श्रेणीकौल भाग-२ : येथील श्रेणीसुविधा साधारणतः प्रतिसादांचे सुयोग्य वर्णन दर्शवते का?

भाग १ |

इथे श्रेणीसुविधेवरून काहीशी नाराजी अनेकदा दिसते. या सुविधेमागचा उद्देश कोणताही/कसाही असला तरी त्याचा वापर कसा होतो हे जाणण्यासाठी हा कौल सुरू करत आहे.
या भागात केवळ एकच पर्याय निवडावा ही विनंती (काही तांत्रिक कारणाने तसा कौल सुरू करणे मला जमलेले नाही)

या श्रेणी कौल मालिकेत कृपया खरी व शक्य त्या सगळ्यांनी मते द्या जेणेकरून आवश्यक वाटल्यास या सुविधेत योग्य ते बदल करता येतील.

प्रतिक्रिया

तीनही कौल महत्त्वाचे आहेत. हा दुसरा कौल राहून जाऊ नये म्हणून वर काढतोय

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन श्रेण्या बहुतांश वेळा योग्यं असतात.
ऋण श्रेणी बाबत काही धाग्यांवर, जाणवले आहे की , आकसापोटी दिल्या गेल्या असतात.
अर्थात सरसकट सर्व ऋण श्रेण्या अयोग्य नसतात.

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मला श्रेणीगणतीतला श्रेण्यांचा दर्जा पुढच्या श्रेणीप्रदानामुळे बदलणे हा प्रकार आवडत नाही. त्याऐवजी, उदा. ४रोचक १मार्मिक अशी वेगवेगळी गणती दिसावी. सध्या ४ रोचक आणि नंतर एक मार्मिक पडली की सगळे ५ मार्मिक होऊन जाते.
काही लोक उदार आणि उमदेपणातून ऋण श्रेण्या धन करीत असतात. पण त्यामुळे या मागच्या मूळ हेतूला बाधा येते. अश्या वेळी धन-ऋण श्रेण्या प्रकारांसकट दिसाव्यात.
जास्तीत जास्त ५ पर्यंत पोचता येते. असे नसावे. ५ नंतरही पुढचे क्रमांक दिसत राहावे.
आकसाने मुद्दाम ऋण श्रेण्या देण्याचे प्रकार वातावरण बिघडवतात.
फक्त श्रेण्या दिल्याने प्रतिसादसंख्या कमी भासते आणि संस्थळाचा चेहरा भकास आणि मरगळलेला दिसतो. इथे काही हालचालच नाही असे उगीचच वाटते.

होय, बहुतेकदा प्रतिसादाला मिळालेल्या केवळ धन श्रेण्या योग्य वर्णन दर्शवतात, मात्र ऋण श्रेण्यांबद्दल तसे म्हणता येणार नाही

हा पर्याय निवडला आहे.

> प्रतिसादाला मिळालेल्या केवळ धन श्रेण्या योग्य/विपरित वर्णन दर्शवतात
याचे सुयोग्य उत्तर देण्याकरिता ही शंका आहे :
काही प्रतिसादांना अनेक लोकांनी श्रेणी दिलेल्या असतात. त्यातल्या त्यात शेवटली श्रेणी कुठली हे स्पष्ट दिसते. परंतु आदल्या श्रेणी कुठल्या हे समजायचा मार्ग आहे का?

सध्या जे उत्तर दिलेले आहे, ते त्या एका शेवटच्या श्रेणीबाबत दिलेले आहे.

श्रेणी संकल्पना मुळातच फेल गेली आहे. आपल्या कंपूतील (डाव्या विचारांच्या) लोकांच्या कोणत्याही प्रतिसादाला पॉझिटिव्ह श्रेणी आणि डाव्या मतांच्या विरोधातील प्रतिसादांना निगेटिव्ह श्रेणी दिली जाते. त्यातून कंपूबाजीला अजून प्रोत्साहन मिळाले आहे. श्रेणीपध्दत ही वाईट आहे आणि ऐसीच्या गळ्यातील धोंड बनली आहे. त्या कारणामुळे ऐसीअक्षरे हे मिसळपाव किंवा मायबोलीच्या लेव्हलला दहा हजार वर्षात जाऊच शकणार नाही. याच श्रेणी पध्दतीमुळे आणि कंपूबाजीमुळे मिसळपाव आणि मायबोलीवरील अनेक चांगले लिहिणारे इथे येत नाहीत.

तरीही मी श्रेणी वापरतो का? हो. वापरतो. इतरांनी कंपूबाजीमुळे मला निगेटिव्ह श्रेणी दिली तर मी गप्प बसावे अशी अपेक्षा करता येणार नाही. असे अनेक सदस्यांविषयी लिहिता येईल. त्यातूनच ऐसीवरील वातावरण बिघडते.

