभिनयाचा विचार करता दिलेल्या पर्यायांपैकी इरफान खान आणि के के मेनन यांना कोणत्याही प्रकारच्या पात्राचं सोंग आणणं व्यवस्थित जमेल असं वाटतं. शेरलॉक होम्स पहाणं सोडून आमीर खान आणि कमल हासन यांना काय पहायचं? श्रेयस तळपदे कदाचित चांगलं सोंग आणू शकेल पण त्याचा चेहेरा seasoned (चांगला मराठी प्रतिशब्द?) वाटत नाही, तो अजूनही गोग्गोड, निरागसच दिसतो; निदान मलातरी तसा वाटतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याकडे चित्रपटाचा नायक म्हणजे चिकना पाहिजे असा समज आहे. येथले बहूतेक नायक (साउथचे सोडल्यास, काही प्रादेशीक भाषांतले व मराठीही) हे मॅनली वाटत नाही. आताचे नविन व वर उल्लेखलेले तर नाहीच नाही.
गुगळेंच्या म्हणण्याप्रमाणे होम्स देखणा नसावाच. ओमपुरी चालेल, अनिल कपुर चालेल, सयाजी शिंदे चालेल.

आणखी एक. आपण ज्या कादंबर्‍या वाचतो त्यातील नायक नायिंकांचे एक मनात चित्र उभे राहत असते. त्यावर होणारा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनातील व्यक्तीरेखेला न्याय मिळतोच असे नाही. यात अगदी शिवाजी महाराज यांचीदेखील व्यक्तीरेखा आली.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मॅनली नसणारे नायक म्हणजे काय याबद्दल कुतूहल आहे. विशेषतः एका पुरूषाच्या* नजरेतून मॅनली म्हणजे काय हे वाचायला आवडेल.

*पाषाणभेद हे पुरूष असून ते 'पाषू' नाहीत असा समज आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद पोस्ट केला होता पण टाईमआउट आला व कायतरी एरर आली होती. परत टायपतो.

मॅनली म्हणजे देखणा नसेना का पण बघणेबल चेहेरा, प्रमाणबध्द शरीर, भारतीय प्रमाणातील उंची, गोरा नसलेला पण काळासावळा तरूण, ओरीजन मिशाबिशा (दबंग सारख्या डुप्लीकेट नको), सरळ नाक. थोडक्यात म्हणजे मी. Smile

मला तर सयाजी शिंदे यासाठी योग्य वाटतो. ढेबरू होम्स कसा दिसेल कल्पना करा.

(आम्ही परकाया प्रवेश घेण्यात एक्सर्ट आहोत. त्यामुळे कधी पाषूही असतो.)


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सयाजी शिँदे आणि होम्स

हाय रे कर्मा

.

अरेरे, तुमच्या टाईम-आउट एररबद्दल स्वारी आहे.

माझ्या एका मित्राने, त्याच्या विशीत मिशा काढल्या तेव्हा त्याच्या माम्या, मावश्या, काकवांनी "आता तुझं लग्न कसं रे होणार?" अशी तक्रार केल्याचा इतिहास काही वर्षांपूर्वी ऐकला होता त्याची आठवण झाली. ते सांगताना उपस्थित सर्व आबालवृद्ध पोरं-पोरींची हसून हसून पुरेवाट झाली होती. पाभेकाका, तुमचं वय निदान ५० असावं असा अंदाज आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साऊथ मध्ये मिशा पुरूषाला मिशा असाव्याच लागतात. अर्थात त्यात मॅनलीच्या दृष्टीने काहीच वावगे नाही. पुरूष हा बायकी न दिसता पुरूषच दिसायला हवा.

माझे मागील वाक्यच पुन्हा उदधृत करतो:
आणखी एक. आपण ज्या कादंबर्‍या वाचतो त्यातील नायक नायिंकांचे एक मनात चित्र उभे राहत असते. त्यावर होणारा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनातील व्यक्तीरेखेला न्याय मिळतोच असे नाही.

