विधानसभेसाठी महाराष्ट्रातील लोकप्रीय राजकीय पक्ष कोणता ?

महाराष्ट्रात भाजपच्या स्थानिक नेत्यांपेक्षा मोदींच्या नावावर मते अधिक भिस्त अधिक आहे, हे सांगण्यासाठी आता कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही पण परदेश दौर्‍यांमध्ये अधिक व्यस्त राहील्याने मोदी स्वतः वेळ देऊ नाही शकले तरीही मोदी समर्थक भाजपाच्या पाठीशी उभी राहतील का ? खासकरून मोदी प्रचारात नाहीत आणि राज ठाकरे आहेत त्या वेळी राज ठाकर्‍यांचे पारडे जरासे जड होईल का ?

माझ्या अंदाजानुसार केंद्रसरकारच्या निवडणूका होऊन स्थिर स्थावर झाल्यावर राजयांची लोकप्रियता पुन्हा एकदा वर जाऊ शकते. काँग्रेस आणि शिवसेनेस त्यांची मते पक्षनेत्यांच्या नावावर नव्हे तर पक्षाच्या नावावर मिळण्याची शक्यता आहे तर मनसे, भाजपा, आणि राष्ट्रवादी मते पक्षांच्या नाववर नव्हे तर व्यक्ती म्हणजे राज, मोदी आणि शरद पवार यांच्या नावावर मिळण्याची शक्यता आहे. केंद्राच्या निवडणूकीनंतरचा अनपेक्षीत महत्वाचा बदल कदाचित रामदास आठवल्यांची स्विकार्हता महाराष्ट्रातील नॉन ट्रॅडीशनल वोटरबेस मध्ये वाढली असण्याची आणि या बाबत मोठे राजकीय पक्ष आणि कदाचित स्वतः रामदास आठवले राजकीय दृष्ट्या गाफिल सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार - राज ठाकरे आणि नंतर रामदास आठवलेंचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे. अर्थात रामदास आठवलेंच्या राज ठाकरे दिडपटीने लोकप्रियतेत पुढे असावेत शरद पवार राज ठाकरेंच्या दुप्पट तर मोदींची केंद्रीय निवडणूकी नंतर महाराष्ट्रातील लोकप्रीयता वाढून शरद पवारांच्या चक्क पाचपट पर्यंत वाढली असावी हे खासकरून त्यांची टिव्ही मिडीयातन हिंदी भाषणे आणि मुलाखती येऊ लागल्या नंतर हा महाराष्ट्रात बदल झाला असावा. हि सगळी माझी व्यक्तीगत मते आहेत आणि ती इतरांना मान्य असलीच पाहीजेत असे मुळीच नाही. महाराष्ट्रातील विधान सभा निवडणूकींना अजून तसा अवकाश आहे.

एक अधिक जनरल पोल लावला आहेच. लोकप्रीय नेत्यांची नावे लिहीली असलीतरी हा पोल महाराष्ट्रातील पक्षिय बलाची माहिती घेण्याच्या दृष्टीने आहे.

प्रतिक्रिया

तुम्ही कौलावर कौले लावत चालला आहात. अशा प्रकारच्या कौलांचे पुढे काय होते ते कळेल काय?

या कौलांचे रिझल्ट एकतर सिक्रेट नाहीत मत दिल्यानंतर लगेच दिसतात. ऐसी अक्षरेवर आत्तापर्यंत तरी कौलावर मतांची संख्या फारशी झाली असावे असे मला दिसले नाही त्यामुळे या कौल लावण्याचा अर्थ मर्यादीतच आहे. मी स्वतःतरी या कौलांच काहीच करणार नाही. फक्त राजकीय कौलांमुळे मतदेणार्‍यांची संख्या वाढली सहभाग वाढला तर इतर काही कौलांना फायदा होतो काय ते पाहतो आहे ! मोकळेपणाने सांगायचे झाले तर कौलांना व्हिजीटर आहेत पण मतदान प्रोपोर्शनेटली सध्या कमी आहे प्रतिसाद आणि मतदात्यांचे प्रोपोर्शन वाढवण्याची सिंप्ली मार्केटींग टॅक्टीक आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

समजा रामदास आठवले या मतप्रदर्शनात निवडून आले तर त्याचे विश्लेषण वगैरे काही होणार आहे काय? नुसते निकाल पाहून काहीच उपयोग नाही.