कल्पना आहे की या प्रतिसादालाही निगेटिव्ह श्रेणी दिली जाऊ शकते तरी माझे मत मांडत आहे.

श्रेणीपद्धतीबद्दल मतभेद होऊ शकतील पण ऐसीची वाढ त्यावर अवलंबून असेल असे वाटत नाही. इथे वातावरण निकोप आहे. शिवीगाळ होत नाही. एकमेकांचा अपमानार्थ एकेरी उल्लेख केला जात नाही. चिखलफेक होत नाही. टोकाच्या मतांचा प्रतिवाद शांतपणे केला जातो. सगळे मिळून हल्ला करीत नाहीत. (आधी सगळे मिळून आहेतच किती, तर ते मिळून हल्ला करतील?) 'खिक्' 'खुक्' 'खॅक्' असे निरर्थक प्रतिसाद दिले जात नाहीत. स्माय्लीज निरर्थकपणे वापरल्या जात नाहीत. हो आणि फारसे कोणी बॅनही होत नसावे. प्रतिसाद उडवायची वेळच येत नसावी कारण ते सभ्य भाषेत असतात. वैयक्तिक टर उडवणारे नसतात.
ऐसीने इतरांसारखे का व्हावे? वेगळे अस्तित्व आहे ते बरे आहे की.

हल्ली बॅटमन इथे का लिहित नाहीत हो? डायरेक्ट कोणाला बॅन करायची गरजच पडत नाही. इथले वातावरणच इतके विचारजंती, उच्चभ्रू आणि स्वयंघोषित पुरोगामी आहे की उजव्या विचारांचे लोक इथे फार काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून कोणाच्या अंगावर जायची वेळच येत नाही. इइथल्या वातावरणामुळे विरोधी विचार असलेल्यांनी स्वतः सोडून जावे असे वाटावे असे वातावरण निर्माण केले की मग परत इथे शांतपणे प्रतिवाद केला जातो असा टेंभा मिरवायला ऐसीवाले मोकळेच आहेत की. मिसळपाव आणि मायबोलीवर चालतात तसे वादविवाद होणार कसे इथे? कारण तू माझी पाठ खाजव आणि मी तुझी पाठ खाजवतो असा अहो रूपम अहो ध्वनीम प्रकार आहे हो इथे.

जालावर जितकी अधिक मराठी संस्थळे निघतील तितके चांगलेच आहे ना? आणि सगळी संस्थळे सारखीच का असावी? नीश असू दे की प्रत्येकाची. अमुक ठिकाणी अशी खडाजंगी/वादविवाद होतात तसे इथे होत नाहीत हा दोष की गुण? अमुक ठिकाणी आय्डीजची कापाकापी करावी लागते, आय्डीजचे दशावतार होत राहातात. होऊ देत की. काही संस्थळे बोलकी/बोलभांड असतात तर काही मितभाषी. काही अल्पजीवी, काही दीर्घजीवी. असू देत की. काही सरळ चालतात, काही तिरकी तर काही उड्या मारत.
ठीकच आहे की.
विचारजंत आणि स्वयंघोषित पुरोगामी या शब्दप्रयोगांबद्दल काहीच म्हणायचे नाही. ज्याची त्याची आवड-निवड. ज्याचा त्याचा आक्षेप. ज्याचे त्याचे मत. ते प्रमाण मानण्याचे कारण नाही. नीचभ्रूवाल्यांकडे अधिक्षेपाने न पाहाणारे उच्चभ्रू असणे हाही दोषच झाला की काय.

कोणी सोडून जाणे याला तेथील लोकच्च फक्त जबाबदार असतात आणि त्या व्यक्तीचे मात्र काही उत्तरदायित्व नसते हा विचारच एकूण उदाहरणार्थ रोचक वाटला. असो ज्याची त्याची जाण ...

सध्या श्रेणीव्यवस्थेबाबत माझे मत निगेटिव्ह आहे.
----------------------------
परंतु तुम्ही बॅटमॅन इथे का लिहीत नाही असा प्रश्न विचारला आहे त्याप्रमाणे नितिन थत्ते तिथे का लिहीत नाही असा प्रश्न विचारता येईल. (तसे बिपिन कार्यकर्ते दोन्हीकडे लिहीत नाहीत. त्याला दोन्ही संस्थळे कारणीभूत असतील असे नाही).

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

हल्ली बॅटमन इथे का लिहित नाहीत हो?

मी लहान आहे हत्तीपेक्शा पण एक फुकट सल्ला देतो
प्राण्याचं नाव घेत्लं तर वाईट वागवतात इथले लोक
तुम्ही नाव बदला
आणि ते जरा न्युमरोलोजी पण बघा
झालच तर गोमेदचा खडा वगेरे
मग चांगले लोक भेटतील
तुमची पण पाठ खाजवायला

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

+१. केवळ श्रेणी नको म्हणून हा प्रतिसाद.