>>> तुमचं वय निदान ५० असावं असा अंदाज आहे
हॅ हॅ हॅ... आम्ही १५ व्या शतकात होतो असाही पुरावा आंतरजालावर काही ठिकाणी भेटतो असे म्हणतात ब्वॉ.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

इरफान खान हा चांगला नट आहे पण त्याची प्रतिमा होम्सच्या वेळे प्रसंगी हाणामारी करण्याच्या, होम्सची बॉक्सिंग बद्दल माहिती असण्याच्या प्रतिमेत बसत नाही.

के के मेनन, आमीर खान हे तर अंगकाठीने सुटच होणार नाहीत. ड्रग्ज घेणारा, वेगवेगळे वेषांतर करणारा ह्या लोकांच्या प्रतिमेत मला तरी दिसत नाही. होम्सच्या वर्णनात डॉयल, 'वेळ आलीच तर तो चार हात करू शकतो पण तो कोणालाही भारी पडेल असे नाही', असे काहीतरी लिहतो.

विचारी चेहरा, चांगली अंगकाठी अश्या दृष्टीने विचार केल्यास सैफ अली खान किंवा अजय देवगण डोळ्यांसमोर येतात. रॉबर्ट डाउनिचा होम्स जरासा खेळकर दाखवला आहे, पुस्तकातला होम्स इतका खेळकर नाही. पण खेळकर होम्स दाखवायचा असेल तर देवगण कामाचा नाही.

-Nile

जेरेमी ब्रेटचा होम्स अतिशय उत्तम होता. डाउनिपे़क्षाही भारी.

------------------------
घणघणतो घंटानाद

ब्रेटचा होम्स संपूर्ण पाहिला आहे. त्याने कादंबरीतला होम्स चांगला वठवला आहे यात शंका नाही. पण जर डॉयलने पुस्तक २० व्या किंवा २१ वा शतकात लिहलं असतं तर तो होम्स डाऊनिसारखाच असता असं वाटतं. (पहिला डाऊनिचा होम्स 'सो-सो' होता. पण दुसर्‍या सिनेमात चांगला वठवला आहे.)

-Nile

दिसायला ठिक ठिक, सदृढ, दिसायला शिष्ठ असणारा?
अंअंअंअंअ....

मोनिष बेहल?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सैफ अली खान इज गुड चाँईस
त्याबरोबर अदितीने सुचवलेला श्रेयस तळपदे हा वाँटसनसाठी योग्य पर्याय वाटतो

.

आपला च्वाइस शिवाजी साटम (एसीपी प्रद्युम्न).
"दया, कुछ तो गडबड है...."

डॉक्टर वॉटसन म्हणून डॉक्टर साळुंखे चालतील.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिवाजी साटम

ROFL =))=))

.

होम्समध्ये एक भेदक नजर आणि समोरच्याच्या नजरेत भरणारा (आणि कदाचित अस्वस्थ करणारा) धारदारपणा मला आवडेल. त्या दृष्टीनं मला मोहन गोखलेला शेरलॉक होम्स म्हणून पाहायला आवडलं असतं.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

च्या**...आमचा मराठी बाणा उसळला की..

खेळकर होम्स (न बघता येण्यासारखा) - भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर
वरणभात होम्स - श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी
पुणेरी होम्स (कोकण्स्थ होम्स असेही वाचता येइल) - सुबोध भावे, सुनिल बर्वे
गाणारा होम्स - राहूल देशपांडे
गावठी होम्स - गिरीश कुलकर्णी

बाकी वॉटसनसाठी तुर्तास - आनंद ईंगळे.

ROFL ROFL
गाणारा होम्स काय ... पाय कुठे आहेत तुमचे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गाणारा होम्स काय ...

अहो तो व्हायोलीन वाजवायचा ना. आपल्याकडे नाही का प्रभाकर जोग हे गाणारं व्हायोलीन म्हणून प्रसिद्ध आहेत तसंच होम्सचं पण.

------------------------
घणघणतो घंटानाद