२०१४च्या लोकसभा निवडणूकीची पक्षवार टक्केवारी http://eciresults.nic.in/PartyWiseResultS13.htm?st=S13 इलेक्शन कमीशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेच. या कौलात पुरेसे मतप्रदर्शन होई पर्यंत काही महिने जातील आणि विधानसभेच्या दृष्टीने लोकांचा कल बदलल्यास लक्षात येऊ शकेल. (पण खर्‍या अर्थाने कल लक्षात येण्यासाठी भरपूर लोकांचे मतप्रदर्शन झाल्यासच अर्थ आहे हे खरे). विवीध ऑनलाईन वृत्तपत्रे जसे की इसकाळ वगैरे ऑनलाईन कौल घेत आहेत ते महत्वाचे आहेत कारण त्यांना मिळणार्‍या हिट्सची संख्या मोठी असते, पण वृत्तसंस्थांकडून एंप्लॉय होणारे कौल काही वेळा बायस्ड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐसी सारख्या स्वतंत्र ठिकाणी असणार्‍य कल घेण्याचे एक स्वतःचे महत्व असु शकते. ऐसी अक्षरेचा वाचक वर्गही वेगळा आहे. ऐसीने लेखक मंडळी आंमत्रणे देऊन जोडली असल्यामुळे ऐसीचा वाचकवर्ग तौलनीक दृष्ट्या कमी असला तरी येथे लेखक वाचकात प्रगल्भतेची वेगळी पातळी दिसून येते किमान पक्षी या वर्गाची स्वतःची मते लक्षात येऊ शकतील.

एकाच आकडेवारीचे प्रत्येकाचे विश्लेषण वेगळे असू शकते. ऐसी अक्षरेवर बरीच मंडळी विश्लेषण क्षमता ठेऊन आहेत ते आपापल्या पद्धतीने विश्लेषणे करू शकतात.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

घर

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

दलितांचे मतांचे राजकारण करणारे विविध पक्ष हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लोकप्रिय पक्ष आहेत.

शिवसेना आणि कंसात नेत्याचे नाव असे फक्त शिवसेच्याच बाबतीत का केले आहे?

बाकी लोकप्रियतेचा निकष काय? मिळालेली मते? कधी? लोकसभेत? त्यासाठी पोल का हवा, ती आकडेवारी उपलब्ध आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी लोकांच्या ऑनलाईन सर्चेसमध्ये शिवसेना आणि मनसेत शिवसेनेला सर्च अधीक जातो आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यात राज ठाकरेंना अधीक जातो. प्रत्यक्षात मते ज्यात्या एकाच बाजूला पडणार आहेत. राज ठाकरें एवजी मनसे आधी लिहिल तर राज यांची मत कमी दिसतील शिवसेना एवजी उद्धव ठाकरे हे नाव आधी टाकल तर उद्धव ठाकरेंची मते कमी दिसतील. असे होईलच असे नाही पण कौलात होता होईतो समतोल राहवा म्हणून तसे केले आहे.
(भाजपाने जसे गुजराथेतून मोदींना पुढे आणले तसे ; महाराष्ट्रात भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना माझ्या कडे सल्ला मागण्यास येण्याची शक्यता नाही तरीपण तिन्ही पक्षांना महाराष्ट्र पातळीवर कॅरीस्मॅईक नेतृत्व स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरून शोधण्याची गरज आहे असे माझे व्यक्तीगत मत आपल्या आपापसातील चर्चेसाठी नोंदवतो.)

(उद्धव ठाकरें राहूल गांधी ही संघटना घडवणारी मानस आहेत त्यांची मत त्यांच्या व्यक्तीमत्वा पेक्षा संघटनेच्या नावावर येण्याची शक्यता अधीक आहे. अर्थात महाराष्ट्रात व्यक्तीमत्व म्हणून उद्धव ठाकरे नि:संशय राहुल गांधींच्या पुढे आहेत, हे मी माझ्या स्रोतातील सर्च इंजीन अ‍ॅनालिसीसवर सांगतो आहे माझा तर्क चुकू सुद्धा शकतो. मीच बरोबर आहे असा माझा आग्रह नाही.)

(कौलाची उपयोगीततेच्याबाबतीत तसे प्रश्नाचे उत्तर याच धाग्यात इतर प्रतिसादास देऊन झाले आहे पण निवडनूकीच्या काही महिने आधी पर्यंत महाराष्ट्रीय शोधात राज ठाकरे मोदींच्या बरेच पुढे चालले होते ते मोदींच्या हिंदी भाषणांनतर मागे पडत गेले पण निवडणूकांनतर पुन्हा एकदा त्यांचा शोध वाढतो आहे असे माझ्या नोंदी दाखवताहेत गोष्टी जर एवढ्या वेगाने बदलू शकत असतील तर त्याची दखल घ्यावयास हवी माझे शोध मला व्यक्तीगत स्तरावर माहित होत असतातच पण इथला कौल माझ्याकडच्या माहितीची खात्री होण्यास मला अंशतः उपयूक्त ठरतो. इतरांना त्यांच्या पद्धतीने उपयूक्त ठरू शकेल.))

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.