ऐसीअक्षरे हे मिसळपाव किंवा मायबोलीच्या लेव्हलला दहा हजार वर्षात जाऊच शकणार नाही.

(१) अन्य संस्थळांची नावे तुम्ही प्रथम घेतली आहेत
(२) म्हणून मला घ्यायला लागतायत. हां तर - वरील वाक्याप्रमाणेच मिपा/माबो हेदेखील ऐसीच्या लेव्हल वर येणार नाहीतच ना. फक्त भरमसाठ लोक हा क्रायटेरीया नसतो, क्वालिटी हादेखील असतो..... बाय द वे मी माबोवर कधीच गेलेले नाही तिथला क्राऊड कशा धाटणीचा आहे ते मला माहीत नाही.

फक्त भरमसाठ लोक हा क्रायटेरीया नसतो, क्वालिटी हादेखील असतो

तेच म्हणतो. क्वालिटी याच क्रायटेरियावर ऐसीअक्षरे शेकडो योजने मागे आहे.

श्रेणी पद्धत नकोच.
मला स्वतःलाही या पद्धतीमुळे सुरुवातीला फक्त थोडेच प्रतिसाद दिसायचे आणि उरलेले झाकलेले आहेत हेच कळायचे नाहीत.
सर्वच वाचक लॉग इन करूनच वाचतात असे नाही. त्यांच्यापर्यंत, ज्यांचे प्रतिसाद झाकलेले आहेत त्यांचे विचार अडथळा पार केल्यावरच पोहोचतात, आणि बहुतेक वेळा हा अडथळा आहे हेच त्या वाचकांना माहित नसते.
वाचकांच्या बुद्धीचा, आकलनशक्तीचा, आवडीनिवडीचा आदर करणे आणि त्यांना त्यांची निवड करू देणे हे एक जबाबदार संपादक मंडळाचे कर्तव्य आहे असे मला वाटते.
श्रेणी पद्धत हवीच असल्यास प्रतिसाद झाकणे हा प्रकार बंद करावा असे मला वाटते.
विस्कळीत प्रतीसादाबद्धल क्षमस्व.

काही तांत्रिक माहिती -

प्रतिसाद झाकलेले असतात ते १ च्या खाली गुणांक असणारे. ते डीफॉल्ट सेटिंग आहे, पण कोणालाही, सदस्यत्व न घेताही सगळे प्रतिसाद दिसू शकतात. ते ब्राऊजर संबंधित सेटिंग असतं. ठराविक ब्राऊजर आणि ठराविक उपकरणावर एकदा सेटींग केलं की कॅशे रिकामी करेस्तोवर ते टिकून राहतं. ते व्यवस्थापकांना बदलता येत नाही.

एका प्रतिसादाला एकापेक्षा अधिक श्रेणी मिळाल्या असतील तर त्यातली prevailing श्रेणी दिसते. म्हणजे तीन सकारात्मक असतील तर त्यातली 'वरच्या श्रेणी'ची श्रेणी दिसते. उदा. रोचक आणि मार्मिक असतील तर मार्मिक दिसते. सकारात्मक/नकारात्मक असतील तर ज्या प्रकारच्या श्रेणी जास्त असतील त्यातली एक दिसते. एकेक सकारात्मक-नकारात्मक असतील तर जी शेवटी दिलेली असेल ती दिसते. हे समजण्यासारखं लिहिता आलंय का नाही याबद्दल मलाच शंका आहे. पण मुद्दा असा की कोणकोणत्या श्रेणी मिळालेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिसादासोबत दाखवणं सध्यातरी माझ्या पे-ग्रेडच्या वरचं काम आहे.

---

क्वांटिटी-क्वालिटी प्रकरणाबद्दल -

जितकी संस्थळं सुरू होतील तेवढं चांगलंच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आवडीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या जागा असाव्यात. सगळ्यांना सगळ्या (जालीय वा वास्तवातल्या) जागा आवडाव्यात, आपल्या वाटाव्यात असा आग्रह धरणं अनाठायी आहे. म्हणजे एक प्रकारे हे 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आहे. ज्यांना पुरेशी क्वालिटी आणि/किंवा क्वांटिटी जमवता येणार नाही ती संस्थळं बंद पडतील. ज्यांना जमेल ती संस्थळं टिकून राहतील. अमकं एक संस्थळ जगलंच पाहिजे, त्या संस्थळाने ठराविक जीवनपद्धतीच स्वीकारली पाहिजे या आग्रहातून एका छापाचे गणपती तयार होतील. ही गोष्ट जालसमूहासाठी पोषक नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.